लातूर

Submitted by विप्रा on 1 July, 2009 - 06:07

लातुर् चे मेम्बर नाहित का ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाहीर सूचना

आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्‍यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्‍यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्‍यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.

लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.

सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्‍या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.

लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.

१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.

२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.

वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.

वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.

नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

तुम्हालापण शुभेच्छा!
इतकी वर्षे आमच्या गावात सरकारी सुट्टी असे पण यापुढे रेस्ट्रिक्टेड हॉलिडे देणार यावर्षीपासून.
असो.
सकाळी सकाळी मुले जाऊन ध्वजवंदन करून आली.

मार्गशिर्ष अमावस्येला सोलापुर जिल्ह्याचा काही भाग, लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात "वेळा अमावस्या" (बोली भाषेत 'येळवस') हा शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण साजरा केला जातो. हा सण शेजारील कर्नाटकातुन महाराष्ट्रात आला आहे. 21 डिसेंबर रोजी हा सण मोठ्या उत्साहात पार पडावा..
ह्या दरम्यान रब्बीचे पिक जोरात असते, शेतकरी बांधव ह्या दिवशी कुटुंबासहीत, मित्रपरीवारासह शेतात खोप बांधुन काळ्या आईची पुजा करतात.

लातुरसारख्या शहरात ह्या दिवशी अघोषीत संचारबंदी असल्यासारखी असते, कलेक्टर डिक्लेअर्ड हॉलीडे असतो. बँकाना वगैरे सुटी नसते पण लोक सकाळपासुनच शेतात गेल्यामुळे काम फारसे नसते. व्यापारी प्रतिष्ठाने व ईतर व्यवहार पुर्णपणे बंद असतात.

नुकत्याच आलेल्या वाटाणा , तुरीचे दाणे घालुन केलेली भाजी ( भज्जी ), तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावुन केलेली आंबील अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो.

उत्तरपुजेचे वेळी गवताच्या पेंड्या पेटवुन शेतात फिरवतात व होलगा , होलगा म्हणतात.
होलगा हा शब्द कानडी असावा, पण बहुधा सम्रुध्धी येवु दे असा काहीसा अर्थ असावा.

"वेळ अमावस्या" या मराठमोळ्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा...

डिसेंबर पासुन पाणी विकतचे, प्यायचे आधीपासुनच विकत घ्यावे लागत होते.
टँकर वाले पण मस्त भाव वाढ करताहेत.
पावसाळ्याची आतुरतेने वाट बघतोय मराठवाडा.

विलासराव गेले अन लातुरची रयाच गेली ..... असे होणे वाईट, पण असेच होते. एकच एक पक्ष, एकच एक नेता यांचे पाठी गेले की नंतर त्या त्या नेत्याचे शत्रु नेत्या ऐवजी पब्लिकलाच वेठीस धरतात..... त्याचेच लातुर हे एक उदाहरण. लातुरची जहागिरी मिळणार नसेल, तर त्यांना पाणी तरी का पुरवावे हे सूत्र.......

कोणत्या ना कोणत्या जीवनावश्यक गरजेकर्ता लोकांना झगडवण्यात नेत्यांचा आजवरचा कालखंड गेलेला, आता बाकी काही नाही तर पाण्याकरताही लोकांना झगडवण्यात जुनेजाणते राजकारणी माहिर आहेतच, तेच चाललय.
अन त्यातुन फारच भडकतय पाण्यावरुन असे वाटले, तर तमाम लोकांना भलतीकडेच "छू:" म्हणून सोडायला टारगेट्स आहेतच भांडारकरसारखी...... !
वाईट वाटते एकंदरीतच मराठवाड्याबद्दल...

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

नमस्कार .
गेले वर्षभर चाललेले विलिनिकरण (सहयोगी बॅन्काचे भारतिय स्टेट बॅ.न्केत) १ एप्रिल पासुन होणार.
मराठवाड्यातील निझाम काळापासुनची महत्वाची बॅंक स्टेट बँक औफ हैदराबाद चे अस्तीत्व नाहीसे होणार.
७५ वर्षांची एक चांगली बँक इतीहास जमा होणार.

Retail Alliance Ad.jpg

नमस्कार .

आम्ही अजुनही पावसाच्या प्रतिक्षेत .