क्या कूल है हम .. मस्ती जादे .. सेन्सॉरचा तमाशा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2016 - 11:38

क्या कूल है हम चित्रपट तुम्ही कोणी पाहिला होता का?
ज्या कोणी चुकून फॅमिलीसोबत पाहिला असेल त्याला नक्की का पाहिला असे झाले असेल?

मग क्या कूल है हम २ आला.
तो पाहिला?
पहिल्याच्या अनुभवावरून मी नाही पाहिला.
पण माझ्या एका मित्राने पाहिला. त्याने एका वाक्यात असे परीक्षण दिले - आपण जे नॉनवेज एसेमेस एकमेकांना फॉर्वर्ड करतो ते पडद्यावर बघायचे असतील तर जा..
अर्थातच मी नाही गेलो.

नुकतेच क्या कूल हम है - ३ चा ट्रेलर यू ट्यूब वर बघायचे नशीबी आले.
चित्रपटाचे वर्णनच ‘सेक्स कॉमेडी’ असे केले होते. वेळ रात्रीची होती. म्हणून ट्रेलर तरी बघूया म्हटले.
तुम्हाला बघायची इच्छा असल्यास इथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=Ma26XplFIEo
आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख टिचक्या त्यावर पडल्यात, चार ईथून पडल्या तर बिघडत नाही.

माझा तो ट्रेलर बघून झाल्यावर मी मनाशीच काहीतरी प्रतिक्रिया देणार ईतक्यातच माझी नजर त्याच्या नेक्स्ट विडीओवर पडली.
मस्तीझादे - स्टारींग वन्स अगेन तुश्शार कपूर. सोबतीला सनी लिओन.
हा देखील इथे आपापल्या रिस्कवर बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=2H44_uMHJLs
हा चित्रपट सेक्स कॉमेडीच्या एक पायरी वर जात ‘पॉर्न कॉमेडी’ म्हणून घोषित केला आहे.

मागेही मी एआयबी रोस्टच्या विरोधात धागा काढला होता. त्यामुळे माझे याबाबतीतले विचार अगदी स्पष्ट आहेत. तेव्हा त्याच्या समर्थनार्थ काही असे युक्तीवाद पुढे आले होते की बंद जागेत शो होतोय. यू ट्यूबवर विडीओ अपलोड होतोय. तर हा ज्याच्या त्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे.

पण चित्रपटांना हा युक्तीवाद लागू होत नाही. ते चित्रपट गृहात झळकतात. त्याच्या सीडी निघतात. नाक्यावर पोस्टर लावले जातात. टीव्हीवर जाहीराती येतात. चर्चा होते. एकंदरीत ते कोणी बघावे, कोणी बघू नये, यावर सहजी निर्बंध लावता येत नाही. म्हणूनच ते बनतानाच निर्बंध लावले जातात. आणि ते निर्बंध लावायला म्हणूनच आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड नामक संस्था आहे. काही चित्रपटांमधील गरमागरम, हिंसात्मक, एखाद्या समूहाच्या भावना भडकावणारे वगैरे द्रुश्ये कापून ते अधूनमधून आपले अस्तित्वही दाखवून देतात, आणि याबद्दल त्यांचे कौतुक आहे.

पण या अश्या चित्रपटांच्या वेळी त्यांचे तर्क आणि नियम नक्की कुठे गंडतात हे जाणून घ्यायला आवडेल.

क्या कूल है हम ३ प्रमाणेच मस्तीझादेच्या ट्रेलर वर सुद्धा एक करोडच्यावर टिचक्या पडल्या आहेत, तर बहुतांश लोकांना हे आवडते असा सोयीनुसार अर्थ जरी यातून काढला तरी सेन्सॉर बोर्ड लोकांच्या आवडीवर नक्कीच चालत नाही.
सनी लिऑन एक पॉर्न स्टार आहे. आम्हाला तिच्या पोटापाण्याच्या व्यवसायाचा आदर आहे. आम्ही तिचे पॉर्न आवडीने बघतो. पण ते रात्रीच्या अंधारात घरी बघतो आणि त्याचे पोस्टर दिवसाढवळ्या भरबाजारात लागू नयेत, त्यावर तरुणांची मुक्तपणे चर्चा होऊ नये, अशी आमची इच्छा असेल तर ती गैर आहे का?

लिहायला बरेच आहे. तुर्तास एवढेच.

तळटीप - इथे त्या चित्रपटाच्या लिंक दिल्या असल्या तरी त्यांची जाहीरात करणे हा हेतू नसून विरोधच करायचा आहे. जर कोणाला इथे प्रतिसाद देण्याआधी हे काय प्रकरण आहे हे बघणे गरजेचे वाटत असेल तर ते असेही गूगाळून शोधणारच. तर त्यांचा त्रास वाचावा म्हणून सोयीसाठी दिल्या आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

hate story 3 chi gaani bindhast lagtaat t.v var.
hallli music channel baghatana konatya moviie trailor laagel yaachi dhakdhuk asate.
nidaan tv var dakhavalyaa jaanaryaa trailor chi vegali catagoery asavi.
navin aalele barechase trailor chaar chaughaat baghatana aapalyaalach kaankond hot.
luvshuda ha pan tasach.

या चित्रपटाला/ना सेन्सॉरने कुठले सर्टिफिकेट दिले ?
>>>
याने काही फरक पडतो? म्हणजे हे चित्रपट ए ग्रेड देऊन सोडून देण्याईतपत आहेत का? ए ग्रेड म्हणजे नुसती खोटी खोटी तंबी दिल्यासारखे आहे.

बाकी ती टीव्हीवर गाणी ट्रेलर मी केव्हाच बघणे सोडून दिलेय. कोण ते हातात सतत रिमोट घेऊन बसणार. कारण गाणी प्रमोशनसाठी आणखीन अश्लील बनवली जातात. आयटम साँगचा अर्थ मला बराच काळ त्यात नाचणार्‍या हिरोईनला आयटम संबोधतात असे वाटायचा.

३० सेकंद ट्रेलर बघितले...अजिबात विश्वास बसत नाहिये की हे सगळे टिव्हीवर दाखवतात... यांना सेन्सोर कडून परवानगी कशी मिळते?

क्या कूल है हम एक पाहिला होता, त्यातले नॉनव्हेज विनोद फॅमिली बरोबर पण बघता येऊ शकले.भाग २ एकदम यक्क वाटला ते आधी बेशुद्ध आणि नंतर शुद्धिवर आलेला माणूस,कुतरे ई..चुकून मेल्स च्या रात्रीच्या ओल्या पार्टीत गेल्यासारखे वाटले.क्या कूल है हम तीन त्याही पेक्षा बेकार आहे ऐकलेय त्यामुळे गेला खड्डयात.

ऋन्मेऽऽष,

वरती तुच एका वाक्यात लिहिले आहे की सेन्सॉरचा तमाशा !
ह्यातच सगळे आले की.

पेहलाज नेहलानी जिंदाबाद.
बहुदा या चित्रपटांमधे "जेम्स बाँड" सारखे "किसिंग सीन्स" नसतील. म्हणून मेहरबानी झालेली दिसते Wink

अर्थात त्या जेम्स बॉन्ड वाल्यांना इथले रेट माहीत नसतील. पेहलाज निजलानीने किंमत चुकवली असेल.

बाकी वॅलेंटाईनला विरोध करणारे संस्कृतीरक्षक आणि खानांच्या चित्रपटाला विरोध करणारे राजकीय संघटना यांनी तरी किमान तुश्शार आणि एकता कपूरच्या घरावर मोर्चा न्यायचा.

खानांच्या चित्रपटाला विरोध करणारे >> गप रे.. खानच्या चित्रपटांमधे एकही किसिंग सिन नसतो. फॅमिली एंटरेर्मेन्त असतात. अश्या चित्रपटांना विरोध होणारच.

ऋन्मेऽऽष | 7 January, 2016 - 10:59 नवीन
अर्थात त्या जेम्स बॉन्ड वाल्यांना इथले रेट माहीत नसतील. पेहलाज निजलानीने किंमत चुकवली असेल.

>>

काही तरी गैरसमज झाला आहे बहुतेक. निहलानी 'क्याकूहैंह-३' चे कुणी नसून सेन्सॉर बोर्डाचे चीफ (का काय तरी) आहेत.

बाकी असल्या भिकार चाळ्यांबाबत सांगायचं, तर हे सगळं स्वस्तातलं असतं. चावट विनोद करणे ही खूप सोपी गोष्ट आहे. अश्लील करणे तर त्याहूनही सोपी. त्यामुळे एकूणच 'विनोद' हा प्रकार सर्वच चित्रपटांत आचरट व चावटच असतो. दर्जेदार विनोद हृषिकेश मुखर्जींसोबत मेला बहुतेक. अर्थात, अधूनमधून काही लोक आशा दाखवतात. मात्र ते सध्या तरी 'अपवादात्मक'च म्हणायला लागतंय. ही गत तर कौटुंबिक, मुख्य धारेतल्या चित्रपटांची आहे. त्यामुळे 'अ‍ॅडल्ट कॉमेडी' म्हटल्यावर तर काय रान मोकळंच !

ह्या दळभद्री लोकांपेक्षा ते रामसे बंधू परवडले. असंही त्यांच्या चित्रपटांना 'वरिष्ठ' प्रमाणपत्र मिळत होतं, तर त्यात भरमसाट चावटपणा व अश्लीलपणाही ते करू शकत होतेच. ('एक खून की सजा फांसी और दो खून की सजा भी 'सिर्फ फांसी' होती हैं', असा एक डायलॉग होता बच्चनचा, 'मजबूर'मध्ये. तसंच.) केला त्यांनी थोडाफार चावटपणा आणि अश्लीलपणा, पण त्यातही कुठे तरी 'जनाची नाही तर मनाची तरी' होतीच. मात्र आता तर कशाचीच राहिलेली नाही. हनी सिंगचे अश्लाघ्य, असभ्य शब्द आज संगीत म्हणून ऐकले जातात आणि अश्या अस्सल हरामखोरासोबत मोठमोठे सुपरस्टार्ससुद्धा निर्लज्जपणे उभे राहतात.

माझा पोरगा माझ्या वयाचा होईपर्यंत त्या काळातले शाहरुख, सलमान, आमीर, अक्षय वगैरे सुपरस्टार्ससुद्धा असले थिल्लर चाळे करायला लागतील, ह्याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

(आनंद होतोय की मी सध्या तरी कुठल्या वर्तमानपत्रासाठी लिहित नाही. मला तो 'हेट स्टोरी -३' नामक सॉफ्ट पॉर्न बळंच पाहायला लागला होता, तसाच हेसुद्धा पाहायला लागले असते कदाचित ! )

काही तरी गैरसमज झाला आहे बहुतेक. निहलानी 'क्याकूहैंह-३' चे कुणी नसून सेन्सॉर बोर्डाचे चीफ (का काय तरी) आहेत.
>>>
रसप ओके. कल्पना नव्हती. तसेही सामान्य लोकांना त्या खुर्चीवर कोण बसलाय, त्याचे निवड कोणत्या निकषांवर होते, त्या बोर्डाचे काय नियम असतात, ईत्यादी ठाऊक नसतेच. मागे एक आशा पारेख होत्या ते तेवढे माहीत आहे. तिथे महिला सदस्याच ठेवणे ऊचित असे वाटते.

बाकी पोस्टशी सहमत!

तरी विनोदाचा घसरलेला दर्जा परवडला. पण तो अश्याप्रकारे कंबरेखाली तरी घसरायला नको.

सनी लिऑन एक पॉर्न स्टार आहे. आम्हाला तिच्या पोटापाण्याच्या व्यवसायाचा आदर आहे. आम्ही तिचे पॉर्न आवडीने बघतो. पण ते रात्रीच्या अंधारात घरी बघतो आणि त्याचे पोस्टर दिवसाढवळ्या भरबाजारात लागू नयेत, त्यावर तरुणांची मुक्तपणे चर्चा होऊ नये, अशी आमची इच्छा असेल तर ती गैर आहे का?

>> गैर नाही पण डबल स्टँडर्ड वाटते. भारतात लैंगिक दृष्ट्या रिप्रेस्ड( चेक डिक्षनरी) लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ज्यांना डिरेक्ट पॉर्न पेक्षा किंवा ते बघण्या आधी असले अर्धवट चेकाळलेले सिनेमे बघायला आवडतात कपिल च्या शोवरचे भिकार विनोदही साधारण अश्याच दर्जाचे अस्तात. एकता हुशार बिझनेस वुमन आहे. व सनी ताई सुद्धा. तर त्यांनी ही गॅप ओळखून त्यात फिट बसणारे असे चित्रपट बनवले आहेत तुशार ला काम नस्तेच त्यामुळे तो काहीही रोल मिळाला तरी करणारच. ह्या परिस्थितीत असे ट्रेलर चित्रपट न बघणे हेच आपण करू शकतो. स्लीझी स्टफ
जगात सर्वत्र राहणारच. न बघायचा चॉइस आपल्या हातात आहे.

एकता हुशार बिझनेस वुमन आहे. व सनी ताई सुद्धा. तर त्यांनी ही गॅप ओळखून त्यात फिट बसणारे असे चित्रपट बनवले आहेत
>>>

हे कौतुक आहे का?
का उपरोधाने म्हटलेय?

एखाद्या ज्युनिअर कॉलेजच्या जवळ चहा टपरीवर सिगारेट विकायला सुरुवात केली तर अमाप धंदा होईल. हळूहळू गिर्हाईक हेरून तिथे चरस गांजा ठेवल्यास त्याचाही खप होईल. कारण या वयातील मुले अश्या व्यसनांच्या आहारी चटकन जातात. मग असा धंदा करणार्‍यांना रोखायचे की त्यांच्या धंद्याच्या दिमागचे कौतुक करायचे. याचप्रकारे एखाद्या दंगल संवेदनशील भागात हत्यारांचा व्यवसाय सुरू केला तर त्यालाही बरकत मिळेल. अशी आणखीही उदाहरणे देता येतील. मुळात प्रश्न हा आहे की हे गैर आहे की नाही? माझ्यामते गैर आहे.

अजून एक म्हणजे,
शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाची गरज आहे की नाही या चर्चेत एक मुद्दा येतो की जर योग्य वयात मुलांना आपण लैंगिक शिक्षण दिले नाही तर त्यांच्यात असलेल्या कुतुहलापोटी ते चुकीच्या मार्गाने ते शिक्षण मिळवतील. माझ्यामते हा देखील त्यातलाच एक चुकीचा मार्ग ठरू शकतो.

चित्रपट हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात..
पण आपला समाज हा खरेच असा आहे का?
माझ्यामते नाही.
पण या चित्रपटांच्या प्रभावाने नक्कीच तसा बनण्याची शक्यता आहे.

पाण्यात उतरायचं पण अंग ओलं झालं नाही पाहीजे...
या कलेतल्या निपुणतेबद्दल कुणाला पुरस्कार द्यावा मायबोलीवर ?

हा धागा कसा का होईना "चालवलास" पण.

jara mhanun navin tailors wagere pahave mhatla tar anapekshit asa kahitari samor yeta.. saglech awkward situation madhe... gharche pan chehryawar mottha <?> gheun pahtat mav aplyakade:अओ:

he asa kahi worldwide public madhe release karna chookach ahe... very wrong!

ट्रेलरच्या सुरु व्हायच्या आधीच कोणत्या क्लासिफिकेशनचा चित्रपट (अ, व ...) आहे हे दाखवायला हवे कंपल्सरी. बर्‍याचशा देशात ही पद्धत आहे.