बनियन , इनर गार्मेन्ट्स कुठले घ्यावे ?

Submitted by घायल on 19 April, 2016 - 22:15

पूर्वी व्हीआयपी आणि एक दोन कंपन्यांची बनियन व इतर होजिअरी घेतली की अनेक दिवस जायचे. गेल्या काही वर्षात मात्र गोळीबार करून चाळण करावी अशा पद्धतीने त्याची अवस्थ्या काही दिवसातच होते. किंमती पण वाढतच चालल्या आहेत.

चांगल्या प्रतीचे मजबूत, टिकाऊ, मऊ, दणकट होजिअरी आयटेम्स कुठले घ्यावेत याविषयी इथे चर्चा करता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्यतो "बॉडी बेसिक्स" मधुन चांगल्या कंपनीचे जॉकी (किंवा हेन्स इ.) चे वापरावेत. स्वस्त गोष्टी मस्त असतातच असे नाही. एखादी १०० रु. ची वस्तु तीन वेळा विकत घेण्यापेक्षा एकदाच ३०० रु, ची घेतलेली वस्तु दीर्घकाळ टिकते.

<<अरे देवा, रुन्म्याच्या क्लासात जाऊन बनियन का बरं असे होतील!!! अ ओ, आता काय करायचं>>
अरे ऋन्मेशच्या अचाट डोक्यातून सुटलेल्या गोळ्यांनी बनियनची नाय तर डोसक्याची चळण होते रे .

छान धागा कापोचे.
बरेच दिवस मलाच काढायचा होता. पण मी आधीच बदनाम आहे. रुमालाचा धागा काढला तरी लोक त्याच्या चिंध्या करतात. बनियानचे पार भानशेरं करतील या भितीने आजवर नाही काढला.

रुमाल मी हल्ली हल्लीच ब्रांडेड वापरायला सुरुवात केली असली तरी बनियान आणि तत्सम आंतर्वस्त्रे लहानपणापासूनच ब्रांडेड घालत आलोय. मात्र हल्ली चांगल्या ब्रांडचे बनियान सुद्धा लवकर ढिलेढाले पडतात. (कदाचित मी वाढत्या अंगाचा असल्यानेही असे होत असेल) अगदीच गोळीबार होत नाही पण तरीही झुले झुले लाल बनून फिरण्यातही मजा नाही. मुख्यत्वे घरी असताना बनियानवरच मोकळेढाकळे वावरायची सवय असल्याने बनियान सुस्थितीतीलच असावे लागते अशी आमच्या घराची शिस्त आहे.

असो,
यावर एक उपाय मी माझ्यापुरता केलाय. बनियान रोज धुवायची नाही. रोज धुतली की लवकर फाटते. मुंबईच्या दमट हवेला पाहता एका निरोगी माणसाला जो एवरेज घाम येतो त्याचे कॅलक्युलेशन करून साधारण तीन दिवस एकच बनियान वापरू शकतो. त्यानंतर हवे तर आणखी एक दिवस ती बनियान उलटी करून घालायची. त्याने घामाचे उर्ध्वपतन होते. शहरांनुसार तेथील हवामानाला अनुसरून हे कॅलक्युलेशन बदलेल. मात्र कुठल्याही परीस्थितीत 7 दिवसांपेक्षा जास्त वापरू नयेत. अन्यथा निरोगी माणसे फार काळ निरोगी राहणार नाहीत. बनियान म्हणजे मोजे नव्हेत जे त्यातून वास येईपर्यंत वापरा.

बनियान रोज धुवायची नाही. रोज धुतली की लवकर फाटते. मुंबईच्या दमट हवेला पाहता एका निरोगी माणसाला जो एवरेज घाम येतो त्याचे कॅलक्युलेशन करून साधारण तीन दिवस एकच बनियान वापरू शकतो. त्यानंतर हवे तर आणखी एक दिवस ती बनियान उलटी करून घालायची. त्याने घामाचे उर्ध्वपतन होते. >>>>>ईईईईईईईई!Giving thumbs down

त्यानंतर हवे तर आणखी एक दिवस ती बनियान उलटी करून घालायची.>>.
त्यापेक्षा IIT पद्धतिने ड्राय क्लिनिंग करा, स्वस्त आणि मस्त पर्याय..
खुलासा : IIT ड्राय क्लिनिंग पद्धत,
१. एक ड्राय बकेट घ्या.
२. वापरलेले कपडे गोळा करुन ह्या बकेट मध्ये टाका.
३. बकेट बेड खाली ठेउन द्या.
४. २-३ दिवसांनी ह्या बकेट मधुन कपडे काढा, घडी करुन व्यवस्थीत कपटात ठेवा.

मात्र हल्ली चांगल्या ब्रांडचे बनियान सुद्धा लवकर ढिलेढाले पडतात.>>> +१
पण, ह्यावर बनियान रोज धुवायची नाही हा उपाय भयंकर आहे.

बनियन-मोजे-अंवे ढीलेढाले, भोकाभोकांचे न होण्यासाठी -
-धुताना हार्ड ब्रश कधीच वापरु नका. साबण - डीटर्जंट जे काही असेल ते लावुन / त्यात भिजवुन हातानेच चोळुन धुवा.
ह्यामुळे भोकाभोकांची चाळण होत नाही.
- धुतल्यावर कधीच घट्ट पिळु नका.
- अगदी दोन मुठीत घेउन लाडु वळतो तसे पिळा. हलकेच झटकुन वाळत घाला.
ह्यामुळे फॅब्रीक ताणत नाही. पर्यायी हे कपडे ढीलेढाले होत नाहीत.

जनरली होजियरी फॅब्रिकच्या सगळ्याच कपडयां साठी असेच करा. लहान मुलाच्याही टीशर्ट्सचे गळे, पॅन्ट्स वैगेरे , घट्ट-मुरगळुन पिळल्यामुळे, ताणल्याने विचित्र दिसतात. आणि चांगले कपडे वाया जातात. (स्वानुभव)
(नवर्‍यासाठी बनियन-मोजे-अंवे घ्यायला गेलेलो त्या दुकानदाराने दिलेली टीप आणि स्वानुभवातुन आलेले शहाणपण )

ऋ, वाच रे घाणेड्र्या.

ऋ, +१.

हास्टेलात हे आलटुन पालटुन घालण्याचे प्रकार लय केलेलेत. आता नाय व्ह्यायचे. बाकी सस्मित ह्यांच्याशी सहमत. टी शर्ट किंवा सॉफ्ट फॅब्रीक असलेले कपडे ब्रश केले किंवा हाताने पिरगाळुन काढले तर रया जाते.

बनियान व अंतर्वस्रे रोज प्लीज धुवूनच वापरा. सहा घेतले जोड तर रविवारी दोन बादल्यात धूता येइल . नाहीतर बॅक्टेरिया मुळे स्किन इन्फेक्षन वगैरे होउ शकते. तसेच नाहून आल्यावर सिंथॉल लेमन( माझ्याकडे हीच आहे सध्या) किंवा तत्सम आवडीची पावडर लावून मग घाला म्हणजे उकाड्याचा त्रास कमी होईल. आयडिअली सर्व अंतर्वस्त्रे एका डेटॉलच्या पाण्यातून काढली तर बेस्ट.

पूर्वी एक आर आर नावाचा ब्रँड असे.( बाबांचे जमान्यात) त्याचे चांगले होते बनियन. बडॅ आरामसे/ अमूल वगैरे कशे असतात? मला काही अनुभव नाही. अक्षय कुमारास विचारले पाहिजे. किंवा विद्याताईंचा बाफ येइलच. ( मी संदीपला म्हटलंच ए बनियान फाटला आहे. घेउ या ना. शिकागो इत्यादि इत्यादि. )

कपोचे धुंद रवी ह्या माबोलीकरांचे लुंगी खरेदी वाचले आहे का? ति

अमा, तुमच्या प्रतिसादातील पहिला पॅरा वाचतानाच चांगली पोस्ट असा प्रतिसाद लिहायचा विचारच करत होते की,
<<< किंवा विद्याताईंचा बाफ येइलच. ( मी संदीपला म्हटलंच ए बनियान फाटला आहे. घेउ या ना. शिकागो इत्यादि इत्यादि. )>>> हे वाचले. आणि चांगली पोस्ट असा जो विचार चालु होता ते एकदम 'ओह! खरंच ह्याची गरज होती का?' असा झाला.

नातेवाईक पुरुष मंडळींच्या अनुभवाप्रमाणे जॉकी बनियान.खालचे वस्तही जॉकी हा एकमेव टिकाऊ पर्याय.चार सेट ठेवून वॉशिंग मशिन ला वेगळी बॅच वेगळे डेटॉल्+अगदी थोडा साबण असे स्मॉल इकॉनॉमिक सायकल लावल्यास हाताने धुतल्याने होणारी हानी कमी होईल.(आता वॉशिंग मशिन मध्ये म्हटल्यावर यक्क असे प्रतीसाद येतील पण स्वतःचे वेगळे सायकल लावल्यास काहीच हरकत नाही.)
अंतर्वस्रांचे तीन किंवा चार सेट एका वेळी ठेवल्यास एक सेट झिजण्याचा रेट कमी होईल.किंमत वाढेल हे खरे पण दुकानात वारंवार जाण्याचा व्याप वाचेल.

भानशेरं म्हणजे > चुलीवयली भांडी उतरवताना वापरतात ती फडकी.

अच्छा म्हणजे घाटावर सोधनी का काय म्हणतात ती फड़की वह्य!! बरंय!

आता वॉशिंग मशिन मध्ये म्हटल्यावर यक्क असे प्रतीसाद येतील >>> खरंच नवल वाटले. लवकर फाटतात.

एका वेळेस ८ घ्या व रोज एक वापरा व धुवायला टाका आणि सर्व आठवड्याला एकदमच धुवा , रोज धुण्याचे कष्ट वाचतील व जास्त दिवस टिकल्याचे समाधान मिळेल ,

जॉकी नावाची एक मराठी सिरीयल होती. वर्षा उसगावकर होती. आणि निर्माते बंधुच त्यात हिरो आणि व्हिलन होते. जनतेच्या आक्रोशामुळे बंद करावी लागलेली ती पहिली सिरीयल! (जॉकी वरुन आठवलं, या धाग्याशी संबधित नाहिये) Proud

Pages