“ द माइंडगेम ” (अंतिम भाग)

Submitted by रुद्रसेन on 25 April, 2016 - 03:36

“ द माइंडगेम ” (अंतिम भाग)

या घटनेनंतर पुढच्या गोष्टी खुपचं पटापट घडत गेल्या. डिटेक्टिव्ह स्कॉट हा परत घरी आलेला पाहून मेरीला आश्चर्य वाटलं. रुबेलाला चौकशी साठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं, रुबेलाच्या पायाखालची तर जमीनच सरकली, आपल्याला कोणत्या कारणासाठी ताब्यात घेत आहेत हेच तिला समजेना. सायमन खून प्रकरणात तिला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात येत आहे असं स्कॉट ने स्पष्ट केलं, रुबेलाने खूप आकांडतांडव करून आपला या खुनाशी काहीही संबंध नाही असं सांगितलं, पण पोलिसांना त्यांच्या तपासात रुबेलाची गाड़ी घटनास्थळी आढळून आल्याच निदर्शनास आलेल होतं. ग्रीन व्हॅली पार्कच्या परिसरात राहत असलेल्या लोकांनी एक गाड़ी घटनास्थळी पाहिल्याचं सांगितलेल होत अणि त्यांनी गाडीच केलेल वर्णन रुबेलाच्या गाडीशी तंतोतंत जुळत होत. पोलिसांनी तिची बऱ्याच वेळ चौकशी केली, घटना घडली असता तिची गाड़ी घटनेच्या जागी कशी काय आली, त्यावर रुबेलाने आपल्याला एक निनावी फ़ोन आला होता, ज्यामधे आपल्याला फोनवरील व्यक्तीने घटनास्थळी बोलावलेल होत बस इतकच तिला माहित होत. पुढे पोलिसांनी रुबेलाच्या झडती मधे एक पिस्तुल सापडल ज्याचा परवाना तिचाकडे न्हावता,आजकालचे त्या भागातील चोरा चिलटांचे भय पाहता स्वसंरक्षण करण्याच्या हेतूने ते तिने जवळ बाळगल्याचा तिचा जबाब पोलिसांना तितकासा रुचला नाही. कहर तर तेव्हा झाला जेव्हा पोलिसांना तपास करताना आढळून आल की सायमनच्या शरीरात घुसलेल्या तिन गोळ्या या रुबेलाच्याच पिस्तुलामधुन झाडल्या गेलेल्या होत्या. या सर्व गोष्टी रुबेलाकडेच गुन्हेगार म्हणून बोट दाखवत होत्या. रूबेला कायद्याचा कचाट्यात पूर्णपणे अडकलेली होती.
रात्र झाली घरामधे मेरी एकटीच होती, बाहेर काळोख पसरला होता, थंडीसुद्धा बऱ्यापैकी जाणवत होती, मेरी घराच्या मागच्या दरवाजामधुन बाहेर आली, बाजूला लावलेली सायकल तिने बाहेर काढली सायकल चालवत ती बरीच दूर आली. काही वेळाने तिची सायकल एका नदीच्या जवळ दाट झाडांजवळ आणली, आजुबाजुला चिटपाखरू देखिल न्हवत नदीच्या बाजूला त्या दाट झाड़ीजवळ मेरिने सायकल उभी केली अणि हलकेच सायकलची घंटी वाजवली. शांततेत घंटीचा आवाज स्पष्ट उमटला, त्यासरशी झाडांच्या दाट झाडीतुन एक ऊंचापूरा तरुण बाहेर आला. त्याने काळया रंगाच जॅकेट घातलेल होतं.
“ हेलो मेरी कशी आहेस.” तो तरुण स्मितहास्य करत म्हणाला. त्याचे घारे डोळे विलक्षण दिसत होते.
“हेलो डॅनियल मी ठीक आहे.” मेरी म्हणाली.
तसा डॅन पुढे आला अणि त्याने मेरीला आलिंगन दिले,
“ काम व्यवस्थित पार पडल ना?, मेरिची मीठीमधून सुटका करत डॅनने विचरल.
“ एकदम चोख” मेरिने सायकलला बाजूला लावत सांगीतल, मेरी अणि डॅन नदीच्या जवळ आले. तिथे नदीच्या मधे एक पुलासारखी एक लाकडी जागा होती ती जागा बसण्यासाठी होती, मेरी अणि डॅन तिथे बसले.
“ पण मेरी तू हे जमवलच कस, मला परत एकदा सांग पाहू.” डॅनने उतावीळ होत विचारणा केली.
मेरी शांतच होती ती नदीच्या पात्रा मधे पाय सोडून बसलेली होती,
“ ओके सांगते” मेरी शांतपणे म्हणाली. “ काही दिवसातच ९ मिलियन माझ्या नावावर जमा होतील, आणि तुलासुदधा तुझा हिस्सा मिळेलच.
“ ओके आता मला पहिल्यापासून सगळ सांग.” डॅन जोर देत म्हणाला.
मेरिने हातावर हात चोळले अणि बोलू लागली. - माझा पप्पांच्या मृत्युपूर्वी त्यांनी एक पत्र मला पाठवलेल होत. त्यामधे त्यांनी तिथल वातावरण अणि त्यांचा मित्र असलेला सायमनबद्दल सुद्धा सांगितलेल होत. त्यांना बराच नफा झालेला होता त्यातला काही भाग ते माझ्या नावावर आणि काही भाग रूबेलाच्या नावावर करणार होते. पण किती ते माहित नव्ह्ते. पुढे सायमनने सांगितलेल्या ऑफरमधे मला निश्चित आकड़ा कळाला.
“म्हणजे तुझ्या पप्पांचा नफा आणि सायमन यांबद्द्ल तुला आधीच कल्पना होती तर “ डॅनियल तिला मधेच तोडत म्हणाला.
मेरी पुढे बोलू लागली, “सायमन माझ्या घरावर पाळत ठेउन होता, आणि एका अनपेक्षित वेळी तो माझ्या समोर आला आणि त्याने मला ऑफर दिली, माझ्या वडिलांनी मिळविलेला नफा आणि त्याच्याबद्दल मला प्रथमच समजत होते अस त्याला वाटत होते. त्यामुळे तो जास्तच फुशारकी मारत होता. मी त्याला थोडासा वेळ मागुन घेतला कारण मला रचायचा होता एक डाव, एक माईंडगेम. त्यानुसार एके रात्री मि तुझ्याकडे आले आणि तुझ्यावर एक काम सोपवलं आणि ते तु अगदी उत्तमरीत्या पार पाडलेले आहेस.
“मिलियन डॉलरचा प्रश्न असेल तर कामगिरी हि उत्तम राहणारच” डॅनियल दात दाखवत म्हणाला.
“रुबेलाला पप्पांकडून मला आलेल्या पत्राबबत समजलेले असणार कारण ते पत्र मी ज्या कपाटामधे ठेवलेले होतं ते आपल्या मूळ जागेपासुन काहीसं बाजूला सरकलेलं होतं आणि माझ्या कपड्यांची ठेवणीची पद्धतसुद्धा बदललेली होती.
“ वाव मेरी खुपच हुशार आहेस तू “ मधेच डॅनियल हसून म्हणाला.
“ त्यामुळे एक गोष्ट समजली की, रुबेलाला पैशाचा वाटणीबददल समजलेल असणार आणि इतकी कमी रक्कम आपल्याला मिळणार हे समजुन तिच डोक फिरल नसेल तर नवलच. दरम्यानच मला तिच्या जवळ असलेल्या पिस्तुलाबाबत कळालं, आणि तिच गोष्ट आपल्या पथ्थ्यावर पडली. सायमन ला होकर कळवुन आपला माईंडगेम सुरु झाला. त्या रात्रि मि सांगितल्याप्रमाणे तू सायमनच्या घराची माहिती मिळवली रात्री सायमन पार्कमधे रपेट मारायचा, रुबेलाला निनावी फ़ोन केलास आणि पार्कजवळ बोलावलस. रूबेला तिथे आल्यावर हळूच झाड़ीमधून येउन तू तिची बॅग हिसकावलीस, आणि तिला काही कळायच्या आत पसारही झाला असशील. नंतर तू सायमन च्या रात्रीच्या रपेट मारण्याचा जागेवर आलास लपून सायमनवर गोळ्या झाडल्या, इकडे रूबेला तुला शोधत झाड़ीमधे फिरत असतानाच तू तिची बॅग आणि त्यामधे पिस्तुल ठेउन बॅग गाड़ीजवळ टाकुन निघून गेलास. रुबेलाला तू काही सापडला नाहीस, ती परत गाड़ी जवळ आली तिला तिथे तिची बॅग पडलेली दिसली असणार तिने ती तशीच उचलून पळ काढला असेल, आपल्या पिस्तुलातुन कोणीतरी गोळ्या झाडल्या आहेत हे तिच्या गावीही नसेल.
“ एकदम जबरदस्त पोलिसांना तुझा संशय आला नसेल ना” डॅनियलने गंभीरपणे विचरल.
“ अब्सोलुटली नॉट, कारण हा सगळा सावळा गोंधळ चाललेला असताना मी माझा घरी पिझा ऑर्डर केलेला होता, पिझावाल्या माणसाने त्याचा जबानीत मी त्या वेळी घरीच असल्याच सांगितलेल असणार.”
“ मला सांग मेरी एवढा जबरदस्त प्लान तुला सुचलाच कसा” डॅनियलने आश्चर्याने विचारल.
“ त्याच का्य आहे डॅनि मी पदवीच्या शेवटच्या वर्षी क्रिमिनल साइकोलॉजी या विषयाचा विशेष अभ्यास केलेला होता. त्या अभ्यासतुनच मला समजल की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गुन्हे कसे करतात कोणत्या चूका करतात. पुरावा मागे न सोडता नियोजनबद्धरित्या डाव आखला की झाल.” मेरिने आपलं बोलणं पूर्ण केल.
“ ओहो खुपच छान, बरं मला माझा हिस्सा कधी मिलणार “डॅनियलने अधाशासारख विचारल.
“ हिस्सा ना, मिळेल ना, पण मला आधी सांग की तुला पोहता येत न्हवत ना कॉलेज मधे असताना मग अजुन तू शिकलास की नाहीस” मेरिने थंडपणे डॅनियलला विचारल.
“ नाही शिकलो अजुन,” मधेच हे पोहण्याच बिहण्याच का्य काढल मधे हिने अस वाटुन डॅनियल जरा रागात म्हणाला.
"पोहण्यासाठी छान जागा आहे ना हि "
मेरी उभी राहिली आणि डॅनियलच्या मागे आली डॅनियल तिचाकडे पाहत होता की हि करतेय काय
“डॅनि तुला माहितीय एकही पुरावा मागे सोडता कामा नये कारण ते डाव रचणारयाला खुपच घातक असतं. “ मेरी आकाशाकडे पाहत म्हणाली. “ ते बघ डॅनि, अकाशामधे ते काय दिसत आहे.”
डॅनियलने कुठे काय अस म्हणत वर पहिलं तस मेरिने मागुन अचानकपणे डॅनियलला जोरदार धक्का दिला, डॅनियल बेसावध होत किंबहुना त्याला अपेक्षाच न्हवती की मेरी असं काही करेल म्हणून, धक्क्याबरोबर डॅनियल नदीच्या पाण्यात पडला, त्याला अजुनही पोहता येत नसल्याची खात्री मेरिने केलेलीच होती, तिथल्या भयाण शांततेत डॅनियलला आरडाओरडा करायला देखिल फुरसद मिळाली नाही. नाकातोंडात पाणी जाऊन क्षणार्धातच डॅनियल नदीच्या तळाशी पोचला. आता खरया अर्थाने तिचा माईंडगेम पूर्ण झालेला होता. अणि एकही पुरावा मागे सुटलेला न्हवता. रुबेलाला शिक्षा तर होणारच होती, आणि ९ मिलियन डॉलर विनासायास तिच्या खिशात आलेले होते.

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.