आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा बिनधास्त !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 April, 2016 - 07:52

आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा बिनधास्त !

आता दुचाकीवर मागे बसणार्‍या प्रवाशालाही हेल्मेट सक्ती!

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/helmet-co...

फक्त एकच प्रश्न ..

ट्रिपल सीटला मागच्या दोघांनाही हेल्मेट सक्ती होणार का?

मायबोलीकरांच्या संयत प्रतिक्रिया अपेक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष भाऊ ह्यांचे नामकरण ज्याने कोणी "धाग्यावेताळ" ठेवले आहे त्या व्यक्तीचा आम्ही नागनाथ पारावर शाल व श्रीफल देऊन सत्कार करू इच्छितो!

धन्यवाद

एरवी कोणाच्या लेखन स्वातंत्र्यावर तोंडसुख घेणे आम्ही महापातक समजतो हे ही नोंदवतो पण ऋन्मेष भाऊ अब रहम करो!

ट्रिपल सीट वाहन चालवणेच मुळात बेकायदेशीर आहे.
आरटीओच्या निर्णयाला माझा पाठिम्बा !

>>>>>

एक्झॅक्टली!
ते मुद्दामच उपहासाने लिहिले आहे.
कारण आमच्याइथे सर्रास पोरं ट्रिपल सीट एंजॉय करतात. कोणाला कोणी पकडत नाही.

कापोचे, मुद्दा तो नाही आहे. लोकं आपल्या जबाबदारीवर गाडी चालवतील. नियमाची काय गरज आहे.
ते देखील त्या शहरात जिथे शेअर रिक्षावाले बाजूला फोर्थ सीट बसवून रिक्षा चालवतात..

असामी हे तुम्ही कौतुकाने म्हणताहात की माझी खेचायला Proud याची कल्पना नाही, पण अहो सिरीअसली. त्या रिक्षेत पाठीमागे तीन माणसेच कशीबशी दाटीवाटीने बसली असतात. रिक्षाचा निमुळता आकार पाहता पुढे एकट्या त्या रिक्षावाल्याचीच बसायची सोय असते, तिथे हा भाई कडेवर पोरगं घेतल्यागत कंबरेच्या वरतून सरकून एकाला अ‍ॅडजस्ट करतो आणि रिक्षा सुसाट (सैराट?) हाणतो. जिथे शक्य असेल तिथे सिग्नलचे सारे नियम धाब्यावर बसवले जातात. गरज पडलीच तर जागच्याजागी ब्रेक मारून आपण रिक्षा थांबवू किंवा २७० अंशाच्या कोनात वळवू असा अहंकार या रिक्षावाल्यांना असल्याने ट्राफिकला अक्षरशा कापत रिक्षा जात असते.. आणि या सगळ्यात ना कोणाच्या डोक्यावर हेल्मेट असते ना कोणी सीटबेल्ट बांधला असतो Happy

१) फाइटर विमांनांना पाइलटच्या डोक्यावर काचेचे/प्लास्टिकचे घुमट असते तसे एसीवाले बाइकला असावे.डोकेच काय सर्व शरीर हातपाय सुरक्षित राहतील लाडक्या गर्लफ्रेंडचे. असा सहानुभुतिदर्शक अधिक वैज्ञानिक मुद्दा सुचवतो.
२) ऋन्मेषचे धागे आणि विषय आवडत नसल्यास ,नसणारे बरेच दिवसात आरशासमोर उभं राहायचं टाळत असतील.वयाचा परिणाम सर्वच गोष्टींत होऊ लागतो.
३) गर्लफ्रेंडला { कोणाच्या ?} बघून इतरांना ताप झाला तरी आतमध्ये कूल असेल.

बिचारे विवाहित!साध्या प्रतिसादाची मजाही घेता येत नाही.फक्त बाजारातून दुधीभोपळा आणण्यासाठी हेल्मेट घालून जातात एकटे

आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा बिनधास्त !

"दुसर्‍याच्या"बायको/नवर्‍या बरोबर सुध्दा फिरा बिन्धास्त असे का नाही ?