धरतीवरील स्वर्ग (काश्मिर भाग - ३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 December, 2015 - 02:42

धरतीवरील स्वर्ग (काश्मिर भाग - १) दल लेक - http://www.maayboli.com/node/49570
धरतीवरील स्वर्ग (काश्मिर भाग - २) सोनमर्ग, गुलमर्ग - http://www.maayboli.com/node/50057

११ ते १७ मे २०१४ दरम्यान केलेल्या काश्मिर टुरचा वृतांत जुन २०१४ मध्ये लिहाय्ला घेतला व २ भाग लिहून झाले त्यानंतर खंड पडला आणि काश्मिरवर अवकळा आली तेव्हा तर मला लिहीण्याचा उत्साहच गेला होता. आज अचानक जुने फोटो पहाताना पुढचे भाग लिहावेसे वाटले. म्हणून इतक्या महिन्यानंतर काश्मिर पुरात बुडण्यापूर्वीचे हे काश्मिरचे खालील निसर्ग सौंदर्य. काश्मिर पुन्हा पूर्ववत झाल असाव व होवो ही सदिच्छा.

चौथा दिवस म्हणजे गुलमर्ग सोडून पहलगामला जायचा. सकाळीच लवकर उठून आम्ही पहलगामचा रस्ता धरला. पहलगामला पोहोचतानाही वाटेत निसर्ग सौंदर्य न्याहाळता येत होते. ठिकठिकाणी सफरचंद आणि आक्रोडच्या बागा पहायला मिळत होत्या. आम्हाला उतरायची खुप इच्छा होती पण लांबचा पल्ला असल्याने ड्रायव्हरने परतीच्या वेळेस ह्या बागेत नेण्याचे कबुल केले.

पहलगाम जसे जवळ आले तसे आपण खरच धरतीवरील स्वर्गात आहोत याचा अनुभव येऊ लागला. पहलगामला सुरुवात होते ती शुभ्र फेसाळणार्‍या झरझर धावणार्‍या नद्यांनी. अजुन पुढे गेले की पुर्ण हिरवेगार डोंगर व वरती बर्फाच्छदित भाग. खाली पुर्ण हिरवा निसर्ग आणि खळखळणार्‍या नद्या.

''

पहलगाम जवळ आले तसे आमच्या पाठून काळे ठगही पुन्हा पाठलाग करत आलेच. आम्ही पोहोचायला जवळ जवळ ७ वाजले. थंडीची पुन्हा लाट आली पावसामुळे. आम्हाला वाटले आमचे हॉटेल मार्केट एरीयामध्ये असेल पण ते होते लांब डोंगरावर जंगलासारख्या ठिकाणी. तिथे वस्तीही जास्त नव्हती. त्यामुळे सगळे भयाण वाटू लागले. हॉटेलही खास नव्हते. जास्त सोयी नव्हत्या. बेडला फक्त हिटर लावला होता त्यामुळे
बेडवर पडून राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मुले फक्त टि.व्ही. पाहून आणि हॉटेल मध्ये खाऊ ऑर्डर देऊन एन्जॉय करत होती. थंडी इतकी होती की हात पाण्यात घालवत नव्हते. इतके भयानक वाटत होते की तिथून दिवस उजाडताच आपण पुन्हा श्रीनगरला जाउया, पॅकेजमध्ये नाही तरी एखादे पुन्हा पैसे भरून हॉटेल घेउया इतबत आमची बोलाचाली झाली.

पण दुसर्‍या दिवशी जादू झाली. जाग आली ती प्रकाशकिरणांनी. एकदम हायसे वाटले बाहेरील उजेड पाहुन. थंडीही कमी झाली होती. राधाही आज फ्रेश झाली होती. आता तिचा ताप पुर्णपणे गेला होता. सकाळी हॉटेलच्या डायनिंग हॉल मध्ये नाश्त्यासाठी गेलो तेंव्हा सुंदर नजारा बाहेर दिसू लागला.

तिथे एका झाडावर चक्क मोठी माकडे हुंदडताना दिसत होती. त्यामुळे बच्चेकंपनी चांगलीच खुष झाली. माकडे रंगाने करडी आणि केसाळ वाटली.

हॉटेलच्या आवारातही हिरवळीवर सुंदर नाजूक फुले लक्ष वेधून घेत होती. ही फुले काही खास लावलेली वाटली नाहीत. कारण इतर परीसरात म्हणजे डोंगरातही हा फुलांचा ताटवा पसरलेला दिसायचा प्रवासात.

ही सगळी फुले पाहुन माझी आणि कॅमेर्‍याची कसरत चालू होती. माझे मन पुर्ण फुलांमध्ये गुंतले गेले होते.

ही पिवळी फुलेही जागोजागी होती.

ह्या दिवशी आम्ही बेताब व्हॅलीला गेलो. जाताना जो नजारा होता तो केवळ स्वर्गच. आपल्या हिरव्या सह्याद्रीच्या रांगा तसे तिथे बर्फाच्छदीत पर्वत. पाहतानाच नजर गारेगार होऊन जाते.

हा झुम केलेला फोटो

रस्त्यालगतचे पर्वताचे खडक.

बेताब व्हॅली पॉइंटच्या सुरुवातीलाच खळाळणारी सुंदर नदी.

बेताब व्हॅलीतील शांत पारदर्शी नदी. खालचे दगड अगदी स्पष्ट दिसत होते.

समोर बर्फाच्छदीत पर्वत.

गगनाच्या दिशेने वाढत जाणारी ही सुंदर झाडे.

नदीच्या कडेने अशी झाडे होती.

ह्या फुलांना सुगंध होता. पण वृक्षाला एकही पान नव्हते.

ह्या ससुल्याच्या पिल्लाला हातात घेऊन फोटो काढायचा आणि १० रु. मिळवायचे असा हा रोजगारी बालससेमजूर.

तेथील नजारा.

ह्या हिरवळीवर छोटी छोटी फुले फुललेली होती. अप्रतिम सौंदर्य.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम. फारच सुण्दर .( फोटोचे वाटर मार्क रसभंग करतात बुवा. तुम्ही कमर्शियल फोटोग्रफर नसाव्यात असे वाटते)

जागुले तू बौत म्हणजे बौतच खुशनसीब आहेस.:स्मित: असे स्वर्गीय सौन्दर्य अनूभवणे एक सुन्दर स्वप्नाप्रमाणे असते. सर्वच फोटो उत्तम आहेत. ससुल्या आवडला. पाठीमागचे बर्फाच्छादीत डोन्गर रान्गा अप्रतीम! नदीतले पाणी पण किती नितळ आणी स्वच्छ आहे.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

महेशकुमार आम्ही नेटवरूनच सर्च केल होत. तुम्हीही सर्च करा कारण आता अजुन त्यात बदल झाल्याची शक्यता आहे.

पादुकानंद मी हौशी फोटोग्राफर आहे आणि मी काढलेले बरेच फोटो चोरीला गेलेले फेसबुकवर आढळले म्हणून हे वॉटरमार्क. तसे मोठेच दिसत आहेत पण सरावांनी आता थोडे अस्पष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे.

रश्मी खरच एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारख वाटल होत.