दगाबाज नाशिबाचे वाहन !

Submitted by सुप्रिया जाधव. on 9 May, 2016 - 13:27

आठवणींचे सरेल ईंधन
नैराश्याचे थांबवू ज्वलन !

किती चांगला रस्ता शोधा
दगाबाज नशिबाचे वाहन !

घाट्यामधला सौदा झाला
नको तिथे गुंतत गेले मन !

झोतासरशी पांगुन गेले
भरल्यासरशी विरलेही घन !

जाणतो जरी फसवे मृगजळ !
निवडूंगाचे शहारते तन

परस्परांना बांधुन घाले
आमच्यातील वादंग गहन !

स्वैर भरारी दहा दिशांना ..
ह्या विचारांस ठेंगणे गगन !

कणिक तिंबते आयुष्याची
माणुसकीचे मिसळुन मोहन !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्यातील वादंग गहन ! - अडखळलो… एक मात्रा जास्त आहे. लय ही बिघडते आहे.

ह्या विचारांस ठेंगणे गगन ! ऐवजी 'विचारांस ह्या ठेंगणे गगन !' जास्त चांगले लयीत बसेल…

घाट्यामधला सौदा झाला
नको तिथे गुंतत गेले मन !

वरील शेर आवडला....

वैभव धन्यवाद !

वादंग आणि गहन ह्या पाठोपाठ आलेल्या शब्दांतील सामायिक ग अक्षरामुळे थोडासा रसभंग होत असावा असे वाटते. बाक़ी ह्या विचारांस ठेंगणे गगन वर विचार चालू आहे.

सुप्रिया

ओके

लय गडबडली अनेक जागी
मात्रावृत्त अजून स्मूथली हाताळले जायला हवे होते

.

मात्रा वृत्त हाताळताना सहसा अखंड गा ह्या लयीत हाताळावे बरे पडते
अगदीच गरज लागली तर एका गा चे दोन ल करताना एकतर ते सलग यावेत किंवा अगदीच एखादा गा सोडून यावेत असे झाल्याने फार गडबड जाणवत नाही किंवा तेही न जमले तर एका शब्दात ते २ ल यावेत असेआनेक जण पाहतात असे मी पाहिले आहे (म्हणून सांगत आहे )

आणि मीटर अगदीच इतका छोटा असल्यास मात्रांचे गट (लयखंड) पाडत आणि त्यातही यती-बिती पाळत बसू नये असे माझे मत

चांगली सुचवणी... विचार करते.... धन्यवाद !

आणि हो मात्रांचे. ढोबळ मानाने प्रचलित झालेले नियम जसे एका गा ऐवजी ल ल लागून घेणे अथवा ल नंतर एखादा गा नंतर ल.....हे ही ठावूक आहेत....इथे लिहिल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद !!

सुप्रिया !