दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यात पण आहे की खोटेपणा.... आशुचा पास्ट, रेशमाचे लग्न
म्हणजे झी च्या त्या क्रायटेरियात बसतीय ही सिरीअल Wink

अरेरे मटा वाचते मी आता, आजचा पेपर नाही वाचला अजून.

हो पण इथे खोटेपणा लहान स्वरुपात आहेना, झीच्या व्याखेत बसत नसेल ;).

अर्रर पेपरवाल्याने लोकसत्ता टाकलाय आज. वरची लिंक वाचते मटाची.

"या मालिकेवरील लोकांचे प्रेम कमी होऊ नये म्हणून वेळीच थांबायचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे".. एका अर्थी हे पटलं. पण तो टाइम स्लॉट आता मोकळा मोकळा वाटणार हे नक्की Sad

नवीन सिरीज नवीन विषयांनी सुरु करणार बहुतेक. गाण पण नवीन घ्याव मग.
किंवा प्रौडक्शन हाऊस ला पैसा दुसरीकडे वळवायचा असेल.

चला मन लावून वेळ लक्षात ठेवून सिरीयल बघायचं कारण संपणार. सध्या हीच बघायचे. नवरा अशोका बघतो म्हणून ती येता जाता बघते. पण D 3 समोर बसून लक्ष ठेऊन बघायचे. Happy

कालचा भाग बघताना वाटलं की आजच एन्ड करतायेत की काय. ती रेश्मा नवीन रुपात (तिला वाटलं त्या रुपात) पण नाही आवडली.

कैवु, सुजुपण नाही आवडले त्या टाईपमधे. आशु, अ‍ॅना बरे वाटले.

तो कबीर गफेबरोबर येणार की काय नेक्स्ट एपि. मधे. ती काहीतरीच दिसतेय.

Happy हो. त्याचं नवीन नाटक पण आलं आहे सध्या.
आदे पेक्षा कबीर म्हणून खूप छान दिसलाय आणि वावरलाय. मजा येते तो एपिसोड मधे असला की.

हो हो बरोबर हेच नाटक.

rmd तुम्ही प्रत्यक्ष भेटलात ना त्याला, सो लकी. आमच्या जवळच्या गावातलंच आहे बघा हे पोरगं. आधी बदलापूर आणि आता कल्याण. कामानिमित्त मुंबईत राहात असणार आता.

Pages