पहिले

Submitted by रोहिणी निला on 6 May, 2016 - 09:14

झाले म्हणून आणि ऐकून शब्द सगळे
तरीही उरात उरले अव्यक्त प्रेम पहिले

आता मुशाफिरीला पर्याय नाही उरला
चकव्यात सोडले मी माझेच गाव पहिले

होता अटीतटीची सगळे बघेच नुसते
आवेश मात्र यांचा जणू बाजीराव पहिले

जे जेवले सुखाच्या सुग्रास पंगतींना
टाकून दुःख पानी गेले निघून पहिले

हातात रंगवूनी मेंदीस कोणी आले
नक्षीतुनी फिकटले माझेच नाव पहिले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह चांगली वाटली कविता / गझल
आम्हाला तंत्रातले काही फारसे कळत नाही,
पण आशय भावला की चांगले वाटते.