मायक्रोसॉफ्ट विन्डोज १० - अनुभव?

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 March, 2016 - 08:45

ऑफिस संगणंकावर आम्ही Winows 7 Pro वापरतो. ऑफिशियल कामासाठी Windows 8.1 चांगले नाही वाटले म्हणुन Winows 7 हेच वापरतो (नविन संगणकांवर Windows 8.1 आलेले ते Windows 7 ला downgrade केले).

पण आता सारखा Message येत असतो, "Microsoft recommends to upgrade to Windows 10. Upgrading to Windows 10 is free for limited time."
PC Compatibility Check केली, report प्रमाणे compatible आहे.
ऑफिस मधील काही computers ची RAM 4 GB आणि काहींची 8 GB आहे.

Windows 10 चा कुणाला अनुभव आहे का? Windows 7 च्या तुलनेत ते कसे आहे?
Upgrade करावे की नाही?

(कृपया Linux अथवा इतर OS या धाग्यात सुचवु नयेत, कारण office च्या बर्‍याच प्रोग्राम्ससाठी निदान सध्यातरी Windows च लागेल.)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव, घरच्या एका लॅपटॉप वर विन १० अपग्रेड केलेय (८.१ वरून). माझ्यामते तरी फक्त कॉस्मेटिक चेंजेस आहेत ओवर ८.१. सो फार काही वेगळं असं वाटत नाही. मुळात ७ ही जशी ग्राऊंड अप बिल्ट केली होती तसे १० चं नाही. केली अपग्रेड तरी काही तसा प्रॉब्लेम नसावा.

घरचा लॅपी तर अगदीच बेसिक आहे (पेंटिअम ड्यूअल कोअर, ४ जिबी रॅम, १ टिबी हार्ड-ड्राईव) तरीही विन १० नीट चालतंय.

मी टाळत होतो, पण दुबईत लॅपटॉप आपोआप बंद पडला आणि अपडेट झाले. मला तरी फार काही ग्र्ट वाटत नाही. रंग वेगवेगळे दिसतात एवढेच. देवनागरी टायपिंग चा जो प्रॉब्लेम आय ई मधे होता, तो आहेच.

योकु, अच्छा, धन्यवाद.
मला कोणीतरी म्हणालं होतं की Windows 10 हे Windows 7 + Windows 8 combination सारखे आहे.

जसं की Windows XP वरुन Windows 8 वर जाणारा माणुस गोंधळतो, पण Windows 7 ला मात्र लगेच सरावतो, तस काहीसं Windows 10 बद्दल असावं असा माझा ग्रह झाला होता.

पण तुमच्या पोस्ट वरुन तर असं वाटत नाही.
appearance windows 8 सारखंच आहे का?

काही दिवसांपूर्वी लॅप्स झालेल्या हार्डडिस्क साठी डेल सर्विस सेंटर्ला जाणे झाले..
तिथ बाजुच्या टेबलावर असलेल्या एकाने त्यांना १० साठी अप्ग्रेड करु का अस विचारल असता त्यांनी सरळ नका करु असा सल्ला दिला.. ते म्हणाले कि फार वाईट रिव्ह्युज् आहेत कस्टमरचे.. कळत नाहीए लोकांना.. अ‍ॅप्स धड काम करत नाहीए आणि अजुन बरचं काही.. Windows 7 ultimate is best among all असं म्हणाले.. मीसुद्धा तीच वापरते आणि छान काम करते ती Happy

>>Upgrade करावे की नाही?<<

आॅफिसचा लॅपटाॅप असेल तर हा निर्णय आयटि ने घ्यायचा आहे. कंपन्यांची वेल डिफाइन्ड आयटि पाॅलिसी असते थर्ड पार्टि साॅफ्टवेर इन्स्टाल करण्याबाबत, ओएस अपग्रेड तर मोठ्ठी उडी आहे; पाॅलिसी एकदा चेक करा.

मी घरच्या दोन लॅपटाॅपवर अपग्रेड केलेली आहे. थोडं लुक ॲंड फिल वेगळं आहे, काहि चांगली फिचर्स आहेत. डिफाॅल्ट ब्राउझर एज्ज आहे - हा काहि वेबसाइट्सना इरॅटिक बिहेव करतो, हे अनुभवलं आहे. घरचा लॅपटाॅप आहे म्हणुन फरक पडत नाहि परंतु आॅफिसच्या कामात हा अडथळा ठरु शकतो...

विन ७ प्रोफेशनल + ऑफिस ३६५ प्रो प्लस इज बेस्ट. त्यातही ते शेअरपॉईट वगैरे मला तरी जास्तीचं काम वाटतं पण कोलॅबरेशन मध्ये जास्त फायद्याचं राहातं आणि लोकल डिस्क्वर डेटा साठवण्याची गरज नाही.

मी एक नॉन आय टी माणूस आहे. विंडोज सात खूपच अंगवळणी पडले होते. त्यामुळे विंडोज १० वर अपग्रेडला भीती वाटत होती. पण काहीही प्रॉब्लेम नाही.दिनेश यांनी मराठीचे म्हटले आहे खरे पण मला काही प्रॉब्लेम येत नाही. गुगलचे गुगल मराठी इनपुट वगैरे व्यवस्थित चालते. काही दिवसानी एम एस विं ७ ची अप डेट सुविधा बण्द करीलच तेव्हा १० वर यावेच लागेल

लॅप टॉप सुरु होताना रोज नवीन चित्र दिसते ( बिंग वर दिसते तसे ) बाकी काही विशेष फरक नाही दिसला. माझाही पर्सनल लॅपटॉप आहे. ऑफिसमधे अजून नाही केलेय. पर्सनल वर फार महत्वाचे काम नसते. गाणि ऐकताना, क्लीप्स बघताना फारसे काही वेगळे जाणवत नाही ( लूक्स सोडले तर )

My Lenovo laptop has display flickering and scroll pad related issues with Windows 10 upgrade from Windows 8.1. However my cousin upgraded her dell laptop from Windows 7 to 10 and she has no such issues. IMHO, Windows 10 is better than 8.1 but not that great if you are upgrading from Windows 7. Some features are nice though eg file explorer, media player etc.

अपग्रेडेशननंतर वायफाय आणि ब्लूटूथ चालत नव्हते. वायफायचे सेटिंग बदलल्यावर सुरू झालं. ब्लूटूथ अजूनही चालत नाही. सगळे उपाय करून झाले.

अपग्रेड केल्यापासून कम्प्युटर थोड्या-थोड्या वेळानं फ्रीझ होणे, वायफाय कनेक्ट न होणे (*) या दोन गोष्टी होतात.

या व्यतिरिक्त युजर इंटरफेस बदलला आहे. फन्क्शनॅलिटी काही बदललेली दिसली नाही. अर्थात मी ऑफिसच्या वर्कस्टेशनला कनेक्ट होण्यासाठी ब्राउझर आणि इतर काही फुटकळ कामांसाठी ऑफिस हे दोनच अ‍ॅप्लिकेशन्स वापरले आहेत नवीन ओएस टाकल्यापासून.

* प्रत्येक वेळी लॉगिन केले की कनेक्ट होते पण स्लीप मोडमधून जाग आली की राउटरचा प्रॉब्लेम आहे असा मेसेज येतो, तो ट्रबलशूट केला की मग कनेक्ट होतो.

तुमची रिस्क घ्यायची तयारी आहे का? मी स्वतः विंडोज वापरत नाही पण बरेच मित्र वापरतात आणि जवळपास सगळे आता १० वर आहेत. त्यांचा अनुभव ५०-५० आहे. काही जणांना अजिबात त्रास झाला नाही बाकीचे प्रत्येक जण वेगवेगळी अडचण सांगतो. या सर्व अडचणी सोडवता येतात पण त्याला द्यावा लागेल वेळ आणि जो तुमच्याकडे बहुधा नसावा. त्यामुळे ७ वर अडचण येत नसेल तर अजिबात अपग्रेडच्या फंदात पडू नका. योकुंशी पूर्णतः सहमत - विन ७ प्रोफेशनल + ऑफिस ३६५ प्रो प्लस हे कॉम्बिनेशन ऑफिसच्या वापरासाठी सर्वोत्तम आहे.

विन ७ मधलं आयई १२ महा बकवास आहे. Why couldn't Windows build a solid browser like Safari on Mac or may be like Chrome or Firefox with all Sharepoint functionality? मी शक्यतो क्रोमच वापरतो ऑफिस लॅपटॉप आणि वर्कस्टेशन वर पण शेअरपॉईंट करता पुन्हा आयई वर जायला लागतं कारण क्रोम मध्ये एक्सेल/वर्ड्/पॉपॉ चे वेबअ‍ॅप्स चालत नाहीत. बरेचदा अ‍ॅडमिन राईट्समुळे एखादी फाईल ही वेबअ‍ॅपमध्येच एडीट करायला लागते त्यावेळेस ही अडचण जाणवते.

विंडोज 8.1 मधून त्यांनी १) वेब पेज सेव हा पर्याय काढला ,२) कॅाल रेकॅार्डिंग सपोर्ट( फोनसाठी) काढला ३) एफेएम रेकॅार्डिंग काढले.
विंडोज १० मध्ये सतत वनड्राइव वापरणे उद्देश ठेवला आहे तो सर्वांनाच उपयोगाचा नाही.मासॅा च्या स्वत:च्या सर्फेस उपकरणांपेक्षा htc आणि इतर कंपन्यांचे लॅपटॅाप वगैरे स्वस्त येताहेत.

सगळ्यांना धन्यवाद.
अपग्रेड न करण्याचा निर्णय घेतो आहे. नविन लॅपटॉप्स घेउ त्यावेळेस Windows 10 येईल तेव्हा बघु. तो पर्यंत त्यातिल त्रुटी कदाचित सोडवल्या असतील.

पायस, तुमचे म्हणणे पटले दोन तीन लॅपटॉप्सना प्रॉब्लेम्स आले, सोडवता येईल पण सगळ्या सिस्टिम्स अपग्रेड करुन असे प्रॉब्लेम्स सोडवत बसणं कठीण.

योकु मी तर IE वापरणं केव्हापासून बंद केलय.पण काही ऑनलाईन टेंडर सिस्स्टीम्स साठी वापरावं लागतं. वैताग आहे.

अपग्रेड करून घ्या, विशेष काही फरक नाही.

लॅपटॉप्ची बॅटरी आधीपेक्षा लवकर संपते असा एक फील मला आलेला आहे, इतर लॅपटॉपवर विंडोज १० वापरणार्‍यांचा काय अनुभव आहे?

वर वाय फाय च्या बाबतीत सांगितल्यासारखा प्रॉब्लेम मला साउंड डिव्हाईस्च्या बाबतीत आला होता. लॅपटॉप सुरु केल्या केल्या साउंड ऑफ असायचा आणि ट्रबलशूट केला की ओके व्हायचा. नंतर काही दिवसांनी इंटरमिटंट अपडेट्स केल्यावर ही अडचण दूर झाली.

आजच आमच्या ऑफिसमधे Windows10 लोड केल्यावर त्या मशीन्सवरची सर्व CAD softwares बन्द पडली.
आता windows 8 ला downgrade करूनही ती चालत नाहियेत.
IT वाले झगडताहेत.
जरा जपूनच.

अगदी पहिल्यांदा १० आले तेंव्हा upgrade केले होते
मला out look ला प्रोब्लेम आला होता . नेट connection ला पण प्रोब्लेम होता
पण out look चे प्रॉब्लेम्स नाहीच solve झाले .
त्यामुळे downgrade करावेच लागले .
downgrade करतानाही त्रास झाला . support पण निट नव्हता मिळाला.
हे अगदी पहिल्या ८-१० दिवसात केले होते
आता कदाचित support सुधारला असेल

मला एक सांगा, हे विन १० चे अपग्रेड आहेत, हे एंटरप्राईज व्हर्जन्स आहेत का होम बेसिक आहेत? म्हणजे माझा लॅपटॉपवर विन ७ ते विन १० अपग्रेड केल्यावर तो लॅपटॉप कुंपणी डोमेनमधे घेता येईल का?

नवर्‍याने त्याच्या डेल च्या लॅपटॉपचं महिन्याभरापुर्वी विंडोज ७ प्रो वरून अपग्रेड केलं होतं. त्याला वायफाय कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतोय. घरी वायफाय अजिबात चालत नाही (म्हणजे लॅपटॉप कनेक्ट होतो वायफयशी पण नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही). कॉलेजात मात्र वायफायवरुन कनेक्टिव्हीटी मिळते. फोनच्या हॉटस्पॉटवरुन पण कनेक्टिव्हिटी मिळते.
वायफाय सेटींग्ज बदलून बघितल्यात पण काही फरक नाही पडला. सध्या तरी तो घरी वायफाय वापरतच नाहीये.

त्याचा अनुभव बघून मी माझा लॅपटॉप अपग्रेड करायची हिम्मत केली नाही. तसंही मला विंडोज ७ प्रो जास्त आवडलिये.

गिरी, तुझ्या लॅपटॉपवर विंडोज ७ चे जे वर्जन असेल (home basic, home premium,professional or ultimate) त्यानुसार तुला विंडोज १० चे वर्जन मिळेल. डोमेन ला कनेक्ट करण्यासाठी Prof or Ultimate लागते.
इथे पहा.

तुमच्या कंपनीमधे मासॉ ऑफिस आणि इंटरनेट सोडता इतर कुठलीही अ‍ॅप्लिकेशन्स वापरत असाल तर ती १० वर चालतात का ह्याचा त्या त्या अ‍ॅप्लिकेशनच्या ऑफिशिअल सपोर्ट कडून चौकशी करुन खात्री करुन घ्या. एखाद्या अ‍ॅप्लिकेशनला सपोर्ट नसेल तर तुमचे काम अडु शकते.

माझ्या पर्सनल लॅपटॉपवर नेट कनेक्शनचा खुप त्रास झाला. १० वर नेट वापरासाठी आपोआप एज येते पण ते भयाण स्लो आणि कसही चालत होते. मी अगदी विन्डो ७ ला परत येण्याचा निर्णय घेतलेला पण कुणीतरी इन्टरनेट एक्स्प्लोरर वापरयचा सल्ला दिला. आय ई आयकॉन Desktop वर नव्हते. शोधून टाकावे लागले. मराठी लिहिण्याची फारच अडचण होत होती. आता सराव झाला पण आय ई खूप स्लो होते.

Win 10 as a free upgrade is not available for existing win 7 professional users

योकु, आहे. आमचे Win 7 Pro च आहे, आणि free upgrade साठी नियमित पॉप-अप येत असतो.

No. Win १० free upgrade is available for win ७ pro users. My husband had that upgrade and I am getting a message about free upgrade daily.

कुणी विंडोज फोन १० अपडेट केलंय का?
करून पाहा, विंडोज फोन जास्त छान वाटतोय वापरायला.

डायरेक्ट अपडेट मिळणार नाही. त्याकरता विंडोज अ‍ॅपस्टोर मध्ये जाऊन 'विंडोज फोन अपग्रेड अ‍ॅड्वायझर' हे अ‍ॅप डालो करून इंन्स्टॉल करा. मग या अ‍ॅप थ्रू अपडेट चेक करा. त्यानंतर, अ‍ॅपमध्ये शेवटल्या स्टेपला सांगितल्यानुसार फोनच्या सेटींग्ज मधून अपडेट चेक करा आणि विंडोज फोन १० डालो + ईन्स्टॉल करा...
लई लिच्चड काम केलंय पण विंडोज नी यावेळेला.

अपडेट साईज बरीच मोठी आहे, त्यामुळे पेशन्स ठेवा. इन्स्टॉल व्हायलाही बराच वेळ घेते.

Pages