लो कार्ब हाय फॅट (LCHF) डायट: Intensive dietary management

Submitted by नलिनी on 7 January, 2016 - 04:21

हल्ली बर्‍याचदा ह्या डायट प्रकाराबद्दल वाचनात येते आहे.
३१ तारखेला एका मित्राकडून कळाले की त्याला ८ वर्ष डायबेटीस- प्रकार २ होता. काही कालावधीच्या ह्या डायट नंतर आता त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कोणत्याही औषधांशिवाय नॉर्मल रेंज मधे असते.

आणखी माहिती शोधायला सुरवात केल्यावर वाचनात आले की intensive dietary management ( https://youtu.be/mAwgdX5VxGc ) पद्धतीने Dr. Jason Fung's बर्‍याच डायबेटीक (प्रकार २), ओबेस रुग्णांना , बरे करत आहेत. ह्याचा फायदा फॅटी लिवर, पी सी ओ सी, कोलेस्ट्रोल नियंत्रण, रक्तदाब नियंत्रण, थायरॉईड तसेच इतर आजार प्रकार होतो असे म्हणतात.

हा धागा काढण्याचे कारण असे की मायबोलीवर जर कोणाला ह्याबद्दल अधिक माहीती असल्यास, ह्याचा कोणाला फायदा झाला असल्यास ह्यावर चर्चा करता यावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>प्रफुल्ल, तुम्ही धान्यांतून मिळणारी कर्बोदके कमी केली आहेत ( त्याऐवजी फळे-भाज्यांतून मिळणारी कर्बोदके खाऊन लो कार्ब डाएट साध्य करत आहात ) पण तुमचा आहार हाय फॅट अजिबात वाटला नाही.>> +१

लो कार्ब हाय फॅट म्हटले तरी यात फॅट प्रमाणात घेणेच अपेक्षित आहे. फक्त बटर, क्रिम वगैरे पदार्थ लो फॅट म्हटले की अजिबात बंद तसे नसते. सर्वसाधारण नॉर्थ अमेरीकन आहारात लो फॅट नावाखाली जे काही तयार स्वरुपात उपलब्ध असते त्यात लो फॅट मुळे येणारी चवीची कमतरता बर्‍याचदा अतिरिक्त साखर आणि मीठाने भरुन काढली जाते. साहाजिकच लो फॅट म्हणजे हाय शुगर हाय सोडीयम असे घडते. इथे लो फॅट दही देखील भरपूर साखर आणि आर्टिफिशियल फ्लेवर आणि रंगवाले खाल्ले जाते . एकदा लो कार्ब म्हटले की आपोआप बहूतेक प्रोसेस फूड बाद होते, त्याबरोबर अतिरिक्त साखर, मीठ, मार्जरिन सारख्या स्वरुपातली फॅट हे ही जाते. बीयर पिता येत नाही. सर्व प्रकारचे मीट चालते . हाय फॅट चालेल म्हणून शेल फिश आणि बांगडा, सामन सारखे फॅटी फीश खायला परवानगी असते. पण हे हाय प्रोटिन डायट नाही त्यामुळे मीट आणि फिश प्रमाणातच. तसेच बदाम, अक्रोड, काजू वगैरे खाता येतात. अवाकाडो चालते.
काही प्रमाणात रुट वेजिटेबल्स आणि भरपूर भाज्या खाणे अपेक्षित आहे. फ्रेंच फ्राइज म्हणजे वेजिटेबल समजणार्‍या मंडळींच्या आहारात यामुळे भाज्या समाविष्ट होतात. फ्रोजन योगर्ट, लो फॅट आइसक्रिम यासारख्या फसव्या लोफॅट ऐवजी ऐवजी फळं , शक्यतो बेरीज डेझर्ट म्हणून. कढधान्यात कार्ब्ज असल्याने कढधान्य नको असे असते. ही मंडळी मुळातच फारसे कढधान्य खात नाहीत त्यामुळे त्यांना काही फारसा फरक पडत नाही.

मी फॅट साठी नट्स , टोफू, सॉमन फिश, किंग फिश, अ‍ॅवाकाडो , अंडी, ऑलिव्ह ऑईल , मिक्स सीड्स् आणि खुप डाळी खातोय (स्टीम्ड) जसे की उसळ, मुग ई.

औरंगजेब फॉर्मुला वापरायचा विचार सुरु आहे.

१ वेळ जेवणे
३ मैल चालणे
५ वेळा अल्ला म्हणणे
७ वेळा पाणी पिणे

९० वर्षे जगणे.

पण धाडस होत नाही आहे.

पहिले अवघड आहे... बाकी चार सुरू आहेत.

Proud

मी १ वेळ जेवणे चार दिवस केले.

पण पुढे त्या फॉर्मुल्यात ११ आकडाही येईल या भितीने बंद केले.

( ११ दिवसातून संडासला जाणे . )

Proud

मीही असेच काहीसे आहाराचे रूटीन ठरवत आहे. (पूर्वी जमवले आहे त्यामुळे ह्याचे फायदे ठाऊक आहेत. इंचेस झपाट्याने कमी होतात व त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे खूप टवटवीत वाटते. मला तर मोठा बोलभरून सॅलड खाताना इतकं समाधान वाटते. जवळच्या एका मधुमेही व्यक्तीने अशा लाइफस्टाईलने डॉ.च्या मदतीने गोळी न घेता शुगर अत्यंत व्यवस्थित कंट्रोल केली आहे. सर्व पॅरॅमीटर्स रेंजमध्ये येतात अक्षरशः..) आहाराचा मुख्य भर सॅलड/कच्च्य भाज्या/ स्टीम्ड भाज्या/ सुप्स. गम्मत म्हणजे हे हवे तितके खा काहीच अपायकारक नाही. अर्थात ड्रेसिंग घेत असाल तर ते हवे तितके नाही चालणार. फॅट ह्या प्रकाराबद्दल उगीच खूप भिती असते ते चूक आहे. अर्थात फॅट म्हणजे थोडे दाणे/बदाम/काजू/अव्होकॅडो इत्यादी. तसेच तेलापेक्षा कमी प्रमाणात तूप/ बटर चांगले. फॅट आहारात का असले पाहीजेत वर मी वाचले होते की आपला ब्रेन मुख्यत्वेकरून फॅटपासून बनला आहे व त्याला फॅट्समधील न्युट्रीअंट्सची जरूरी असते. त्याच बरोबर सॅटिइटी फॅक्टर. फॅट्स आहारात असले की खाल्ल्याचे समाधान मिळते व क्रेव्हिंग्ज कमी होतात. अर्थात इथे 'पोर्शन कंट्रोल' हा खूप महत्वाचा शब्द आहे.
मी ह्यवर बरेच वाचले आहे. व माझेही मत असेच बनले आहे की लो कार्ब्स ओके फॅट हेच खरे. अर्थात मला पोळी ब्रेड बंद करणे जमू शकते त्यामुळे हे डाएट मला आवडते. तुम्ही जे काही खाल त्याचा कॅलरी/ न्युट्रीअंट्स रेशो बघा. एम्प्टी कॅलरीज वाईट. वगैरे.

पोळी, भात कमी खायचे असेल तर कमी मसाले घालून केलेल्या भाज्या खा. भाज्यांची चव मस्त लागते. मला तर तसेच आवडते. Happy

पंधरा दिवस जरी हे डाएट कडक पणे पाळलं तर आपल्या वेट लॉस ला प्रचंड जंप स्टार्ट मिळतो
>>

हे शरीरातून गेलेलं पाणी तर नव्हे? जंपस्टार्ट शब्दाची भीती वाटते डायेटींगमध्ये म्हणून विचारलं.

व्यायाम करत नसाल तर प्रोटीन जास्त जाऊन काहीही फायदा नाही, कारण स्नायूंची अतिरिक्त झीजच होणार नसेल तर ते प्रोटीन शेवटी न वापरता कदाचित फॅटमध्ये जातात का?

बाकी, प्री-डायबेटीक ऑर ओव्हरवेट असलेली मंडळी, सिरीयसली स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करा आणि कार्डीओवर पळाच.

योग्य डाएटला व्यायाम योग्य पाहिजेच.

भाकरी पोळीऐवजी चालणार नाही कारण ज्वारी, बाजरी म्हणजे सुद्धा कार्बच आहेत.>>>> नलिनी, पण ज्वारीत कमी कॅलरीज आहेत. खरच माझ्या मुलीच्या शाळेतल्या मुलान्च्या आया सडसडीत आहेत.( नोकरी न करणार्‍या) नोकरी करणारे दररोज भाकरी कशी नेऊ शकतील? कारण तेल नसल्याने भाकरी कोरडी असते. दुसरे असे की या बायान्च्या घरी नवरे-मुले सकाळी नसल्याने त्या भात रात्रीच खातात ( हे योग्य आहे का?) आणी दुपारी परतलेल्या पाले-फळ भाज्या, उसळी आणी भाकरी. गोड कमी. तेल थोडे जास्त, पण तुप कमी.

इतके सगळे नियम रोज रोज पाळणे जरा अवघड वाटते एकतर वेळेची कमतरात. शहरात तर चांगल्या भाज्या मिळत सुद्धा नाही.

माझ्यामते वरण भात भाजी पोळी कोशिंबीर पण अत्यंत सात्विकरित्या बनवलेली शरिर चांगले ठेवायला पुरेसी आहे. ह्या खेरीज चांगल्या सवयी म्हणजे व्यसन नसणे, जंक/शिळे फसफसले अन्न न खाणे, खूप दमवणूक होऊ न देणे, योग्य वेळी उठणे झोपणे आराम करणे, आणि सर्वात म्हत्त्वाचा म्हणजे कुठलाही व्यायाम - ह्यात प्रभातफेरी, संध्याभ्रमण, योगा, धावणे, जीम, पोहणे, घरची कामे करणे, सायकल धोपटणे, पायी चालणे असे अनेक प्रकार मोडतात.

पाच रंगाच्या पाच भाज्या आणि पाच रंगाची फळे हे सगळे दैनदिनीत बसवणे इतके सोपे नाही. ह्यासाठी तुम्हाला एक केअरटेकरच असावा असावी लागते. प्रफुल्ल तुम्ही फार लकी आहात तुमच्या सौ तुमचे इतके सगळे करतात.

अय्यो! अहो मग खायचे काय?:अओ: धान्य नको, तेल-तुप नको, गोड नको!

माझ्या साबान्चे डायबेटीक तज्ञ सान्गतात भाकरी खा. भात अती खाऊ नका. सॅलेडस खा. साखर एकदम कमी करु नका, पण दुधा-तुपाचे व तळकट पदार्थ, मिठाया पण खाऊ नका.

पण हे संतुलित आहारच्या विरोधी नाही का? दररोज फक्त सॅलड खाऊन काही अपाय होणार (भाज्यावरची किटकनाशके, कृमी किटके, अतिरिक्त क्षार ) नाही का?

हो मन्जूडी, नाचणीची आणी ज्वारीची दोन्ही सान्गीतलीय. पण ज्वारीची कमीच खा असे सान्गीतलेय.

पण ज्वारीची कमीच खा >> Happy

आहार नियमन करत असाल नाचणी, बाजरी, ज्वारी, मका, तांदूळ असे उतरते प्रेफरन्सेस आहेत भाकरी खाण्याचे.
मी बर्‍याचदा नाचणी+बाजरीची भाकरी आणते डब्यात. कोरडी वगैरे लागत नाही. गरम पाण्यात पीठ भिजवलं की छान होते भाकरी.

एक शंका - मधूमेहावरील वैद्यकीय उपचार हे व्यक्तीसापेक्ष असतील ना? म्हणजे काही गोष्टी समान असतील पण व्यक्तीचे वय, वजन, दिनचर्या वगैरेचा विचार करून डॉक्टर्स आहार व इतर सल्ले देत असतील ना?

मला तरी वाटते की मधूमेहासारख्या रोगावर स्वानुभव सांगणे योग्य ठरेल. सरसकटीकरण करणे अयोग्य ठरेल.

(हा प्रतिसाद कोणालाही एकाला उद्देशून नव्हे)

मला असे वाटते कि , नलिनी यानी सन्गितलेली डाएट ' crash diet' या प्रकारात मोडते. अश्या प्रकारच्या डाएट ने वजन तातपुर्ते कमी होते पण नन्तर वाढ्ते. परत शाकाहारी बरेच ' limitations' येतात. असा अनुभव ' GM diet' चा पण आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा.

मला वाटतं नलिनीने कोणतेही डाएट सांगितलेले नाही.
तिने या डाएटकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि कोणाला अधिक माहिती/ अनुभव आहे का अशी विचारणा केली आहे.

अश्विनी दिक्षित हे क्रॅश डाएट नाही. मात्र खूप अवघड डाएट असल्याने ते कन्सिस्टन्सीने पाळण्याचा प्लॅन मात्र क्रॅश होतो. एम्प्टी कॅलरीज टाळणे, कार्ब्स कमी करणे हे सोपे नसते.

हे 'Crash Diet' नसेल. पण,शाकाहारी लोक काय खाउ शकतात? आणी हे डाएट थाम्बवल्यावर वजनमध्ये परत वाड होते का?

डायट करणारे लोक अगदी कुपोषितासारखे दिसतात आणि लवकर म्हातारे होतात Happy त्यापेक्षा आठ्वड्यातून एकदा उपवास करुन राहणारे लोक फार छान वाटतात.

डायबेटीस म्हटल्यावर जीआय चा विचार प्रथम येतो.

मैदा, पांढरा भात , पांढरी साखर , इत्यादि ची जीआय जास्त असल्याने ते टाळावे तर wholewheat आटा , रेड राइस , बाजारी इत्यादि ची जीआय कमी असलेने ते खावे असा स्पष्ट सल्ला डॉक्टर नी दिला होता

कोणतीही वस्तु खाण्यापूर्वी तिची जीआय व दैनंदिन एकूण आहारातील त्या वस्तूचे प्रमाण याबद्दल तारतम्य ठेवून जेवण घेणे अपेक्षित ... आजही दिवसभर पोळी न खाता नुसताच भात खाल्ला तर लगेच दुसर्‍या दिवशी शुगर वाढते ..

प्रफुल्ल, स्वाती२, बस्के, प्द्मावति, Mandar Katre, छान माहिती.
मंजूडी, धन्यवाद!
स्वाती२, फॅट्बद्दल माझ्याही मनात शंका होती, त्यासंदर्भात तुमची पोस्ट माहितीपुर्ण आहे. धन्यवाद!
अश्विनि दिक्षित, मी पण बस्केशी सहमत आहे. हा डायट क्रॅश डायट नाही वाटत मला.

लो कार्ब म्हटल्यानंतर ह्यात दिवसाला २० ग्रॅम पेक्षा कमी, २०-५० ग्रॅम , ५० -१०० ग्रॅम असे तीन गट केले जातात. आपले उद्दीष्ट काय आहे ह्यावरून आहारात बदल केले जाऊ शकतात. ३० ग्रॅम शेंगदाणे घेतले तरी त्यात साधारण ३ ग्रॅम कार्ब असते.

गरजेपेक्षा जास्तीचे कार्ब हे भविष्याची तरतूद म्हणून फॅट स्वरूपात साठविले जातात. आपण सातत्याने कार्ब खाऊन आहे त्या चरबीत आणखी भर घालत जातो. LCHF डायट मध्ये आपल्याला ही अतिरीक्त चरबी जाळण्याचे/ वापरण्याचे काम करायचे आहे आणि ह्यासाठी आपल्याला इंधन हवे आहे. एरव्ही आपण कार्ब इंधन म्हणून वापरतो, तो पर्याय आता नाही म्हणून फॅट इंधनाचे काम करणार. तसेच बस्के ने म्हटल्याप्रमाणे "आपला ब्रेन मुख्यत्वेकरून फॅटपासून बनला आहे व त्याला फॅट्समधील न्युट्रीअंट्सची जरूरी असते. त्याच बरोबर सॅटिइटी फॅक्टर. फॅट्स आहारात असले की खाल्ल्याचे समाधान मिळते व क्रेव्हिंग्ज कमी होतात. "

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जितके आपले वजन जास्त तितक्या प्रमाणात आपल्याला अधिक इन्सुलिन लागते. तसेच जर आपण अधिक प्रमाणात कार्ब घेतले तर त्याचे विधटन करायालाही अधिक इन्सुलिन आवश्यक असते. म्हणजे तेवढ्या प्रमाणात इन्सुलिन तयार करण्याचे जास्तीचे काम त्या त्या अवयावांना करावे लागते.
ह्या डायट च्या काळात आपण कार्बचं प्रमाण अगदीच कमी केल्याने आता कमीत कमी इन्सुलिन गरज भासणार आणि म्हणून त्याची निर्मीतीही तेवढ्याच प्रमाणात केली जाणार.
Intensive dietary management मध्ये डायट प्लान सोबतच फास्टींग करण्याचा सल्ला दिला जातो. मला वाटते त्या काळात शरीराची झालेली पडझड पाहून त्या प्रमाणे दुरुस्तीचे काम होत असावे. जसे की डायबेटीक रुग्णांच्या बाबतीत वाढलेला इन्सुलिन रेझिस्टंस ह्या डायट आणि फास्टींग दरम्यान कमी केला जातो.

मी लेखासोबत दिलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलेय की इन्सुलिन रेझिस्टंस वाढलाय म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तातील साखर कमी करणासाठी औषधे किंवा इन्सुलिन दिले जाते. ह्याने मुळ आजार बरा होतच नाही. फक्त रक्तातील साखरेचे प्रमाण कमी केले जाते. ह्यात इन्सुलिन रेझिस्टंस आणखी वाढत जातो आणि औषधांची मात्रा वाढवावी लागते.
मी ह्या विषयात तज्ञ नाही. माझे वरील मत हे मी वाचत असलेल्या माहितीच्या आधारावर बनले आहे. माझी मायबोलीवरील सर्व तज्ञ मंडळींना कळकळीची विनंती आहे की आपण ह्या विषयावर अधिक माहिती द्यावी.

एक शंका - मधूमेहावरील वैद्यकीय उपचार हे व्यक्तीसापेक्ष असतील ना>> बेफिकीर, हो!
मधूमेह असणार्‍या व्यक्तींनी जर हा डायट करायचा ठरवला आणि ते जर इन्सुलिन घेत असतील तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरला कल्पना द्यायला हवी. त्यांचा इन्सुलिन डोस रक्तातील साखरेच्या प्रमाणात कमी करावा लागू शकतो. त्यांना साखरेची पातळी सातत्याने तपासाण्याची गरज भासणार.

तसेच इतर आजार प्रकारातील रुग्णांनी ( जसे की बिपी कींवा ज्यांना दररोज औषधे सुरू आहेत) सुद्धा डॉक्टरला कल्पना द्यायला हवी.

माझी पोस्ट जरा विस्कळीत झाली आहे.

Pages