होळी भाग ३

Submitted by नितीनचंद्र on 30 April, 2011 - 10:32

http://www.maayboli.com/node/25235 होळी भाग १
http://www.maayboli.com/node/25282 होळी भाग २

होळीचा दिवस उगवला तो गडबडीचा. ज्याच्या त्याच्या घरात पुरण शिजत होत. बाजारपेठेतले व्यापारी दुपारी तीन पर्यत दुकाने उघडी ठेऊन होते. चांगला कोल्हापुरी गुळ, खपली गहु आणि हरबर्‍याच्या डाळीची पोती संपत आली होती. चिंचवडात लाईट येऊन पंचवीस वर्ष झाली असतील त्यामुळे जाती मोडुन आता गिरण्यात लाईनी लागत होत्या. दुपार झाली तशी सकाळी दळायला टाकलेले गहु दळुन झाले की नाही ते बघायला प्रत्येक घरची बाई मुलींना धाडत होती. राज्याच्या घरी हे काम मुलांच होत. हातावर दुपारच्या जेवणाच पाणी पडताच राज्याची आई राज्याला म्हणाली. दळण आणशील ना ?

" हो ग आणतो म्हणल ना ?" तु कसा नाही म्हणणार रज्जीच्या घरावरुन दळण आणायला गेलास की ती पण येईल दळणाच कारण काढुन." राज्याच्या आईनी चेष्टा केली. आज चेष्टा केल्यावर राज्या खुलला नाही. मान खाली घालुन अंगात शर्ट घालु लागला.

"काय झाल रे ? भांडण झाल काय रज्जीबरोबर ?" आईने पुन्हा विचारल.

" राज्या घुम्यासारखा गप्प पाहुन आईने पुन्हा त्याला थांबवल." काय झाल मला तरी सांगशील ?

" काय होणार ? ती जाईल लग्न करुन. अजुन काय होणार ? भाई काय थांबणार आहेत मी कमवता होईपर्यंत ? आणि हे लग्न लावायची काय सोय आहे. भाईंना तोंड राहिल का जातीत ?

"अस जर कळतय तर मग तीला भेटायला का जातोस ?" चमकुन राज्याने आईकडे पाहिल.

" तुला काय वाटल ? मला कळत का नाही ? राज्याला तोंड उरल नव्हत बोलायला. सायकलची किल्ली घ्यायला तो माजघरातल्या नेहमीच्या ठिकाणी गेला. किल्ली फ़िरवत आला तो आईच समोरच थांबली होती.
"आई, या विषयात माझ डोक काम करत नाही. तु अजुन डोक खाऊ नको. माझा टाईमपास चालला नाही मला रज्जी आवडते हे तुलाही माहित आहे. "

अरे मोठी गोड आहे. ती मलाही आवडते. मागच्याच महिन्यात तु बसला होतास अभ्यासात डोक घालुन म्हणुन मी गेले दळण आणायला तेव्हा मला म्हणाली आत्या मी येते दळण पोचवायला. मी म्हणल की काय ग काकु ची आत्या कशी झाली. त्यावर मान खाली घालुन लाजुन हसली. पण काय करणार? जे काय करेल ते मोरयाच करेल. तु जीवाला लाऊन घेऊ नको. भाईंनी तिच लग्न दुसर्‍या कुणाशी लावायच ठरवल तर तु डोक्यात राग घालुन घेऊ नकोस. तुला पण लहान बहिण आहे हे लक्षात असुदे. यावर काही न बोलता राज्याने पायात चपला चढवल्या आणि बाहेर येऊन सायकलला टांग मारली.

आपल्याला लहान बहिण आहे तिचही कधी काळी लग्न कराव लागेल. आपण जाती बाहेरची मुलगी आणली तर तिच्या लग्नाचा प्रश्न होईल याचा विचार कधी आपण का केला नाही? जाताना दुकानात त्याने डोकावले तर भाई गादीवर आकडेमोड करत बसले होते. रज्जीचा पत्ताच नव्हता. पुर्वी तिच्या घरात राजरोस जाता यायच कारण तिच्याच वयाचा तिचा चुलतभाऊ सुधीर आपला मित्र होता.वर्गात पण होत. दोन वर्षापुर्वी चिंचवडच्या नविन भागात त्याच्या वडीलांनी दुकान काढल आणि सोय म्हणुन त्याच कुटुंब वेगळ झाल. पहिली पासुन सुधीर, रज्जी आणि राज्या एकाच वर्गात होते. चवथी झाल्यावर मुलांची आणि मुलींची शाळा वेगळी झाली तरी अभ्यासाला रज्जीच्या घरात सगळे बसायचे ते थेट दहावी पर्यंत. सुधीरने दहावी झाल्यानंतर बाहेरुन १२ वीच्या फॉर्म भरला पण रज्जीने तेही नाही केल. गेले दोन वर्ष दोघे भेटत होते पण या भेटी कोणाला नकळत.

अनिलशेठ्च्या गिरणीत तो पोचला. न बोलता दळणाचे पैसे देऊन पिशवी सायकलला लावली आणि निघाला. त्याच्याच गिरणीत काम करणार्या गोविंदाने शिट्टी मारली. थोड थांब, रज्जीच पण दळण आलाय. ती पण येईल पाठोपाठ हे गोविंदाला सुचवायच होत. पण राज्याला या क्षणाला काहीच नको झाल होत.

घरात दळण ठेऊन जरा झोपाव म्हणुन राज्या आडवा झाला. त्याला जाग आली ते टिमक्या वाजताना ऐकुन. लहान मुलांनी गल्लीत टिमक्या वाजवायला सुरवात केली होती. घरात पुर्ण शिजवल्याचा वास येत होता. चार वाजले होते. पोरांना जमा करुन उरलेल्या गवर्‍या आणायच्या होत्या. राज्या धड्पडत उठला. मोरीत चुळ भरुन केस विंचरुन निघणार तोच आई म्हणाली "जरा थांब चहा पिऊन जा."

"नको आई उशीर होईल.". आईकडे न पहाताच राज्या बोलला.
" मगाच्या बोलण्याचा राग आला कारे ?
"तु काय चुकीच बोललीस आई ? या घरात तुच काय अण्णांसुध्दा मला रागवायच्या आधी विचार करतात हे मला माहित आहे. बोलता बोलता राज्याने खास ठेवणीचा कुर्ता अंगावर चढवला. पायात नेहमीची पॅट आणि वर कुर्ता हा त्याचा आवडीचा ड्रेस. चपला सरकवुन राज्या बाहेर सुध्दा गेला.

भैरोबाच्या देवळाजवळ तो पोचला तोवर उस्मान्याने बैलगाडीतुन उरलेल्या पाचशे गवर्‍या आणलेल्या दिसत होत्या. "काय रे, कुठुन आणल्या गवर्‍या? " राज्याने विचारले. "कुठुन म्हणजे काय वाल्हेकरवाडी वरुन. इथ कोण विकत का गवर्‍या ? बैलगाडी पण वाल्हेकरवाडीची अन वरुन तानी पण वाल्हेकरवाडीची."त्याच्याबरोबर गवर्‍या आणायला गेलेला बाब्या बोलला.

आता ही तानी कोण ? राज्याने विचारले.

तानी कोण ? भले म्हन्जे तुला काहिच माहीत न्हाई ? अर तानी म्हणजे उस्मान्याच नव्व सामान. एक दिवस तिच्या भाजीच्या पाट्या याने सायकलवर आणल्या तेव्हा पासुन रोज वाट पाहुन असती. हा रोज वाल्हेकरवाडीला जातो तिच्या पाट्या सायकला बांधतो तिला फ़ुड घेतो आणि येतो चिंचवडच्या बाजारात. ए XXXX रोज कुठ रे पुढ बसती ती? पाटी घेउन मागच बसती. एक दिवस पाटी जड हुती म्हनुन पुढ घेतली.

"बर बास झाल तानी पुराण हे घे शंभर रुपये आणि ज्याचे त्याला दे. ऐ पोरांनो त्या टिमक्या द्या घरला ठेउन इकड या जरा गवर्‍या द्यायला. उस्मान्या, राज्या आणि बाब्या गवर्‍या रचायला घेणार तोवर गुरव आला. काल बाहेर गावी गेला होता तो आज दुपारी गावात आला.

हे लेई बेस झाल. काय गवर्‍या जमवल्या पोरांनो. शाब्बास शाब्बास. मी जातो आता पाटलाकडे सुर्यास्ताला त्यांना यायला सांगतो. पोरांनो जावा गावच्या मोठ्या माणसांना माझा निरोप सांगा. मी बोलावलय म्हणाव होळीला. सदा गुरव घरात गेला. येताना पायजमा सदरा आणि सणासुदीला घालायची खास टोपी घालुन पाटील वाड्यात गेला. पोरांनी उरलेल्या गवर्‍या रचल्या. गुरवाच्या मुलाने एरंड होळीच्या मधोमध ठेवला व होलीच्या पुजेसाठी हळद, बुक्का, गुलाल, पान सुपारी, फ़ुल सर्वकाही आणुन ठेवल. बघता बघता सहा वाजले. सुर्य अस्ताला गेला.

गावची सगळी मातब्बर मंडळी जमली. मागच्या दंगलीत ज्यांनी एकमेकांवर वार केले असे एकमेकांपासुन अंतर राखुन उभे होते. दरवर्षीच्या या आनंदाला आपण चार वर्ष मुकलो हे भाव दोन्ही गटात होते. तिसर्‍या गटात गावचे पाटील,ग्रामजोशी केशवतात्या, चिंचवड देवस्थानचे महाराज आणि गुरव घरचे तीनही भाऊ उभे होते. सर्वात मोठे सदा गुरव यांनी पुढे होऊन गावच्या पाटलांना होळीची पुजा करुन होळी पेटवायची हात जोडुन विनंती केली. या प्रथेचा मान ठेवत पाटिलांनी जसे गुरव सांगत होता तशी पुजा करुन होळी पेटवली. मग होळी भवती पाणी फ़िरवुन होळी चांगली पेटल्यावर मोठ्ठा नारळ आणि पुरणपोळी होळीला अर्पण केली. नारळ पडल्या पडल्या मुलांनी तो उडवला. मुलांची तो नारळ प्रसाद म्हणुन खायला फ़ोडला. पहिला भाग प्रतिष्ठीतांना वाटुन झाल्यावर दुसरा भाग मुलांकडे गेला.

होळी पुजेचा म्हणुन राज्याने लाह्या बत्तासेचा प्रसाद आणला. राज्याने तो प्रसाद उपस्थितांना वाटला. मग प्रत्येकाच्या घरची पुरणपोळीचा नैवेद्य येउ लागला. प्रत्येकाच्या नावान बोंबाबोंब सुरु झाली. टिमक्या वाजु लागल्या. होळीच्या ज्वाळा वर वर जाऊ लागल्या. गावची म्हातारी मंडळी मातब्बर नेते मंडळी नमस्कार चमत्कार करुन निघाली.

हे रात्री आठला मुलांनी एक झाड तोडुन आणल. ते तोडताना आणि आणताना सगळ्यांची दमछाक झाली होती. ते वाळलेल झाड होळीत गेल आणि मग मुल शांत बसली. तोवर वसंताभाऊ आणि त्याचे चार भाऊबंद आले. वसंताभाऊने राज्या आणि उस्मान्याचे कौतुक करुन पाठीवर थाप मारली. संपुर्ण संवादात वसंताभाऊ तुम्ही माझ ऐकत राहिलात तर एक दिवस सगळ गाव तुमच ऐकल हे सांगण्याकडे कल होता.

वसंताभाऊने जाताच उस्मान्याने बाजुला ठेवलेली ढोलकी काढली. ती राज्याच्या हातात देऊन तो म्हणाला " बजाव उस्ताद बजाव" स्वत:साठी त्याने बुलबुलतरंग आणल होत. संध्याकाळचे आठ वाजुन गेले होते. जवळ जवळ सगळ्यांचे नैवेद्य होळीला अर्पण होऊन बोंबा मारुन पोरांचा घसा सुकला होता. दगडी पारावार सगळी मुल जमली. हळु हळु काही लहान मुल काही मोठी माणस पुरणाच्या पोळ्या खाऊन ह्या मुलांची गंमत बघायला जमली. कुणीतरी मोठ्या हंड्यात पाणी आणल.

पाणी पिऊन राज्या आणि उस्मान्याने दगडी पारावर बैठक मारली. उस्मान बुलबुलतरंगच्या तारा ताणुन प्लॅस्टीकच्या स्ट्राईकरने सुर वाजवुन बघत होता तर राज्याने ढोलकीच्या वाद्या ताणुन ढोलकीवर थाप मारुन अंदाज घेत होता. उस्मान्याने ढोलकी लागली का म्हणुन नजेरेने राज्याला विचारले. राज्याने पण थापेनेच ढोलकी लागल्याचा इशारा केला.

सिनेमाच्या गाजलेल्या गीतांच्या सुरावटी बुलबुलतरंगवर वाजवण्यात उस्मान्या पटाईत तर कोणतही ताल वाद्य मग ते ढोलकी, तबला, मृदुंग या सारखी पारंपारिक असो की कॉलेज मधल्या गॅदरिंगला कोंगो, बोंगो ड्रम असो राज्याने हात लावला आणि दाद नाही मिळाली अस कधी झालच नाही.

" तारिफ़ तेरी निकली दिल से, आई है लब पे बन के कव्वाली.........

उस्मान्याने आवाज लावताच दोन चार मुलांनी टाळ्याचा ठेका धरला. राज्याला ढोलकीचा सुर गवसला आणि एका जोरदार जलश्याला सुरवात झाली. गल्लीमधले लोक हळु हळु जमा व्हायला लागले. स्पिकर्स चा व्यावसायीक समोरच रहात होता त्यालाही सुरसुरी आली. साईबाबांची आळवणी संपायच्या आत एक्स्टेंशन बोर्ड, माईक अ‍ॅम्प्लीफ़ायर, स्पिकर्स ची जुळणी होऊन आवाज लांबवर पसरला.

तल्लीन होऊन गाताना उस्मान्याच भान नव्हत ना राज्याच. गाण संपताच आजुबाजुच्या लोकांनी टाळ्यावाजवल्या अणि दोघं भानावर आले. उस्मान्यात आणखी साधारण बुलबुलतरंगवर जमतील अशी दोन गाणी वाजवली आणि म्हणली तो पर्यंत आणखी लोक जमा झाले. बाब्या स्टेजवर आला आणि कुजबुजला की वर्मांच्या घरी दोन पाहुणे आलेत आणि ते मस्त गाणी म्हणतात त्यांना येउदेका ? राज्याने मान हलवली तोवर वर्मांच्या घरातुन तबला आणि पेटी घेऊन ते युवक येऊन दगडी पारावर बसले.

उस्मान्याने त्या दोघंशी बोलुन लोकांना हे इंदोरचे कलाकार आहेत अशी ओळख करुन दिली. सुरवातीला दोन चार साधी गाणी झाली. उस्मान्याला त्यांनी बोलावुन एक अडचण सांगीतली. उस्मान्या म्हणला " उस्मे क्या है मैं पुरा इंतजाम करता हु. राज्याला त्याने खुणेने दोघ दर्दी असल्याच सांगीतल. सायकलवर टांग मारुन उस्मान्या गेला. दोन मिनटात परत आला आणि एकाच्या घरात जाऊन त्याने तांब्या भांड आणल. तांब्या भांड्यातल पाणी पेटी वाजवुन गाण म्हणणार्‍याने घेतल आणि मग एकापेक्षा एक आराधना, बॉबी, मेरानाम जोकर, या सिनेमातली गाजलेली गाणी सुरु झाली.

"राज्या, चलकी भोळ्याकडुन निरोप आलाय." बाब्यनं निरोप सांगतच राज्या, बाब्या, दिल्या, बबन्या सगळी एकेक करुन भांग लाऊन आली. यात बाब्या प्रत्येकाबरोबर होताच. बाब्याचे चार पाच ग्लास झाले. भोळे म्हणला गोड खायच नाही तोवर प्रत्येकाला भुक लागली. आज सगळ्यांच्या घरी भाकर्‍या नव्हत्या. होत्या पुरणाच्या पोळ्या. भोळ्याचा निरोप विसरुन सगळे पटापट जेऊन पुन्हा हजर झाले तोवर गाणी चालुच होती.

आता पेटी वाजवुन गाणारा तबला, ढोलकी वाजवायला बसला आणि तबला ढोलकी इतका वेळ वाजवणारा पेटी वाजवुन गायला बसला.

" भंग का रंग जमा हो चकाचक, फ़िरलो पान चबाय " हा सुर ऐकताच इतका वेळ मुकेशची जागा आता किशोरकुमारने घेतल्याच दर्दी लोकांच्या लक्षात आल. सगळी मुल नाचायला लागली. लोकांनी पण टाळ्यावर ताल धरला. लहान मुल नाचायला लागली. आणखी मोठ्यावयाच्या गल्लीतल्या लोकांना पण मोह आवरला नाही. तीही शिट्या वाजवुन नाचायला लागली.

गाण संपल आणि वन्स मोर झाल. तांब्या भांड्यातल पाणी संपल होत. उस्मानने पुन्हा तांब्या भांड नेल आणि भरुन आणल. दुसर्‍या वेळेला गाण सुरु करताना पुन्हा गायकाने पाणी घेतल. काही लोक गायकांच्या तांब्याभांड्यात नेमक काय असाव याचा चर्चा करुन अंदाज घेत होते. आजुबाजुच्या लोकांच्या लक्षात आल की बाब्या गाण संपल तरी अजुन नाचतोय. सगळे त्याच्या कडे बघुन हसत होते. एक दोघांनी त्याला थांबवल पण बाब्याचा डान्स थांबेना. मग राज्या आणि उस्मान्या धावले आणि बाब्याची उचलबांगडी केली.

दोन चार गाण्यानंतर कार्येक्रम संपला. मोठी माणसे, लहान मुल घरी गेली. रात्रीचे बारा वाजुन गेले. पोरांनी गोधड्या पारावर अंथरल्या. बाब्याचे वेडेचाळे चालुच होते. बबन्याने डोळे मिटले आणि दोन मिनटातच उघडले. "बाबोSSSS आभाळ पडतय." बबन्या ओरडला.

"उस्मान्या सारच गरगर फ़िरतय" राज्या म्हणाला. केली काशी ? कुणीरे झक मारायला सांगीतली ? भांग न पिलेला एकटाच उस्मान्या सगळ्यांची समजुत घालत होता. कोणाची बोटात बोट अडकली ती सोडवत होता.

समाप्त

गुलमोहर: 

.

नितीन बोरगेंंशी सहमत,

पण तिसरा भाग जरा कमी रंगला. दुसृया भाग जसा रंगला तसा नाही रंगला. ही मालिका अशीच चालु राहिल का?

क्लासच ! सगळंकाही कसं डोळ्यासमोर उभं राहीलं. तिन्ही भाग एकदम वाचून काढले. चिंचवडशी तसा प्रत्यक्ष संबंध नव्हता आला कधी. पण हे सगळं जवळ-जवळ प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेलं असतं. विशेषतः घोटा हा प्रकार.........
रात्रभर सायकल चालवल्यासारखे दोन्ही पाय चालवत होतो बिछान्यात, Proud मला वाटतं ९१ सालची गोष्ट असेल. लै झ्याक देवा !! Happy

धन्यवाद, नितीन बोरगे, नविन, विशाल आणि शुभांगी.

मी घोट्याच्या नशेत प्रत्यक्ष सायकल चालवली. पुर्वी सायकल ला एक मोठ्ठा स्टॅड असायचा. ज्यात सायकलच मागच चाक अधांतरी असायच अश्या सायकलवर रात्रभर चालवली.

लैच राडा घालायचो. असो संपले ते दिवस. आता फक्त आठवणी.

आम्ही घोटा मारुन दिवसभर सायकल हाणत रंगपंचमी खेळलेलो, मग काय रात्री बिछान्यावर पडलो तरी पाय थांबायला तयारच नाहीत Wink

कवित शी सहमत......
अजुन वाचायचीय...................अरेरे
खुप लवकरच्च्च्च्च्च संपली..

नितिनचंद्र, छान आहे हो शैली.
पण म्हणूनच कदाचित गोष्टं एकदम संपल्यासारखी वाटली. ह्या गोष्टीत बरीच "सब्-कथानकं" चालू असल्याचं वाटलं. त्यामुळे पंचवीस नाही पण गेला बाजार दहा तरी भाग येतील अशा आशेत होते.
अजून विचार करा. ह्याच कथेच्या बाजात्-शैलीत... मोठी लिहून काढा नं.
आम्ही वाट बघतो... कसं?

दाद, आपल्या प्रतिसादाबाबत धन्यवाद. रोहीत, तृष्णा, कवित पुढचा भाग लिहण्याचा विचार आहे. तुमचेही प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हा भाग पण छान होता..
खरंच, कथा लवकर संपली असं वाटलं.. Sad
anticlimax का काय म्हणतात तसं झालं.. अजून लिहा..
राजा आणि रज्जीचं काय आणि?

क्लासिक. Happy
वातावरण निर्मिती भारीच. मी पहिल्यान्दाच वाचली कथा.
राज्या आणि रज्जी काल्पनिक नसुन सत्य जरी असले तरी तो काळ लक्षात घेता काय झाल असेल हे समजण फार अवघड नाहिये.
तुमच्यासोबत चिन्चवड दर्शन कार्यक्रम ठरवतो लवकरच.
जरा जुन्या जागा दाखवा आम्हालाहि. Happy

झकासराव,

राज्या आणि रज्जी काल्पनिक नसुन सत्य जरी असले तरी तो काळ लक्षात घेता काय झाल असेल हे समजण फार अवघड नाहिये. खर आहे.

आमच्या मित्रांच्या गप्पा सुरु झाल्या म्हणजे ओघाने याविषयावर गाडी येते आणि रेंगाळते. राज्या आपल्या संसारात आनंदात आणि रज्जी सुध्दा. दोघही समोरासमोर येण्याचे प्रसंगही जवळ जवळ नसतातच.