स्पॉटलाईटला ऑस्कर मिळण्याइतपत असं काय आहे त्यात!!!!????

Submitted by हर्ट on 8 March, 2016 - 01:32

मी रविवारी रात्री स्पॉटलाईट पाहिला. अर्धा हॉल रिकामा अर्धा भरलेला होता. सिनेमा दोन तासांपेक्षा अधिक लांब आहे. सिनेमा चांगला आहे पण अगदी ऑस्कर सारखा महान पुरस्कार मिळावा असे क्षणभरही वाटले नाही.

बॉस्टनमधील एका चर्चमधे अनेक लहान मुलांचे लैंगिक शोषण (लै. शो.) होत असलेल्या घटना घडतात. ही मुले मोठी झाली की त्यांचे आयुष्य इतर सामान्य लोकांसारखे न राहता त्यांना त्यांच्यावरील लै. शो. चा त्रास होतो. हे सर्व करणारी व्यक्ती एका चर्चमधील प्रिस्ट असते. पण ती व्यक्ती नक्की कुठे राहते, ते चर्च कुठले, ठिकाण कुठले ह्याबद्दल काहीच माहिती नसते. हा शोध घेण्यासाठी स्पॉटलाईटमधील सहा लोकांनी एक टीम पुढे येते. आणि मग त्यांचा शोध सुरु होतो. अनेक मुलांच्या मुलाखती होतात. अनेक कोर्टात फेर्‍या होतात. अनेक गुप्तहेरीसारखे कामे होतात. आणि शेवटी ज्याचा शोध घ्यायचा असतो त्याबद्दल एक वेगळीच माहिती पुढे येते. असे अनेक चर्च असतात जिथे लहान मुलांचे लैंगिक शोषण होत असते. संशोधनाचा हा प्रकार कसा होतो. पत्रकार लोक कशी कामे करतात. त्यांना काय काय संकंट येतात हे सर्व स्पॉटलाईट मधे दाखवले आहे.

सिनेमा मनावर खूप ठसा पोहचवतो असे काहीही नाही. सिनेमाची कथा खूप हृदयद्रावक आहे असेही नाही. सिनेमातील प्रसंग फार तरल आहेत असेही नाही. सिनेमातील पात्रांनी खूप उत्तम अभिनय केला आहे असेही नाही. मग नक्की ह्या चित्रपटला ऑस्कर का मिळतो हे मला फार रुचले नाही. कदाचित इथे तुमची मते जाणून मला जे कळले नाही ते कळून माझा गैरसमज दुर होईन अशी अपेक्षा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चित्रपट मी बघितला नाही, पण एक नक्की, या पुरस्कारात इतर सिनेमाबाह्य घटकही असतात ( उदा, एखाद्या कलाकाराला आधी ऑस्कर मिळाले असेल, नसेल वगैरे ) शिवाय मतदात्यांपर्यंत चित्रपटाचे निर्माते किती प्रभावीपणे पोहोचले, तेही महत्वाचे असते.

त्यांची निवड आपल्याला रुचतेच असे नाही.. म्हणून आपले स्वतंत्र मत बनवावे आणि ते मांडावे हे उत्तम..

ऑस्कर मिळाला म्हणजे आपल्याला आवडायलाच हवा किंवा कोणतीही कलाकृती महान का ते आपल्याला कळायलाच हवी असे वाटणे हाच तुझा गैरसमज आहे. आता माझे हे वाक्यही 'अक्कल काढणे' या खात्यात पडून अजून नवा गैरसमज तयार होण्याची शक्यता आहेच.

जागतिक मुंजाबाचा बोळ सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार सुद्धा न मिळालेला सिनेमा चांगला असू शकतो.

बी, मध्ये तुम्ही बरेच दिवस चित्रपट पाहिले नव्हते ना?
मग हल्ली कसे चित्रपट निघतात, पुरस्कार प्राप्त चित्रपट कसे असतात, यावर्षीचे बाकीचे चित्रपट कसे होते आणि त्यामुळे त्यांच्यापेक्षा स्पॉटलाईट कसा चांगला हे तुम्हाला कळणार नाही.
सो अजून अनेक चित्रपट पहा, यावर्षीच्या ऑस्करच्या लिस्टीतले बाकीचे चित्रपट पहा. मग कदाचित हा सिनेमा कसा नंबर एक आहे (किंवा नाही) हे तुम्हाला कळून येईल.

एखाद्या सिनेमाला नॉमिनेशन अन अवार्ड कसे मिळते ते वाचलंयस का ?

मनावर खूप ठसा पोहचवतो असे काहीही नाही. सिनेमाची कथा खूप हृदयद्रावक आहे असेही नाही. सिनेमातील प्रसंग फार तरल आहेत असेही नाही. सिनेमातील पात्रांनी खूप उत्तम अभिनय केला आहे असेही नाही. >> हे किंवा असे कुठलेही क्रायटेरिया अकॅडेमी सांगत नाही. Academy of Motion Picture Arts and Sciences चे मेंबर्स कसे मतदान करतात त्यावरुन सर्व ठरते.

>>>सिनेमाची कथा खूप हृदयद्रावक आहे असेही नाही. 

हो का? इथे तुला कुणी काही मन दुखावणार लिहील तर तो 'बलात्कार' वाटतो, आणि तिथे त्या लहान मुलांवर खरोखर बलात्कार होताहेत ते हृदयद्रावक नाही?

लोकांना "कोर्ट" नावाचा चित्रपट सुध्दा सुवर्णकमळ विजेता वाटत नाही. काय त्यात इतके खास म्हणून विचारतात.
याचा अर्थ हा नाही की कोर्ट चित्रपट वाईट आहे आणि याचा अर्थ हा ही नाही की कळला नाही म्हणजे समोरच्याची बौध्दिक कुवत कमी आहे. प्रत्येकाची एक टेस्ट असते, त्याची नजर असते, त्याचा दृष्टीकोन असतो. आता कोर्ट पाहताना दृष्टीकोन "दबंग" "चैन्नई एस्प्रेस"चा ठेवून गेलो अथवा कोर्ट नाट्य म्हणजे "सन्नीचा अजरामर डायलॉग तारिख पे तारिख" सारखे संवाद असतील. असा विचार केला तर अत्यंत संथ बोअर वाटेल. आणि त्यात चुकिचे काही नाही. कारण त्याच माणसाला "पानसिंग तोमर" "गँग ऑफ वासेपूर" सारखा चित्रपट पसंद पडतो कारण तो ऑफबिट असुन ही वेगवान असतो.

दिनेशदा आणि मेधा ह्यांनी लिहिलंय त्याप्रमाणे नॉमिनेशन्स आणि वोटींगची प्रोसिजर वेगळी असते. बरेचदाच ऑस्कर मिळालेले चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर बाजी मारलेले किंवा लोकांना फार आवडलेले असे नसतात, किंवा क्रिटीकली अक्लेम्ड चित्रपटाला ऑस्कर मिळेलच असे नाही. गूगल करुन वोटींगबद्दल माहिती मिळेल.
अनेकदा लोकांना डिझर्व्हींग वाटणार्‍या व्यक्तींना/चित्रपटाला चित्रपटाला ऑस्कर मिळत नाही. पण ज्युरींना ते डिझर्व्हींग वाटतात. त्यांचे मत हे शेवटी ग्राह्य धरले जाणारे मत!

याचा अर्थ हा नाही की कोर्ट चित्रपट वाईट आहे आणि याचा अर्थ हा ही नाही की कळला नाही म्हणजे समोरच्याची बौध्दिक कुवत कमी आहे. प्रत्येकाची एक टेस्ट असते, त्याची नजर असते, त्याचा दृष्टीकोन असतो.

>>>>> बोल्ड केलेली वाक्य महत्त्वाची आहेत जी बरेचदा लोकं विसरून जातात आणि प्यॅकेजं काढणं सुरू करतात!

(हे बीच्या लेखासंदर्भात नाही.. इनजनरल मत. ऑस्कर अवॉर्ड वोटींगची पद्धत असते आणि ती ते पाळतात!)

>>>>> ऑस्कर मिळाला म्हणजे आपल्याला आवडायलाच हवा किंवा कोणतीही कलाकृती महान का ते आपल्याला कळायलाच हवी असे वाटणे हाच तुझा गैरसमज आहे. <<<<<
हेच वाक्य मी जरा वेगळे लिहिले तर चालेल का?
मी असे लिहीतो की " ऑस्कर मिळाला म्हणजे तो चित्रपटाच्या "सर्वोत्तमतेचाच महानतेचा क्रायटेरिया" आहे असे वाटणे हाच तुझा गैरसमज आहे".. Proud

बी, तुम्ही गेल्या वर्षीचा ऑस्कर विनर बर्डमॅन बघून काय वाटते ते सांगा. तो नावडलेले मी आणि माझे दोन मित्र एवढे तीनच लोक मला माहीत आहेत. पण त्यापेक्षा तुम्हाला स्पॉटलाईट बराच बरा वाटेल असे वाटते.

भास्कराचार्य, बर्डमॅन मलापण आवडला नाही. असो, आपल्यालाच अक्कल नाही अशी समजोन घातली स्वतःची!

बी, इतरांनी म्हणाल्याप्रमाणे ऑस्कर साठी मतदान पद्धत असते. आता त्या बहुतांश मतदारांना तो चित्रपट का आवडला व दुसरा का नाही, ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपली आवड वेगळी आहे असं समजून घ्या झालं. मलातरी नेहमीच ऑस्कर मधील सर्वोत्कृष्ठ परदेशी चित्रपट (फॉरेन फिल्म) पुरस्कारासाठी नामांकन मिळलेले चित्रपट बघायला आवडतात. लगान जेव्हा त्या स्पर्धेत हरला तेव्हा त्याला हरवणारा "नो मॅन्स लॅन्ड" बघितला आणि लगान का हरला ते कळालं. तेव्हापासुन त्या यादीतले चित्रपट मिळतील तेव्हा बघतो.

This film was honoured for bringing the issue of abuse by Catholic Priests. Few days back the third highest ranked Catholic Priest Cardinal Pell was interrogated for four days in Rome by a commission for his neglect of this issue while he was a priest in Ballarat, Australia. Indians will not undersatdn the seriousness of this crime because India is mainly a Hindu country and Catholics form a minority and such incidents if they do occur do not feature prominently in Indian newspapers which is not the case in USA or Australia or other western nations.

हो सध्या या विषयावर पेपरमधे, रेडिओवर खुपच गदारोळ चालू आहे. मी रविवारी रेवेनंट पाहिला. मलाही तो फारसा आवडला नाही.

चौकट राजा, हाथ मिलाओ यार! Happy अ‍ॅक्टर लोकांना आवडलेला अ‍ॅक्टिंगबद्दलचा सिनेमा एवढेच म्हणायचे अन् काय!

मुळात ऑस्कर मिळाला म्हणजेच काहीतरी सिद्ध केले हा सर्वात मोठा गैरसमज आहे.
ऑस्कर हा देखील एक माणसांनीच काही निकष ठरवून दिलेला एवार्ड आहे. तसेच तो निकष योग्य प्रकारे लावण्यातही ज्युरी चुकू शकतात. ही काही शंभर मीटर धावण्याची स्पर्धा नाही जिथे शून्य पॉईंट शून्य शून्य एक सेकंदाचा हिशोब ठेवत अचूक विजेता निवडू शकतो.

मी जर एखादी कलाकृती निर्माण केली आणि ती समजण्याची पात्रता जगात कोणाचीच नसेल तर मला गल्लीतला एवार्ड सुद्धा मिळणार नाही. पण मग इथे प्रश्न येतो की जगात कोणालाच झेपणार नाही अशी कलाकृती बनवण्यात तथ्य काय Happy

ज्युरींना जे पटले त्यानुसार त्यांनी एवार्ड दिला. बी यांना ते नाही रुचले त्यांनी आपले मत मांडले.

बी, तुम्ही गेल्या वर्षीचा ऑस्कर विनर बर्डमॅन बघून काय वाटते ते सांगा. तो नावडलेले मी आणि माझे दोन मित्र एवढे तीनच लोक मला माहीत आहेत. >> मलापन घ्या तुमच्या कंपूत.. पण ऑस्कर नॉमिनी असलेल्या फार कमी चित्रपटांबाबत अस होत.. यावेळी स्पर्धेत असलेला 'द रुम' कुणी पाहिलाय का ? सुंदर चित्रपट..
सगळे आवडतीलच असं नाही.. आणि सगळे वाईटच असतील असही नाही..

१) ऑस्कर मिळाला म्हणजे आपल्याला आवडायलाच हवा किंवा कोणतीही कलाकृती महान का ते आपल्याला कळायलाच हवी असे वाटणे हाच तुझा गैरसमज आहे.>>

आगावू, सिनेमात न कळण्यासारखे काहीच नाही. सिनेमा थेट आहे. एक कलाकृतीच्या नजरेने पाहिले तरी हा सिनेमा इतर सिनेमांच्या तुलनेही इतका प्रभावी वाटत नाही. लहान मुलांचे लै. शो. हा विषय आजच्या घडीला नवीन नाही. शोधकार्य हाही विषय नवीन नाही. माध्यम जगत हाही विषय नवीन नाही. मला सिनेमा आवडला नाही वा कळला नाही हा विषय मुळीच नाही. तर सिनेमात असे काय प्रभावी होते ज्यामुळे सिनेमाला ऑस्कर मिळाला हे मला जाणून घ्यायचे आहे. इथे प्रत्येकाची आवड नावड बघण्याची दृष्टी वेगळी आहे. प्रत्येकाला काहीतरी वेगळे सापडले असेल.

२) सिनेमाची कथा खूप हृदयद्रावक आहे असेही नाही. >> इथे सुरूवात कर.>> असामी म्हणजे काय करु? सिनेमा हृदयद्रावक बनवला नाही तो कदाचित मुद्दाम तसा कोरडा ठेवला असेल असे माझे मत आहे. पत्रकार लोकांच्या नजरेनी पाहिले तर त्यांना त्यांचे काम महत्त्वाचे. ते उगाच भावनाविवश होऊन शोध घेतील की एक नोकरी म्हणून आपले काम करतील कि दोन्ही गोष्टीचा समावेश त्यांच्या कामात असेल? एक प्रेक्षक म्हणून हा सिनेमा बघताना जो विषय इथे सिनेमात मांडला आहे त्यात बालकांचे लै. शो. मुलाखतीमधून शब्दबद्ध करताना त्या मुलांच्या भावना खूपच कोरड्या शब्दात/भावात मांडल्या गेल्या आहेत. ( इथे मला स्पर्श सिनेमाची आठवण होते. त्या सिनेमात किती संवेदनशीलता होती!!!)

३) बी, मध्ये तुम्ही बरेच दिवस चित्रपट पाहिले नव्हते ना?
मग हल्ली कसे चित्रपट निघतात, पुरस्कार प्राप्त चित्रपट कसे असतात, यावर्षीचे बाकीचे चित्रपट कसे होते आणि त्यामुळे त्यांच्यापेक्षा स्पॉटलाईट कसा चांगला हे तुम्हाला कळणार नाही.
सो अजून अनेक चित्रपट पहा, यावर्षीच्या ऑस्करच्या लिस्टीतले बाकीचे चित्रपट पहा. मग कदाचित हा सिनेमा कसा नंबर एक आहे (किंवा नाही) हे तुम्हाला कळून येईल.>>>

साती, मी सिनेमे अगदीच पाहिले नाही असे नाही. टच कायम आहे सिनेमाशी माझा. अगदीच गॅप गेली. जग बदलले असे झाले नाही. जर स्पॉटलाईट असा आहे तर बाकी सिनेमे ह्याहीपेक्षा लो-रेटेड असतील हे विधान मला तरी पटत नाही.

४) एखाद्या सिनेमाला नॉमिनेशन अन अवार्ड कसे मिळते ते वाचलंयस का ?

मनावर खूप ठसा पोहचवतो असे काहीही नाही. सिनेमाची कथा खूप हृदयद्रावक आहे असेही नाही. सिनेमातील प्रसंग फार तरल आहेत असेही नाही. सिनेमातील पात्रांनी खूप उत्तम अभिनय केला आहे असेही नाही. >> हे किंवा असे कुठलेही क्रायटेरिया अकॅडेमी सांगत नाही. Academy of Motion Picture Arts and Sciences चे मेंबर्स कसे मतदान करतात त्यावरुन सर्व ठरते.

>> मेधा, नाही त्यांच्या अहर्ता मला माहिती नाहीत. वाचेन नंतर. पण त्यांच्या अहर्ता सामान्य लोकांच्या आवडी निवडीशी जुळू नये ह्याचे एक नवल वाटत आहे.

>>>सिनेमाची कथा खूप हृदयद्रावक आहे असेही नाही.

४) हो का? इथे तुला कुणी काही मन दुखावणार लिहील तर तो 'बलात्कार' वाटतो, आणि तिथे त्या लहान मुलांवर खरोखर बलात्कार होताहेत ते हृदयद्रावक नाही?

मृण्मयी, ज्या व्यक्तीवर रेप होतो त्याच्यासाठी ती घटना त्याचे जग उद्धस्त करणारी असते. पण इथे चित्रपटातून अशी मुलांवर रेप होणारी घटना दाखवताना तो रेपचा प्रसंग वा त्या मुलाचे निवेदन हृदयद्रावक वाटते का? ज्यांनी रेप विक्टीम म्हणून ह्यात काम केली त्यांचे निवेदन इतके प्रभावी वाटले नाही मला. हे मला इथे सांगायचे आहे.

५) मायबाप - मी कोर्ट पाहिला नाही.

६) मो - हो गुगल करुन माहिती मिळवेन.

७) भास्कराचार्य - नाही मी बर्डमॅन पाहिला नाही. बघेन मात्र नंतर.

८) मलातरी नेहमीच ऑस्कर मधील सर्वोत्कृष्ठ परदेशी चित्रपट (फॉरेन फिल्म) पुरस्कारासाठी नामांकन मिळलेले चित्रपट बघायला आवडतात. >>
चौकट राजा मलाही असे सिनेमे पहायला आवडतात.

९) This film was honoured for bringing the issue of abuse by Catholic Priests. Few days back the third highest ranked Catholic Priest Cardinal Pell was interrogated for four days in Rome by a commission for his neglect of this issue while he was a priest in Ballarat, Australia. Indians will not undersatdn the seriousness of this crime because India is mainly a Hindu country and Catholics form a minority and such incidents if they do occur do not feature prominently in Indian newspapers which is not the case in USA or Australia or other western nations.>>

दिगोची, you are talking same as Mrunamayee said above. I do accept the seriousness of the subject shown in this movie. I do have empathy for such victims. My question is whether it is depicted/captured strongly or not?

सर्वांचे आभार Happy

इथे ह्या साईट वर बेस्ट पिच्चर अवार्ड दिला जातो त्याचे नियम स्पष्ट केले आहेत पण ते एकदाच वाचून कळत नाही.

http://www.goldderby.com/cms/view/209/

मला हे नियम ऑस्करच्या साईटवर हवे आहेत. लिंक मिळाली तर इथे द्या.

रेव्हरंट, ट्रम्बो अशा चर्चित चित्रपटांना बाजूला ठेवून स्पॉटलाइटला सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं. पत्रकार आणि त्यांच्या संस्थांनाही मॅनेज करता येतं अशा काळातही खरीखुरी पत्रकारिता जिवंत राखणाऱ्यांप्रती आदर म्हणून हा सन्मान. संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत नसलेल्या ‘स्पॉटलाइट’ची निवड झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. या चित्रपटालाही कथानक आहे पण मसाला नाही. हिरो, हिरॉइन, गाणीबिणी असा मामला नाही. पण तरीही दोन तास, दहा मिनिटं तो तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो. काही वर्षांपूर्वी प्रत्यक्षात घडलेल्या घटनाक्रमाला पडद्यावर बटबटीत होऊ न देता मांडणी करणाऱ्या प्रयत्नांना सलाम म्हणून हा पुरस्कार. पेड न्यूजने ग्रासलेल्या, राधे माँपासून पूनम पांडेपर्यंत सगळ्यांना न्यूजव्हॅल्यू देणाऱ्यांना, प्रो-गव्हर्न्मेंट, अँटी एस्टॅब्लिशमेंट अशी विभागणी झालेल्या, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टच्या जुगाडात अडकलेल्या, पोकळ चर्चाची गुऱ्हाळं जमवणाऱ्या भारतीय मीडियासाठीही ऑस्कर महत्त्वाचा. ‘स्पॉटलाइट’ सर्वोत्तम ठरल्यावर सोशल मीडियावर बोस्टन ग्लोब, हे प्रकरण उकरणारे पत्रकार, चित्रपटातले कलाकार ट्रेंडिंगमध्ये आले. आपल्याकडेही कव्हरेज दणक्यात होतं, पण आपला ‘स्पॉटलाइट’ होता प्रियांकाजींच्या हॉट गाउनवर! -

हे हार्पेन यांनी दिलेल्या लिंक मधला पॅरा बरेच काही सांगून जातो.

सिनेमा मनावर खूप ठसा पोहचवतो असे काहीही नाही. सिनेमाची कथा खूप हृदयद्रावक आहे असेही नाही. सिनेमातील प्रसंग फार तरल आहेत असेही नाही. सिनेमातील पात्रांनी खूप उत्तम अभिनय केला आहे असेही नाही.

या सर्व मुद्द्यांशी पूर्णतः असहमत

अब्जावधी डॉलर खर्चून अन कमावून कुठलेतरी बालिश अन फुटक्ळ एलियन इन्व्हेजन वगैरे बाष्कळ काल्पनिक विषयांवर आधारित गलाभरू सिनेमाज पेक्षा हा चित्रपट अनेक बाबीनी अनेक पटीने उजवा आहे

ऑस्कर दिल्याबद्दल निवड समितीचे आभार अन स्पॉटलाईट च्या टीम चे हार्दिक अभिनन्दन !

ह्या सिनेमाला ऑस्कर का दिला ह्याचे कारण मला नंतर विचारविनिमय केल्यानंतर कळले. आणि खरे तर ऑस्कर साठी नॉमिनेट झालेले सगळे सिनेमे आपण जोवर पाहत नाही तोवर ह्याच सिनेमाला ऑस्कर का दिला ह्याचे विवेचन करणे शक्यच नाही. आणि सगळे सिनेमे पाहणे जमत नाही.