" खूनी कोण ? " (भाग पहिला )

Submitted by विनित राजाराम ध... on 27 March, 2016 - 09:11

फोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळी-सकाळी, ते सुद्धा रविवारी, कोणी फोन केला.असा विचार करत तिने फोन उचलला.
" Hello !! ",
"Hello… अभी…" तिने महेशचा आवाज ओळखला. " अरे महेश, अभी झोपला आहे अजून… ",
"उठवं ना त्याला जरा …. urgent … ",
"हो… हो , थांब." तिने अभीला जागं केलं.

अभिषेक डोळे चोळत चोळत फोन जवळ आला. एक मोठी जांभई दिली आणि फोन कानाला लावला.
" Hello, बोल रे…. काय तुंम्ही, झोपायला सुद्धा देत नाहीत.",
"urgent होता म्हणून लावला ना call…",
"मग मोबाईल वर लावायचा ना, इथे घरच्या फोनवर कशाला लावलास. मम्मी-पप्पा पण जागे झाले असतील आता… ",
"अरे माणसा…. मोबाईल चेक कर जरा… बंद आहे म्हणून लावला इथे." ,
"हो का… बघतो नंतर. काय काम होतं urgent ",
"हा…. लवकर पोहोचं, पोलिस स्टेशनमध्ये …. एक वेगळीच केस आली आहे." ,
"OK… ठीक आहे, येतो पटकन." अभिषेकने फोन ठेवला आणि आंघोळीसाठी गेला.

२० मिनिटात inspector अभिषेक पोलिस स्टेशनमध्ये आला. महेश नुकताच पोहोचला होता.
"काय रे, सुट्टीच्या दिवशी तरी झोपायला द्या माणसाला… "अभी, डॉक्टर महेशला बोलला.
" काय करणार यार…. मला तर ५.३० ला call आलेला सरांचा…. त्यामुळे तू माझ्यापेक्षा अर्धा तास जास्त झोपलास… तक्रार मी केली पाहिजे मग." अभी हसायला लागला त्यावर.
"अरे, पण सर कुठे आहेत… फसवलं नाही ना त्यांनी आपल्याला." ,
"येतील रे." दोघे सरांची वाट बघू लागले. पोलिस स्टेशन मध्ये हळूहळू बाकीचे कर्मचारी येऊ लागलेले. ७ वाजता त्यांचे मोठे आले, तसे दोघे उभे राहिले.

"हम्म… " सरांनी त्यांच्याकडे पाहिलं." चला… माझ्या केबिनमध्ये बसू… ","एस सर… " दोघे त्यांच्या मागून आत गेले. inspector अभिषेक आणि forensic expert असलेला त्याचा मित्र डॉक्टर महेश, यांची जोडी तशी फ़ेमसच होती. कितीतरी कठीण केसेस त्यांनी मिळून सोडवल्या होत्या. फक्त मुंबईच नाही तर बाहेरच्या केसेस सुद्धा त्यांच्याकडे येत होत्या. तशीच एक केस आता आलेली होती.
" अभी आणि महेश, तुम्हाला जरा त्रास दिला…. सुट्टीच्या दिवशी, तेही एवढ्या लवकर बोलावलं… झोपमोड झाली असेल ना… ",
"असं काही नाही सर… बोला तुम्ही, कोणती केस आहे… "महेश बोलला.
" तुम्हा दोघांना नाशिकला निघायचे आहे. ",
"कधी ?",
"आत्ता, लगेच…. ",
"कोणती केस आहे, एवढी urgent… " ,
"गेल्या आठवड्यात म्हणजेच ७ दिवसात ८ खून झाले आहेत नाशिकला. तिथेच जायचे आहे तुम्हाला.… ",
"पण ती तर तिकडची केस आहे ना… मग आम्ही ?",
"तुम्हा दोघांचं खूप नावं झालं आहे सध्या…. शिवाय तिथल्या स्थानिक पोलिसांना ,खून कोणी केला,याचा तपास करण्यात अपयश आले आहे. मिडीयाचा दबाव वाढत आहे. त्या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून हि केस मुंबई पोलिसांकडे आली आहे. त्यात मला कमिशनर सरांनी तुमची नावं सुचवली.…. म्हणून, तिथे तुम्हाला inspector म्हात्रे मदत करतील. तिथे तेच केस handle करत आहेत. तर, तुम्ही आजच निघा…. and best of luck. ","thanks sir" म्हणत दोघे बाहेर आले आणि निघायची तयारी करण्यासाठी घरी गेले.

तयारी करून दोघे निघाले. नाशिकला पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. दोघांची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केलेली होती. थोडावेळ आराम करून दोघांनी कामाला सुरुवात केली. दोघांनी तिथल्या पोलिस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला. तसे दोघे पोहोचले. बघतो तर काय !! inspector म्हात्रे जागेवर नाहीत.
" हे म्हात्रे कूठे गेले ? " महेशने एका हवालदाराला विचारलं.
" ते ना… म्हात्रे सर आत्ताच घरी गेले.",
"घरी ? आम्ही येणार ते माहित नाही का त्यांना… ",
"नाही सर… कोणालाच माहिती नाही, शिवाय ते २ दिवस घरी गेलेच नव्हते म्हणून आम्हीच त्यांना आराम करण्यासाठी घरी जायला सांगितले.",
"ठीक आहे… उद्या येतील ना ते… ",
"हो सर… ",
"नक्की ना… नाहीतर त्यांना फोन करून सांगा… आम्ही येतो उद्या सकाळी. " अभी बोलला आणि दोघेही हॉटेलवर आले.

सकाळी पुन्हा ते पोलिस स्टेशनला आले, तेव्हा मात्र inspector म्हात्रे हजर होते. " Welcome sir " म्हणत inspector म्हात्रे पुढे आले.
"sorry सर, काल जरा लवकर गेलेलो घरी… आणि मला सांगितलंही नाही कि तुम्ही येणार ते." ,
"हा… राहू दे… असं काही नाही, कळलं मला, तुम्ही २ दिवस घरी गेला नव्हता म्हणून…किती काम असते ते माहित आहे मला. त्यामुळे आता तुम्ही tension घेऊ नका… आता आम्ही आलो आहोत ना, तुमचं ट्रेस कमी होईल. " अभी बोलला तसे तिघेही हसले.
" चला, मग कामाला लागू आपण… " महेश बोलला. तिघेही एका टेबलवर जाऊन बसले.
" तुम्ही, तुम्हाला काय काय माहिती मिळाली ते सांगा आधी." महेश बोलला.
" ते सांगतो मी, पण आधी एक प्रश्न आहे… विचारू का… " inspector म्हात्रेनी विचारलं.
" हा विचारा… " ,
"तुम्हा दोघांचे खूप नावं ऐकलं आहे मी… त्यात तुमच्या विषयी सुद्धा ऐकलं आहे. " म्हात्रे ,महेशकडे पाहत म्हणाले. "तर तुम्ही forensic expert आहात ना… तरी तुम्ही या तपासात अभिषेक सरांबरोबर असतात ना… म्हणजे मला बोलायचे आहे कि इतर डॉक्टर फक्त त्याचं काम करत असतात. ते कधी तपासात भाग घेत नाहीत. मग तुम्ही ? " महेश हसला त्यावर.
"त्याचं काय आहे ना… मला डॉक्टर व्हायचे नव्हते. मी तुमच्याच ड्रेसमध्ये दिसलो असतो. फक्त माझी उंची कमी पडली ना जरा… नाहीतर मी पण असाच ड्रेस घातला असता, उंचीमुळे निवड झाली नाही माझी. आणि हा अभी, माझाच मित्र… तो बोलला, तू forensic expert होऊ शकतोस. त्याचं ऐकून डॉक्टर झालो आणि पोलिस department जॉईन केलं.… एक बर आहे… हा घेऊन जातो मला प्रत्येक केसला म्हणून… नाहीतर मला कोणी विचारलं असतं." अभी हसायला लागला.

"Thanks sir…. चला, मग सुरु करू का… ",
"हो.",
"एकंदर ८ खून झाले.",
"हो, ते माहित आहे, पण एक प्रश्न आहे." अभी बोलला.
" कोणता प्रश्न सर ?",
"तुम्ही एकटेच कसे या केसेसला handle करत आहात… म्हणजे अजून कोणीतरी हवं ना सोबत तुमच्या, किती धावपळ झाली असेल तुमची" अभी बोलला.
" हो ना सर, आमची टीम आहे सोबत, तरीसुद्धा इतक्या झटपट झालं ना सगळं… काही सुचत नव्हतं. पहिल्या दिवशी दोन खून झाले…. त्यांचा तपास सुरु केला तर दुसऱ्या दिवशी अजून एक खून झाला. त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा…. कूठे लक्ष देऊ तेच कळत नव्हतं. माझी टीम तरी काय करणार ना… त्यात ते media वाले… त्यांना वाटते आम्ही काहीच काम करत नाही… ",
"हो… media तसंच समजते… " महेश मधेच बोलला.
" ठीक आहे. आता केस मुंबई पोलिसांकडे आली आहे ना, तुम्ही फक्त मदत करा… बाकीच आम्ही बघतो." अभी बोलला.
" असं करूया… तुम्ही सगळी माहिती… जेवढी तुम्ही जमवली आहेत तेवढी…. ती आता मला द्या…. महेश, तू postmortem आणि बाकीचे रिपोर्ट चेक कर… " ,
" ठीक आहे, मी निघतो मग." महेश म्हणाला.
" पाटील… महेश सरांना आपल्या forensic expert team कडे घेऊन जा. " म्हात्रे म्हणाले. महेश त्या हवालदारासोबत निघून गेला.
"OK, आता तुम्ही आणि तुमची टीम मला लागेल. कोण कोण आहे तुमच्या टीम मध्ये… ",
" मी , दोन sub-inspector आणि सहा हवालदार आहेत, अजून पाहिजे तर तशी व्यवस्था करू शकतो मी. ",
" चालेल ठीक आहे… ते sub-inspector कूठे आहेत… एकही दिसत नाही. " अभी आजूबाजूला पाहत म्हणाला.
" एक sub-inspector…सावंत, ते परवा झालेल्या खूनाच्या स्पॉट वर आहेत. आणि दुसरे , sub-inspector कदम, ते आज सुट्टीवर आहेत… ते सुद्धा खूप दिवस धावपळ करत आहेत. म्हणून मीच सुट्टी दिली त्यांना… ",
"ठीक आहे… उद्या बोलावून घ्या त्यांना. मी आज सगळ्या केसेसची study करतो. महेश ते रिपोर्ट घेऊन येईल. तुम्ही उद्याची तयारी करा, उद्या सकाळी आपण पहिल्या स्पॉटवर जाऊ… ",
" OK सर… " आणि सगळे पेपर्स, फोटो घेऊन अभी हॉटेलवर आला.

थोड्यावेळाने महेश , बाकीचे रिपोर्ट घेऊन रूमवर आला. दोघे ते पेपर्स , माहिती वाचू लागले. बरेच फोटो काढले होते. त्यावरून एक नजर टाकली. खूप वेळाने महेश बोलला.
" या सगळ्यांमध्ये एक नातं होतं, माहिती आहे का तुला ? ",
" नाही, म्हात्रे तसं काही बोलला नाही.… विसरला असेल, may be… ",
" असेल किंवा त्याला माहित नसेल… ",
"सांग काय ते… ? ",
" हे आठ जण, नातेवाईक होते…",
"म्हणजे… ",
" एक संपूर्ण कुटुंब आहे ते… ",
" सविस्तर सांग जरा महेश… " ,
" हे सगळे रिपोर्ट्स बघ… आणि म्हात्रेने सुद्धा ती माहिती जमवली असेल बघ. त्यांच्या नावावरून सुद्धा कळेल तुला… पवार कुटुंब आहे ते… ",
" हो, बरोबर बोलतोस तू… " अभी ते पेपर्स बघत म्हणाला. " अजून काही माहिती मिळाली का तुला… त्या postmortem रिपोर्ट्स वरून… ",
"नाही रे… अजून पूर्ण वाचले नाहीत मी… वाचून सांगतो तुला… " महेश म्हणाला.
" तरी काय अंदाज आहे… " ,
" अंदाज म्हणजे…एकाच कुटुंबाचे आहेत सगळे… असेल काहीतरी… कोणाला बदला वगैरे घेयाचा असेल… नाहीतर कोण कशाला मारेल ना… ",
" हम्म… " अभी विचार करत म्हणाला. " ठीक आहे मग, उद्या सकाळी पहिल्या ठिकाणी जाऊ… तिथे अजून काही माहिती मिळू शकते. तू पण बघ जरा, त्या रिपोर्ट्समध्ये काय मिळते का… " महेश त्याच्या रूममध्ये निघून गेला. अभी रात्री उशिरापर्यंत ते केस पेपर्स वाचत होता.

सकाळी ठरल्याप्रमाणे, महेश आणि अभी पोलिस स्टेशनमध्ये आले. अभीने सांगितल्याप्रमाणे, सगळी टीम तयार होती. सगळे हजर होते, फक्त sub-inspector कदम सोडून. अभीच्या लक्षात आलं ते. अभीने सगळ्यांवर एक नजर टाकली. " म्हात्रे… आता पहिल्या स्पॉट वर जाऊ… चला. " तसे सगळे निघाले. दोन गाड्यांमध्ये बसले सगळे. गाडी सुरु करणार इतक्यात sub-inspector कदम धावत धावत आले. " Sorry… Sorry sir, उशीर झाला." अभीने त्यांच्याकडे एकदा पाहिलं. " लवकर आलात तुम्ही… चला, बसा पटकन गाडीत." अभी जरा रागातच बोलला. कदम गाडीत बसले आणि दोन्ही गाड्या निघाल्या पहिल्या खुनाच्या जागी.

ती जागा सील केलेली होती. एका मोठ्या सोसायटीमध्ये ती रूम होती. अभी सगळीकडे बघत होता. " अभी, मी बाहेर चौकशी करतो… शेजारी, watchman कडे… " महेश म्हणाला. अभीने होकारार्थी मान हलवली. आणि म्हात्रेला हाक मारली," म्हात्रे… या पुढे… " तसे inspector म्हात्रे पुढे आले.
" एस सर ? ",
"काय काय सापडलं इथे तुम्हाला… ",
" हा सर… २ मृतदेह… Mr. and Ms. पवार, दोघांचा कोणत्यातरी धारदार हत्याराने खून झाला.",
"कोणतं हत्यार ? ",
" sorry सर, सापडलं नाही ते… " ,
"हम्म…. आरोपी बरोबर घेऊन गेला असेल… पुढे सांगा. ",
" फिंगर प्रिंट्स मिळाले… ",
"मिळाले ? ",
" हा म्हणजे… ५ जणांचे फिंगर प्रिंट्स आहेत. त्यातले २ या दोघांचे आहेत, पवारांचे… उरलेल्या ३ पैकी एक आरोपीचा असू शकतो.",
" किती वाजता झालं हे सगळं… ",
"साधारण रात्री १० ते १०.३० दरम्यान…",
"आणि तुम्हाला कसं कळलं ? " ,
" सोसायटीच्या सेक्रेटरीने फोन केला होता.",
" बोलवा जरा त्याला. " एका हवालदाराला सेक्रेटरीला बोलवायला पाठवले.

अभी त्या रुमच्या बाल्कनीत आला. पाचवा मजला…. खाली वाकून पाहिलं त्याने. महेश होता खाली watchman बरोबर बोलत. आजूबाजूला नजर फिरवली. हम्म्म… उंची तर आहे या बाल्कनीपर्यंत. शिवाय इथपर्यंत चढून येणं सोप्पं नाही. अभी विचार करत होता. थोड्यावेळाने सेक्रेटरी आला.
" नमस्कार सर… " , त्याने बाहेरूनच नमस्कार केला.
" या आत या. " अभीने बाल्कनीत बोलावून घेतलं त्यांना. " मी शेजाऱ्यांशी चौकशी केली… ते म्हणतात कि कोणताच आवाज झाला नाही… या रूम काय sound proof आहेत का… ",
"तसं काही नाही. तरीदेखील त्यांना कसलाच आवाज आला नाही, का ते मलाही कळत नाही… ",
"ठीक आहे… बरं, तुम्हाला कसं कळलं हे… ",
"कचरा गोळा करणारा रघु आहे ना… त्याला कळलं पहिलं हे, त्यानंतर त्याने मला येऊन सांगितलं हे… ",
"हम्म्म… तुम्ही जाऊ नका… बाहेरच थांबा, आणि त्या रघुला बोलावून घ्या… " रघु आला थोड्यावेळाने. तोपर्यंत महेश आलेला वर.
" हा रघु… काय झालं ते सांग… न घाबरता… ",
" हा सर.… त्या दिवशी मी कचरा गोळा करत करत इकडे आलो. यांचा कचऱ्याचा डब्बा आधीच बाहेर ठेवलेला असतो.… दोघेच जण… कचरा कमीच असतो. त्यादिवशी डब्बा दिसला नाही बाहेर म्हणून दारावरची बेल वाजवली मी.… तीन-चारदा वाजवली…. दरवाजा वाजवला तर उघडाच होता.… तेव्हा जरा विचित्र वाटलं…. सेक्रेटरी साहेबाना सांगितलं लगेच… तेव्हा आत गेलो आम्ही तर या दोघांना…. " रघु थांबला बोलता बोलता.
" ह्म्म्म… कळलं पुढे काय ते. तू जा बाहेर… " रघु बाहेर गेला आणि अभी, महेश बोलू लागले.

" काय माहिती मिळाली तुला महेश… " अभीने विचारलं.
" शेजारी बोलतात, आवाज आला नाही… ते जरा बघावं लागेल… पुन्हा सोसायटीमध्ये बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत… त्यातून कोण कोण इथे आलेलं ते कळेल… " महेशने माहिती पुरवली. तेवढ्यात खालून फोन आला. " हा, येतो खाली… " अभी म्हणाला आणि महेशला घेऊन खाली निघाला. " खुनाच्या दिवशी, रात्री… ज्यांची duty होती, त्यांना बोलावलं होतं मी. तो आला आहे खाली." अभीने महेशला सांगितलं.
"सलाम साहेब. " ,
" हा, ठीक आहे.,…. त्यादिवशी रात्री कोण आलेलं, आहे का लक्षात… ",
"हो साहेब… आम्ही ते लिहून ठेवतो ना…. कोण आलेलं , कोणाकडे आलेलं… ",
" जरा बघून सांगता का मला.",
"हो साहेब… " त्याने ते रजिस्टर उघडलं.
" रात्री १० नंतर कोण आलेलं पवारांकडे… ",
"१० नंतर पवारांकडे काय… या सोसायटी मध्येच entry नाही कोणाला… " अभी महेशकडे बघू लागला.
" हा पण, ९ वाजता एक जण आलेला, पवारांकडे…. " अभी चमकला.
"कोण… नावं वगैरे… " ,
" मंदार देशपांडे … तोच आलेला ९ वाजता… ",
"त्याला बघितलंसं का नीट तू… ओळखशील त्याला… ",
"हो साहेब… चांगलाच लक्षात राहिला तो… ",
" तो कसा ",
" त्याने गेट समोरच गाडी पार्क केलेली ना साहेब… म्हणून जरा आवाज चढला होता… ",
" का… गाडी आत पार्क करू शकत नाही का… ",
" आहे ना साहेब, पण गेट समोर कोणी गाडी लावते का सांगा मला… मग मला बाकीच्या लोकांचा ओरडा मिळाला असता… म्हणून ओरडलो त्याला… ",
"मग पुढे… ",
" पुढे काय… गाडी मागे घेऊन गेला कूठेतरी आणि आला परत. ",
" OK… थेट वरती पवारांकडे गेला का…",
"हो…. आणि १०.१५ ला निघून गेला.",
" छान माहिती दिलीत तुम्ही… आता, एक काम करा…. त्याचं वर्णन सांगा, त्याचं चित्र काढता येईल मग… आणि त्या गाडीचे सुद्धा वर्णन सांगा. "
"सांगतो… पण ती गाडी तर तिथे बाहेरच उभी आहे , रस्त्यावर… " ,
"काय ?", अभीला आच्शर्य वाटलं. तसे ते सगळे गाडीजवळ आले.
" ही कार आहे का ",
"हो साहेब हीच… ",
"ठीक आहे… तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये जा, त्याचं स्केच बनवा… आणि म्हात्रे, या गाडीची तपासणी करा… फिंगर प्रिंट्स वगैरे मिळतील ते बघा… आणि गाडी कोणच्या नावावर आहे ते चेक करा." म्हात्रे लगेच कामाला लागले.

( पुढे वाचा.
http://vinitdhanawade.blogspot.in/2016/03/blog-post.html
आवडली तर नक्की share करा. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप दिवसानी interesting कथा वाचायला मिळाली पुढ्चे भाग लवकरात लवकर मिळतील ही अपेक्शा

thanks for comments !!!!!!!!!!!!!!!!!!