पायाच्या तळव्यांची आग

Submitted by मामी on 2 January, 2016 - 05:10

एका वयस्क व्यक्तीच्या पायाच्या तळव्यांची अतिशय जळजळ होते. खूपच त्रास होत आहे. तोंडातही बरेचदा फोड येतात आणि काही खाता येणं अशक्य होतं. कदाचित बरीच औषधं वगैरे घेतल्यामुळे अंगात उष्णता निर्माण झाली आहे.

१. तळपायांची आग कशी कमी करता येईल? घरगुती उपचार हवे आहेत.

२. तोंडात येणार्‍या फोडांवर काही सोपे घरगुती उपाय आहेत काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तळपायांची आग कशी कमी करता येईल? घरगुती उपचार हवे आहेत

उपाय नं १
काश्याची वाटी ने तळपायाला खोबरेल तेलाची मालिश करायची. काश्याची वाटी ( गोलाकार बुड असलेला वाडगा)
मिळतो बाजारात, बहुदा तांबाकाटा मुंबईत मिळेल !

उपाय नं २
पायाला कोकम तेल लावायच ! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण
खुप घट्ट असत हे तेल, ह्या तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध असत .

तळपायांची आग कशी कमी करता येईल? >>>>>
तळपायाला मेंदी लावून झोपले कि कमी होऊ शकते.

तोंडात येणार्‍या फोडांवर काही सोपे घरगुती उपाय आहेत काय?>>>>>
तोंडली खाल्याने कमी होतात म्हणे.

तुम्ही फक्त घरगुती उपाय विचारले आहेत तरी लिहितो, पुण्यात किंवा मुंबईमधे असाल तर वैद्य खडीवालेंना भेटा.

मला ऊष्णतेचा त्रास झाला होता तेव्हा त्यांच्या औषधांचा बराच फरक पडला होता.

अशी तळपायाची आग होणे हे वयस्कर स्त्री बाबतीत जास्त होत, हार्मोन इंबॅलेंस मुळे होत असत,

सकाळी हिरव्या भाज्यांचा रस प्यायल्याने फरक पडेल, नियमीत एक आठवडा तरी करायला पाहीजे,
सकाळचा नाश्ता घ्यायचा नाही,
१. कोहळा, १/४ किलो साल काढुन
२. पांढरा दुधी १/४ किलो साल काढुन
३. आवळा १०० ग्रॅम बिया काढुन
४. आलं ५० ग्रॅम साल काढुन

मिक्सर मध्ये घालायच.
थोडसच पाणी घालायच.
तयार झालेला रस पाढंर्या पंच्यातुन पिळुन काढायचा आणि सकाळी घ्यायचा !
असा रस एक ग्लास घेतला की दोन तिन तास काही घ्यायची / खायची गरज नाही.

ह्या रसाने वजनही कमी व्हायला मदत होते.

मामी, काश्याची वाटी दादरला कबुतरखान्याजवळच्या दुकानात हमखास मिळेल. ती अस्सल आहे का ते मात्र बघून घे. ( अगदी अस्सल असते त्यात सोन्याचा एखादा वेढा असतो, पण तशी आता मिळेलच असे नाही ) याने खरेच खुप फायदा होतो.

रुह आफजा ( जर साखरेचा प्रॉब्लेम नसेल तर ) सबजा, तुळस बी पण वापरून बघता येईल ( अर्थात पोटातून घेण्यासाठी )

तोंडातल्या फोडासाठी डॉक्टर एक जेल देतात. तोपर्यंत साबुदाण्याची पेज, अरारुट लापशी, शिकरण खाता येते ( बाकी काही खाणे शक्य होत नाही. )

पायाला कोकम तेल लावायच ! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण
खुप घट्ट असत हे तेल, ह्या तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध असत . >> हो. ते एकदा दोनदा लावलं पण जास्त त्रास वाटायला लागला असा फीडबॅक मिळाला. कोकम तेलानं सुरवातीला जास्त उष्णता जाणवते का?

काश्याची वाटी दादरला कबुतरखान्याजवळच्या दुकानात हमखास मिळेल. >>> दिनेशदा, गोरा गांधी कडे ना? ओक्के बघते.

डायबिटीसमुळे गोड काही खाणं शक्य नाही. पण भाज्यांचा रस, सबजा वगैरे उपाय करून बघायला हरकत नाही.

जयश्रीराम, अतरंगी, मृणाल १, दिनेशदा ... धन्यवाद.

बहुदा उष्णता बाहेर पडत आहे. तोंडातल्या फोडांसाठी "स्माईली" म्हणून मेडिकल मधे क्रिम मिळते तीने बराच आराम मिळतो. या
BENZOCAINE GEL U.S.P.
MUCOPAIN यानावाची क्रिम मला डॉक्टरने तोंडातल्या फोंडांना लावायला दिलेली

मामी, शतधौतघृत या नावाचा मलम मिळतो तो घ्या. ( म्हणजे त्या काका/ काकुना घ्यायला सान्गा.) शतधौत म्हणजे शम्भर वेळा पाण्याने धुतलेले साजूक तुप असते ते. तो तळपायाला चोळावा. तसेच कैलास जीवन पण ठीक आहे.

तोन्ड येण्यावर उपचारसाठी अन्गातली उष्णता कमी करायला हवी. साजूक तुप ५ मिनीट तोन्डात ठेऊन मग चुळा भराव्या. अरारुट ( किराणा दुकानात मिळते ते) ची खीर घ्यावी.

एकदा ब्लड टेस्ट पण करायला सान्गा. दुसरे असे की पोट साफ नसेल तर वरचे वर तोन्ड येते. आधी पचन ठीक असावे. पोट साफ होण्यासाठी रात्री काळ्या मनुका पाण्यात भिजवुन सकाळी त्या कुस्करुन खाव्या व ते पाणी प्यावे. डायबेटीसला मनुका ( काळ्याच) सध्या चालतील.

नाही भ्रमर, ते तुप विषारी आहे, पोटात वा तोन्डासाठी वापरत नाहीत. फक्त बाहेरुन उपयोग करतात. मात्र तळपायाच्या उष्णतेसाठी चान्गले आहे. जवळच्या कुठल्याही आयुर्वेदीक डॉक्टरना विचारले तरी चालेल.

मामी, भांड्याच्या दुकानातही मिळेल. त्याने जरा जोर लावून चोळावे लागते पण आपल्याआपणही ते करता येते.
ते करतानाच आराम वाटू लागतो. ( पुर्वी नव्या सुनेला माहेरून द्यायच्या भांड्यात ही वाटी असायची. तिने सासूसासर्‍यांची सेवा करावी, अशी अपेक्षा असे. )

मोगा म्हणताहेत तसे डायबेटीस साठी पण चेकप करायला हवा.

डायबेटिस असेल तर नर्व डॅमेजमुळे तळपायाची जळजळ होते. वायटॅमिन डेफिशियन्सीमुळे देखील हा त्रास होतो.

पायाला आणि तोंडातील फोडांना कैलास जीवन लावुन पहा.
>>>
असे वाटले माझ्या आईनेच हा उपाय सुचवलाय. ती कैलास जीवनची ब्रांण्ड अँबासेडर आहे.
पण येस्स यावर मात्र हे नक्कीच काम करेल. ईतर उपायांच्या जोडीने करायला हरकत नाही.
ईतरही उपाय चांगले येत आहेत. ऊपयुक्त धागा.

थोडंसं साजुक (घरी बनवलेलं) तुप रोज रात्री झोपताना तळव्यांना लावायचं. खुप फरक पडतो. बाहेरच्या तुपानी काही फरक पडत नाही. का ते नाही माहीत.

धन्यवाद, भ्रमर, जयंत.१, रश्मी.. , _प्राची_ , किट्टु, moga, स्वाती२, ऋन्मेऽऽष, प्राजक्ता, नताशा.

कैलास जीवन नंबर वन उपाय.

शरीरातील उश्णते साठी : गार दुधात. तुळशीचे बी भिजवून घेणे. रात्री भिजिवले तर सकाळी घेता येते. हे मी रवी साठी अनेक वर्शे केले आहे.

तसेच डाबर आमला केश तेलाने डोक्याला मालीश करणे. माहीत नाही का पन त्याने थंड वाट्ते. तेलात मेंथॉल नाही.

तुळशीचे बी म्हणजेच सब्जा साध्या पाण्यात भिजवुन नन्तर कोकम सरबत मिक्स करुन घेणे, कीडनी स्टोनच्या त्रासातही आराम मिळतो वेदनापासुन. जमले तर खिकण लाव, खिकण हे समुद्रि वनस्पतीच्या बियापासुन बनवलेले मलम असते, वातावर अतिशय गुणकारी, आमच्या एका नातेवाईकाने ६ महीने सतत पुर्ण शरीराला चोळुन १० कीलो वजन कमी केले होते पण डुप्लिकेसीठ खुप असते , यात्रेत वगैरे मडक्यातुन विकायला आणतात पण ते भेसळयुक्तच मिळते. महाग असते पण गुणकारी, शक्यतो आमच्या भागात मिळते, मी पदयात्रेसाठी वापरते , दिवसभर चालुन पायाच्या शिरा कडक होतात , जळजळ होते खिकण लावल्यावर आराम मिळतो बर्‍याच जणाना शौचाचा त्रास होतो हे पोटाला चोळल्यास पोट साफ होते. एकदम ओरीजीनल नाही पण ९०% प्युअरवाल मिळवते मी, हे दाणेदार व गरम वातावरणात वितळते. एका ओळखीच्या ग्रुहस्थाच्या बहीणीचे सन्धीवाताने हातापायाची बोटे वळली होती त्याला मी हे सुचवले तिला खुप आराम पडलाय अस तो म्हाणालाय खरा.

तोंडात फोड येत असतील तर बहुदा झोप व्यवस्थित झालेली + होत नसावी.
ब जीवनसत्त्वाच्या (बी काँप्लेक्स) गोळ्या तज्ञ वैद्यकांच्या सल्ल्याने घ्या.
यामुळे फोड सुमारे ४८ तासात जातात असा माझा अनुभव आहे.

तुम्ही घरगुती उपाय विचारला आहे म्हणून -
सडीच्या भाताचा उरलेला कोंडा रोज थोडा खाण्यात घेतला की आपोआप हा त्रास कमी व्हायला हवा.
किंवा यासाठी साळीसहीत भात (ब्राऊन राईस?) खाल्ला तरी चालेल. यात ब १ जीवनसत्त्व असते.
इतर ब जीवनसत्त्वासाठी हिरव्या भाज्या आणि अंडी यातून मदत व्हावी.

वर कविता१९७८ यांनी दिले आहे ते तुळशीचे बी किंवा तुकमराई काही काळ घेणे चांगले राहील असे वाटते.

१/२ - १/२ चमचा धणे- जिरे ग्लासभर पाण्यात भिजवुन ते पाणी पिणे... दिवसातुन ३-४ वेळा पिल्यास नक्की फरक पडतो... माझा अनुभव आहे.. याने मला तरी कधी सर्दी झाली नाही ...

पाय चोळण्यासाठी बालाजी तांबेंचा किट मिळतो आयुर्वेदिक अऑषधाच्या दुकानात. त्यात काशाची वाटी आणि मलम / तूप असते.

१/२ - १/२ चमचा धणे- जिरे ग्लासभर पाण्यात भिजवुन ते पाणी पिणे... दिवसातुन ३-४ वेळा पिल्यास नक्की फरक पडतो... माझा अनुभव आहे..>> याने सर्दी होऊ शकते.

Pages