ग्लोबल मराठी- Dr Lee schlesinger

Submitted by सनव on 21 February, 2016 - 03:06

एका मैत्रिणीने व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवलेला हा व्हिडियो इथे आवर्जून शेअर करावसा वाटला.

Dr. Lee Schlesinger हे मिशिगन युनिव्हर्सिटीचे Anthropologist आहेत. गेली अनेक वर्षं महाराष्ट्रात येऊन काम करणार्‍या या अमेरिकन गृहस्थाला मराठीत बोलताना बघाच. इतकं चांगलं मराठी आज मराठी घरातही अभावानेच ऐकायला मिळतं!

https://www.youtube.com/watch?v=6fs1tRY9VOY

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

भारीच आहे की हे, एकदम गावाकडचं मराठी आणि त्यावर शिकागोची फोडणी. ही मुलाखत थोडी विस्तारात ऐकायला आवडली असती.

छान! हे खूपच कौतुकास्पद ! भारतात येउन राहिलेले अमेरिकन वा युरोपियन मिशनरी यांनासुद्धा छान मराठी बोलताना ऐकले आहे. पण माधुरी दिक्षित, सचिन तेंडूलकर किंवा तत्सम लोक मराठीत बोलतात याचे लोकांना काय कौतुक वाटते हे कळत नाही. यावरून आठवले, १० -१२ वर्षांपूर्वी orlando ला मैत्रिणीबरोबर फिरत असताना मराठीत बोलत होतो तेव्हा एक गोरी म्हातारी झरझर चालत आमच्या पाठी आली आणि इतक्या वर्षांनी मराठी ऐकून किती छान वाटले असे म्हणाली, आम्ही गार! इथे अजूनही फारसे मराठी लोक नाहीत, जे आहेत त्यांच्या मराठीबद्दल न बोललेले बरे ! म्हातारी १९४५ - ५० च्या आसपास पुण्याला १० -१२ वर्ष राहत होती कोणत्या तरी मिशनरी शाळेत इंग्रजी शिकवायची. काश्मीरच्या प्रश्नाचे काय झाले, तिथले गालीचे मस्त असतात वगैरे बोलत होती. मराठीत एरवी मस्त बोलता येते पण पुण्यात भाजीवाल्यांशी मराठीत घासाघीस करणे कठीण जायचे म्हणाली. पु लंच्या अपूर्वाई मध्ये पण लिहिलाय तसा किस्सा.

मला त्या डॉ.चं कौतुक हे वाटलं की मराठी बोलताना मध्येच इंग्लिश शब्द वापरणं वगैरे करत नव्हते. आपलंही खूपदा अनवधानाने केलं जातं.