एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी
पिचकीन जी तो परप्राणाने
छेदुनी टान्गूनी सारी लक्तरे
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी पिपाणी द्या हीज आणुनी
मती जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
कुन्थत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढला धोका
खांद्यास चला खांदा देऊनी
एक 'कन्हैया' द्या हीज आणुनी
(वाजवील तो बासुरी सुन्दर)
प्राप्तकाल हा विशाल धूसर
सुंदर बेणी तयात खोदा
निजधामे त्या वरती नोंदा
बसुनी का गाढवीवर मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या सि.न्हावर,ह्या वाघीणीवर
मुढानो या त्वरा करा रे
मूढते चा ध्वज उंच धरा रे
बेअकले ची द्वाही फिरवा रे
पिपाणीच्या या सुरा बरोबर

मूळ कविता :
एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सारी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मजलागुनि
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे
समते चा ध्वज उंच धारा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुरा बरोबर

विषय: 
प्रकार: 

एक जेन्यूईन शंका!
पप्पू पुरुष कॅरॅक्टर आहे का?
असल्यास पिपाणी द्या हीज आणूनी होणार नाही.
ह्याज आणूनी/ ह्यास आणूनी होईल.

आता मुद्दाम चिडवायला तुम्ही पप्पू नावाच्या व्यक्तीचा उल्लेख स्त्री सर्वनामाने करत असल्यास माहिती नाही.

कविता भारीये.:फिदी: मोदीनी कृती जास्त करावी, शब्द प्रयोग कमी करावे आणी राहुल गान्धी यानी राजकारणाचा अभ्यास जास्त वाढवावा. मोदी जिथे जातात त्या स्थळाचे नाव सान्गून जातात, राहुल ते पण करत नाही, तर त्यानी ते करावे, म्हणजे सकाळ मध्ये ढिन्ग टान्ग कमी होईल. राहुल यान्चे वडील विरोधकाना पण तसा मान वगैरे देत होते. राहुल यानी तसे करुन बघावे. मोदीनी पण विरोधकान्चे ऐकावे. म्हणजे सन्सदेत हो-हल्ला कमी होऊन काम सुरळीत चालेल.

आणी नट-नट्या-खेळाडु याना राज्यसभेत निवडुन देऊ नये, ते फार भन्कसगिरी करतात.

पप्पू पुरुष कॅरॅक्टर आहे का?
असल्यास पिपाणी द्या हीज आणूनी होणार नाही.
ह्याज आणूनी/ ह्यास आणूनी होईल.

आता मुद्दाम चिडवायला तुम्ही पप्पू नावाच्या व्यक्तीचा उल्लेख स्त्री सर्वनामाने करत असल्यास माहिती नाही.

केदार१२३ | 11 March, 2016 - 10:29 नवीन

हो तसच आहे साती स्मित
<<

अगं केदार, हा निर्बुद्धपणा आहे असे तूस वाटत नाही का?