पाणी व्यवस्थापनाचे पारंपारिक प्रकार

Submitted by भरत गोडांबे on 29 February, 2016 - 08:20

पाणी व्यवस्थापनाचे पारंपारिक प्रकार
यावर्षी पाऊस कमी झालाय नि त्यामुळे धरणातील पाणी साठे कमी झाले. अजून पावसाळ्याला कमीत कमी ३-४ महिने अवकाश आहे नि फक्त ३० % पिण्याचे पाणी धरणात शिक्कल आहे (महाराष्ट्रातील आकडा ) . पाणी बचतीचे असंख्य प्रकार आहेत त्यातील हा एक
पूर्वी आपल्याकडे पाहुणे आले कि त्यांच्या पुढे तांब्याभांडे ठेवले जात असे. भांडे म्हणजे फुलपात्र; जे नेहमी २-३ घोट पाणी राहील या आकाराचे असायचे. यामुळे पाणी पिणारी व्यक्ती गरज असेल तितकेच पाणी घ्यायची नि प्यायची व पाणी देखील वाया जात नसे. पण चकाचक घरात तांब्याभांडे शोभेनासे झाले नि त्याची जागा काचेच्या ग्लासांनी घेतली. नि पाण्याचा अपव्यय वाढला. आपले पूर्वज खूप दूरदर्शी होते; "तांब्याभांडे" हे त्यांच्या पाणी व्यवस्थापनातील एक मुख्य गोष्ट होती. आज पुन्हा गरज आहे ती तांब्याभांडे पद्धती वापरण्याची....
11999083_890468484340004_6839173050257247905_n.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिती बद्दल धन्यवाद.
माझ्याही मनात याबाबत करण्यासारखे काही आहे त्याची मी नोंद करुन ठेवली आहे व योग्य वेळ येताच अमलात आणणार आहे.
तसेच सामन्या प्रसंगामधे आपला उपाय नक्की काम करेल याचीही जाणीव आहे.

जमिनीत पाणी जिरवणे आणि पाण्याचा शक्य तितका पुनर्वापर करणे व त्यासाठी यंत्रणा बसवणे हे सुद्धा आपण करायला हवे आहे.

काचेचे पेले तर वापरत नाही पण लोक तेवढे पेले ट्रे मधे घेऊन पाणी दिल्या जात..
त्यातही काही लोक अगदी एक घुटं पाणी पिउन उरलेले तसेच टाकून देतात ज्या गोष्टीचा मला खुप राग आहे (ते फेकून न देता मी झाडांना टाकते.)..
तू सांगितलेला उपाय छान आहे भरत, पण पाणी व्यवस्थापनाचे आणखी काही पारंपारिक प्रकार वाचायला आवडतील..

घ्या••••••••••आमच्या पुण्यात"पाणी आणू का?" असे विचारून पाणी आणतात तर त्यांची चेष्टा करतात Wink
तो हि पाणी व्यवस्थापनाचा प्रकारच होता

१. खेड्यांमध्ये पूर्वापार चालत आलेली पध्दत म्हणजे जेवणानंतर हात ताटातच धुणे. नंतर हे पाणी गुरांना पाजले जाते किंवा झाडांना घातले जाते. काही ठिकाणी हात-पाय धुवायच्या मोरीजवळच एखादे झाड लावलेले असते किंवा झाडाभोवती अळे करून तिथे हातपाय धुतात. पाण्याचा अपव्यय होत नाही.
२. खरकटी भांडी एका पसरट पातेल्यात पाणी घेऊन त्यातच विसळणे. पाणी कमी वापरले जाते.
३. घरी बरेच पाहुणे असतील तर जेवताना पत्रावळी द्रोणांचा वापर.
४. धुणे धुवून झाल्यावर ते साबणाचे पाणी लादी पुसायला, संडासात फ्लश करायला किंवा वाहन पुसण्यासाठी करणे.
५. लहान मोठ्या झाडांच्या मुळांलगत जमीनीत गळणारी मडकी किंवा प्लास्टिक बाटली छिद्रं पाडून पाणी भरून खोचून ठेवणे.
६. परसबागेत रोपांच्या वाफ्यांतील जमीन व परसाची जागा झाडांवरून गळालेल्या सुक्या पानांनी आच्छादणे.
७. गळणारे नळ, पाईप्स, पाणीगळती दुरूस्त करवून घेणे.

पाणी वाचविण्याचे उपाय सांगितले जात आहेत पण अस दात कोरुन का पोट भरणार आहे ? त्यावर ही असेल थेंबे थेंबे तळे साचे असा युक्तिवाद . पण आपल्याला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली आपण पाण्याची सोय नाही करु शकलोय? एवढा पाऊस पडतो आपल्याकडे पण दरवर्षी तीच रड. आपल्या देशात पावसाचा आणि पाणी टंचाईचा काही एक संबंध नाहीये. कितीही पडला पाऊस तरी फेब्रु. मार्च पासुन पाण्याचा आटाआट असतोच. अमेरिकेत म्हणे कही भागात तीन तीन वर्ष पावसाचा थेंब पडत नाही पण त्यांच्याकडे नसते अशी जीवघेणी काटकसर पाणी वाचविण्यापे़क्षा पाऊस नाही पडला तरी चालेल एखाद वर्ष पण अशी वेळ जनतेवर येऊ देणार नाही अस ध्येय हव. हे राजकारणी आम्हाला कोरडी होळी खेळण्याचं आवाहन करणार आणि स्वतः मात्र टबात डुंबत बसणार.

आपले पूर्वज खूप दूरदर्शी होते; "तांब्याभांडे" हे त्यांच्या पाणी व्यवस्थापनातील एक मुख्य गोष्ट होती. आज पुन्हा गरज आहे ती तांब्याभांडे पद्धती वापरण्याची....>>> +१

पाणी व्यवस्थापनाचा एक आणखी प्रकार म्हणजे, बाहेरुन आलेल्या माणसाला हातपाय धुण्यासाठी एक घंगाळ ठेवलेलं असे व त्यात तांब्या. पाय धुण्यापुरते पाणी घेतले जात असे, नळ सोडून पाणी वाया घालवले जात नसे.

आणखी, भांडी घासायला फक्त राखच वापरली जात असे ( म्हणजे साबण वगैरे काही नाही ) आणि त्या पाण्याच्या वापर करून अळू, केळी, कर्दळी सारखी झाडे जोपासली जात.

मालवणला आमच्या घरी, अगदी घराला लागूनच विहीर होती. जेवायला बसले कि त्यातून एक छोटी कळशी भरुन पाणी आणायचे. पिण्याचे पाणी भरुन ठेवले जात नसे. ते पाणी अगदी थंडगार असे.

पाणी योग्य वेळी भरुन(हार्वेस्ट) ठेवले तर मला वाटत फार जिकीरीच्या व्यवस्थापनाची वेळ येणारच नाही आपल्यावर.
पण त्यातल्या त्यात पिण्यासोबत खर्चाच्या पाण्याचा आपण भरपूर अपव्यय करत असतो किंवा होत असतो. त्यावर काही उपाय आपण योजू शकतो.जसे जास्तीचे कपडे आठवड्यातून एकदाच धुवायला काढणे.रोजचे कपडे धुण्यासाठी कमीच असतात. गरम पाणी थोडे घेऊन त्यात गार पाणी मिसळुन वापरणे. नो शॉवर नो फ्लश वापर. फ्लश बॉक्स मध्ये २ अर्धा लि. वॉटर बॉटल भरून आत टाकणे.म्हणजे टोटल फ्लश ला कमी पाणी वापर होईल.
हा पण पाण्याची काटकसर वगैरे मलाही तितका न पटणारा मुद्दा वाटतो.

विषय बरोबर आहे.
स्वहस्ते तांब्यातुन पाणी काढुन भांड्यात घेणे हे कैक घरातील पाहुणे व यजमानांस "अपमानास्पद" वाटण्याचि अचाट उदाहरणेही माहित आहेत व हट्टाने आख्खा ग्लास भरुनच पाणी देणारेही माहित आहेत.

>>> लश बॉक्स मध्ये २ अर्धा लि. वॉटर बॉटल भरून आत टाकणे.म्हणजे टोटल फ्लश ला कमी पाणी वापर होईल. <<<
परवाच हा उपाय मी मित्राला सांगितला, त्याचि तर्कार होती की हल्ली पाणी जास्त लागते.....
म्हणले ते फ्लश बसवलेत ते आधी सुधारा....
दुसरे म्हणजे फुल्ली अ‍ॅटोमॅटिक वॉशिम्ग मशिन अवाच्च्यासवा पाणी खाते... वाया घालवते.

घ्या••••••••••आमच्या पुण्यात"पाणी आणू का?" असे विचारून पाणी आणतात तर त्यांची चेष्टा करतात डोळा मारा
तो हि पाणी व्यवस्थापनाचा प्रकारच होता <<<<<

तर तर... अहो आमच्याकडे जेवण झाल्यावर उठताना भांड्यात पाणी शिल्लक राहिले तर ओरडा बसायचा, एक तर ते पाणी पूर्ण पिऊन भांडे रिकामे करावेच लागायचे, अन वर तंबी मिळायची की पुढच्या वेळेस तहानेचा अंदाज घेऊन जितकी गरज आहे तितकेच पाणी भांड्यात ओतुन घ्यायचे.
अन या नियमांस पावणेरावण्यांची पोरेटोरेही अपवाद नसायची... नियम सगळ्यांनाच लागु....

वरचे उपाय, रादर पद्धती काळी/ त्या वेळी सोपे सुटसुटीत होते इतकंच. त्याला उगा पाणी व्यवस्थापन असलं गोंडस नाव देऊन काय हशील?
वरील मानिमोहर यांच्या प्रतिक्रियेशी सहमत. थेंबे थेंबे किंवा दात कोरून पोट भरणे युक्त्या आहेत या. त्या करायला काहीच हरकत नाही पण यातून आपण फार काही करतोय, किंवा पाण्याच्या प्रश्न माझ्या पुरता सोडवण्यासाठी योगदान असले खुळचट भ्रम येऊ नये म्हणजे झालं.

इथे पारंपरिक या शब्दाला विरोध आहे. प्रकाराला नाही. अशाच पारंपरिक प्रकारात, आडाला (विहिरीला) मशीन लावून किंवा आणखी पारंपरिक जायचं तर इतर पद्धतीने पाणी शेंदून पाटा द्वारे वाडीत पोहोचवून शिपण काढत पाणी द्यायचे. कोकणात अजूनही देतात. कपडे भांडी अशीच मशीन लावून वाहत्या पाण्यात सर्रास कोकणात धुतात. अर्थात जिकडे मुबलक पाणी आहे तिकडे अशी चैन परवडते.
आमचे पूर्वज हुश्शार होते असा यातून अर्थ निघतोय जो यातून काढणे बरोबर नाही इतकंच वाटतं. रिसोर्स स्केअर्स झाला की किंमत (दोन्ही अर्थाने) कळते, आणि गरज ही शोधाची जननी आहे यावर पोरांना निबंध लिहावे लागतात.

रिसोर्स स्केअर्स झाला की किंमत (दोन्ही अर्थाने) कळते<< रिसोर्स स्केअर होण्याची वाट बघत बसणे..आवडता भारतीय छंद.
वॉशिंग मशीन बद्दल अनुमोदन. एका बादलीतल्या कामासाठी ५ बादल्या सहज खपतं पाणी त्यात.
वॉटर हर्वेस्टींग किती सोपं झालंय आजकाल.पण प्रयत्न पण करताना दिसत नाहीत आजकाल कोणी त्यासाठी.

दुष्काळ तर आमच्याही गावाला आहेच. लोकांकडच्या विहीरी, बोर्वेल्स कधीच्याच आटल्यात. जा जित्या आहेत त्यात पण फारच मर्यादित पाणी. उन्हाळा असो, पावसाळा; मुन्शीपाल्टीच्या नळाला पाणी आठवड्यातून एकदा फक्त. ते ही ठरलेल्या दिवशीच आणि ठरलेल्या वेळातच. पाणी असतं मात्र मस्त फोर्स नी; सगळी टाकी, ओव्हरहेड टँक वगैरे मशीन न लावता भरल्या जातात. उन्हाळ्यात दिवस फक्त पाचाचे कधी सात/ आठ होतात. आणि हे असं गेले बरेच वर्षे आहे. त्यामुळे पाणी साठवण भरपूर आणि वापर मर्यादित ही सवयच लागून गेलेय. पाणी ओतून देणे वगैरे प्रकार कधीचेच हद्दपार झालेत. आजीकरता देवाच्या पूजेकरता पण दोन बादल्या वेगळं पाणी भरून ठेवलं असतं. ते पाणी तिच्यामते 'शिळं' सो ते पाणी नळाला पाणी सोडल्यावर एकतर झाडांना किंवा सरळ हौदात रिकामं करतात आणि मग ती तीचं 'सोवळ्याचं' पाणी पुन्हा भरते. पटत नाही पाणी ताजं - शिळं कन्सेप्ट पण हा एक काढलेला मार्ग.

एक मात्र बरंय, एरीयाचा जो कुणी कॉर्पोरेटर आहे त्यांनी एक मेसेज लिस्ट केलेली आहे. पाणी सोडायच्या आधी एक मेसेज टाकतात. घरी जास्त पाहुणे असतील तर पाणी जरावेळ जास्तही सोडतात.

भरत चांगला विषय आहे. तू तुझ्या पर्यावरण दक्षता मंचातर्फे पाण्याच्या समस्येवरील उपाययोजनांबाबत जनजागृती करशील ह्यात शंका नाही.

योकु माझ्या साबाही जेव्हा नळाला पाणी येईल तेव्हाच ताज पाणी घेतात पुजेसाठी आणि आता ह्या वयात त्यांच्याकडून बदलाची अपेक्षाही नाही ठेऊ शकत.

वॉशिंग मशीन खरच खुप पाणी वाया घालवते.

सदरची तांब्याभांडे पद्धती त्या काळात सरळ सुलभ होती तशी ती याही काळात आहे आणि यातून पाण्याचा अपव्यय टळून पाण्याची बचत होते हेही नक्की . त्यामुळे हा जल व्यवस्थापन साधा सोपा पर्याय आहे नि राहील.
आता तो वापरायची कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.
शासकीय पातळीवर जल संधारण होईल ते होईल पण सामान्य नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे कि नाही ? .
बाकी सुज्ञास सांगणे न लागे ….

भरत गोडांबे,

पाणी व्यवस्थापनाचे पारंपारिक प्रकार असा धागा काढल्या बद्दल धन्यवाद !

गेल्या काही वर्षांपर्यंत घरोघरी तांब्याभांडे पद्धती अस्तित्वात होती
स्टेम्नलेस स्टील वापरात हल्ली आलेल आहे, त्या पुर्वी तांब्या पितळेची भांडी वापरात असत. तांबे हा धातु
लोखंडाच्या पुर्वी पासुन माहिती होता, चलनात होता. त्याची हत्यारे, वस्तु बनवत असत. महाराष्ट्रात काही ठीकाणी अजुनही कासार लोक रहातात ते अश्या तांब्या पितळेच काम करतात.

मी मायबोलीवर हा लेख २५ सप्टें २०११ ला लिहीला , तो तसाच खाली देत आहे,
http://www.maayboli.com/node/29307

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?
ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

हा मुद्दा होता, जर गावातील पाणी अश्या प्रकारे दुषीत असेल तर ही जनता हेच पाणी वापरून तग तरी कशी धरून आहे? जर ह्या पाण्या बद्दल जनतेला माहीती असती तर जनेतेने ते पाणी शुद्ध करण्यासाठी एका तरी treatment चा पर्याय निवडला असता. ह्या पर्यायत पाणी उकळवणे, पाणी शूद्धी करणासाथी ULTRA Violet
उपकरणाचां वापर करणे. पण ही ठरली जनता ज्यांची एका वेळेची जेवायची मारामार तेथे पाणी शूद्धीकरण
म्हणजे डोक्यावरून पाणी. ज्यांच्या घरात झीरो चा दिवा लावयला विज नाही तिथे ULTRA Violet उपकरण?

पण आमची ही सर्व्व जनता ह्या विशाणु जिवाणु ना पुरुन उरली. कशी? हा प्रश्न ह्या टीम ला पडला होता.
ह्या नंतर NATURE च्या झालेल्या संशोधन चा विषय बदलला हे तुमच्या लक्षात आले असेलच.
त्या NATURE च्या टीमने पितळेची भांडीच उचलली, पाण्या ची SAMPLES घेतली. प्रयोगशाळेत नेउन
रीतसर प्रयोग केले गेले व

निश्कर्ष असा नि घाला कि पितळे च्या भांड्यांत दुषीत पाणी २४ तासात पिण्या एवढे
शुद्ध होते, कुठलीही उर्जा न वापरता !!. कारण.... पितळे तील तांब्याचे अणु. ह्याच अणु मुळे पाणी शूद्धीकरण
होते. http://www.nature.com/news/2005/050404/full/news050404-14.html ह्या लेखात स्पष्टपणे नमूद केले आहे कि हा शोध NATURE च्या टीमने लावला व त्याचा उपयोग भारता सारख्या देशाला घ्यावयास हवा. खरं कि नाही??

आता विषय दुसरा: जस्त (ZINC) चा शोध Andreas Maggraff 1746 ला लावला. पण भारतात् जस्त (ZINC) ची निर्मीती (शूद्धीकरण) BC 400 च्या पूर्वी पा सून होतय! ह्या ZINC शूद्धीकरणाची पद्धत फक्त भारतीयांनाच अवगत होती. ह्या ZINC च्या खाणी चे अवशेष राजस्थानात अजुन ही पाहायला मिळतात. जर ZINC चे शूद्धीकरण व व्यापरी उत्पादन भारतात BC 400 पासून होत होते तर Andreas Maggraff ला ह्या शोधाच Credit कसे दिले गेले?

Zinc & Copper चे मिष्रधातू बनवणे फार मुश्कील काम, ह्याचे कारण ह्या धातूंचा Melting Temp. Copper
वितळे पर्यंत Zinc वितळून उडुन जाई. भारतीयानी एक स्पेशल प्रोसेस तयार करून Brass ला जन्म दिला.
भारत पितळेची भांडी जवळ जवळ १५००-१७०० वर्षा पासून वापरतोय. भारतातू न ही भांडी परदेशात गेली.

पितळेच्या भांड्यांपुर्वी तांब्याची भांडी भारतात उपलब्ध होतीच. मग पितळेच्या मागे का ? कारण तांब्याची
किम्मत, ती ईतकी जास्त होती कि जर तांब्या चे गुणधर्म सारखे ठेउन सर्वसाधारण जनतेला, पर्यायी धातूंची भांडी द्यावी हा च विचार ह्या मागे असला पाहीजे. त्या मुळेच देव पुजे साठी तांब्याची पण सर्व साधारण कामा साठी पितळेची हा पर्याय निघाला असावा !!!!

आता आपली जनता ही भांडी कशी वापरते ? पहेले पाण्याला जाऊन घागर पाण्या ने स्वच्छ धुते. हाती
राखुन्डी लागली तर ठीकच नाही तर माती, नारळाची किशी सुद्धा चालते. घागर मस्त चकचकीत झाली पाहीजे.
हे सर्व्वे आपली जनता परंपरेने करत आलीय. पण ह्याच भां ड्याच्या चकचकीत पणा मुळेच पाणी शूद्धीकरण
क्रिया सुरळीत होत होती.

ठोक्याचे भांडे !! तांब्या - पितळेची भांड्यांना आपण का ठोके लाउन घेत होतो ? उत्तर परत एकदा तेच, भांड्याचा चकचकीत पणा !

आताची परीस्थीती : ही तांब्या - पितळेची भां डी गेलीत अडगळीच्या खोल्यात. काही भंगारात काढली गेलीत.
त्या भांड्याची जागा आता फक्त वरुन चकचकीत दिसणार्या प्लास्टीकच्या भांड्यानी घेतलीय.

वरून चकचकीत दिसणारी प्लास्टीकची भांडी पाणी साठवुन ठेवण्या पलिकडे जाऊ शकतील ?

स्त्रोतः बरेच वर्षा पासुन मनात हा विषय घोळत होता. ह्या वि षया ची व्याप्ती फार मोठी आहे व सर्व जनतेची
ह्या विषया बद्दल जा गरुक ता करणे गरजे च आहे.
माहिती जाला वरुन,
http://www.inae.org/metallurgy/archives_pdf/smelt%20zinc.pdf