पुण्याजवळील डायबिटिस मुक्ती केंद्राबद्दल माहिती हवी आहे

Submitted by दिविजा on 10 February, 2016 - 17:16

प्लीज पुण्याजवळील ह्या http://diabetesmukti.com/ संस्थे बद्दल माहिती हवी आहे.आईला एका परिचितान कडून ह्या बाबत माहिती कळली. माझी आई मागील बरीच वर्ष डायबिटिस पेशंट आहे. त्या परिचितांचा म्हणण्यानुसार तिथे दिल्या जाणारा औषधांमुळे त्यांची शुगर नियंत्रणात आहे. आई अगदी नियामिंत तिची नेहमीची औषध आणि पथ्य करते पण सध्या केलेल्या reports नुसार शुगर वाढली आहे. डॉक्टरांनी औषध बदलून दिली आहेत पण तिला एक पूरक औषध पद्धती म्हणून ह्या केंद्रात जावून यावे अस वाटतंय. प्लीज काही अनुभव असेल तर माहिती द्या!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला य विशयि महिति नाही. मी स्वतः दर रोज दुपारी लन्चसाठी स्मूदि करुन पितो त्यात एक सफरचन्द, काही पालकची व तुळशीची पाने, गाजराचे तुकडे, थोडेसे आले व पाणी असे असते. कधीकधी ५-६ बदाम टाकतो. साधारणपणे अर्धा लिटर करुन पितो. सन्ध्याकाळीच्या जेवणात भात व भाज्या पण पोळी वा भाकरी नाही किम्वा पोळी वा भाकरी असेल तर भात नाही असे असते. त्याचवेळी गोळ्यापण घेत होतो. हे करुन पहा. मी हे जवळजवळ ५ महिने करत आहे त्याने साखर कमी झाली आहे. I will consult my physician soon and check my 3 month blood sugar level using Hb1Ac test. Best of luck

आजच्या सकाळ मधे सम्पूर्ण शाकाहारी आहार घेतल्याने आपल्याला मधुमेहापासुन कसे दूर थेवले हे लिहिले आहे जरुर वाचा. औशधापेक्षा मग ती आयुर्वेदिक असोत वा अलोपथिक असोत हे बरे. त्यामुले कोलेस्तेरोल पण कमी होइल.

दिगोचि आणि स्वप्नांची राणी धन्यवाद!!मधुमेह आणि आयुर्वेदिक उपचार हा धाग्यावर फार छान माहिती मिळाली.