वर्षाविहार २०१६: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by admin on 14 May, 2016 - 02:06

यंदाचा (२०१६) वर्षाविहार हा आपला १४वा ववि आहे.. गेली १३ वर्ष उत्साहात साजर्‍या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

***********************

माहिती इंद्रधनुष्य यांनी दिली आहे. यांत जसं जमेल तसं जुन्या समिती सदस्यांनी भर घालावी.

अंदाजे ५० ते ७५ मायबोलीकर ववि साठी येतात... त्या अनुशंगाने लिहित आहे.

१. सुरुवात कशी होते. >>>
१.१ मे महिन्याच्या अखेरीस पुणेकर आणि मुंबईकर संयोजक ववि स्थळ शोध मोहिम आखतात.
१.२ दोन्ही संयोजक टिम आपले फिडबॅक संयोजकाच्या BBवर देऊन चर्चा करतात.
१.३ शक्य असल्यास फोनवर/मेलवर/प्रत्यक्ष भेटूनही स्पॉट बद्दल चर्चा करतात.

२. ठिकाण कसं निवडलं जातं.>>> ववि योग्य ठिकाण निवडण्यासाठी खालिल बाबिंचा विचार केला जातो.
२.१ पुणे-मुंबईला मध्यवर्ती ठिकाणाचा पर्याय शोधणे... (लोणावळा, खंडळा, खोपोली, कर्जत)
२.२ मागिल वविच्या ठिकाणाची पुर्नरावृत्ती टाळणे...
२.३ ववि साठी निवडलेल्या रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे प्रत्येकी रु.२५० - ३५०/- च्या दरम्यान असावे.
२.४ रिसॉर्टच्या भाड्यात लहान मुलांसाठी ५०% सूट आहे का ते पहाणे.
२.५ रिसॉर्टवर इलेक्ट्रिसिटीला बॅकअप सिस्टम असावि जेणे करून सांसकृतिक कार्यक्रमाच्या वेळी स्पिकर मधे वत्यय येऊ नये.
२.६ खुर्च्या, स्पिकर व माईकची सोय रिसॉर्टवर आहे का ते पहाणे.
२.७ रिसॉर्टवर २ चेंजिंग रुम असव्यात. (चेंजिंग रुमचे भाडे गृपच्या संखेनुसार negotiate करावे)
२.८ रिसॉर्टवरील जेवण, नाष्ट्याच्या मेन्यूची विविधता तपासणे.
२.९ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एखादा हॉल किंवा शेड उपलब्ध आहे का ते पहाणे.

३. पैसे कसे गोळा केले जातात. >>>
३.१ वविची दवंडी पिटल्यावर पैसे गोळा करण्याचे ठिकाण आणि तारिख त्या दवंडीत नमुद केली जाते.
३.२ वविच्या १ आठवडा आधी नोंदणीकृत सभासदांची वर्गणी जमा करण्यासाठी पुणे संयोजक बाल गंर्धवच्या स्पॉटवर तर मुंबई संयोजक शिवाजी पार्कातील स्पॉटवर भेटायची जागा निश्वित करतात.
३.३ जमा झालेल्या पैश्यातून रिसॉर्टला काही अनामत रक्कम द्यावि लागते.
३.४ वर्गणीची वर्गवारी खालिल प्रमाणे करावि
A. रिसॉर्टचे भाडे प्रत्येकी
B. बस भाडे प्रत्येकी
C. सांस्कृतिक कार्यक्रमांची वर्गणी प्रत्येकी
D. चेंजिंग रुमचे भाडे
E. स्पिकर, माईक आणि खुर्च्यांचे भाडे

४. तिथले कार्यक्रम कसे ठरतात? >>> सांस्कृतिक समिती तेथिल कार्यक्रमांची जबाबदारी पार पाडते... सां.स.ने याबाबत मार्गदशन करावे.

५. जाण्याची सुविधा? त्याचं संयोजन कसं होतं >>>
५.१ जाण्याची सुविधा बसने केली जाते.
५.२ स्वतःच्या गाडीने येणार्‍या सदस्याकडून बसची वर्गणी घेतली जात नाही.
५.३ संयोजकांनी बसची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी खालिल गोष्टी पडताळून पहाव्यात...
a. गृपच्या नोंदणी नुसार १८ सिटर, २२ सिटर, २६ सिटर की ५४ सिटर बस सोईची पडेल ते ठरवणे.
b. बसची रक्कम Lumpsum ठरवली असेल तर त्यात Toll include आहे का ते पहाणे.
५.४ वविच्या २-३ दिवस आधी वविच्या BBवर बसची खालिल माहिती पुरविणे.
a. बसचा रुट (pickup points)
b. pickup point वरील वेळ
c. शक्य असल्यास बस क्रमांक, बसचा रंग, बसचा प्रकार याची माहिती देणे.

६. त्या दिवशी करण्याच्या गोष्टी. >>>
६.१ सगळ्या सदस्यांना फोन करून बसच्या ठरलेल्या वेळेवर pickup point वर येण्याची आठवण करणे.
६.२ म्युझिक सिस्टम, सांस्कृतिक कार्यक्रमाच सामान, बसमधील उपहार, First Aidच सामान इत्यादीची योग्य ती सोय करणे.
६.३ रिसॉर्टच्या वाटेवर शक्य असल्यास चहापानाचा कार्यक्रम पार पाडणे.
६.४ रिसॉर्टवर पोहचल्यावर चेंजिंग रूमचा ताबा घेऊन सभासदांची योग्य ती सोय करणे.
६.५ रिसॉर्टवर सांस्कृतिक समितीला म्युझिक सिस्टमची सोय उपलब्ध करून देणे.
६.६ रिसॉर्टवरील नाष्टा, जेवण, चहापान योग्य त्या वेळी पार पाडणे.
६.७ रिसॉर्टचे भाडे चुकते करून रीसिट घेणे.
६.७ संध्याकाळी ५च्या दरम्यान सगळे कार्यक्रम आटोपून एक गृप फोटो काढून परतीच्या प्रवासाला लागणे.

७. काही विशेष सूचना: ज्या पाळायला कींवा टाळायला हव्यात.
७.१ वविच्या ठिकाणी मद्दपान / धुम्रपान टाळणे.
७.२ सगळ्यांना छत्री, रेनकोटची सक्ती करणे.
७.३ रिसॉर्टवर स्विमिंग पूल असेल तर जलक्रिडा करणार्‍या सभासदांनवर लक्ष ठेवणे आवश्यक.
७.४ बसची सोय शक्यतो माहितीतील ट्रॅव्हल्स वाल्याकडूनच करणे... (ट्रॅव्हल्सवाले ऐन वेळी बस बदलतात)
७.५ वविचा हिशोब त्या नंतरच्या आठवड्यात पार पाडून अ‍ॅडमिनकडे सुपुर्द करणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांनो, टी.पी. थांबवा.

मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपापल्या शहरात, नवीन आणि जु. जा. संयोजकांची सभा आयोजित करा.

पायलट ची घोषणा करा, टिम करा......

चला कामाला लागा........

ववीचे ठिकाण कसे कसावे याबाबत बरेच चर्चिले गेले आहे.
नवीन इच्छुकांनी जुने धागे वाचुन काधणे.

ठिकान हे पुणे- मुंबै च्या मध्यात असावे, स्त्री- पुरु षांसाठी वेगवेगळ्या खोल्या, जेवणाची व्यवस्था, स्विमिंग पुल, गेम्स, सांस्कृतिक कार्य्क्रमासाठी हॉल, माइक व्यवस्थे सहित, माफक भाडे इ. बेसिक गोष्टी आहेत.

माहिती इंद्रधनुष्य यांनी दिली आहे. यांत जसं जमेल तसं जुन्या समिती सदस्यांनी भर घालावी.

अंदाजे ५० ते ७५ मायबोलीकर ववि साठी येतात... त्या अनुशंगाने लिहित आहे.

१. सुरुवात कशी होते. >>>
१.१ मे महिन्याच्या अखेरीस पुणेकर आणि मुंबईकर संयोजक ववि स्थळ शोध मोहिम आखतात.
१.२ दोन्ही संयोजक टिम आपले फिडबॅक संयोजकाच्या BBवर देऊन चर्चा करतात.
१.३ शक्य असल्यास फोनवर/मेलवर/प्रत्यक्ष भेटूनही स्पॉट बद्दल चर्चा करतात.

२. ठिकाण कसं निवडलं जातं.>>> ववि योग्य ठिकाण निवडण्यासाठी खालिल बाबिंचा विचार केला जातो.
२.१ पुणे-मुंबईला मध्यवर्ती ठिकाणाचा पर्याय शोधणे... (लोणावळा, खंडळा, खोपोली, कर्जत)
२.२ मागिल वविच्या ठिकाणाची पुर्नरावृत्ती टाळणे...
२.३ ववि साठी निवडलेल्या रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे प्रत्येकी रु.२५० - ३५०/- च्या दरम्यान असावे.
२.४ रिसॉर्टच्या भाड्यात लहान मुलांसाठी ५०% सूट आहे का ते पहाणे.
२.५ रिसॉर्टवर इलेक्ट्रिसिटीला बॅकअप सिस्टम असावि जेणे करून सांसकृतिक कार्यक्रमाच्या वेळी स्पिकर मधे वत्यय येऊ नये.
२.६ खुर्च्या, स्पिकर व माईकची सोय रिसॉर्टवर आहे का ते पहाणे.
२.७ रिसॉर्टवर २ चेंजिंग रुम असव्यात. (चेंजिंग रुमचे भाडे गृपच्या संखेनुसार negotiate करावे)
२.८ रिसॉर्टवरील जेवण, नाष्ट्याच्या मेन्यूची विविधता तपासणे.
२.९ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एखादा हॉल किंवा शेड उपलब्ध आहे का ते पहाणे.

३. पैसे कसे गोळा केले जातात. >>>
३.१ वविची दवंडी पिटल्यावर पैसे गोळा करण्याचे ठिकाण आणि तारिख त्या दवंडीत नमुद केली जाते.
३.२ वविच्या १ आठवडा आधी नोंदणीकृत सभासदांची वर्गणी जमा करण्यासाठी पुणे संयोजक बाल गंर्धवच्या स्पॉटवर तर मुंबई संयोजक शिवाजी पार्कातील स्पॉटवर भेटायची जागा निश्वित करतात.
३.३ जमा झालेल्या पैश्यातून रिसॉर्टला काही अनामत रक्कम द्यावि लागते.
३.४ वर्गणीची वर्गवारी खालिल प्रमाणे करावि
A. रिसॉर्टचे भाडे प्रत्येकी
B. बस भाडे प्रत्येकी
C. सांस्कृतिक कार्यक्रमांची वर्गणी प्रत्येकी
D. चेंजिंग रुमचे भाडे
E. स्पिकर, माईक आणि खुर्च्यांचे भाडे

४. तिथले कार्यक्रम कसे ठरतात? >>> सांस्कृतिक समिती तेथिल कार्यक्रमांची जबाबदारी पार पाडते... सां.स.ने याबाबत मार्गदशन करावे.

५. जाण्याची सुविधा? त्याचं संयोजन कसं होतं >>>
५.१ जाण्याची सुविधा बसने केली जाते.
५.२ स्वतःच्या गाडीने येणार्‍या सदस्याकडून बसची वर्गणी घेतली जात नाही.
५.३ संयोजकांनी बसची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी खालिल गोष्टी पडताळून पहाव्यात...
a. गृपच्या नोंदणी नुसार १८ सिटर, २२ सिटर, २६ सिटर की ५४ सिटर बस सोईची पडेल ते ठरवणे.
b. बसची रक्कम Lumpsum ठरवली असेल तर त्यात Toll include आहे का ते पहाणे.
५.४ वविच्या २-३ दिवस आधी वविच्या BBवर बसची खालिल माहिती पुरविणे.
a. बसचा रुट (pickup points)
b. pickup point वरील वेळ
c. शक्य असल्यास बस क्रमांक, बसचा रंग, बसचा प्रकार याची माहिती देणे.

६. त्या दिवशी करण्याच्या गोष्टी. >>>
६.१ सगळ्या सदस्यांना फोन करून बसच्या ठरलेल्या वेळेवर pickup point वर येण्याची आठवण करणे.
६.२ म्युझिक सिस्टम, सांस्कृतिक कार्यक्रमाच सामान, बसमधील उपहार, First Aidच सामान इत्यादीची योग्य ती सोय करणे.
६.३ रिसॉर्टच्या वाटेवर शक्य असल्यास चहापानाचा कार्यक्रम पार पाडणे.
६.४ रिसॉर्टवर पोहचल्यावर चेंजिंग रूमचा ताबा घेऊन सभासदांची योग्य ती सोय करणे.
६.५ रिसॉर्टवर सांस्कृतिक समितीला म्युझिक सिस्टमची सोय उपलब्ध करून देणे.
६.६ रिसॉर्टवरील नाष्टा, जेवण, चहापान योग्य त्या वेळी पार पाडणे.
६.७ रिसॉर्टचे भाडे चुकते करून रीसिट घेणे.
६.७ संध्याकाळी ५च्या दरम्यान सगळे कार्यक्रम आटोपून एक गृप फोटो काढून परतीच्या प्रवासाला लागणे.

७. काही विशेष सूचना: ज्या पाळायला कींवा टाळायला हव्यात.
७.१ वविच्या ठिकाणी मद्दपान / धुम्रपान टाळणे.
७.२ सगळ्यांना छत्री, रेनकोटची सक्ती करणे.
७.३ रिसॉर्टवर स्विमिंग पूल असेल तर जलक्रिडा करणार्‍या सभासदांनवर लक्ष ठेवणे आवश्यक.
७.४ बसची सोय शक्यतो माहितीतील ट्रॅव्हल्स वाल्याकडूनच करणे... (ट्रॅव्हल्सवाले ऐन वेळी बस बदलतात)
७.५ वविचा हिशोब त्या नंतरच्या आठवड्यात पार पाडून अ‍ॅडमिनकडे सुपुर्द करणे.

नवीन काही आयडिया हवी असेल तर एक सुचवतो.

मावळ, मुळशी तालुका, रायगड जिल्हा, किंवा कर्जत खोपोली या ठिकाणी कुणाच्यातरी ओळखीने भातशेतीला भेट द्यावी. जमल्यास मस्त लावणी वगैरे करावी गुडघाभर चिखलात. आणी बांधावर बसून जेवण. सोबत रिप-रिप पाऊस असेलच. (अर्थात हे जुलै मध्यातच शक्य आहे)

बघा आवडते काय. Wink

अत्यंत विस्तृत माहिती...
मी सांगितलेला पर्याय चांगला आहे... भातशेती,पाणी अक्च्युअल ववि होईल...कुठेही कृत्रिम न वाटणार वातावरण... फक्त प्रवास लांबचा आहे... मुम्बईकरांसाठी ...
दुसरा पर्याय जुन्नर जवळ कुठेही लोकेशन चांगलेच आहे...तिथल्या माबोकरानी सुचवावे...अर्थात योग्य वाटल्यास...

ववि ला माबोकर आपापल्या परिवार अथवा आई वडिलांना घेऊन येतात. ट्रेक आणि इतर अंगमेहनातीची कामे सगळ्यांना जमतीलच असं नाही.

आणि पुणे आणि मुंबई सोडून इतर कुठेही ववि ठरवला तर प्रवासातच जास्त वेळ जाईल. मागे माळशेज जवळ ववि ठरवला होता पण नाशिक मधून कोणीही येऊ शकलं नाही. त्यावर्षी मुंबई आणि पुणेकर दोन्ही खूप उशिरा घरी पोहोचले.

नील. +१
पुण्याची बस त्यावेळेस बरीच उशीरानी पोहोचली होती.

तीन-साडेतीन तासांचा प्रवास (बसथांबे + चापाणी धरून, बहुतेक) भरपूर होतो कारण परतीच्या प्रवासालाही तेव्हढाच वेळ लागतो.

ववि ला येणं जमणार नाही, पण यंदा टी-शर्ट असावेत ही इच्छा आहे. Happy
शेवटच्या वेळेला घेतलेले टी-शर्ट आणि बॅग एकदम मस्त होते.

विनय, नील, मयुरेश, हिम्या, दक्षीणा...
तुमच्या सोबत या वर्षी पुन्हा एकदा 'व-वि - २०१६'च्या संयोजनात सहभागी व्हायची ईच्छा आहे...
मला सामील करुन घेताय का? जास्त काही नाही 'मुंबईचं पुण्याला'... आणि 'पुण्याचं मुंबईला'... (अरे, एsss... प.पु. घारुअण्णा स्टाईलने नव्हे...) करु शकेन... बघा, विचार करुन कळवा काय ते...
वाट बघतोय...

आशु +१
नील नी मस्त लिहिल आहे. ती पोस्ट अ‍ॅडमिन हेडर ला टाकलीत तर उत्तम.

ववि म्हणजे सोहळा असतो मायबोलीसाठी. नविन मंडळीनी आवश्य अनुभव घ्यावा.
जुन्यांनी जाऊ नये अस म्हणत नाहिये Wink

नील, मुग्धा , विनय , दक्षिणा यांनी सूत्र हातात घेतली आहेत म्हणजे ववि जोरदार होणार
लगे रहो लोक्स. Happy

हिम्या, मुग्धा आत्ताच्या घडीला हो च हाय, मग ठिकाण आणि दिवस यांच काय म्हणण आहे त्यावर उरलेल हो Happy
काही लागलं तर कळवा ते करायला टायम हाय.

देसाइ, वाट कोणाची पाहाताय?
घरंच कार्य आहे हे?

तुम्ही पुण्याकडुन की मुंबई कडुन ते सां गा?

मस्त व विस्तृत पोस्ट नील. रिसॉर्टचे वन डे पिकनिक पॅकेज / खर्चाचा आकडा पुन्हा बघणार का एकदा? माझ्या माहितीत आजकाल किमान ४०० - ५०० ₹ च्या आत पॅकेज जनरली मिळत नाही. मिळत असेल तर उत्तमच आहे!

Pages