पर्यटनाचे आगर - "गुहागर"

Submitted by जिप्सी on 3 January, 2016 - 12:57

सर्वप्रथम तमाम मायबोलीकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टीचा फायदा घेत व २०१५ वर्षात कमी ठिकाणी झालेल्या भटकंतीचा बॅकलॉग भरण्यासाठी ४ दिवसांची गुहागर भटकंती करून आलो. मुंबई - पुणे - सातारा - उंब्रज - पाटण - कोयनानगर - कुंभार्ली घाट - चिपळुण - गुहागर - वेळणेश्वर - हेदवी - राई-भातगाव मार्गे गणपतीपुळे - जयगड - तवसाळ - अंजनवेल - गोपाळगड - गुहागर - चिपळुण - कुंभार्ली घाट - पाटण - दातेगड किल्ला - सडा वाघापुर मार्गे सातारा - शेरे लिंब येथील "बारा मोटेची विहिर" - बावधन (वाई) - पुणे - मुंबई असा भरगच्च कार्यक्रम होता. Happy सदर भटकंतीचा हा चित्र वृत्तांत. Happy

प्रचि ०१
हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश
प्रचि ०२
हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ
प्रचि ०३
हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरक्षित आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. ऐन भरतीच्या वेळेस येथे उंच उसळलेली लाट आपले स्वागत करते. डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी आदळून एक अरुंद घळ तयार झाले आहे. हिच ती सुप्रसिद्ध "बामणघळ". येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे जरा जपुनच!

प्रचि ०४
हेदवीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा
प्रचि ०५

प्रचि ०६
उफराटा (उरफाटा) गणपती मंदिर (गुहागर)
प्रचि ०७
खवळलेल्या समुद्राच्या प्रकोपापासुन गुहागरला वाचवण्यासाठी, एका भक्ताच्या हाकेला श्री गणपती धावून आला. पूर्वाभिमुख असलेल्या गजाननाने आपले मुख वळवून सागराकडे म्हणजेच पश्चिमाभिमुख केले. समुद्र शांत झाला व गुहागरचे संरक्षण झाले. दिशा संपूर्ण बदलली (उफराटी) म्हणुन "उफराटा गणपती". (आख्यायिका)
गुहागरचा समुद्रकिनारा
प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
वेळणेश्वर
प्रचि ११
दुर्गादेवी मंदिर
प्रचि १२

प्रचि १३
राई-भातगाव पूल
प्रचि १४
गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव भातगाव व रत्नागिरी तालुक्यातील राई या गावांना जोडणारा पूल. या पुलामुळे गणपतीपुळे, जयगड, या स्थळांना भेट देऊन रत्नागिरीस जाणे सुलभ झाले.

प्रचि १५
जयगडची खाडी
प्रचि १६

प्रचि १७
रोहिले गाव
हेदवीच्या पुढे तवसाळला जाणार्‍या रस्तावर "रोहिले" नावाचे गुहागर तालुक्यातील क्षेत्रफळाने सर्वात छोटे असलेले गाव वसले आहे.
प्रचि १८

प्रचि १९
तवसाळचा समुद्रकिनारा
प्रचि २०
तवसाळ - जयगड फेरी बोट
प्रचि २१
तवसाळहुन अगदी ४०-४५ मिनिटात आपल्या गाडीसहित जयगडला पोहचत येते आणि तेथुन पुढे कर्‍हाटेश्वर, मालगुंड गावांना भेट देत गणपतीपुळ्यास कमी वेळात जाता येते. Happy (राई-भातगावहुन जाकादेवी मार्गे गणपतीपुळे तर तवसाळ-जयगड फेरीबोटीने मालगुंड मार्गे गणपतीपुळे)

प्रचि २२

प्रचि २३
जयगड किल्ल्याचा उपदुर्ग "विजयगड"
प्रचि २४
गोपाळगड
प्रचि २५

प्रचि २६
टाळकेश्वर दीपगृह
गोपाळगडाच्या जवळच दीपगृह आणि टाळकेश्वर मंदिर आहे. येथील कर्मचार्‍यांच्या परवानगीने दीपगृह पाहता येते. संध्याकाळी ५ पर्यंत दीपगृह पाहता येते.
प्रचि २७

प्रचि २८
टाळकेश्वर मंदिर
प्रचि २९
अंजनवेल येथील बहुचर्चित एनरॉन प्रकल्प
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३
आंबेमोहर
प्रचि ३४

प्रचि ३५
बकुळ
प्रचि ३६
अंजनवेल येथील "अंजन वेल" Happy
प्रचि ३७
चांडाळ चौकडी Happy
प्रचि ३८
तळटीपः
१. प्रकाशचित्रे टेक्निकली तितकेसे खास आले नाहीत. Happy
२. वरील काही माहिती "पराग पिंपळे" यांच्या "साद सागराची गुहागर-वेळणेश्वर-हेदवी" या पुस्तकातुन. गुहागर भटकंतीसाठी (रादर को़कण भटकंतीसाठी) अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. Happy

पुढील भागात "गणपतीपुळे परीसर" Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव,, सुपर लाईक.. कोकण ची ओळख होतीये तुझ्या प्रचिंतून..

गुहाघर.. आजोबांच्या तोंडून ऐकलेलेय हे नांव.. म्हणून पाहायची इच्छा आहे

वा.. गुहागरकडून राई भातगाव ब्रिजकडे यायला हेदवी, तवसाळ करत आलात का? तसे असेल तर आमच्या घरावरून आलात. Happy

>>हेदवीला बरेचदा पाण्यातुन हवेत उड्या मारणारे मासे दिसतात ( डॉल्फिन आहेत का ते ? )<<
अहो डाॅल्फिन जाउद्या, यावेळेस माणसांचे हवेत उड्या मारणारे फोटो देखिल नाहि आले... Happy Light 1

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

गुहागरकडून राई भातगाव ब्रिजकडे यायला हेदवी, तवसाळ करत आलात का?>>>>>>>>हो नी, जाताना हेदवी वरूनच राई भातगाव ब्रिजकडे गेलो. Happy
तसे असेल तर आमच्या घरावरून आलात. >>>>>> भातगाव वरून जाताना आठवण आलेलीच Happy

व्याडेश्वरास गेला नाहीत का?>>>>>सनव, व्याडेश्वरास गेलो होतो. मंदिरात फोटो काढण्यास परवानगी नाही. मंदिराचे बाहेरून १-२ फोटो काढले, पण माझ्या कॅमेर्‍यात कि मित्राच्या कॅमेर्‍यात काढले तेच आठवत नाही. माझ्या कॅमेर्‍यात दिसत नाही आहेत फोटो. Sad

अहो डाॅल्फिन जाउद्या, यावेळेस माणसांचे हवेत उड्या मारणारे फोटो देखिल नाहि आले>>>>>>राज, Proud

फोटो सुंदर आहेत सगळेच.

प्रत्यक्षाहुन प्रतिमा खुपच उत्कट होताहेत... बहुतेक आमच्या डोळ्यांचा दोष असावा.. Happy

भारी फोटो नेहमीसारखेच.
पहिल्या परिच्छेदात शेरे-लिंब च्या त्या (फेबु -व्हॉअ‍ॅ) फेमस विहिरी चा उल्लेख आहे. त्यांची वेगळी चित्रमालिका येणार आहे असं गृहित धरलं आहे Wink

छानच फोटो... मी गेल्या भारत भेटीत फक्त आत्याला भेटायला म्हणून दोन तास गुहागरात गेलो होतो पण हे काहीच बघितले नाही. चला इथे तरी बघितले.

पुढल्या वेळेस दिवे आगर, गुहागर, दापोली असा बेत आहे.

फोटोन्चे काय कौतुक करायचे, ते नेहेमीप्रमाणे खरच उच्च आहेत. तरी पण करते,मला प्रचि १३ ते १९ खूप आवडले. आता सुट्टीत परत जायचे आहे नवीन कोकण बघायला.

बाय द वे, हे पराग पिम्पळेन्चे पुस्तक ( वर तू सान्गीतलेले गुहारगर बद्दलचे ) कुठे मिळेल? नेटवर उपलब्ध आहे का?

मस्तच !

पण ऐसा वर्षमें एक बारच जा के कैसा चलेगा बाबा ? मस्त नहा धोके जरा जादा बार जानेका सोचो.

प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!! Happy

पहिल्या परिच्छेदात शेरे-लिंब च्या त्या (फेबु -व्हॉअ‍ॅ) फेमस विहिरी चा उल्लेख आहे. त्यांची वेगळी चित्रमालिका येणार आहे असं गृहित धरलं आहे>>>>>मित अगदी अगदी ;-). पण फेबु-व्हॉअ‍ॅप वर जे फोटोज फिरत आहेत ते दुसर्‍या विहिरीचे आहे (ते अहमदाबाद येथील "राणीनी वाव" आणि जयपुर-आग्रा रस्त्यावरची "चांद बावडी" चे आहेत.) अर्थात आपली दुमजली बारा मोटेची विहिरही तितकीच खास आहे. Wink

बाय द वे, हे पराग पिम्पळेन्चे पुस्तक ( वर तू सान्गीतलेले गुहारगर बद्दलचे ) कुठे मिळेल? नेटवर उपलब्ध आहे का?>>>>>रश्मी, बुक गंगावर ६ पुस्तकांचा सेट उपलब्ध आहे. मी पण तिथुनच मागवलेलं. Happy

पण ऐसा वर्षमें एक बारच जा के कैसा चलेगा बाबा ? >>>>>मामी Proud सध्या प्रोबेशन पिरियड चालु आहे सो भटकंतीवर थोडा चाप बसलाय. Happy

आम्ही तिकडे असताना आलात तर येवा घर आपलांच आसां.>>>>>नक्कीच Happy

परिचयाच्या छान परिसराचीं छान प्रचि !!
[ मुद्दाम राई- भातगांव पूल बघायला प्रथमच मीं चिपळूणहून एस्टीने तिथंच जाणार्‍या बसने गेलो होतो. ती बस इतक्या ठिकाणी वाटेतल्या छोट्या छोट्या दरींतल्या गांवांत डोंगर उतरून जायची व परत वर यायची कीं तें छोटसं अंतर कापायला बसला जवळ जवळ पांच तास लागले होते. शिवाय, त्या बसचा शेवटचा थांबा पूलापासून अर्धा किलोमीटर लांब [ तें लक्ष्मीकांत बेर्डेंचं गांव असंही कळलं] व बस पंधरा मिनीटांत परत जाणारी ! त्यामुळें या पूलाचं पहिलं दर्शन लांबूनच घडलं. पण नंतर मला खूप आवडलेल्या या पूलावर जावून आनंद घेतला ! वरील प्रचि पाहून त्या सर्वाचा पुनःप्रत्ययाचा आनंदही मिळाला ! धन्यवाद.]

गुहागर माझ आजोळ . लहानपणापासून आईबरोबर २०-२५ दिवस गुहागरात आजोळच्या घरी मुक्काम . म्हणून आवर्जून धागा उघडला आणि सार्थक झाल. गुहागरात अष्टवण्यावर आणि पार्टव्ण्यावर गेला नाहीत का ? Happy

जिप्सी ,
फोटो आणि वर्णन दोनीही छान !!
कुठे उतरला होतात याची माहिती मिळु शकेल का?? - मला असा plan करायचा आहे.

Pages