कोक्पर - ४

Submitted by उदय८२ on 19 January, 2016 - 02:02

कोक्पर - ३

डेव्हिड आणि सहकारी एका इमारतीत गेल्यावर तपासणी करत असताना दोन व्यक्तीवर संशय येउ लागला.

"सर, यांच्या घराची तपासणी करत असताना आतल्या पलंगाखाली पाचशे डॉलर्स आणि ही हत्यारे सापडलीत आणि काही सुकामेवा देखील सापडला."
एका सार्जंट्ने डेव्हिडला माहिती पुरवली.
"हत्यारे कोणत्या प्रकारची? "
"सर एक लोकल रिव्हॉल्वर आहे. आणि दुसरी पिस्तूल आहे ९एमएम"
"9 एमएम अरे व्वा. घेऊन या त्याला"
बाहेर एक उंचापुरा काळा पहाड म्हणता येईल असा पुरुष आणि उंच पण वयाने लहान असा एक मुलगा. दोघांना हातकड्यांनी हात मागे बांधून आणण्यात आले
"तुमची नाव काय आहेत" उंच काळ्यापहाडला बघून डेव्हिड म्हणाला.
"महल्लविद दहान्ना सीन्ना? "
"ट्रान्सलेटरला बोलवा यार; इथे हीच समस्या आहे."
सिरीयामध्ये मुख्यतः: अरबी भाषा असल्याने सैनिकांना ट्रान्सलेटर सोबत घ्यावा लागतो. संभाषण करताना बर्‍याचवेळा उपयोगी पडतो. सुलेमान रशीद हा त्यांच्याबरोबर ट्रान्स्लेटर म्हणून होता. तोच पुढे आला.
" म्ला अस्युम्मुकी? "
" तुस्सुम्मी युसुफ बेन , तस्समुहु अकिल मलिक"
"याचे नाव युसुफ बेन आणि त्याचे अकिल मलिक." सुलेमानने माहिती पुरवली.
"हे पैसे आणि हत्यारे घेऊन इथे काय करत होतात, विचार त्यांना."
"ते म्हणत आहेत की ते लेबनान मधून आलेत आणि स्वसंरक्षणाकरिता हत्यारे आहेत. त्यांचे नातेवाईक इथे सिरीयात राहतात, महकन मध्ये"
"लायसेन्स आहेत का"
"नाही इथल्या परिस्थितीमुळे लेबनान सीमेजवळूनच एका लोकल माणसांकडून घेतली होती. "
"आत थांबवा यांना आणि घराची अजून तपासणी करा. विचारपूस चालूच ठेवा.. मी रस्त्याची तपासणी करून आलो."

सार्जन्ट सुलेमानकडे सूत्रे सोपवून डेव्हिड बाहेर पुढील तपासणीकरिता निघाला. सुलेमानने बरेच उलटेसुलटे प्रश्न विचारले. त्यांच्याकडे असणार्‍या वॉन्टेड अतिरेक्यांचे फोटो दाखवून काही ओळख आहे का वगैरे तपास चालू केला. इकडे डेव्हिडने देखील रस्त्यावरची तपासणी वेगात सुरू केली होती. तपासणी करत करत चार वाजायला आले. चौकातून परत येत असताना सॅटेलाईट फोन वाजला.
"वॉरहेड कमिंग वॉरहेड."
"मेजर कमांडर डेव्हिड कमिंग ओव्हर."
"ब्लॅकबर्ड , नवीन अपडेट्स आली आहेत. बघून कन्फर्म करा ओव्हर."
"कॉपी दॅट, चेक करून माहिती पुढे पाठवतो. ओव्हर अँड आऊट."
डेव्हिडने लॅपटॉप उघडून त्यावर आलेली माहिती बघायला सुरुवात केली. आजच्या मिशन मधली माहिती अपडेट करण्यात आली होती. तसेच आणखी काही चेहर्‍यांची ओळख पाठवली होती. त्यातल्या तीनचार जणांचे फोटो बघून डेव्हिडला हसू आले. आणि तो इमारतीच्या दिशेने चालू लागला.

काही वेळेतच डेव्हिड आणि चमू इमारती जवळ आले. डेव्हिड जिना चढून फ्लॅटजवळ पोहचला. बाहेर तीनचार सैनिक होते. त्यांचा सॅल्यूट घेऊन डेव्हिड रूममध्ये शिरला. दोघांना खुर्चीवर बसवले होते. एका बाजूला सोफ्यावर सुलेमान बसलेला आणि त्यांच्या भोवती चारपाच सैनिक उभे होते. सुलेमान शांतपणे त्यांना अरबी भाषेत प्रश्न विचारत होता. डेव्हिड खुर्ची घेऊन समोर बसला. सुलेमान उभा राहिला पण त्याला हातानेच खाली बसवले.
"सुलेमान, काय प्रोग्रेस?
" काही नाही सर, हा युसुफ लेबनान मधून आलेला आहे म्हणतोय. चोरीच्या तेलाचा व्यवसाय आहे. त्यासाठीच नातेवाईकाला घ्यायला आलेला. विहिरीतून काढलेले तेलाचे ड्रम गोडाउन मधून परस्पर उचलतात. म्हणून त्यासाठी हत्यारे जवळ ठेवावी लागतात. स्थानिक ओळखीचा जवळ असावा म्हणून नातेवाइकाला मदतीला घेतलाय."
"अस्स. तेल चोरी करत.... " अचानक बोलता बोलता डेव्हिडने अकिलच्या कानफाडात वाजवली. अकिल अचानक झालेल्या हल्ल्यामुळे धडपडत खुर्चीसकट मागे पडला. डेव्हिड शांतपणे उठून त्याच्याजवळ गेला. त्याला आधार देऊन विचारले "तेलचोरी करतो काय? " अकिलचे केस पकडून डोके वर उचलून परत खाली आदळले

"सर काय झाले?" सुलेमान आश्चर्य चकित झाला.
"................ " डेव्हिडने सुलेमानकडे बघून शांत राहण्याचा इशारा केला. अकिलला उचलून परत समोरच्या भिंतीवर आदळला. तीन-चार कानफाडात वाजवून शांतपणे परत विचारले "तेल चोरी करू नये कळते का तुला"? "
अकिल विव्हळत "महह्मा महह्मा" बोलत होता. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून डेव्हिडने बाजूला असलेली लाकडी खुर्ची त्याच्या पाठीवर खाड् करून मारली. एक- दोन- तिसर्‍या फ़टक्याला खुर्ची तुटली.
"तेल चोरणार का परत?" आता डेव्हिडने त्याला खाली बसवले. अकिलच्या डोक्यातून रक्त वाहत होते. समोरचे दात तुटल्यातच जमा होते. त्याला बसायला त्रास होत होता. डेव्हिड परत खुर्ची घेऊन अकीलसमोर बसला. चेहर्‍यावरचा क्रूरपण जाऊन हसरेपणा आला. अकिलच्या डोक्यावरून हात फिरवून परत एकदा विचारले. "चोरी किती वाईट असते कळले ना? " अकिलचा साथीदार युसुफ आदिल डोळे फाडून डेव्हिड कडे बघत होता. सुलेमानच्या डोळ्यांत देखील भय दाटून आले होते. आता पर्यंत त्याने वॉरहेड आणि त्यांच्या कारनाम्यांबद्दल फक्त ऐकले होते. आज त्याच्या समोर खुद्द वॉरहेडचा मेंबरच बसलेला होता. डेव्हिडने एक हसरा कटाक्ष युसुफकडे टाकला आणि अकिलचा एक हात स्वतःच्या मांडीवर ठेवला. खिशातून स्वीसनाईफ काढली. सावकाशपणे उघडून त्यातली पकड असलेला पार्ट काढला.
"अकिल, तेल चोरू नये. बहुधा हे तुला आता चांगलेच कळले असेल. बरोबर ना? "
"महह्मा मह्ह्मा," अकिलची स्थिती फारच केविलवाणी झालेली. अठरावीस वयाचा असेल अकिल. पहिल्यांदा इमारतीमध्ये येताना जेव्हा डेव्हिडला बघितलेला तेव्हा शांत हसमुख, फारच सभ्य वाटणारा मनुष्य अचानक सैतानासारखा हिंस्र होईल असे त्याला स्वप्नात देखील वाटले नसते. त्याच्या डोळ्यांतून अश्रू आणि भीती निरंतर वाहत होते. डेव्हिडच्या चेहरा परत पहिल्यासारखा शांत हसमुख झाला. अकिलचा हात हातात घेऊन पकड त्याच्या करंगळीच्या नखावर पकडली. आणि अचानक एका झटक्यात त्याचे नख करंगळीपासून दूर केले. अकिलची किंकाळी रूम मध्ये घुमली.
"अल्लाआऽऽऽऽ " किंकाळीसरशी युसुफ नखशिखान्त हादरला. लटपटू लागला. डेव्हिडच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब होऊन पुन्हा एकदा सैतानाचा चेहरा अकिलला दिसू लागला. डेव्हिडच्या पायावर डोके ठेवण्याचा प्रयत्न केला पण डेव्हिडने त्याचा हात तसाच पकडून ठेवलेला. आता अनामिकेची पाळी होती.
""अल्लाआऽऽऽऽ... " परत एक किंकाळी रूम मध्ये ऐकू आली. आता सुलेमान अस्वस्थ होऊ लागला. क्रूरपणा त्याने देखील बघितलेला आणि केलेला देखील. पण या क्रूरपणामागेचे कारण काहीच कळेनासे होते. दुसरीकडे युसुफची अवस्था सुलेमानपेक्षाही वाईट होती. भीतीने बोबडी वळली होती आणि अकिलचे बघून स्वतःची मूठ आवळून घट्ट ठेवण्याचा सतत प्रयत्न करत होता. डेव्हिडने आपली नजर युसुफकडे वळवली त्याची अवस्था बघून त्याला हसू आले. अजून एक बोटाचे नख उखडल्यानंतर डेव्हिडने अकिलला दूर लोटले. अकिल हळूहळू वेदनेने बेशुद्ध होऊ लागलेला. डेव्हिडने पाण्याचा जग मागवला आणि त्यात रक्ताळलेली स्विसनाईफ शांतपणे धुऊन स्वच्छ केली. थोडे पाणी अकिलच्या तोंडावर टाकून त्याला शुद्धीवर आणले. खिशातून एक पेनकिलरची गोळी काढून अकिलच्या तोंडात टाकली आणि पाणी पाजले
" मुलांना असल्या कामावर लावू नयेच. साफ़ चुकीचे असते ते," युसुफकडे बघून डेव्हिड सुलेमानशी बोलू लागला.
"पण सर, कळू शकेल झाले काय ते?" सुलेमानने भीतभीतच विचारले.
"अरे! कोवळ्या वयाच्या मुलांना कोणी कामावर लावतात का? मला अजिबात आवडत नाही. पण या लोकांनी खुदा के बंदे देखील धंद्यावर लावले. " अर्धवट शुद्धीत असलेल्या अकिलला उचलून त्याने सोफ्यावर बसवले.
"सांग युसुफ, तेल कुठून चोरणार होतास?" अचानक युसुफकडे बघून डेव्हिड शांतपणे बोलला.
"दाख्ख-अल..." सवयीप्रमाणे सुलेमान ट्रान्सलेट करायला लागला पण डेव्हिडने हाताच्या इशार्‍याने थांबवले. सुलेमानच्या चेहर्‍यावर पुढे काय हा प्रताप करणार आहे असे भीतीदायक प्रश्नचिन्ह उमटले.

:क्रमशः

कोक्पर - ५
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८० सार्जंट? ८० मरीन्स म्हणायच आहे का तुम्हाला? सार्र्जंट हा एक सैन्यातला नॉन कमिशंड ऑफ़िसर चा हुद्दा आहे.

आकाशात ब्लॅकहॉक हेलिकॉप्ट्कर का?

एस आर ७१ ब्लॅकबर्ड हे अतिउंचावरुन टेहळणी करणारे अमेरिकन विमान आहे.

प्रयत्न आवडला.पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर टेहाळणी करण्याकरीता आणि सैन्यांना आवश्यकतेनुसार उतरवण्याकरीता वापरले जाते.
मध्यम उंचीवर उडत असल्यामुळे प्रदेशावर गस्त घालण्याकरीता यांचा वापर इराक सिरिया अफगाणिस्तान इ. ठिकाणी मिशन्स मधे केला आहे.