वाद, वाद आणि वाद

Submitted by बेफ़िकीर on 21 December, 2015 - 03:49

बहुसंख्य धाग्यांवर जात, धर्म, राजकारण, श्रद्धा / अंधश्रद्धा अश्या विषयांवरून वाद होऊ लागलेले आहेत. चिथावणीखोर प्रतिसाद, उपरोधिक ताशेरे, आक्रमक भाषा, आकसयुक्त विधाने, तीव्र संताप व्यक्त करणारे युक्तिवाद ह्या सर्वांनी युक्त अश्या चर्चा सर्वत्र दिसत आहेत. काही वाहत्या पानांना केवळ वाहती व गप्पांची पाने म्हणणे अशक्य झालेले आहे. तेथे फोरमवर काय वाचावे, त्यावर काय भूमिका घ्यावी, काय लिहावे ह्याच्या जणू योजना आखल्याप्रमाणे चर्चा होत आहेत. स्क्रीन शॉट्स घेणे, तक्रारी करणे हे तर आहेच पण उघड उघड आपल्या नावडत्या नेत्यांबद्दल व समूहांबद्दल अनुचित उल्लेख सहजपणे होत आहेत.

ह्या सगळ्याचा उबग आला म्हणून ही चार, सहा वाक्ये खरडली. रोज नवनवे धागे निघत आहेत त्यात हाही एक धागा निघाल्याने खूप काही बिघडणार नाही असे वाटले म्हणून हा धागा काढला.

हे सगळे असेच चालू राहील ह्याची खात्री वाटत आहे.

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि,
तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा आणि नविन किंवा अपुर्ण राहिलेल्या कथा/कादंबरी पुर्ण करा.
किती दिवस झाले तुमची कथा/कादंबरी नाही. खरतर तुम्हाला या साठी विपुच करणार होती पण आता हा धागा आलाच आहे तर इथेच सांगते, तसेही माबोवर हल्ली सगळ्याच धाग्यांवर अवांतरे चालतात.

वाद, वाद आणि वाद >>> माबोवर हल्ली फक्त हेच चालतं असं वाटु लागलय, खरचं उबग आलायं.

म्हणुन सांगते तुम्ही एखादी फर्मास कथा/कादंबरी लिहाच आणि नवचैतन्य आणा.

बेफि,
तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा आणि नविन किंवा अपुर्ण राहिलेल्या कथा/कादंबरी पुर्ण करा.
किती दिवस झाले तुमची कथा/कादंबरी नाही.
>>>>>>> १०० % अनुमोदन
मी फक्त एक वाचक आहे मा.बो ची,आणी तुम्च्या सारख्या चांगल्या लेखकांच्या लिखाणाचे वाचन करने हा छंद आहे.

बेफिकीर - हा आरसा आहे, त्याला झाकायचा प्रयत्न करू नका. भारतीय ( मराठी ) समाज कसा आहे आणि तो कीती प्रमाणात विभागलेला आहे हेच दिसते. ही दुही पूर्वीही होतीच, फक्त आता नविन मिडीयम मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाहेर येते आहे.

खोटा गोग्गोड मुखवटा गळुन पडला आहे ( कोणा व्यक्तीचा नाही तर पूर्ण समाजाचाच ).

अश्या परिस्थितीत देशाने सुपरपॉवर होण्याच्या वल्गना मारणे कीती हास्यास्पद आहे हे पण दिसून येते.

हे सगळे असेच चालू राहील ह्याची खात्री वाटत आहे. >>>>> हो खात्री आहेच. त्यामुळे हल्ली राजकीय धागे वाचणे आणि त्यावर आपली मते व्यक्त करणे खुप कमी केले आहे. एखादा वाचण्यासारखा धागा असेल तर वाचतो आणि प्रतिसाद देतो.

प्रत्येक मराठी साईटीचे जुनी झाल्यावर हे होणे अपरिहार्य आहे. कितीही चुकीचं वाटलं तरी ते साईट जिवंत असल्याचे लक्षण आहे.लोक साईटींमध्ये भावना गुंतवायला लागतात. त्यावर लिहीणार्‍या आयडींना आपले कुटुंब समजू लागतात, कुटुंब म्हटल्यावर वाद आणि प्रेम हे दोन्ही आलंच.काहींनी (नाव माहित आहे, इथे लिहीणार नाही)यावरुन जीवन संपवल्याचे उल्लेखही वाचले आहेत.
फक्त साईट किंवा माणसं सायबर क्राईम च्या आवाक्यात येणार नाही याची काळजी घेऊन कोणाला काय लिहायचं असेल लिहावं.
(मनोगत, उपक्रम, मायबोली, मिपा,बजबजपुरी,ऐसी अक्षरे,मीमराठी,माझे शब्द सर्वांची वाचक.)

खरे आहे.

बेफि,
तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा आणि नविन किंवा अपुर्ण राहिलेल्या कथा/कादंबरी पुर्ण करा.
किती दिवस झाले तुमची कथा/कादंबरी नाही. >>>>>>> १०० % अनुमोदन
मी फक्त एक वाचक आहे मा.बो ची,आणी तुम्च्या सारख्या चांगल्या लेखकांच्या लिखाणाचे वाचन करने हा छंद आहे.

+१०००००

तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा आणि नविन किंवा अपुर्ण राहिलेल्या कथा/कादंबरी पुर्ण करा.>> +१००

बेफिकीर हे उत्तम गझलकार आणि ताकदीचे कथालेखक आहेत. पण माझे एक निरीक्षण असे की त्यांनी राजकरण या विषयात रस घ्यायला सुरुवात केली, आमचा कट्टा नामक कुणा शांताराम कागाळे (आता हयात नसलेला आयडी) यांनी सुरु केलेल्या धाग्यावर जास्तच लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हापासुन त्यांच्यातील गझलकार/कथा-कादंबरीकार कुठेतरी हरवु लागला. मायबोलीवरील सर्वच रसिक आणि चाहत्यांच्या वतीने मी बेफिकीर यांना विनंती करतओ की त्यांनी राजकारण हा विषय सोडुन पुन्हा गझल-कथा-कादंबर्‍या यांच्याकडॅ वळावे व आम्हाला त्याचा रसास्वाद घेउ द्यावा.

धन्यवाद

विठ्ठल सहमत. हल्ली ते सुंदर कथा/कादंबर्‍या/लेख लिहीताना दिसत नाहीत.गुड मॉर्निंग मॅडम आणि ओल्ड मंक मी खूपदा वाचते.

सारे फसाद की जड राजकारण
>>

+१३!

बेफि,

चालायचेच हो, समाजमाध्यम आहेत! समाजाचे विचारतरंग उठणारच इथे Wink

बेफिकीर, राजकारण सोडावे हे उत्तम. तो आपला पिन्ड नाही. तुम्ही आधी भुक्कड व अन्या पूर्ण करा बघु......>>>>>
रश्मीजीशी सहमत..राजकारणात बेफिकीरांची कमी आहे का ?

मी कालच बहुधा कट्ट्यावर लिहिले होते की काही दिवसांनी मला काही गोष्टी लिहिता येतील व ती इच्छाही आहेच. येथेही काही प्रतिसाद केवळ धाग्याचा विषय ध्यानात घेतल्यामुळे टोन बदलून आलेले आहेत पण त्यामागील हिडन मेसेज मला समजलेला आहे. बाकीच्या भाबड्यांना तो समजला असो अथवा नसो.

बाकी मोगा ह्यांच्यासाठी:

ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत हे जरा विस्तारपूर्वक सांगितलेत तर मदत होईल.

बेफिकीर - हा आरसा आहे, त्याला झाकायचा प्रयत्न करू नका. भारतीय ( मराठी ) समाज कसा आहे आणि तो कीती प्रमाणात विभागलेला आहे हेच दिसते. ही दुही पूर्वीही होतीच, फक्त आता नविन मिडीयम मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाहेर येते आहे.

खोटा गोग्गोड मुखवटा गळुन पडला आहे ( कोणा व्यक्तीचा नाही तर पूर्ण समाजाचाच ).

अश्या परिस्थितीत देशाने सुपरपॉवर होण्याच्या वल्गना मारणे कीती हास्यास्पद आहे हे पण दिसून येते.

ही पोस्ट खूप पटते आहे.
कॉस्मोपॉलिटन समाजात व मेट्रो सिटीजमध्ये अठरापगड जातीधर्माच्या लोकांत वावरत असताना कधी जातीवरुन वगैरे वाईट अनुभव आले नाहीत. मायबोलीवर आल्यावर मात्र दिसलं की जातीवरील विखार किती टोकाचा पसरलेला आहे. मायबोलीवर येण्यापूर्वी वाटलं होतं की मराठी साईट आहे तर सर्व मराठी जन एकत्र आहेत असं चित्र दिसेल. पण जे चित्र दिसलं ते भयावह आहे. इतकी टोकाची नकारात्मकता कधीच कुठेच बघितली नव्हती.

तसा आमच्या जातीचाही एक फेसबुक ग्रुप आहे. तिथे सर्व विषयांवर चर्चा चालतात पण दुसर्‍या जातींचा कधी उल्लेखही होत नाही..दुसर्‍या जातींवर टीका वगैरे तर कधीच नाही. मायबोलीवर मात्र दुसर्‍या जातीवर- त्यातही एका विशिष्ट जातीवर- विखारी टीका वाचायला मिळाली नाही असा एक दिवसही जात नाही.

आपला भारत देश फार छान छान आहे, आपल्या देशाचं भविष्य फार उज्वल आहे, आपण आपल्या देशात फार सुरक्षित आहोत अशी भाबडी समजूत मायबोलीवर येण्यापूर्वी होती. इथलं कमालीचं hatred पाहून ही सर्व समजूत धुळीला मिळाली. एका अर्थी मायबोलीवरील विखारी लोकांचे आभारच मानले पाहिजेत की त्यांनी मला वेळीच जागं केलं आणि वस्तुस्थितीची जाणीव करुन दिली Wink

भाबडी समजूत मायबोलीवर येण्यापूर्वी होती.> थोडे आधी आला असता तर भारत अतिशय संपन्न दिसला असता Light 1 आधी फार फार गळ्यात गळे होते. आता आता हे चालू झाले