तुला समजण्यासाठी उरली खर्ची पड़ते

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 March, 2016 - 02:33

निसर्गासही समर्पणाचे महत्त्व कळते
नवी पालवी फुटण्यासाठी जुनाट झड़ते

तिला हसवण्यापूर्वी मित्रा विचार कर तू
हसता हसता वेडी हमसाहमशी रडते

गर्व कशाला बाळगता या लखलखण्याचा
कुणास ठावुक कोण अचानक कधी निखळते

स्वतःस जेव्हा समज दयायची पाळी येते
क्षणार्धामधे धार स्वरांची बोथट बनते

झाड़ पाडल्या गेले होते केव्हाचे ते ...
अजाण पिल्लू अजून घरट्यामागे लपते

मला समजण्यामध्ये अर्धी हयात गेली
तुला समजण्यासाठी उरली खर्ची पड़ते

म्हणण्यावाचुन हे गत्यंतर उरले नाही ...
'जे घडते ते बहुधा भल्याचसाठी घडते !'

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>हसता हसता वेडी हमसाहमशी रडते>>>वावा!

>>>स्वतःस जेव्हा समज दयायची पाळी येते
क्षणार्धामधे धार स्वरांची बोथट बनते>>>क्या बात!

>>>मला समजण्यामध्ये अर्धी हयात गेली
तुला समजण्यासाठी उरली खर्ची पड़ते>>>खासंच!