Submitted by pulasti on 18 June, 2008 - 14:50
काल मी नव्हतो असा मग आज का?
चार पैशांनी चढावा माज का?
शब्द असतातच दिखाऊ, नाटकी
अर्थही झालेत टाळीबाज का?
बातम्यांमध्ये कुठे नाहीच मी
वाचताना वाटते मग लाज का?
पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?
दूर व्हावे अन दिसावी संगती -
रे मना, तू ईश्वरी कोलाज का?
प्राण जोवर, कर्ज उरते तोवरी
कोठवर नुसतेच फेडू व्याज? का?
आग, पडझड, धूळ, भीती, आसवे...
आजही कानात ते आवाज का?
गुलमोहर:
शेअर करा
शब्द
शब्द असतातच दिखाऊ, नाटकी
अर्थही झालेत टाळीबाज का?
.
बातम्यांमध्ये कुठे नाहीच मी
वाचताना वाटते मग लाज का?
.
मस्त!
दूर व्हावे
दूर व्हावे अन दिसावी संगती -
रे मना, तू ईश्वरी कोलाज का?
अर्थ ठीकाय पण....
बाकी सर्व शेरांना टाळी!
दूर व्हावे
दूर व्हावे अन दिसावी संगती -
रे मना, तू ईश्वरी कोलाज का?
>>>>
लय भारी!! आजपर्यंत मनाबद्दल खूप वाचले... पण ही कल्पना पहिल्यांदाच! टाळी!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...
व, मस्तच,
व, मस्तच, सगळेच शेर छान आहेत.
बातम्यांम
बातम्यांमध्ये कुठे नाहीच मी
वाचताना वाटते मग लाज का?
खास!
कोलाज म्हणजे काय?
शब्द,
शब्द, बातम्या आणि कोलाज खास आवडले.
***
The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.
वा
वा पुलस्ती!!!
खणखणीत गझल...
सर्वच शेर आवडले त्यातही मतला, टाळीबाज, कोलाज आणि अंदाज सहीच
शेवटच्या शेरात सानि मिसर्यात 'आवाज' असल्याने उला मिसर्यात 'आसवे' च्या ऐवजी हुंदके जास्ती योग्य ठरेल का?
किंवा सानि मिसर्यात 'आवाज' असल्याने उला मध्ये 'किंकाळ्या' हवा होता असे वाटले..
आग, पडझड, धूळ, किंकाळ्या, भिती... ??? असे काहीसे?
पण हे माझे वैयक्तीक मत झाले..
चु.भु.द्या.घ्या.
================
मी मुकाट्यानेच सारे सोसतो पण-
हुंदके गातात गाणे जीवघेणे
वा! मस्त
वा! मस्त गझल पुलस्ति! 'टाळीबाज', 'कोलाज', 'अंदाज' सर्वात आवडले.
----------------------

The cheapest face-lift is a SMILE
शब्द
शब्द असतातच दिखाऊ, नाटकी
अर्थही झालेत टाळीबाज का?
आणी
पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?
वा पुलस्ती!
खुप छान!!
स्वाती -
स्वाती - बर्याच दिवसांनी!!
मिल्या, "किंकाळ्या" रुचत नाहिये पण "हुंदके" बद्दल विचार करतो. तू म्हणतोयस तसा तो जास्त समर्पक होऊ शकेल. धन्यवाद!
चिन्नु - "कोलाज" बद्दलही विचार करतोय. जरा कृत्रिम वाटतोय का तो शेर?
सर्वाना प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
माणिक, कोला
माणिक,
कोलाज बद्दल सविस्तर इथे वाच - http://en.wikipedia.org/wiki/Collage
इथे मायबोलीवर नुकतीच श्यामलीची "कोलाज" ही कविता आलीय. इथे वाच - www.maayboli.com/node/2276
श्यामलीने "अस्तित्वाला" कोलाज म्हटलं आहे; या शेरात "मनाला" कोलाज ची उपमा आहे. पण बहुतेक श्यामलीची कविता वाचल्यानंतर "कोलाज" हा शब्द कुठेतरी डोक्यात रेंगाळत राहिला माझ्या आणि मग ही गझल लिहिताना जमीन तीच असल्यामुळे हा शेर आला.
पुलस्तिजी,
पुलस्तिजी,
कोलाजला 'ईश्वरी' स्पर्श झाल्यावर आम्ही पामरांनी काय बोलावे. उपमा आणि शब्द छानच. पण शेर मात्र थोडा ओढल्यासारखा वाटला.
उदा. काल मी नव्हतो असा मग आज का?
चार पैशांनी चढावा माज का?
शब्द असतातच दिखाऊ, नाटकी
अर्थही झालेत टाळीबाज का?
बातम्यांमध्ये कुठे नाहीच मी
वाचताना वाटते मग लाज का?
पावसांचा, वादळांचा लागतो
माणसांचा लागतो अंदाज का?
वरील चारही शेर सहज सुंदर आलेत. नंतरचे इतके सोपे वाटले नाहीत. चु.भू. मापी!
Good one !!! कोठवर
Good one !!!
कोठवर फेडू ... जरा खटकला. सहज वाटला नाही.
परागकण
धन्यवाद
धन्यवाद पुलस्ति!! अर्थ कळला कोलाज चा.
ह्य गझलेत
ह्य गझलेत थोडी ओढाताण जाणावते आहे, पहिले चारे शेर मात्र मस्त सहज सुंदर आहेत..
सगळेच छान
सगळेच छान आहे!
नरेन्द्र
सगळेच शेर
सगळेच शेर सुंदर. त्यातही, टालीबाज, लाज आणि कोलाज.... आरपार आहेत, पुलस्ती!