ऑफिसला यायला बराच उशीर झाला होता. सोमवारी सकाळी साताऱ्यातून निघून पुण्याला पोचायचं म्हणजे नेहमी उशीर होतोच. कितीही माहित असलं तरी रियाला रविवारची रात्र घरी राहिल्याशिवाय जमायचं नाही. त्यात सोमवारी सकाळ सकाळी मिटिंग. विस्कटलेले केस, गळ्यात डोक्यावरचा स्कार्फ आणि पाठीला सामानाची पिशवी सगळं घेऊन ती डेस्कवर आली. तिच्या व्हॉटस अप वर एक मेसेज आला होता अनोळखी नंबरवरून. तिला राग यायचा असले अनोळखी नंबर वरून मेसेज आले की. तिने सरळ त्याला Add न करता सोडून दिले. दहाला पाचच मिनिटं असल्याने पटकन ती वॉशरूमला जाउन मिटिंग मध्ये गेली. स्टेटस मिटिंग मध्ये असताना कमीत कमी ५ मिस्ड कॉल येऊन गेले होते. सायलेंट असला फोन तरी कळतेच ना लोकांना. ती जरा शरमली. तिने एकदा नंबरही तपासून पाहिला. पण ओळखीचा नव्हता.
जागेवर जाऊन कोण बोलतंय बघू म्हणून विचार करेपर्यंत तिच्या बहिणीचा फोन आला होता. तिने पटकन उचलला.
'रिया अगं तुझं वॉलेट हरवलं आहे का?', स्वातीचा आवाज होता.
'काय? नाही गं. ' असं म्हणत तिने पर्समध्ये हात घातला. खरंच तिचं पाकीट सापडत नव्हतं. बसमध्ये सुटे पैसे देऊन तिने परत ठेवलं तेव्हाच काय ते तिने पाहिलं होतं.
'अगं हो न, सापडत नाहीये.', जरा घाबरली होती तोवर. 'बहुतेक वॉलेट घाईत पर्समध्ये न ठेवता खाली पडून गेलं. नसते उद्योग', मनातल्या मनात तिने विचार केला.
'तुला कसं कळलं पण?' जरा सावरत रियाने विचारले.
'मला आपल्या आपटे डॉक्टरांचा फोन आला होता.' स्वाती बोलली.
'ह्यां??' रियाला काहीच कळत नव्हतं.
'अगं तुझ्या मागेच एकजण बसला होता माणूस त्याला उतरताना दिसलं. त्यात बाकी कुणाचे नंबर नव्हते. मग त्याने तुझी एक डॉक्टरांची पावती पाहिली वॉलेटमध्ये. त्यावर फोन करून विचारले की इथे कुणी रिया नावाचे पेशंट आहेत का? त्यांनी तुझा नंबर दिला त्याला. " स्वातीने सांगितले.
"अरे? असा कसा दिला पण? 'रिया वैतागली होती.
"हे बघ तुला वॉलेट हवं आहे की नकोय?" स्वातीने मुद्याचा प्रश्न विचारला होता."त्याने तुला व्हॉटस अप वर एड केलं होतं पण तू त्याला नाही केलंस म्हणून त्याने त्यांना परत फोन करून दुसरा नंबर आहे का विचारून माझा नंबर घेतला. आणि मला फोन केला.
"बाप रे, अवघडच आहे. हे डॉक्टर पण आपले नंबर लोकांना का देत आहेत?" रियाला वॉलेटपेक्षा डॉक्टर वरच जास्त राग येत होता.
"हे बघ आता त्या माणसाला फोन कर आणि घेऊन ये तुझं वॉलेट. " स्वातीने तिला सांगून फोन ठेवून टाकला होता.
पाच मिस्ड कॉलचे कारण तिला आता कळले होते. तिने तो नंबर लावला. पहिल्याच रिंगला उचलला होता तो.
"हेलो मी रिया बोलतेय", रियाने हळूच सांगितले.
"हो मॅडम माहितेय. मी जनार्दन. मी तुमचा नंबर सेव करून ठेवला होता. तुम्हाला फोन पण लावला पण उचलला नाही. म्हणून मग स्वाती मॅडमना लावला. तुम्हाला फोन वर व्हॉटस अप वर पण एड केलं पण काय तुमचं उत्तर आलं नाही. "
तिला बोलायला सवडही न देता समोरचा माणूस बोलत सुटला होता.
"अहो कामात होते मी. " तिने शांतपणे सांगायचा प्रयत्न केला.
"हो अहो पण मी स्वारगेट ला होतो ना, म्हनलं फोन लागला तर लगेच देता येईल पाकीट तुमचं. " सातारा मिक्स पुणे भाषेत त्याचं संभाषण चालू होतं.
"अच्छा सॉरी हं. मिटींगमध्ये होते. बरं आता कुठे आहात तुम्ही मी आले असते घ्यायला." रियाने विचारले.
"मला काम होतं म्हत्वाचं मग चिंचवडला आलोय आता. तुम्हाला तिकडंच यायला लागेल."
शिवाजीनगर ते चिंचवड म्हणजे अवघडच आहे. रियाला स्वत:वर अजूनच चिडचिड होत होती. पटकन कळलं असतं तर लगेच मिळालं असतं कि नाही वॉलेट? शी आता कडमडत तिकडे जायला लागेल.
"बरं चिंचवडला कुठे येऊ?", रिया.
"तसं सोप्पं आहे हो. डांगे चौकात उजवीकड टर्न घ्या. पहिल्याच लेप्टला आहे माझं दुकान. " जनार्दन.
"नाव काय आहे दुकानाचं?" रिया.
"बम्पर मेकॅनिक", 'जनार्दन. दुकानाचं नाव ऐकून रियाला जरा हसू आलं.
"बरं, मला लगेच निघता येणार नाही. संध्याकाळी आले तर चालेल ना?" रियाने विचारलं.
"होय होय चालतंय की. मी दुकानातच आहे आज. आणि तुम्ही काळजी नका करू सर्व सामान तसंच्या तसं आहे. " त्याने आश्वासक स्वरात तिला सांगितलं.
तरी काळजी असतेच ना. पण पर्याय नव्हता. सोमवारी सकाळ सकाळी एकतर उशीर होतो यायला. त्यात ढीगभर कामं. दुपारी जरा मन रमावं म्हणून तिने फेसबुक उघडलं. तर तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती. नाव होतं,"मी एक प्रेमवेडा". काय तर लोक असतात ना. तिने त्यावर क्लिक केलं तर जनार्दन असं नाव दिसलं तिला तिथे एका फोटोखाली. वेगवेगळ्या हिरोंचे-हिरोईनचे फोटो टाकले होते त्याने. कुठे शेर तर कुठे व्हिडिओ. सलमान तर कुठे शाहरुख.
'वेडा आहे का हा? फोनवर बोलले म्हणजे लगेच फ्रेंड होणार आहे का मी?', रिया मनात म्हणाली. आजकाल सोशल नेटवर्क वर खूप जपून राहायला लागतं. बरं रिजेक्ट करावी तर वॉलेट त्याच्या हातात होतं अजून. तिने मग काहीच न करता बंद करून टाकलं.
संध्याकाळी सहा वाजले की पहिली निघाली ती. गाडी काढून पोचेपर्यंत तिला सात वाजले होते. तिला परत जायचे टेन्शन होतेच. डांगे चौकातून तिने त्याला फोन केला आणि शोधत ती तिथे पोचली होती. सकाळपासून जेवणही झालं नव्हतं धड आणि त्यात अशी मरमर. 'बम्पर मेकॅनिक' अशी पाटी आणि त्यावर एक जुनाट शाहरुखचं पोस्टर पण दिसलं. पटकन पाकीट घेऊन निघायचं म्हणजे झालं रियाने विचार केला. ती आल्यावर एक माणूस बाहेर बसला होता वडा-पाव खात. साधारण २५-३० वर्षाचा असेल. पोटावर घट्ट बसलेला मळकट शर्ट, खिसे बाहेर उघडतील अशीच घट्ट पॅन्ट, सावळा रंग आणि मध्यम बांधा असा अवतार होता त्याचा.
"रिया मॅडम ना?", त्यानं विचारलं,"मी पाहीला तुमचा फोटो प्रोफाईल मध्ये तुमच्या. " तिला आपले फोटो असे अनोळखी लोकं बघू शकतात याचाही राग आला जरासा. पण तिलाही त्याचा चेहरा ओळखीचा वाटला त्या 'मी एक प्रेमवेडा' प्रोफाईल मधला.
खाता खाता तो उठून आत गेला, बाहेर येऊन वॉलेट दिलं, म्हणाला, "हां हे घ्या. सगळं नीट आहे ना बघा."
तिला ते चेक करावं की नको असा प्रश्न पडला होता. बघावं तर याला वाटणार माझ्यावर विश्वास नाहीये का? तेव्हढ्यात तोच म्हणाला,'अहो बघून घ्या. बघितलेलं बरं ना?"
मग तिने जुजबी पाहिलं आणि निघायला लागली. तो म्हणाला,' वडा -पाव खाताय? आताच आणलाय टपरीवरनं." तिने मानेनेच नाही म्हटलं,'तो म्हणाला,"खा हो, एक्स्ट्रा आहे." म्हणून त्याने आग्रहाने दिला. आता इतके चांगले त्याने पाकीट दिले तर असे कसे रुक्ष बोलणार म्हणून तिने तो घेतला.
खाणे सुरु ठेवत तो म्हणाला, "सॉरी हं, सकाळी थांबता आलं नाही. काल अचानक घरचा फोन आला, आई आजारी आहे म्हणून. सगळं काम सोडून जायला लागलं. सकाळी कस्टमर लई ओरडत होते. त्यामुळे घाईत यायला लागलं. सकाळपासून काम चाललंय ते आत्ताच खातोय."
तिला फार कसंतरी वाटलं. बिचारा केवळ आपल्याला इतक्या लांब यायला नको म्हणून इतका फोन करत होता आणि आपण त्याला नंबर कुणी दिला म्हणून शंका घेत होतो. कष्ट करून जेवणाऱ्या माणसाला पाहण्यात काहीतरी वेगळं असतं. 'त्याचे कष्ट जणू दिसत असतात त्याच्या जेवण्यात', त्याचा तो मन लावून खाणारा चेहरा पाहून तिला वाटलं.
"नाही नाही, मलाच कळलं नाही वॉलेट हरवलं आहे ते. सकाळी गर्दी पण होती बरीच. वडा पाव छान आहे. " रिया बोलली. तिलाही भूक लागलीच होती. आठ वाजले होते.
'थॅन्क्यू हां, वॉलेटबद्दल." रिया.
"अहो थॅन्क्यू काय? माझं पण हरवलं होतं एकदा. मिळालं नाही तर लई वाईट वाटलं होतं. अजूनही वाटतं इतक्या दिवसांनी. त्यामुळे कधी असं मिळालं की द्यायचा प्रयत्न करतो, इतकंच. " तिला तो आता इतका पण वेडा वाटत नव्हता जितका तो फेसबुक प्रोफाईल पाहून वाटला होता.
ती निघाली, उशीर झाला होताच. "कुठे जायचं आहे तुम्हाला?"त्याने विचारले. तिच्या मनात पुन्हा किडा वळवळला. "उशीर झालाय म्हणून म्हनलं." उगाच एकट्या जाल लांब असेल तर. तसं तिला टेन्शन होतंच.
ती म्हणाली," इतकं काही नाही. ठीक आहे. आता ट्राफिक असते तशी बऱ्यापैकी." म्हणून ती पटकन निघाली परत एकदा थॅन्क्यू म्हणून. त्याने तिला बाय करून काम सुरु केले परत.
रस्ताभर ती विचार करत राहिली, "एव्हढी का संशयी झाले आहे मी? " कुणीतरी मला मदत करायचा प्रयत्न करत होते आणि मी शंका घेत राहिले प्रत्येक वेळी. सोशल नेटवर्क नक्कीच तिला 'सोशल' बनवत नव्हतं. घरी पोचल्यावर तिने फोन पहिला तर त्यावर एक मेसेज आला होता,'पोचला का ?' ती स्वत:शीच हसली. तिने,'हो' म्हणून उत्तर दिले. थोड्या वेळाने तिने ती फ्रेंड रिक्वेस्टही स्वीकारली होती. 'मी एक प्रेमवेडा' आता तिचा 'फ्रेंड' झाला होता.
विद्या भुतकर
माझे फेसबुक पेज- https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
छान आहे कथा
छान आहे कथा
भावना पोहचल्या.लोकांवर सारखा
भावना पोहचल्या.लोकांवर सारखा विश्वास न ठेवण्याचं, मनात सदैव 'व्हॉटस इन इट' विचार करणं खूप दमवून जातं.
परवा आमच्या सोसायटीबाहेर भाजी घेत होते तेव्हा एक काका हातात बॅग, थकलेला चेहरा घेऊन रिक्षा शोधत होते. बहुतेक लांबच्या बस ने उतरले होते.तीन चार रिक्षा वाल्यांनी तोंडाला येईल ते पैसे सांगितल्याने (म्हणजे पिंपळे सौदागर वाकड चौक या ५-६ किमी अंतरासाठी २५० वगैरे.)यांनी रिक्षा सोडल्या. (आमच्या पिंची नगर पालिकेत कीनै, मीटर ने रिक्षा चालवायच्या नसतात.)असा काही वेळ झाला. मी पण मुलीला शहाळे देत तिथे बराच वेळ तिथे उभी होते.त्यांना विचारले ओला ची रिक्षा बोलावून देऊ का, मीटर ने जातील आणि फक्त १० रु जास्त घेतील ओला चार्ज. तर 'नको, ओला खूप महाग असतं, मी बघतो माझी मी रिक्षा' म्हणाले. (त्यांना कदाचित ओला कॅब वाटली असावी.) कोणी अनकंडीशनली मदत करतोय हेही हल्ली पचायला जरा जड जातं.
छान आहे छोटीशी स्टोरी
छान आहे छोटीशी स्टोरी
कोणी अनकंडीशनली मदत करतोय
कोणी अनकंडीशनली मदत करतोय हेही हल्ली पचायला जरा जड जातं.>> खरचं
कथा छानचं.. लिहिता पन
कथा छानचं.. लिहिता पन छान..ओघवत
Keep it up..
मनात सदैव 'व्हॉटस इन इट'
मनात सदैव 'व्हॉटस इन इट' विचार करणं खूप दमवून जातं.>>> + १
छान लेख
अगदी खर आहे. प्रत्येक वेळेला
अगदी खर आहे. प्रत्येक वेळेला संशयाचे भूत मानगुटीवर बसतेच बसते. कळत नाही कि नेमके काय समजावे. पण खरच थोड्या वेगळ्या नजरेतून पहायला पाहिजे. पण कदचित आधी आलेल्या किव इतर लोकांच्या अनुभवातून आपणही तचेस वागत असू.
1. कोणी अनकंडीशनली मदत करतोय
1. कोणी अनकंडीशनली मदत करतोय हेही हल्ली पचायला जरा जड जातं.
2. मनात सदैव 'व्हॉटस इन इट' विचार करणं खूप दमवून जातं.
3. अगदी खर आहे. प्रत्येक वेळेला संशयाचे भूत मानगुटीवर बसतेच बसते. कळत नाही कि नेमके काय समजावे. पण खरच थोड्या वेगळ्या नजरेतून पहायला पाहिजे. >>+१
माझा गोश्ट लिहिण्याचा हेतु साध्य झाला.
धन्यवाद.
विद्या.
वा ! मस्त वाटली गोष्ट!! खुपच
वा !
मस्त वाटली गोष्ट!!
खुपच छान !!!
वा मस्त हलकीफुलकी कथा.
वा मस्त हलकीफुलकी कथा. खुलवलीयही मस्त.
गेल्याच आठवड्यात माझं आणि
गेल्याच आठवड्यात माझं आणि बहिणीचं मोठ वाजलं माझ्या (सो कॉल्ड) विश्वास न ठेवायच्या वृत्तीवरून. तिने मला कुछ लेते क्यू नही असा सल्ला दिलाय. मला काही गैर वाटत अविश्वास ठेवायला, better safe than sorry . वरच्या गोष्टीत कुठेतरी सातच्या आत घरांत आणि आर्थिक स्वावलंबन अशी मुलीची जात म्हणून कुतरओढ आहे. ही गोष्ट मुलगा नायक असता तर लिहिता आली असती का? I don't think so.
छान आहे.
छान आहे.
chan aahe, pan kahi lok ashi
chan aahe, pan kahi lok ashi madat pan kartat, mi swata donda ha anubhav ghetla aahe.
Ho kartat na mhanunach hi
Ho kartat na mhanunach hi katha lihili, for all those nice people. Thank you all for visiting and comments.
Vidya.
छान आहे. कोणी अनकंडीशनली मदत
छान आहे.
कोणी अनकंडीशनली मदत करतोय हेही हल्ली पचायला जरा जड जातं.>> खरचं
धन्यवाद सस्मित. वाचत
धन्यवाद सस्मित. वाचत रहा.
विद्या.
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
छान लिहीली आहे. आवडली.
छान लिहीली आहे. आवडली.
धन्यवाद अन्जली आणि अनघा.
धन्यवाद अन्जली आणि अनघा.
विद्या.
चौकस रहायच्या नावाखाली आपण
चौकस रहायच्या नावाखाली आपण खरंच मदत करणा-यांना ही वाईटच समजतो आजकाल... काय करणार सगळंच बदललंय हल्ली...
कथा मात्र अगदी मनापर्यंत पोहोचली. धन्यवाद
छान लिहिलयं. कोणी अनकंडीशनली
छान लिहिलयं.
कोणी अनकंडीशनली मदत करतोय हेही हल्ली पचायला जरा जड जातं.>>> कितीही नको वाटत असेल तरी खबरदारी घेतलेली कधीही चांगली.
छान लिहिलय..
छान लिहिलय..:)
Thank you all for lovely
Thank you all for lovely comments.
Vidya.