बाहा'य धर्ममंदिर - पनामा

Submitted by वर्षू. on 4 February, 2016 - 21:07

गेली बरीच वर्षे येथील एका उंचच उंच डोंगरवजा टेकडीवरून बाहाय मंदिरा चे पांढरेशुभ्र,अंडाकार छत खुणावत होते. या वेळी इथे भेट द्यायची असा निर्धारच केला होता. त्याप्रमाणे शहरा च्या वेशी जवळ , डावी कडे वळून वर वर डोंगरावर जाणार्‍या वळणावळणा च्या रस्त्यावर गाडी घेतलीच. लगेच दुतर्फा पसरलेले घनदाट रेन फॉरेस्ट साथ देऊ लागले. १५,२० मिनिटांनी टेकडी च्या समतल केलेल्या माथ्यावर पोचलो. सभोवार सुंदर बगीचा केलेला होता. बागेत उंच वृक्ष, सुंदर फुलझाडे इ. सोबत साठेक प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यात आली होती.
मध्यभागी बाहाय मंदिराची सुंदर इमारत उभी होती. तिच्या भिंतीवर बाहेरून केलेले डिझाईन, येथील मूळ चे नेटिव्ह्ज रेड इंडियन्स च्या कपड्यांवर च्या नक्षी शी मिळतीजुळती होती. तीन बाजू ला तीन प्रवेशद्वारे होती. तिन्ही चे डिझाईन थ्री डायमेन्शनल केलेले असून संपूर्ण जाळी दार आहेत त्यामुळे इथे दिवसभर हवा खेळती राहू शकते.
आतमधे चर्च मधे असतात तसे लाकडी, सुंदर पॉलिश केलेले बेंचेस आहेत. तिथे काही रेड इंडियन्स आपल्या ट्रेडिशनल पोशाखांत शांत बसून होते. कुठे ही कसलाही फोटो ,पेंटिंग, मूर्ती, चिन्हे इ. काही नाही. जस्ट प्लेन भिंती !!! आतमधे फोटो ग्राफी करायला, बोलायला बंदी आहे. मेडिटेशन करता उत्तम स्थान!!! Happy
बाहाय धर्माची स्थापना एकोणीसाव्या शतकात पर्शियात ( ईराण) 'बाहायउल्ला' द्वारा करण्यात आली . पुढे त्यांचा मोठा मुलगा ,' अब्दुल बाहा' ने या धर्माचा प्रसार युरोप, अमेरिका खंडात केला.
आता जगभरात या धर्माचे पाच लाखांवर अनुयायी आहेत.
आपल्या राजधानीत ही या धर्माचे एक अतिसुंदर मंदिर आहे असे ऐकून आहे..

खाली दूरवर पसरलेले पनामा शहर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!

सुंदर जागा आहे हि, अगदी शांत आणि रम्य.
दिल्लीलाही त्यांचे एक सुंदर प्रार्थनास्थळ आहे, अगदी वेगळाच पंथ आहे तो.

अतिशय सुंदर फोटो व माहिती .... Happy

हा धर्म पहिल्यांदाच ऐकला. >>>>>+११११११ --- रुचीनां वैचित्र्या दृजुकुटिलनानापथजुषां ... Happy

निवान्त स्थळ आहे....सुन्दरच!!
दिल्लीतले लोटस टेम्पल पाहिले होते. तिथेही आत मधे मुर्ती नाही, फोटो नाही, चिन्हे नाही. बाकी माहिती वाचाय्ला मिळाली.
माझ्या एका मामीच्या बहिणीच्या मुलीने बहाई धर्म स्विकारलाय.

बाहा'य धर्म/ पंथ/फेथ चा उगम (शियाईट) इस्लाम धर्मातून झाल्याने त्यांच्या सर्व मंदिरांमधे मूर्ती,फोटो इ. काहीच नसते.
सगळ्या धर्मां च्या उगमा मागे देवाला जाणून घेणे, देवावर प्रेम करणे, मानवतेची सेवा करणे असे उदात्त उद्देश असतात , याही पंथा च्या निर्माणामागे हेच आहेत.

पनामातील Indigenous लोकं या धर्माचे अनुयायी आहेत.

छान दिसते आहे.
अवांतर : तुम्ही चीन मध्ये होतात ना? पनामा म्हणजे अमेरिकेत आलं ना?
फोटो सुंदर आहेत..

मि-अनु.. एका दशका पेक्षा जास्त काळ चीन मधे राहून आता सध्या मुक्काम पोस्ट ,'पनामा सिटी,पनामा आहे !!
आणी हा पनामा कालवा असलेला.. पनामा , सेंट्रल अमेरिके तील एक देश आहे. साऊथ ला कोलंबिया तर नॉर्थ ला कोस्ता रिका देश आहेत... .

अमेरिकेतील फ्लोरिडा च्या नॉर्थवेस्ट ला असलेली पनामा सिटी बीच वेगळी जागा आहे... Happy

मस्त जागा आहे. पॅनमा सिटी/कॅनल आमच्या लिस्टवर आहे. बायदवे, तुम्हाला ग्लोबल सिटीझन (लिटरली) म्हणायला हरकत नाहि... Happy

मी पण तुम्हाला इस्ट आशियात असाला समजायचो.
पनामा कायम लिस्टवर आहेच. आता चिकन आणि थाय करी मिळणार असेल तर लवकर घेतलं पाहिजे Wink

>>इस्लाममधला बहाबी पंथ म्हणजेच बाहा'य धर्म का?<<

नोऽऽऽ. वहाबी (सुन्नी मधला पंथ) = रॅडिकल इस्लाम = आतंकवादि, अतिरेकी

आहाहा वर्षुताई, सॉलिड भारी फोटो.

दिल्लीला लोटस टेम्पल आहेना, फार अप्रतिम आहे ते. खूप वर्षापूर्वी जाण्याचा योग आला होता.