जाने तु या जाने ना

Submitted by ट्युलिप on 6 July, 2008 - 18:27

जाने तु या जाने ना... आमिर खान प्रॉडक्शन्सचा तिसरा दर्जेदार चित्रपट.
हा चित्रपट का आवडला? पाच मुख्य कारणं आणि इतर अनेक...

१) इम्रान खान आणि जेनेलिआ. मस्ती मधली बोर वाटलेली ती हीच जेनेलिआ का असं वाटाव इतका तिचा सुपर्ब मेकओव्हर अब्बास टायरवालाने केलाय. चांगला डायरेक्टर किती स्पॉन्टेनियस परफॉर्मन्स काढून घेऊ शकतो एखाद्या ऍक्टर कडून ह्याच हे उत्कृष्ट उदाहरण ( बरेचदा डिसीएच मधल्या सोनाली कुल्कर्णीची धाकटी बहिण वाटावी तशी बोलते/हसते. नशिब ड्रेसिंग आणि मेकप सेन्स तिचा नाही घेतलेला) .
इम्रान खान कडे खरंतर तो कां सध्याचा यशस्वी स्टार बनू शकणार नाही ह्याचे सगळे 'गुण' आहेत. म्हणजे त्याच्याकडे आजकालची मस्ट असणारी (इरिटेटींग)'ओव्हर पॅक्ड' बॉडी नाही. लुक्स जरासे फट्टू वाटणारे आहेत. तो बर्‍यापैकी शाय वाटणारी सटल बॉडी लॅन्ग्वेज डिस्प्ले करतो. आणि हे सगळं असं असूनही झकास पर्फॉर्मन्स देऊन आमिर खान चा भाचा असण्याची लाज राखतो.

२) रेहमानचं संगीत. मला वाटतं रंग दे नंतर पहिल्यांदाच रेहमान ने 'तरुण' संगित दिलय. पप्पू डॅन्स पे तो हम फिदा. कभी कभी अदिती.. आणि दुसरं एक स्लो ट्यून वरचं गाणं आहे रशिदचं ते ही क्यूट आणि सुरेख (क्रमाने). (जब वी मेट मधल्या आओगे जब तुम साजना.. वालाच हा रशिद खान आहे कां?)

३) अब्बास टायरवाला. ह्याचे संवाद कायमच ब्रिलियन्ट होते. ह्यातलेही आहेतच अर्थात (अदिती: आंटी कॉलेजके पांच साल कैसे गुजरे पताही नही चला... रत्ना पाठकः फोनपे बेटा. हा तर केक घेऊन जातो.) आणि जोडीला डायरेक्शन पण झक्कास. खूप फ्रेश स्टाईल आहे टेकिंगची.

४) सपोर्टींग कास्ट विशेषतः आदिती आणि जय सोबत त्यांचा सगळाच ग्रूप मस्त डीफाईन झालाय. सगळ्यांचीच कामं सुरेख.
ह्या फिल्ममधलं एक अजून छान वाटणारं म्हणजे ह्यातले सगळे 'आई वडिल' चक्क तेच तेच घसीटलेले चेहरे असलेले नाहीत त्यामुळे खूप नॉर्मल आणि ताजेतवाने वाटतात. रत्ना पाठक म्हणजे जय ची आई आणि नासीरुद्दीन शाह म्हणजे जयचे फोटोतले ' प्राऊड राठोड' वडिल तर कमाल (अर्थात ते अपेक्षितच आहे म्हणा ह्या दोन 'अतीगुणवान' कलावंतांकडून). बाकी रजत कपूर्-किटू गिडवानी आणि जयंत कृपलानी-अनुराधा पटेल ह्या आइ वडिलांच्या जोड्या सुद्धा छानच वाटतात बघायला. ते नेहमीचे अनुपम खेर, किरण खेर, रिमा लागू तत्सम आईबाप नाहीत हे अगदी बरं.

५) सरप्राईज पॅकेज मला अत्यंत आवडलेलं म्हणजे प्रतिक ( आय हेट टु कॉल हिम बब्बर). सेम स्मिता सारखीच सुरुवातीला जराशी ऑकवर्ड वाटणारी पण नंतर समोरच्याकडे लक्षही जाऊ न देणारी कमालिची सहज आणि इंटेन्स स्टाईल आहे पोराकडे. रोल खूपच छोटा आहे अजून सरावलेला लूक नाही पण दोन एक्सेप्रेशन्समधेच स्मिता दिसून जाते. त्याच्या वेगळ्याच लूकला साजेसे रोल मिळाले ह्या ईडस्ट्रीत तर सोनं करील हा मुलगा आणि नाही मिळाले तर गुणांची माती होईल कारण त्या टिपिकल साईडी रोल्समधे अडकून जाईल अशी भिती.

फ्लोरा फाऊंटन, एशियाटीक लायब्ररी आणि अपना झेवियर्स कॉलेजचं मन लुभावून टाकणारं दर्शन खूप खूप वर्षांनी झालंय जाने तु.. मधे हे अजून एक कारण बायदवे.

सेकंड हाफ अजून चांगला व्हायला हवा होता. एस्पे. लास्ट टेन मिनिट्स.

जाने तु... इज सुपरकुल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

tulipला अनुमोदन.
'जाने तू' एकदम मस्त.
'मकबूल', 'सलाम नमस्ते', 'मुन्नाभाई', 'मै हू ना' लिहिणार्‍या अब्बास टायरवालाचे मिंट फ्रेश संवाद, छान गाणी, आणि बहुतेक सगळ्यांचा छान अभिनय. मुख्य म्हणजे मेलोड्रामा नाही. खरं तर सगळं अगदी प्रेडीक्टेबल. पण 'कुछ कुछ होता है' सारखा चकचकाट नाही, बिनडोक कार्टी नाहीत, 'प्यार, इश्क, मुहब्बत, दोस्ती' या शब्दांचा अतिरेकी वापर करून डोकं उठवणारे संवाद नाहीत, 'इश्क विश्क'चे डेस्पो तरूण नाहीत, किलोभर मेकप थापून लाडंलाडं बोलणार्‍या पंजाबिणी नाहीत, अमिरी-गरीबी नाही. उगीच कॉलेज म्हणून आर्ची कॉमिक्ससारख्या व्यक्तिरेखा नाहीत.
यातील मित्रांना/त्यांच्या पालकांना एकमेकांच्या आर्थिक स्थितीशी घेणंदेणं नाही. इथे स्क्रॅबल खेळला जातो. झेवियर्समधून बरोब्बर ५ वर्षांत ही मुलं बाहेर पडतात. ग्रॅज्युएट झाल्यावर फिल्म मेकिंग आणि मार्केटींगच्या नोकर्‍या शोधतात. 'अमरिकी युनिवर्सिटी' न म्हणता व्यवस्थित NYU म्हणतात. मध्यंतरी महेश कोठारेच्या कुठल्याशा सिनेमात संजय नार्वेकर एक नॅनोटेक्नॉलॉजिस्ट होता, आणि नॅनोतंत्रज्ञानाच्या मदतीने तो लोकांना गायब करणारा एक कोट तयार करतो. 'लव स्टोरी २०५०'मध्येसुद्धा बोमन इराणी एक स्पेस सायंटीस्ट कम नॅनोटेक्नॉलॉजिस्ट दाखवलाय म्हणे..आणि या दोहोंशी संबंध नसणारं टाईम मशीन तो तयार करतो, असं कानावर आलंय. त्यामुळे पडद्यावर असं जरा बर्‍यापैकी खरंखुरं पाहिलं की अंमळ बरं वाटतं.
रत्ना पाठक शहा, अनुराधा पटेल, किटू गिडवानी, जयंत कृपलानी बर्‍याच कालवधीनंतर दर्शन देतात.(पाठक भगिनी, नीना गुप्ता, राधा सेठ, अनुराधा पटेल, किटू गिडवानी, तन्वी आझमी ह्या अस्सल कलावती सिनेमांत वरचेवर का दिसत नाहीत?) रत्ना पाठकची सोशल activist (हा शब्द इथे मराठीत लिहिता येत नाही) आई झकास. मध्येच कुठेतरी माया साराभाई डोकावते. "This is the limit" म्हटल्यावर पुढ्यात मोनिषा/इंद्रवदन असल्याचा भास होतो. पण ते तेवढ्यापुरतंच. तिच्या चेहेर्‍यावरच्या झरझर बदलणार्‍या एक्स्प्रेशन्स मस्तच.
तिचा फोटोतला डान्सिंग राजपूत नवरा म्हणून नासीर अफलातून. एक उत्तम विनोदी नट असल्याचं तो परत एकदा सिद्ध करतो.
तसंच परेश रावळचा इन्स्पेक्टर वाघमारे. रत्ना पाठक धाडकन दार ढकलून त्याच्या केबिनमध्ये आल्यावर, हात जोडून उठत म्हटलेलं 'माते' (गडावरील नव्हे) सहीच.
यातल्या सगळ्या व्यक्तिरेखा बर्‍यापैकी हाडामांसाच्या वाटतात. गुज्जु जिगी, त्याने डेटसाठी एअरपोर्टवर आणलेली एअरहोस्टेस मैत्रीण, त्यांचे इतर मित्र हे सगळे खरे वाटतात.
'कभी कभी अदिती' आणि 'पप्पू' या गाण्यांत येणारे आमिर खानचे संदर्भ , आणि शेवटी Mr. Godotची एअरपोर्टवर वाट पाहणारा म्हातारा धमाल. 'आपण नक्की कोणाची वाट बघतोय हे माहिती नसूनही आपण कोणासाठीतरी थांबलेलो असतो', ह्या सॅम्युअल बेकेटच्या 'waiting for godot' मधील सूत्राचा इथे मस्त उपयोग केलाय.
क्लोजअप्सचासुद्धा असाच छान वापर केलाय. किटू गिडवानी, प्रतिक बब्बरचे अस्थिर डोळे बरंच काही सांगून जातात.
मध्यंतरानंतर सिनेमा जरा लांबतो. जेनेलियाचं हिंदी भयंकर. जय आणि अदितीचं मतपरिवर्तन जरा फास्टच होतं. आणि त्याची कारणंही अजिबात पटत नाहीत.
पण एकंदरीत डोक्याला ताप न देणारा एक साधा, चांगला चित्रपट.
चित्रपट संपल्यावर खरोखर लक्षात राहतो तो किटू गिडवानीचा संयत मुद्राभिनय.. आणि रत्ना पाठक शहा ही अफलातून अभिनेत्री. तसंच इम्रान खानचा चित्रपट असूनही प्रतिक बब्बर.. छोटीशी भूमिका पण इतकं अप्रतिम काम केलंय.
आज सकाळी ईस्क्वेअरला माझ्या शेजारी एक आजी बसल्या होत्या. प्रतिक पडद्यावर आला, आणि या रडायलाच लागल्या. स्मिता पाटील ही त्यांची अतिशय आवडती अभिनेत्री. प्रतिक या चित्रपटात आहे म्हणून मुद्दाम त्या आल्या होत्या. आपल्या सगळ्यांत आवडत्या अभिनेत्रीच्या मुलाला पहायला त्या २० वर्षांनी थिएटरची पायरी चढल्या होत्या..
आज अमिताभने त्याच्या ब्लॉगमध्ये प्रतिकच्या कामाचं कौतुक केलंय. आणि स्मिताबद्दल तो लिहितो, ''Smita was a soft gentle and delicate human, full of compassion for others. Her death came suddenly and too too early. We needed her to be with us much longer. On seeing Prateik on screen tonight, everything came back... except Smita".

जाने तु या जाने ना चे वैषिष्ट्य म्हणजे हा चित्रपट प्रेम म्हणजे नक्की काय हे शोधायचा आणि दाखवायचा प्रयत्न करत नाही. चोप्रा जोहर पॉइंटटू बी नोटेड.
इम्रान खान जेनेलिआ चांगले काम करतात. पण डोक्यात भरतो तो प्रतिक. त्याचे "कलावंत" वाटणारे डोळे. माण्साची बरोबर पारख. आणि सहज सुंदर येणारे संवाद.. पोरगा अभिनय करतोय असं वाटतच नाही.. नशीब आईवर गेलाय!!!

संवाद मात्र जबरदस्त आहेत.
"ओह नो, बार बज गय.." "क्यु तू सिंड्रेला है का?""
किंवा "ऑफ कोर्स आय हेट हिम.." सारखे डायलॉग खरंच खूप मजा आणतात.
बाय द वे, एअरपोर्टवर वाट बघत असताना मित्र मैत्रीण कुणालातरी हनीमूनला गेलेल्या कपलची स्टोरी सांगत असतात असा एक पिक्चर मी पाहिलाय. नाव आठवत नाही. असाच ऑफ बीट पिक्चर होता बहुतेक. Happy

जेनेलिआ आणि तिच्या ग्रूपचा फॅशन सेन्स बराच चांगला आहे Happy हेअरस्टाईल पण टिपिकल झेविअर्स. पप्पू डान्स अपन का फेवरेट हो गया.

फक्त त्या प्रतिकला आता चांगले रोल मिळायला हवेत.

--------------
नंदिनी
--------------

अभिनय करतोय असं वाटतच नाही.. नशीब आईवर गेलाय!!!
राज बब्बरही चांगलाच अभिनेता होता/आहे. त्यामुळे बापावर गेला तरी फार बिघडत नाही. पण मराठी मनामध्ये स्मितामुळे राज बब्बरबद्दल एक प्रकारची अढी आहे...

अरे देवा. ट्यू, आपला इतका टोकाचा मतभेद झालेला हा दुसरा सिनेमा. (पहिला जोधा अकबर.)
मला अजिबातच नाही आवडला. फार क्लिशेड, वरवरचा (superficial), ओढून ताणून आणलेल्या व्यक्तीरेखा आणि प्रसंग आणि काही ठिकाणी व्यवस्थित अ. आ. अ. वाटला.
इमरान खान छान आहे हे खरं. ती हिरॉईन मात्र भयंकर annoying आहे. रहमानची गाणी वाया गेली असं वाटलं मला. Sad

सगळ्यांच्या एव्हड्या छान प्रतिक्रिया पाहुन हा सिनेमा बघायला घेतला आणि अपेक्षाभंग झाला.. चित्रपट अ आणि अ कॅटेगरीतला आहे.. म्हणजे बाकीच्या हिंदी पिक्चरमध्ये आणि ह्यात, मला तरी काही फार फरक वाटला नाही.. अतिशय जवळची दोस्ती, मग प्रेम असणे पण त्याचा 'इजहार' न करणे, किंवा ते आहे हे माहिती नसणे इ.इ. अ आ अ मध्येच येते.. कुठलाही 'विनोदी' प्रसंग बघुन हसु येत नाही (तो रत्ना पाठक वाला 'फोन पे बेटा' हा एकमेव बरा डायलॉग).. प्रतिकने असा काय अभिनय केला आहे हे मला अजुनही कळलेले नाही.. जेनेलियाचे आई-बाप आणि त्या इम्रानच्या गर्लफ्रेंडचे आई-बापदेखील अतिशय कृत्रिम..

मला फकस्त शेवटचा वेटिंग फॉर गोदो आवडला..

अरे देवा. ट्यू, आपला इतका टोकाचा मतभेद झालेला हा दुसरा सिनेमा. (पहिला जोधा अकबर.)
>>> ट्युलिप, हल्ली ईतर लोकांना विशेष न आवडणारे चित्रपट तुला मात्र खूsssप आवडतात ह्याचं काही 'वेगळंच' कारण असू शकेल का, one might wonder .. :p

अहा.. स्वाती. अगं किती एक्स्पेक्ट करतेयस मुली ( उस दिन काकू म्हणाल्याबद्दल पार्ल्यातल्या सगळ्याच इथे खुन्नस काढायला येतील आता ह्या शंकेने घाबरुन हे संबोधन :फिदी:) अ.आ.अ. वाटला म्हणजे? तो तसा नसणं म्हणजे हिंदी फिल्म्समधला युएसपीच हिरावून घेत्येस की तु Proud तो सगळा सेकंड हाफमधला सोहेल/अरबाझ्/घोडा/राठोड ट्रॅक जरासा काय संपूर्णच अ.आ.अ. आहे.
जास्त किस न काढता बघावेत रे असे चित्रपट. फार वयं वाढलेली आहेत का तुमची Proud
इतर लोकांना विशेष न आवडणारे चित्रपट 'हल्ली' आवडायला लागले आहेत? हेहे सशल थिन्क अगेन. मला तर वरची मुख्य पाच कारणं सोड. नुसतं फ्लो.फा./अशियाटिक्/झेवियर्स त्या रात्रीच्या शॉट्स मधे सॉलिड रोमॅन्टिक दिसलं आणि नॉस्टेल्जियाचा ऍटॅक आला इतकं चिल्लर कारणही पुरलं असतं चित्रपट 'चिक्कार' आवडला लिहायला Proud
तरी आता शम्मीवर (त्यात त्या असंख्य नासिर हुसेनी (*अहाहा..*) पिच्चरचे संदर्भ साहजिकच ) एक नुकतच लिहून झालेलं ब्लॉगपोस्ट टाकतेय. ते वाचून तर ही सगळी गं.आ.मॅ. पब्लिक स्क्रीनमधे घुसून मारतील मला Proud

ट्यु, अगदी बरोबर. टाईमपास म्हणून बघण्यालायकच पिक्चर आहे. आणि नव्याने सुरू झालेल्या कॉलेजवासीयासाठी हा पिक्चर म्हणजे एका पिढीसाठी कयामत से कयामत तक किंवा आमच्यासाठी कहो ना प्यार है ला जे स्थान आहे ते स्थान मिळवण्याइतका हा पिक्चर नक्कीच "फ्रेश" आहे....

अरे, टोणग्या नशीब की दिसण्याच्या बाबतीत आईवर गेलाय (आता प्लीज राज बब्बरला हँडसम म्हणू नकोस!!)

तो घोड्याचा ट्रॅक फारच ओढून ताणून आणलेला आहे हे मान्य. पण भर रात्री बारा वाजता मुंबईच्या सुनसान रस्त्यावर घोडा फेकणारा इम्रान खान.. जाम रोमँटिक आयडीया... (मी या सीनला शिटी मारली. )

--------------
नंदिनी
--------------

Tu ला अनुमोदन. मस्त refreshing आहे. अ. आणी अ. असणे नसणे हा मुद्दा अलहिदा. प्रचंड fresh आहे movie. उत्स्फुर्त वाटते overall हाताळणी.

अपुन Cindrell पे फिदा Lol

BTW, जिगीचे gujjU accent खल्लास आहेत. Happy

>>> जब वी मेट मधल्या आओगे जब तुम साजना.. वालाच हा रशिद खान आहे कां?
नाहीईईईई!!!!! भगवंता!!!!
हा राशिद अली. UK चा आहे.
रशीद खान हे थोर शास्त्रीय गायक आहेत.
.
(कुठे फेडशील ही पापं ट्यू!!) Proud

हा नक्की बघणार आहे चित्रपट Happy
इम्रान चा चेहेरा दिल चाहत है मधल्या आमीर ची आठवण करून देतो Happy

हो केदार!
मी पण पाहणार. खूप excited आहे.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

आत्ताच दिल चाहता है मधल्या आमिर ची आठवण? मला वाटले कयामत से.. मधल्या आमिर ची येइल. म्हणजे आमिर पदार्पणानंतर १३ वर्षांनी दिसायचा तसा हा आत्ताच दिसतो?:)

हेअर कट विषयी बोलतीये मी.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

हा राशिद अली. UK चा आहे.
रशीद खान हे थोर शास्त्रीय गायक आहेत. >> असो पण ह्या रशिदने पण ते गाणॅ एकदम जीव तोडून म्हटलेय.

@नंदिनी,
जाए तू या>>> हेलो.. जाने तु ना??
पिक्चर एकदम "यो" आहे! जुन्याच वाटा मळलेल्या पण फास्ट! (निदान मध्यंतरा पर्यंत तरी) ग्रेट संवाद, अप्रतिम गाणी, आता रेहमान आहे म्हटल्यावर ते तर आलच! Kabhi Kabhi Aditi, Pappu Cant Dance, ही गाणी सहज तोंडावर रूळणारी आहेत पण Jaane Tu Mera Kya, Nazerin Milana, Tu Bole Mein Boloon, Kahin To ही ही गाणी ऑफबीट वाटतात.

दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"

मलाही आवडला.. मस्तच आहे.. जुनी स्टोरी वगैरे असली आणि थोडा अ.अ. असला तरी आवडला.. एकदम फ्रेश! म्हणजे अगदी, कॉलेजला जाऊन आल्यासारखं फ्रेश वाटलं!!

मलाही आवडला... आणि भरपुर हसु ही आलं मधुन मधुन..........संवाद खरोखरच अगदी चुरचूरीत आहेत..
फ्लॅशबॅकने गोष्ट सांगायची ह्यांची पद्धत नविन वाटली...

काही गोष्टी नाही आवडल्या अ आ अ वाटल्या...

पण जाऊदे ना, १२ आणे वसुल झाले, चार आणे वाया गेले..चालायचंच... (१-२-३ पाहायला गेले तेव्हा अख्खे १६ आणे फुकट गेले, त्यापेक्षा हे बरे)

साधना
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

यस्स! जाने तू ... मस्त वाटला मला पण !! अ. आणि अ . गोष्टींकडे लक्ष जाऊ नये इतका फ्रेश, entertaining.
अगदी त्या जिग्नेस, अरबाज, सोहेल, पासून एन्ड च्या गोदो पर्यन्त सगळे मस्त. इम्रान छान आहे. जेनेलिया कित्ती सोनाली कुलकर्णी सारखी वाटते!! दिसायला काही खास नाहीये मात्र.
overall, माझ्या मते must see !!

आवडला ..
.
अ. आणि अ . गोष्टींकडे लक्ष जाऊ नये इतका फ्रेश, entertaining >>> या मताशी पुर्णपणे सहमत ..

फ्लॅशबॅकने गोष्ट सांगायची ह्यांची पद्धत नविन वाटली...
>>>
नाय गं साधना/ असा एक पिक्चर होता. मी कधीचा आठवतेय. Happy
चलते चलते ला पण अशीच थीम होती. पण एअरपोर्टवर बसून स्टोरी सांगणारा ग्रूप.. च्यायला, कही केल्या आठवत नाहिये,
कुणीतरी मदत करा प्लीज.
--------------
नंदिनी
--------------

मला ठीक ठीकच वाटला सिनेमा. जितका हाईप आहे तितका नाही आवडला.
जेनेलीया खूपच सोनाली कुलकर्णीसारखी दिसते नाही? आणि मधूनच सुचित्रा कृष्णमूर्तिसारखीही Happy तिचा आवाज मात्र भयानक आहे. डब का नाही केला? Uhoh
इम्रान मात्र काय गोड आहे! Happy Happy
सर्व पात्र व्यवस्थित उभी केली आहेत हे आवडलं. जे फ्रेममधे आहेत त्या सगळ्यांना प्रॉपर रोल आहे, उगाच फ्रेम भरवण्यासाठी उभं केलं नाहीये हे छान वाटलं.
प्रतिक स्मिता पाटीलसारखा दिसतो, पण त्यातला 'स्पार्क' वगैरे मला नाही बुवा दिसला. किडकिडीत अंगकाठी, वाढलेले केस... अश्यानी फक्त 'कलाकार' रोल मिळायचे..
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

चलते चलते ला पण अशीच थीम होती. पण एअरपोर्टवर बसून स्टोरी सांगणारा ग्रूप.. च्यायला, कही केल्या आठवत नाहिये>>>>>>>
स्टोरी कुठे बसुन सांगितल ते आता नाही आठवत.
पण पुर्ण पिक्चर फ्लॅशबॅक मध्ये नाही. एका पार्टी पर्यंतच तो तसा आहे. (ह्या पार्टीच्या वेळी ते दोघे भांडण करुनच आलेले असतात) अस काहितरी होतं.
बाकीचा पिक्चर मग वर्तमानातच आहे.
अर्थात मलाहि नेमक अस आठवत नाहिये.
त्यावेळी रानी मुखर्जीसाठी शाहरख सहन केला एवढच आठवतय आता. Happy
BTW साथिया ला फ्लॅशबॅकच आहे पुर्ण.
दिल चाहता है ला देखील आहे.

आणि नंदिनी तो विमानतळावरच मला वाटतं कुछ मीठा हो जाये हा असावा.

ठिकाय. बाकी बर्याच पिक्चर्स पेक्षा बराच बरा. त्याच वेळेस एखादा चांगला पिक्चर आला असता तर ह्याची ऐवढी हाईप झाली नसती. एक दोन जोक्स फारच जबरी आहेत. तो पहीला घोड्याच्या तर जबरी. दुसरा हाफ फार जास्त प्रिडीक्टेबल आहे.

प्रतिक मध्ये मलाही स्पार्क दिसला नाही पण माझ्या सौ चे म्हणने की तो दिसला नाही म्हणूनच तर चांगला ऍक्टर आहे कारण त्याला तो रोल सहज जमला.

मस्त फ्रेश सिनेमा...
मला तरी आवडली बुवा ... जेनेलिआ
तिचा आवाज आणि बोलण्याची स्टाइल बरीचशी उर्मिला मातोंडकर सारखी वाटली.
इम्रानही सहज वाटला.
भारतमुव्ही वर आहे हा सिनेमा

झकास, नाही विमान्तळावरचा तो कुछ मीठा हो जाये मी पाहिलाय.. मला आवडला होता तो पिक्चर.
पण तो हा नव्हे!!!
साथिया आणि दिल चाहता है ची फ्लॅशबॅकची पद्धत वेगळी होती.
केदार, प्रतिकला रीअल लाईफमधे पाहिल्यावर अजिबात वाटत नाही की हा असा असेल. खूप बोलका आणि हसरा आहे तो!! (मलाही माहित नव्हतं.. एका मैत्रिणीने सांगितलं. Happy आयला याचं पी आर पिचिंग आम्हीच केले होते. Happy नंतर ते स्पाईसकडे गेलं ते सोडा...
म्हणजे सहज काम करणं तरी त्याला जमतय. उगाच ओढून ताणून "अभिनय" नाहिये. Happy
आणि तसाही तो आता फक्त २१ चा आहे. अजून करीअरला भरपूर वेळ आहे त्याच्या!!!!

संवादामधला आमच्या ऑफिसने उचललेला संवाद.. रोटलू रो मत!!!!

--------------
नंदिनी
--------------

आमिर खान प्रॉडक्शन्सचा एव्हडीच काय ती माहीती या चित्रपटा बद्दल होती. बघयचा बघायचा असे चालले होते. आत मात्र नक्की बघते Happy

हम्म मलाही ठीकठाकच वाटला सिनेमा.. म्हणजे डोक्याला ताप नाहीये पण खूप मस्त वगैरे पण नाही वाटला... ठिकाय टिपी म्हणून एकदा बघायाला...
.
इम्रान चांगला आहे.. त्याच्या अभिनयात थोडा थोडा अक्षय खन्नाचा भास झाला तर ती जेनेलिआ डोक्यात गेली...
.

बहुतेक हा सिनेमाचे वयाबरोबर व्यस्त समिकरण असावे म्हणजे जितके तुमचे वय जास्त तितका कमी आवडतो हा सिनेमा Proud
.
स्वाती वाचते आहेस ना? Happy ~d

    ================
    नव्यानव्या दागदागिन्यांची ददात नाही तुला तरी
    कशास देहावरी जुने चांदणे मिरवतेस ... सांग ना!

      सुखात आहेस ऐकतो...

        -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

        अरे, टोणग्या नशीब की दिसण्याच्या बाबतीत आईवर गेलाय (आता प्लीज राज बब्बरला हँडसम म्हणू नकोस!!)

        >>>>>>>>>>>

        मी राज बब्बरला हॅन्ड्सम म्हटलेले नाही. चांगला अभिनेता म्हटले आहे. राज बब्बर चांगला अभिनेता आहे हे आंधळ्या नसणार्‍या कोणालाही मान्य व्हावं!

        -----------------------------------हितगुज दॅट इ़़ज....
        पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
        गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

        Pages