Submitted by जयदीप. on 1 May, 2016 - 21:28
आपल्या हाती कुठे आकार असतो
तो ठरवतो सर्व, जो कुंभार असतो
ज्या दिव्याची ज्योत थोडी उंच असते
त्या दिव्याखाली कमी अंधार असतो
याचसाठी जग तुला आैषध सुचवते
राग येणे हा म्हणे आजार असतो
सोडली नसती प्रवाहाधीनता मी
जर तुझ्याइतकाच मी लाचार असतो
राहते स्पर्शात ओतत प्रेम बहुधा
तो तिच्यासाठी जरी व्यवहार असतो
जयदीप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्या दिव्याची ज्योत थोडी उंच
ज्या दिव्याची ज्योत थोडी उंच असते
त्या दिव्याखाली कमी अंधार असतो>>छान
राहते स्पर्शात ओतत प्रेम बहुधा
तो तिच्यासाठी जरी व्यवहार असतो>>व्वा
वा छान
वा
छान
वा
वा
व्यवहार - उत्तम शेर
व्यवहार - उत्तम शेर
मतला सहज सुरेख! दिव्याची
मतला सहज सुरेख!
दिव्याची ज्योतही छान!
शेवटचा शेर कहर!