फुसके बार – २२ जानेवारी २०१६
‘
१) रोहित वेमुला आत्महत्या – इतरांवरील कारवाई मागे घेतल्यावर मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष होणार?
आजच इतर चार विद्यार्थांवरची कारवाई मागे घेतल्याचे कळते आहे. याहीपुढे जाऊन आर्थिक मदत, कोणाची तरी गच्छंती यावर हे प्रकरण मिटले, तरी अनेक मूलभूत प्रश्न अनुत्तरीत राहणार आहेत. यात कोठेही दलित अँगल नसताना त्यावरून राळ उठवली गेली. पप्पू, ममता बॅनर्जीच्या पक्षांच्या लोकांनी तेथे भाषणे दिली. पप्पूच्या पक्षाचे सरकार केद्रात व राज्यातही असताना दहापैकी मागच्या नऊ दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. तिकडे ममता बॅनर्जी उघडपणे अनाचाराचे सरकार चालवत आहेत. अशा लोकांना आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला वापरू दिले. पप्पूला तर आंदोलनकर्त्यांनी याबद्दल एक प्रश्नही विचारला नाही. जणू आधी आत्महत्या केलेल्या दलितांशी त्यांना काही देणेघेणे नव्हते. (या अर्थाने हे आंदोलन ‘दलितां’शी संबंधित नव्हते असे म्हणता येईल).
या आंदोलनाच्या दरम्यान हैद्राबाद विद्यापीठाने या पाच विद्यार्थांची शिष्यवृत्ती सात-आठ महिन्यांपासून बंद केली असा आरोप केला गेला. आजच्या टीव्हीवरील चर्चेत ऐकले की याचा व आंदोलनाचा काहीही संबंध नाही आणि कितीतरी विद्यार्थ्याची स्कॉलरशिप थकलेली आहे. तेथील रचनेत काहीतरी बदल झाल्यामुले हे झाल्याचे व ती यथावकाश एक-रकमी मिळेल असे कळते. यापेक्षा अधिक तपशील माझ्याकडे नाही. तरीदेखील ‘दलिता'च्या पोटावर पाय असा त्याचा प्रचार केला गेल्याचे आपण ऐकले.
मूळ प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न न केल्यामुळे काय होईल, की दलितांशी संबंधित प्रश्नावरून काही राजकीय फायदा उठवता येतो का यावर ही सगळीच राजकीय गिधाडे टपून बसतील.
खरे तर आयआयटीतला अभ्यासक्रम न झेपल्यामुळे, कोट्यासारख्या ठिकाणी मानसिक ताण सहन न झाल्यामुळे किंवा असे राजकीय स्वरूपाचे आंदोलन करून आत्महत्या करणारा यांमध्ये फार काही फरक वाटत नाही. सगळ्याच घटना दुर्दैवी आहेत. यात कोठेही कोणाच्या जातीचा प्रश्न नाही. मागासवर्गीय व गरीब अशा मुलांपुढची आव्हाने इतर मुलांपेक्षा वेगळी व मोठी असतात. त्यासंदर्भात मुलांचे प्रभावी समुपदेशन करण्यासाठी देशभरात यंत्रणा उभी करण्यासाठी कोणी प्रयत्न करेल का?
'पहा, या विद्यार्थ्यावरची आधीची कारवाई चुकीची होती, हेच यावरून सिद्ध होते' अशी एक बाजू म्हणेल, तर 'आंदोलन चिघळू नये म्हणून ही भूमिका घ्यावी लागली' असे दुसरी बाजू म्हणेल. मात्र विद्यार्थ्यांनी (मग ते कोणीही असोत) राजकीय आंदोलने करावीत का, हे मूलभूत प्रश्न मागे पडतील किंबहुना अशी आदोलने करण्याचा प्रत्येकाचा हक्कच आहे, हा सोयीचा प्रस्थापित विचारच चालू राहील.
हे प्रकरण शांत झाल्यावरही यातील मूलभूत मुद्द्यांचा पाठपुरावा करत रहायला हवा. तरच आणखी दलित विद्यार्थ्यांच्या नशिबी असा अंत येणार नाही.
२) बिहारमधील नीतिशकुमार सरकारने लालू व त्यांच्या मुलांवरील अनेक खटले मागे घेतले आहेत.
या खटल्यांमुळे कोर्टाचा वेळ वाया जातो, हजारो केसेस कोर्टापुढे प्रलंबित आहेत. त्यामुळे हे पाऊल उचलल्याचे नीतिशच्या पक्षाचा प्रवक्ता सांगतो आहे. मात्र मागे घेतलेल्या खटल्यांमध्ये जातीय आधारावर लालूच्या पक्षाने पुकारलेल्या बंदमुळे दाखल केलेला खटलाही सामील आहे. हा बंद पाटणा उच्च न्यायालयानेही बेकायदेशीर ठरवला होता.
मी मागेही म्हटले होते स्वच्छ नीतिशनी सत्ता राखण्याच्या व मोदींशी वैयक्तिक स्पर्धा करण्याच्या नादात चिखलात उडी मारली आहे आणि बिहारला वीस वर्षांनी मागे टाकणा-या, भ्रष्टाचार व अनाचाराच्या युगात नेणा-या लालू नावाच्या दैत्याशी संग केला होता. लालूला त्यात गमावण्यासारखे काहीच नव्हते. सौदा होणार होता तो नीतिशनी कमावलेल्या पुण्याईचा. तेच होताना दिसत आहे. अगदी दररोज.
त्यातल्या त्यात एक चांगली बातमी काल वाचण्यात आली. निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे नीतिशनी महिलांना ३५% आरक्षणाची घोषणा केली. आता केन्द्रातही हे होण्यास हातभार लागावा.
३) एबीपी न्यूजवरील प्रधानमंत्री ही मालिका
चीनशी संघर्ष
१९६२चे भारत-चीन युद्धावर या मालिकेत एक प्रकरण आहे. भारताचे स्वातंत्र्य आणि चीनमधली क्रांती या घटना साधारणपणे एकाच सुमारास झाल्या. त्यानंतर लगेचच म्हणजे १९५०मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला. त्यानंतर पंचशील करारामध्ये भारताला तर काहीही मिळाले नाहीच, पण भारताने तिबेटवरचा हक्क मान्य करून टाकला.
एकापाठोपाठ एक चुका करण्याचा विडाच नेहरूंनी उचलला होता. त्यांचे मित्र व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यात आणि लष्करप्रमुख थिमय्या यांच्यात एकमेकांचे तोंड न पाहण्याइतपत कडाक्याचे मतभेद. मेनन यांच्या मताप्रमाणे चीनपेक्षा पाकिस्तानकडून धोका अधिक होता, त्यामुळे चीनच्या सीमेवर सैन्य तैनात करायला ते तयारच नव्हते. त्यात नेहरूंनी त्याचे नातेवाईक समजले जाणारे बी. एम. कौल यांना लेफ्टनंट जनरल म्हणून बढती दिली. ते करताना त्यांनी अनेक अधिका-यांच्या वरिष्ठतेचा बळी दिला. त्यावरून चिडून जनरल थिमैया यांनी नेहरूंकडे आपला राजीनामा सोपवला. नेहरूंनी तो नाकारला. परंतु नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करणे नेहरूंनी सोडले नाही.
चीनचे सामर्थ्य ओळखून त्यांनी चीनशी मैत्री करून युद्ध किंवा संघर्ष करण्याचा प्रयत्न चालवला होता. पण हा प्रकार सशाने वाघाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करण्यासारखा होता. बरे, ब्रिटिशांनी चिनी लोकांच्या महत्त्वाकांक्षा ओळखूनच तिबेट हा एक ‘बफर’ प्रदेश तयार केला होता. परंतु त्यातून धडा घेण्याऐवजी नेहरूंनी त्यावरचा चीनचा हक्क मान्य केला. त्यानंतर फॉरवर्ड पॉलिसी या नावाने चीनच्या सीमेवर सैन्यबल वाढवण्याचे ठरले. पण जसे अर्थसंकल्पांमध्ये घोषणा तर केल्या, पण त्यासाठी निधीच उपलब्ध न करण्याचे प्रकार चालतात, तसाच प्रकार त्यावेळीही झाला. त्यामुळे या काळात जवळजवळ आठ वर्षे मिळूनही त्याकाळात काहीही भरीव प्रगती झाली नाही.
या सगळ्या प्रकारामुळे चीनने चढाई केली तेव्हा भारतीय सैन्याकडे दारूगोळा नव्हता, पुरेसे अन्न नव्हते, होती ती केवळ हिंमत. केवळ हिंमतीवर लढणारे सैन्य किती टिकणार? मागे मी रेझांग ला च्या लढाईत भारतीय सैन्याच्या कुमाऊं बटालियनमधील अहिर यादव जवानांच्या तुकडीने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल लिहिले होते. ज्यांची इच्छा आहे त्यांनी या लढाईचे वर्णन जरूर वाचावे.
अरूणाचल सीमेवर तैनात सैन्याचा चिन्यासारखे दिसणारे पुतळे किंवा चित्रे तयार करून त्यांच्याशी लढून बायोनेटचा वापर करण्याचा सराव चालू होता. पंचशीलचे नाटक चालू होते, तेव्हा लष्कराला सांगून चिन्यांचा कोथळा काढण्याचा सराव बंद करण्यास सांगितले गेले.
या सगळ्या प्रकाराचा परिणाम एकच झाला, भारतीय सैन्याची ससेहोलपट.
दोन्ही बाजूंचे नुकसान तपासले तर भारतीय सैन्याचे १३८३ सैनिक मृत्युमुखी पडले. १०४७ जखमी झाले, १६९६ बेपत्ता झाले तर ४००० सैनिकांना चीनने आपल्या ताब्यात घेतले. या तुलनेत चीनचे ७२५ सैनिक मारले गेले तर १७०० जखमी झाले. तर मग कोणी म्हणेल की मग यावरून भारतीय सैन्य हरले असे का म्हणतात. याचे उत्तर दोन्ही बाजूंच्या सैन्यसंख्येत होते. भारताचे १० ते १२ हजार सैनिक चीनच्या ८०हजारांपुढे कसे टिकणार होते? त्यामुळे चीनने आपला ४३,००० स्वे. किमी प्रदेश व्यापला. नेहरू या काळात काही महिने, काही वर्षे हे युद्ध टिकेल असे भाषणांमध्ये सांगत होते. पण नशीब असे (नशीबच म्हणायला हवे) की एका महिन्यानंतर चीननेच त्यांना जे हवे ते मिळाल्यानंतर युद्ध एकतर्फ़ी थांबवले.
या युद्धापूर्वी चीनने भारताला दिलेला पर्याय अस होता की अरूणाचल प्रदेशचा भाग भारताकडेच ठेवून अक्साई चीनचा भाग चीनला देण्याबाबत मान्यता देणे. पण गवताचे पातेही उगवत नाही त्या प्रदेशावरून काय लढायचे अशी नेहरूंची दूरदृष्टी होती. त्यावर तेव्हाचे खासदार यांनी चिडून व उपरोधाने आपली टोपी काढून विचारले होते की माझ्या डोक्यावरही केस उगवत नाहीत, तर माझे डोके निरूपयोगी समजायचे काय?
मागे वळून पाहिले तर पंतप्रधान नेहरू, व्ही. के. कृष्णा मेनन, ले.ज. कौल हे ती जबाबदारी हाताळण्यास अजिबात लायक नसलेले हे त्रिकूटच लष्कराचा व पर्यायाने देशाचा मुखभंग होण्यास जबाबदार होते असे म्हणावे लागते. आपण देशाचे तहहयात पंतप्रधान झालो आहोत असा समजच जणू नेहरूंनी करून घेतला होता आणि एवढ्या मोठ्या नामुष्कीनंतरही ते त्या पदावरून पायउतार झाले नाहीत. बळींचा बकरा बनवले गेले ते मेनन यांना. एवढे झाल्यावरही आपल्याकडच्या लोकांमध्ये कवित्व शिल्लक होते आणि त्यांनी मेनन यांनी राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री बनवल्यावर त्याला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला वगैरे उपमा दिल्या. धन्य असते लोकांची.
ब्रिगेडियर जॉन परशुराम दळवी यांनी या सगळ्या तमाशावर हिमालयन ब्लंडर हे पुस्तक लिहिले. त्यावर बंदी आणण्याचे काम मात्र भारत सरकारने तत्परतेने केले. तमाशा म्हणणे योग्य एकाच कारणामुळे वाटत नाही की नेते नेभळट निघाले तरी आपल्या जवानांनी हिमालयातल्या ऐन थंडीत आपले रक्त तिथल्या बर्फात सांडले. पुन्हा म्हणतो, या नेभळटांसाठी.
दोन वर्षे झाली ... गांधी
दोन वर्षे झाली ... गांधी नेहरु काँग्रेस गेले.... कमळ , मोदी संघ आले...
...
इतका सगळा इतिहास आहे तर मोदी पाकिस्तानात साड्या वाटत आणि चीनच्या अधक्षाबरोबर झुला झुलत का फिरत आहेत ?
मा. अॅडमिन सदर धागालेखकाला
मा.
अॅडमिन सदर धागालेखकाला यापूर्वीही त्याच्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्न झालेला आहे. कुठल्यातरी चर्चा ऐकून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याप्रमाणे काहीही निष्कर्ष काढून फक्त त्यावरच चर्चा करा नाहीतर माझ्या पानावर येऊ नका असे पवित्रे घेणे, आत्महत्या झालेली कारणे कशी चुकीची आहेत याचे अगम्य तर्क मांडत राहणे, यापेक्षा वेगळा अँगल मांडल्यास अंगावर धावून येणे, शिवीगाळ करणे हे यापूर्वीही झालेलं आहे.
यांच्या कालच्या धाग्यामधे असे निष्कर्ष काढणे कसे चुकीचे आहे हे सप्रमाण दाखवून दिलेले आहे. तसेच मेहनत घेऊन तिथे लिंका वगैरे दिलेल्या आहेत ज्यामुळे या लेखकांना आणि इतरांनाही ते तपासून पाहता येईल.
इतरही सदस्यांनी दाखवून दिलेले आहे कि यापूर्वी झालेल्या आत्महत्यांमधे केंद्र सरकारने रस घेऊन कारवाईसाठी आग्रह धरलेला नाही. केंद्र सरकारने का आग्रह धरला याची कारणे काय याबद्दल व्यक्त झालेली मतं मागच्या धाग्यांवर संदर्भासहीत दिलेलि आहेत. तसा निष्कर्ष वाहीन्यांनी काढला आहे. त्यासंबंधात तपासयंत्रणा योग्य ती कारवाई करतील.
तेव्हां या आत्महत्येला अभ्यास न झेपल्याने आत्महत्या असा नवाच अँगल देऊ पाहण्याच्या या मनोवृत्तीचा तीव्र निषेध !
जर या प्रकारच्या मत मांडताना शिवीगाळ झाली तर लक्ष घालावे ही नम्र विनंती.
या आंदोलनाच्या दरम्यान
या आंदोलनाच्या दरम्यान हैद्राबाद विद्यापीठाने या पाच विद्यार्थांची शिष्यवृत्ती सात-आठ महिन्यांपासून बंद केली असा आरोप केला गेला. आजच्या टीव्हीवरील चर्चेत ऐकले की याचा व आंदोलनाचा काहीही संबंध नाही आणि कितीतरी विद्यार्थ्याची स्कॉलरशिप थकलेली आहे. तेथील रचनेत काहीतरी बदल झाल्यामुले हे झाल्याचे व ती यथावकाश एक-रकमी मिळेल असे कळते. यापेक्षा अधिक तपशील माझ्याकडे नाही. तरीदेखील ‘दलिता'च्या पोटावर पाय असा त्याचा प्रचार केला गेल्याचे आपण ऐकले. >>>>>
रवीशकुमार यांच्या रिपोर्टची लिंक, स्वतः रोहीत वेमुला याचे पेज , सकाळच्य बातम्यांची लिंक आणि अन्य अनेक घटना आहेत ज्यात हे सिद्ध होते आहे की रोहीत वेमुला च्या निलंबनासाठी केंद्र सरकारच्या एक मंत्री प्रयत्नशील होत्या. दुसरे एक मंत्री या खात्याला जाब विचारत होते. रोहीत देशद्रोही आहे असा आरोप त्याच्यावर ठेवला गेला होता. हे सगळं समोर आलेलं असताना त्याच्या दलित असण्यावरून फार मोठा अन्याय सरकारवर झालेला आहे असा वेगळाच रंग गेले दोन दिवस हे लेखक या प्रकरणाला देऊ पाहत आहेत.
कालच इतके घाईने निष्क्रष काढण्याची आवश्यकता आहे का याबद्दल विचारणा देखील केली होती. पण रोहीतच्या निलंबनामागे केंद्र सरकार आहे हा अँगल अत्यंत गौण आहे असे समजून दलित असण्यामुळे कसा इतरांवर अन्याय होतो असा उफराटा प्रचार या साहेबांनी चालवलेला आहे.
खरे तर आयआयटीतला अभ्यासक्रम न झेपल्यामुळे, कोट्यासारख्या ठिकाणी मानसिक ताण सहन न झाल्यामुळे किंवा असे राजकीय स्वरूपाचे आंदोलन करून आत्महत्या करणारा यांमध्ये फार काही फरक वाटत नाही. सगळ्याच घटना दुर्दैवी आहेत. यात कोठेही कोणाच्या जातीचा प्रश्न नाही. मागासवर्गीय व गरीब अशा मुलांपुढची आव्हाने इतर मुलांपेक्षा वेगळी व मोठी असतात. त्यासंदर्भात मुलांचे प्रभावी समुपदेशन करण्यासाठी देशभरात यंत्रणा उभी करण्यासाठी कोणी प्रयत्न करेल का?
या सर्व मुद्यांचा रोहीत वेमुलाच्या आट्महत्येशी काय संबंध आहे हे कळालेले नाही. रोहीत वेमुलाचे नाव वापरून हे मुद्दे इथे कशाला ? त्याने अभ्यासक्र्म झेपला नाही म्हणून आत्महत्या केली आहे का ? कोट्यासारख्या ठिकाणी मानसिक ताण सहन न झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे का ? मग अनेकांना आवडणारे असले मुद्दे त्याच्या आत्महत्येसारख्या संवेदनशील इश्युमधे मिसळण्याचे कारण काय आहे ?
त्याला कोट्यातून अॅडमिशन मिळालेली होती का ? त्याला इतरांपेक्षा कमी गुण होते का ? त्याला शिष्यवृत्ती मिळत होती का याची माहीती घ्या असे काल सुचवण्यात आलेले होते. त्याला ओपन सीटमधे अॅडमिशन मिळाली होती हे काल दाखवून दिलेले आहे. असे असताना त्याच्याशी संबंधित नसलेले इश्युज त्याच्या केसमधे का उपस्थित व्हावेत ? या मुद्यांवर वेगळी चर्चा करायला कुणी आडकाठी केलेली आहे का ?
ते कुठले कार्यक्रम पाहतात याची कल्पना नाही. त्यात किती खरी माहीती दिली जाते किंवा नेमकी काय माहिती दिली आणि इथे काय मांडली गेली याबद्दल अवाक्षरही न लिहील्याने वाचकाला छानबीन करण्याची कुठलीच सोय नाही. तसे संदर्भ मागितले असता शिवीगाळ होणे हे नित्याचे झाले आहे. किंवा माझे हे मुद्दे दिसले नाहीत का, डोळ्यांच्या खाचा झाल्या का असे असंबद्ध प्रश्न विचारले जाणे हे देखील नित्याचे होत चाललेले आहे,
यांच्या धाग्यांकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचे धोरण आहे. पण एका आत्महत्येसारख्या केसमधे काल त्याचीच चूक होती यावर जोर देत राहणे हे मान्य होण्यासारखे नाही.
निर्भया केस मधे तिचीच चूक होती असे वक्तव्य करणा-या नेत्यांबद्दल , सदस्यांबद्दल महिला सदस्यांच्या ज्या भावना होत्या त्याच इथे काही सदस्यांच्या असू शकतात हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.
क्योंकि रोहित एंट्रेंस टेस्ट
क्योंकि रोहित एंट्रेंस टेस्ट का ओवरऑल टॉपर था और उसका Phd एडमिशन अनरिजर्व कैटेगरी में हुआ, तो जाहिर है हैदराबाद सेंट्रल यूनिवर्सिटी के पास उसका कास्ट सर्टिफिकेट नहीं है. इसका फायदा उठाकर संघियों ने पूरे दिन अफवाहबाजी की कि रोहित दलित नहीं है.
RSS वाले रोहित का ओबीसी कास्ट सर्टिफिकेट नहीं पेश कर पाए, क्योंकि वह मौजूद ही नहीं है.
हे संघियों, अगर वह सवर्ण है तो भी क्या. वह बेहतरीन इंसान था, न्यायप्रिय था और हमें प्यारा है. तुमने एक इंसान को मारा है.
वैसे यह रहा उसका कास्ट सर्टिफिकेट. राज्य सरकार ने जारी किया है.
संघियों, सोशल मीडिया के जमाने में झूठ की खेती लंबी नहीं चलती
सकुरा असा प्रचार चालू आहे का
सकुरा
असा प्रचार चालू आहे का ?
जर तो दलित नाही याची खात्री आहे तर मग बाबासाहेबांनी देशद्रोह करायला शिकवला का अशा अर्थाचे शीर्षक देऊन अर्धवट व्हिडीओ हे एबीव्हीपी वाले का शेअर करीत होते ?
निर्भया केस च्या वेळी संबंधित
निर्भया केस च्या वेळी संबंधित मुलीने किंवा मुलीच्या जातीने कुठले कपडे घालावेत, रात्री बाहेर पडावे का याबद्दल सल्ले देणा-यांचा यथेच्छ समाचार घेण्यात आला होता.
रोहीत च्या केसमधे दलितांनी विद्यार्थी चळवळीत , राजकारणात भाग न घेता अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे सल्ले देणे हे त्याच कॅटेगरीत बसते कि नाही ? एबीव्हीपी च्या सदस्यांना जे स्वातंत्र्य आहे ते रोहीतसारख्यांना असावे कि नाही ? ज्याप्रमाणे स्त्रियांनी काय करावे काय करू नये याचे सल्ले पुरूषी मानसिकतेतून दिले जाऊ नयेत त्याचप्रमाणे दलितांनी काय करावे काय करू नये याचे सल्ले विशिष्ट मानसिकतेतून दिले जाऊ नयेत ही अपेक्षा चूक आहे का ?
निर्भया केस मधे स्त्री ने काय करावे काय करू नये याबद्दल पुरूषांचे शिक्षण करण्यासाठी एक प्रश्नावली फिरत होतॉ त्याचप्रमाणे या ही केसमधे एक प्रश्नावली इतरांसाठी बनवणे गरजेचे झालेले आहे.
१९६२ असो की २०१६, कुणी -कधी
१९६२ असो की २०१६, कुणी -कधी -काय करायला हवं होतं ते फक्त कुलकर्णी पंडितांनाच माहित होते असे दिसते.
खरं तर एखादी टर्म संपल्यानंतर पंडित नेहरूंना कळायला पाहिजे होते, आता भारतवर्षात एका लखलखित ज्ञानसूर्याचा, निर्भयतेच्या मूर्तीचा जन्म झाला आहे. त्यांनी आपली खुर्ची स्वतःहून त्या चमकत्या तार्याच्या हातात द्यायला हवी होती.
त्या काळी ७-८ वर्षांच्या असलेल्या या पराक्रमी वीराने भारतमातेला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले असते.
चीनला पळता भुई थोडी झाली असती.
पीएचडींच्या विद्यार्थ्यांना झापडे फ्री म्हणून वाटली गेली असती.
कपोचे, तुमचा अवतार देशातील
कपोचे,
तुमचा अवतार देशातील दलितांचे रक्षण करण्यासाठीच झाला आहे हा जो तुमचा समज आहे, त्याबद्दल मागेच लिहिले आहे. तुमच्या सुचनांना काडीचीही किंमत देत नाही. मुळात तुमची समज मर्यादित असल्याचे व लेखाचा रोख तुमच्या समजेच्या पलीकडचा आहे, हे यापूर्वी अनेकदा दाखवून दिले आहे.
त्यामुळे मी तुमच्या कमेंट्स वाचतही नाही.
नाचत रहा.
चक्रम, अशा सवंग कमेंट करून
चक्रम,
अशा सवंग कमेंट करून तुम्हाला काय मिळते ते पहा.
ज्या आधारावर हे लिहिले आहे, बंदी घातलेल्या ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे तो तपासून पाहण्याची तसदी घेण्याचीही तुमची इच्छा दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला अशाच स्वरूपाच्या कमेंट्स करत रहायच्या असतील तर करत रहा. यापुढे प्रतिसाद देणार नाही.
कुलकर्णी, तुम्ही ह्या
कुलकर्णी, तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर आधी दिले असेल, तर कल्पना नाही, पण तुम्ही रोहितची सुईसाईड नोट वाचली आहे का?
भास्कराचार्य, त्यासाठी माझी
भास्कराचार्य,
त्यासाठी माझी याआधीची पोस्ट वाचली असेल तर त्यात त्याचा उल्लेख आहे. तसेच त्यात कोणाचाही नामोल्लेख नाही यावरून प्रतिवाद करण्याचाही उल्लेख आहे.
नेहेमीप्रमाणे सवंग, अतीरंजीत,
नेहेमीप्रमाणे सवंग, अतीरंजीत, नेहरू-गांधी द्वेष अर्थात संघिष्ट प्रोपोगंडायुक्त जिलबी.
अॅडमिन असे धागे व धागाकर्त्यांना इग्नोअर करण्याची सोय करून देतील काय?
काल या लेखकाने रोहीतने
काल या लेखकाने रोहीतने सुशीलकुमार या विद्यार्थ्याला मारहाण केली हा निष्कर्ष ज्या पद्धतीने काढला त्यामुळे तपासयंत्रणांना लाज वाटायला हवी. खरे तर मारहाण झाली कि नाही याबद्दलच शंका आहेत. जे विद्यापीठ दबावाखाली कारवाई करते ते त्या कारवाईसाठी रिपोर्ट बसलू शकते कि नाही हा काल विचारलेला (ते ही अनेक संदर्भ दिलेले असताना ) पुन्हा त्या धाग्यावर संदिग्ध लिखाण करण्यामागचे हेतू काय आहेत ?
मूळ प्रश्न बाजूला ठेवून मुलभूत प्रश्न काही वेगळेच आहे हे भासवण्यामागचे कारण काय आहे ?
एबीव्हीपीने रोहीत ने घेतलेला मुझफ्फरपूर अभी बाकी है या व्हिडीओच्या स्क्रीनिंगचा कार्यक्रम का उधळला ? ही गुंडगिरी नाहीये का ? मग सुशीलकुमार इनेसन्ट होता कि काय ?
या विडीओची एव्हढी धास्ती का वाटावी ?
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2936773/Muzaffarn...
हा व्हिडीओ दाखवला जाऊ नये यात एबीव्हीपी या संघटनेचं राजकारण नाहीये का ?
मग रोहीतच्या मृत्यूनंतर इतरांनी राजकारण करावे किंवा करू नये याबद्दल चिंता कशाला हा काल प्रश्न विचारलेला होता. त्याला माझ्या हेतूबद्दल शंका घेतली तर शिवीगाळ केली जाईल असे उत्तर मिळाले आहे.
मयताच्या हेतूबद्दल शंका घेतल्याने लेखकाबद्दल शंका घेतली तर लेखक पिसाळून उठतो हे काल सिद्ध झालेले आहे. त्यामुळे मयताच्या हेतूबद्दल शंका घेताना तथ्यं देणं आवश्यक होतं हे मान्य करण्याऐवजी पुन्हा दुस-या दिवशी उठून भलतेच मुद्दे घेऊन येण्याने आणखी काय सिद्ध होतंय ?
रोहीत दरोद्रोही होता हा प्रचार का चालू झाला याचे उत्तर या घडामोडी पाहताना सहज मिळेल. मुझफ्फरपूर बद्दलचा हा व्हिडीओ दिल्ली विश्वविद्यालयात बॅन करण्यात आलेला आहे ? कारण काय ?
http://www.firstpost.com/bollywood/blocked-in-delhi-university-documenta...
याच कारणामुळे या विद्यार्थ्यांना निलंबीत करण्याचा कट शिजला हे उघड होते आहे. त्यामुळे मयताचाच दोष होता असे निष्कर्ष काढणारा प्रचार हा अजेण्डाचा भाग आहे ही शंका घेणे चुकीचे कसे काय ?
त्याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ पदवी परत करणा-या विचारवंतांना तसे करण्याचा हक्क आहे कि नाही याचा विचार न करताच कालच्या लेखात त्यांना दोष देण्यात आलेले आहेत. यावरून लेखात रोहीतच्या कारणांचा संवेदनशील रीतीने शोध घ्यायचा आहे कि कुणाला तरी डिफेण्ड करण्यासाठी विचारांचा रोख भलत्याच इश्युकडे नेण्ञाची ती धडपड आहे हे वाचतानाच क्लिअर होते. लेखकाने ज्या दिशेने लेख लिहीला त्याच दिशेने प्रतिसादकांनी प्रतिसाद द्यावेत असा नियम कुठे आहे ? उलट लेखक भलत्याच दिशेला घेऊन जातोय असे वाटल्यास तशा शंका घेण्यावर निर्बंध आणणे, शिवीगाळ करणे आणि मुद्दे सोडून धमक्या देणे हेच नियमित घडते आहे.
मुझफ्फरपूरचा तो व्हिडीओ जर पाहिला तर एबीव्हीपीच्या त्या कार्यकर्त्यांना भांडण उकरून काढणे का गरजेचे वाटले, एबीव्हीपी ही संघाची किंवा भाजपची शाखा नाही असे दावे का केले जातात याबद्दल प्रश्न मनात उत्पन्न होतील. ही फिल्म चुकीची आहे किंवा कसे याबद्दल प्रतिसाद देण्याला कुणी रोखलेलं नाही, तसंच या फिल्मच्या स्क्रीनिंगवर बंदी असावी का आणि त्यातून निलंबीत करण्यासाठी एका मंत्र्याने दुस-या मंत्र्याला पत्रे लिहावीत का हा मूळ मुद्दा आहे.
मुलभूत प्रश्न म्हणून जे काही मुद्दे कालपासून उपस्थित केले जाताहेत ते रोहीतच्या मृत्यूनंतर आणि त्या घटनेशी सांगड घालून उपस्थित करण्याची काही एक आवश्यकता नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करीत आहे.
सदर व्हिडीओ एका फेसबुक खात्यावर उपलब्ध झाला. तेथून लिंक घेतली आहे. त्या साठी सदस्याची परवानगी आवश्यक असेल असे वाटत नाही.
https://www.facebook.com/prashant.bansode.545/videos/981187131955612/
बाकी दोन उद्धटांची जुगलबंदी
बाकी दोन उद्धटांची जुगलबंदी वाचण्यासारखी असते. फुल टू करमणूक.
राजेश कुलकर्णी माझा उल्लेख
राजेश कुलकर्णी
माझा उल्लेख करू नका. करायचा असल्यास व्यवस्थित करावा.
माकड, डुक्कर, गटारगंगा, थूत तुमच्यावर असे शब्द वापरणे अगदीच अशक्य नाही. तसे करण्याला केवळ संस्कार रोखून धरत आहेत. मला शिवीगाळ करण्यापेक्षा मुद्यांचा प्रतिवाद फक्त करावा आणि मागच्या धाग्यात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत.
अॅडमिन कृपया लेखकाच्या भाषेकडे लक्ष द्यावे,
मग आयआयटीमध्ये सगळ्यांना समान
मग आयआयटीमध्ये सगळ्यांना समान असलेला अभ्यासाचा ताण एखाद्याला सहन न होणे आणि एखाद्याला अभ्यास (रीसर्च) करायचा असताना सिस्टमने त्याला सस्पेंड करणे, त्याच्यावर कारवाईसाठी महिनोमहिने आग्रह धरणे, कुठल्या का कारणाने असेना (सात महिने कुणाचा पगार कसाही अडकून पडणे हे आधीच अक्षम्य आहे) त्याचा इतका पगार अडकून पडणे, ह्या दोन्ही घटनांमध्ये फरक नाही हे पटण्यासारखे आहे काय? प्रश्न कुठल्या व्यक्तीवर किती ताण पडतो आणि त्यांची तो सहन करण्याची क्षमता आहे का, हा नसून सिस्टम कुणाकडे बघताना अन्फेअरली जास्त हार्श होते आहे का, हा आहे. तसे मानण्यासाठी वरील घटना सकृतदर्शनी तरी काहीही सुचवत नाहीत असे म्हणायचे आहे काय?
दीड मायबोलीकर, अतिरंजीत
दीड मायबोलीकर,
अतिरंजीत म्हणण्यापूर्वी जे संदर्भ दिले आहेत, ते वाचण्याची समजण्याचीतरी तुमची कुवत आहे काय. या प्रत्येक वेळी स्वत:ची शोभा करून घ्यायला. Waste of space and time. Good for nothing.
ते कपोचे आणि तुम्ही, खोडसाळपणात कोणाचा क्रमांक पहिला हे ठरवणे अवघड आहे.
कुलकर्णी, १. पप्पू असा उल्लेख
कुलकर्णी,
१. पप्पू असा उल्लेख करणे योग्य वाटत नाही.
२. आज दैनिक सकाळमध्ये आलेला अग्रलेख संतुलित वाटला, तो वाचला नसलात तर वाचावात. त्यात एक असा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांकडून होणार्या आंदोलनांनी अनेकदा राजकीय उलथापालथी होऊ शकतात. ह्याचा असा मर्यादीत अर्थ कृपया घेऊ नका की एखादे शासन उलथवून टाकण्यासाठी ही आंदोलने वापरली जातात. ह्याचा बहुधा अपेक्षित अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका घेऊच नये असे म्हणणे पूर्ण योग्य नाही. रोहित प्रकरण आणि गजेंद्र चौहान नियुक्तीसंदर्भातील आंदोलन ह्यांच्या गुणात्मक तफावत आहे. रोहित प्रकरणी दलित विद्यार्थ्यांच्या सवलती काढून घेतल्या जाण्याचा प्रकार सांगितला जातो तर गजेंद्र चौहान ही माथी मारलेली नियुक्ती आहे. (व्यक्तीशः मात्र मला असे वाटते की अशी आंदोलने जर सर्वच विद्यार्थ्यांनी करायची म्हंटली तर वाटोळे होऊ लागेल).
३. बाकी ह्या अत्यंत दुर्दैवी आणि लांच्छनास्पद घटनेचा राजकीय फायदा सर्व बाजूंकडून उचलला जात आहे ह्यावरून आपल्याकडची एकंदरच गिधाडी मानसिकता प्रकर्षाने दिसून येत आहे. केजरीवालांनी ह्यात पडणे ह्यासारखा दुसरा विनोद नसेल. तो एक शेतकरी आत्महत्या करत होता तेव्हा कणकेच्या गोळ्यासारखे व्यासपीठावर बसलेले हे महाशय आता हैदराबादमध्ये भोचकपणा करत आहेत.
कुलकर्णी, तुम्ही जर काही
कुलकर्णी,
तुम्ही जर काही विशिष्ट मते मांडू पाहात असलात तर एक धोरण अवश्य लक्षात ठेवा. प्रतिसाददात्यांशी अजिबात भांडू नका, किंबहुना वाद घालूच नका. धाग्याखाली त्यांचे विरोधी प्रतिसाद आले ह्याचा अर्थ तुमचे म्हणणे चूक ठरले असा होत नाही. दोन्ही बाजू थोड्याफार बरोबर / चूक असू शकतात, असे अनेक विषय असतात. मात्र फक्त वाद घालण्यात तुम्ही रस घेत राहिलात तर देवपूरकरांप्रमाणेच परिणाम होईल हे मी केवळ एक सदस्य म्हणून सुचवू पाहत आहे. ह्यात इतर कोणताही अर्थ काढू नयेत अशी विनंती.
बाकी दोन उद्धटांची जुगलबंदी
बाकी दोन उद्धटांची जुगलबंदी वाचण्यासारखी असते. फुल टू करमणूक. >>>
पादुकानन्द, तुम्हाला उद्धटांची जुगलबंदी हवी असेल तर स्त्रियांसाठी ड्रेस कोड असा सर्च द्या. तुमची अजून करमणूक होईल. निर्भया केसचे धागे काढून पहा, तुमच्या मानसिकतेप्रमाणे तुमची करमणूक होईल. ती चूक की बरोबर यात मी शिरत नाही.
मुस्लीम या संपूर्ण समाजाची आयडेन्टिटी आज देशद्रोही, आयएसआयचे एजन्ट अशी झालेली आहे. दलितांची तशी आयडेन्टीटी हळूहळू होते कि काय अशी भीती आहे. खैरलांजी घटनेत मोर्च्यामधे नक्षलवादी होते या आरोपामुळे संतत्प वातावरण झाले होते. त्या वेळी तपास बाजूलाच राहीला आणि तपास सुरू करावा या बेसिक मागणीसाठी मोर्च्या काढणा-यांना नक्षली, देशद्रोही ठरवण्यात आले होते.
आताही दलित म्हणून आक्रोश का करता असे प्रश्न काल उपस्थित केले गेले आहेत. त्यामुळे स्त्रियांसाठी ड्रेसकोड किंवा निर्भया प्रकरणात जसा संताप व्यक्त झाला, ज्या भावना व्यक्त झाल्या तशाच भावना इथे काहींच्या आहेत. यात तुम्हाला मनोरंजनात्मक मूल्य दिसत असतील आणि करमणूक होत असेल तर कुणी काय करू शकतो. तुमची करमणूक व्हावी म्हनून दिलेले धागे वाचा.
एडमिन एकाच विषयावर सतत विकृत
एडमिन एकाच विषयावर सतत विकृत धागे काढून कोण कुणास उचकवत आहे हे आपल्या लक्षात आले असेल अशी अपेक्षा ठेवतो. एक धागा रोहीत वर काढल्यानंतर त्यावर चर्चा चालू असताना पुन्हा नवीन धागा काढण्याचे कारण धागाकर्त्यांनी स्पष्ट करावे
नेहरूंनी तत्कालीन परिस्थित जे केले ते आज जरी चुकीचे वाटत असेल तरी त्यावेळेस ते योग्यच होते. ज्यांची घरात सुध्दा निर्णय घेणमयाची लायकी नाही त्यांना हे कळणार नाही. आणि विशिष्ट अजेंडा सतत राबवणार्यांना तर अजिबातच नाही कारण त्याच्या आवडीच्या नेत्यांचे कर्तृत्व शुन्य असल्याने त्याचे " शेळपट" अनुयायींना गुणगान करायला मिळत नाही मग याचे फ्रस्ट्रेशन ते इतर नेत्यांवर काढतात. स्वतः कुवत एक वीट बनवण्याची नसते पण टीका मात्र ताजमहल बनवणार्यांवर करणार.
अर्थात यामागे कुठली मानसिकता आहे हे २००९च्या दारूण आणि मानहानीकारक पराभवामधून पासून दिसून येते.
हा धागा मुद्दामुन वाद निर्माण करण्यासाठी काढलेला आहे आणि यावर झालेले होणारे सर्व वादांची येणार्या उलटसुलट प्रतिसादाची, कुणाला काहीही उद्देशून बोलणे इ. सर्व जवाबदारी फक्त धागाकर्त्याची आहे हे मायबोलीकरांनी लक्षात घ्यावे
नवनिर्माण आंदोलन, आसाम गण
नवनिर्माण आंदोलन, आसाम गण परिषद, तियानामेन चौक.......
जनरल एस पी पी थोरात यांच्या
जनरल एस पी पी थोरात यांच्या मुळ इंग्रजी पुस्तकाचे मराठी "माझे शिपाईगिरी" हे भाषांतर चीन युध्द आणि भारताचा पराभव या संदर्भात जरुर वाचावे. जनरल एस पी पी थोरात हे या काळात नॉर्दन विभागाचे क्मांडर होते.
ते म्हणतात की १९५८ साली चीन भारतावर आक्रमण करणार हे सैन्याने गृहीत धरुन एक फाईल बनवली होती. ह्यात प्रामुख्याने जर चीन चे आक्रमण झाले तर आपले रनगाडे चीन लगतच्या सीमेवर पोहोचतील असे रस्ते सैन्याने बनवुन मागीतले होते. परंतु संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी पं नेहरुजींच्या चीन वरील विश्वास आणि हिंदी - चिनी भाई भाई या घोषणेच्या हे विरोधात असल्यामुळे ही फाईल कॅबिनेट पुढे न ठेवल्यामुळे अनेक कारणांनी या युध्दात पराभव झाला पैकी रनगाडे पोहोचले नाहीत हे ही होते.
या पराभवानंतर नेहरुजींनी जनरल एस पी पी थोरात यांना भेटीला बोलावले. तुम्ही मराठा म्हणजे उत्तर वारीयर असताना पराभव कसा झाला हे विचारले. यावर जनरल एस पी पी थोरात यांनी आपली कारण मिमांसा सांगीतली व त्या फाईलची एक प्रत सादर करत त्यांना पुरावा सादर केला.
माझा लिखाणात नेहरुंजी विषयी आकस नाही. नेहरुजींनी जी धोरणे आखली त्याचा हा पराभव होता. कुठेही तो प्रदेश चीन च्या ताब्यात जावा किंवा भारताला मानहानी पत्करावी लागावी असा त्यांचा मानस नक्की नसेल.
केवळ चर्चा ह्या विषयावर चालल्या मुळे हे लिखाण इतकेच.
असच काही वाजपेयी यांनीही केले
असच काही वाजपेयी यांनीही केले पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालून फिरणार्या वाजपेयी पण नेभळतच
निनाद१ ते नेभळट आहेत असे
निनाद१
ते नेभळट आहेत असे म्हणणे मला बरोबर वाटत नाही पण त्यांच्या डिप्लोमसी चा पराभव झाला हे नक्की. मोदींच्या डिप्लोमसीचा पराभव झाला की नाही हे काळ ठरवेल. कारण मोदी येण्यापुर्वी आणि आल्यानंतरही पठाणकोट सारख्या कारवाया चालुच होत्या.
त्यांचा प्रयत्न माझ्यामते पाकिस्थानच्या राजकीय सत्तेला त्यांच्या सुप्रीम पॉवरची आठवण करुन देऊन त्यांना सक्षम बनविण्याचा आहे. आय एस आय, मिलिट्री आणि अतिरेकी यांची अॅटोनॉमी असलेल्या देशात जर राजकीय सत्तेचे महत्व वाढले आणि आय एस आय, मिलिट्री आणि अतिरेकी यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत घटले तर पाकिस्थान आणि भारत यांच्या चांगल्या सबंधात बिब्बा घालणार्या ह्या तीन संस्थांचे खच्चीकरण होऊन शांतता नांदेल असे आपले परराष्ट्र धोरण आहे. हे धोरण अनेक वेळा प्रसिध्द झाले आहे.
मोदींनी या धोरणाला पुरक अशी कृती करुन प्रोटोकॉल मार्फत दुसर्या पंतप्रधानांशी संवाद करण्या ऐवजी सरळ संवादाचे प्रयत्न केले यात माझ्यामते गैर नाही.
कोणीही पंतप्रधान परराष्ट्र धोरणाशी सुसंगतच वागतात. इस्त्रायलशी संबंध जोडताना नरसिंहराव यांना इंदिराजींच्या काळात असलेले धोरण बदलताना परराष्ट्र खात्याला अंधारात ठेऊन असे वागता आले नव्हते.
नेहरू आहे पण वाजपेयी
नेहरू आहे पण वाजपेयी नाही
धन्य झालो
मी नेहरुजी आणि वाजपेयीजी
मी नेहरुजी आणि वाजपेयीजी यांच्या धोरणाचा पराभव असल्याचे मान्य केले आहे. परंतु दोघेही नेफळट नाहीत.
कोणीही माजी - आजी पंतप्रधानांविषयी असे लिहु नये असे माझे मत आहे.
मोदींच्या विषयाला आत्ताच हात घालु नये कारण त्यांची कारकिर्द संपल्याशिवाय मुल्यमापन करणे गैर असेल.
एकाबाजुला बसयात्रा चालु असताना कारगिरच्या कारवाईचा सुगावा न लागणे आणि एका मेंढपाळाकडुन आपली लष्करी ठाणी काबीज झाल्याचे समजणे ही १९६२ च्या युध्दात झालेल्या चुकीसारखीच चुक आहे.
मात्र पठाणकोटच्या वेळेला आपण सावध होतो. आपली लष्करी कारवाई कधी संपली याबाबत एकवाक्यता नसणे इ. गोंधळ क्षणभर बाजुला ठेवल्यास अतिरेक्यांना घुसता आले तरी मोठा आघात करणे शक्य झाले नाही हे मान्य करावे लागेल.
विषय संपला. आता विपर्यास करावयाचा असेल तर उत्तर मिळणार नाही.
निनाद१, तुम्ही बेाक्कल अाहात
निनाद१,
तुम्ही बेाक्कल अाहात हे आता स्पष्ट झाले. घरातही निर्नय घेण्याची लायकी नाही असे बरळलात म्हणून तो शब्द वापरला.
येथे वाजपेयींचा विषय नाही. मुद्दा उल्लेख केलेल्या मालिकेच्या संबंधात आहे. तुम्ही जगभरचे मुद्दे काढून त्यावरील तुमचे मत माझ्या माथी मारता आहात. हे निव्वळ दळभद्रीपणाचे लक्षण अाहे. उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तुम्ही लिहित नाहीत. तेथे संदर्भ दिलेले अाहेत. ते तपासून पाहण्याची तुमची इच्छाच न्वहे योग्यताही दिसत नाही.
तेव्हा तुमच्यासारख्या बेअक्कल व्यक्तीशी यापुढे वाद घालणार नाही.
अॅडमिन,
निनाद१, दीद मायबोलीकर अणि कपोचे हे सदस्य वारंवार कोणतीही सकारात्मक कमेंट न करता माझ्यावर हेत्वारोप करत आहेत. या प्रकाराकडे मी दुर्लक्ष करावे अशी आपली सूचना अहे काय? उचकवण्याबद्दलही तुम्ही वॉर्निंग देऊनही हे प्रकार चालु आहेत.
फेसबुकवर ज्या प्रकारे नको त्या सदस्यांना कमेंत करण्यापासून वंचित ठेवता येते किंवा थेट ब्लॉक करता येते, तशी सोय येथे नसल्यामुळे तसे करता येत नाही, त्यामुळे अशी सवय असलेल्यांचा बंदोबस्त करता येत नाही. कदाचित सदस्यांच्या सदस्दविवेकबुद्धी व या पोर्टलच्या पॉलिसी सगळेच सदस्य पाळतील या अपेक्षेने तसे केले गेले नसावे. परंतु अनेक सदस्य त्याचा गेरफायदा घेत आहेत. त्यातले निनाद१सारखे स्वत:चे कोणतेही लेखन नसलेले सदस्य तर कमेंट करताना सवंगतेचा, असंबद्धतेचा आणि वैयक्तिक भाषेचा वापर करत आहे. दीड मायबोलीकर हे सदस्यही तसेच करत आहेत. त्यांच्या टीकेत कोणतीही सकारात्मकता नाही.
तेव्हा या पोर्टलची पॉलिसी तंतोतंत पाळली जात आहे हा याचे अवलोकन करून आपण योग्य ती पावले उचलावीत अशी विनंती.
मी याआधी म्हटल्याप्रमाणे माझ्या पोस्टमध्ये कोणत्याही सदस्याचा नामोल्लेख केलेला नसतो. त्यांच्याबद्दलची वावगी भाषा वापरणे तर दूरच. परंतु तरीही कमेंटमध्ये सवंगपनाचा, असंबद्धतेचा आणि वैयक्तिक आरोपांचा सर्रास वापर होत आहे. अशा कमेंट्सना रोखठोक उत्तर दिल्यावर त्याबद्दलचा वाईटपणा मात्र मला येतो. मागच्या वेळी वॉर्निंग देताना केवळ माझ्या नावाचा उल्लेख केला गेला परंतु कमोचे, दीद मायबोलीकर आणि निनाद१ या हेटब्रिगेडचा नाही.
मी वर म्हटल्याप्रमाणे असा टवाळखोरपणा, असंबद्धपणा आणि वैयक्तिक कमेंट्सा वापर करणा-या वरील सदस्यांना ताकीद देण्यात यावी. याच पोस्टवरील इतर सदस्यांचे काही सकारात्मक प्रतिसाद आपण पाहू शकाल आणि त्या तुलनेत या तिघांचेही.
मीदेखील एक पोर्टल चालवतो (टेक्निकल स्वरूपाचे), त्यामुळे इच्छा असेल तर वर उल्लेख केलेल्या सोयी करणे फार अवघड नाही हे मला माहित आहे. तसे केल्यास अशा व्ृत्तींना अपोआप पायबंद बसेलच, आपल्याकडे येणा-या तक्रारीही जवळजवळ संपतील. याचा विचार करण्याबाबत मी आपल्याला यापूर्वीही विनंती केली होती. तरी याचा जरूर विचार करावा.
अॅडमिन, निनाद१, दीद मायबोलीकर
अॅडमिन,
निनाद१, दीद मायबोलीकर अणि कपोचे हे सदस्य वारंवार कोणतीही सकारात्मक कमेंट न करता माझ्यावर हेत्वारोप करत आहेत. या प्रकाराकडे मी दुर्लक्ष करावे अशी आपली सूचना अहे काय? उचकवण्याबद्दलही तुम्ही वॉर्निंग देऊनही हे प्रकार चालु आहेत.
फेसबुकवर ज्या प्रकारे नको त्या सदस्यांना कमेंत करण्यापासून वंचित ठेवता येते किंवा थेट ब्लॉक करता येते, तशी सोय येथे नसल्यामुळे तसे करता येत नाही, त्यामुळे अशी सवय असलेल्यांचा बंदोबस्त करता येत नाही. कदाचित सदस्यांच्या सदस्दविवेकबुद्धी व या पोर्टलच्या पॉलिसी सगळेच सदस्य पाळतील या अपेक्षेने तसे केले गेले नसावे. परंतु अनेक सदस्य त्याचा गेरफायदा घेत आहेत. त्यातले निनाद१सारखे स्वत:चे कोणतेही लेखन नसलेले सदस्य तर कमेंट करताना सवंगतेचा, असंबद्धतेचा आणि वैयक्तिक भाषेचा वापर करत आहे. दीड मायबोलीकर हे सदस्यही तसेच करत आहेत. त्यांच्या टीकेत कोणतीही सकारात्मकता नाही.
तेव्हा या पोर्टलची पॉलिसी तंतोतंत पाळली जात आहे हा याचे अवलोकन करून आपण योग्य ती पावले उचलावीत अशी विनंती.
मी याआधी म्हटल्याप्रमाणे माझ्या पोस्टमध्ये कोणत्याही सदस्याचा नामोल्लेख केलेला नसतो. त्यांच्याबद्दलची वावगी भाषा वापरणे तर दूरच. परंतु तरीही कमेंटमध्ये सवंगपनाचा, असंबद्धतेचा आणि वैयक्तिक आरोपांचा सर्रास वापर होत आहे. अशा कमेंट्सना रोखठोक उत्तर दिल्यावर त्याबद्दलचा वाईटपणा मात्र मला येतो. मागच्या वेळी वॉर्निंग देताना केवळ माझ्या नावाचा उल्लेख केला गेला परंतु कमोचे, दीद मायबोलीकर आणि निनाद१ या हेटब्रिगेडचा नाही.
मी वर म्हटल्याप्रमाणे असा टवाळखोरपणा, असंबद्धपणा आणि वैयक्तिक कमेंट्सा वापर करणा-या वरील सदस्यांना ताकीद देण्यात यावी. याच पोस्टवरील इतर सदस्यांचे काही सकारात्मक प्रतिसाद आपण पाहू शकाल आणि त्या तुलनेत या तिघांचेही.
मीदेखील एक पोर्टल चालवतो (टेक्निकल स्वरूपाचे), त्यामुळे इच्छा असेल तर वर उल्लेख केलेल्या सोयी करणे फार अवघड नाही हे मला माहित आहे. तसे केल्यास अशा व्ृत्तींना अपोआप पायबंद बसेलच, आपल्याकडे येणा-या तक्रारीही जवळजवळ संपतील. याचा विचार करण्याबाबत मी आपल्याला यापूर्वीही विनंती केली होती. तरी याचा जरूर विचार करावा.
मोदींच्या विषयाला आत्ताच हात
मोदींच्या विषयाला आत्ताच हात घालु नये कारण त्यांची कारकिर्द संपल्याशिवाय मुल्यमापन करणे गैर असेल. >>
नितिनसाहेब मोदींचा विषय आपणच सारखा काढत आहे मग इतरांना काढू नका काढू नका कशाला बोलत आहे
उगाचच?
Pages