हसरं लंडन

Submitted by मनीमोहोर on 18 December, 2015 - 02:25

ह्या वर्षी उन्हाळ्यात लंडनला जायची संधी मिळाली आणि लंडनचा उन्हाळा हा तिथला सर्वात बेस्ट सीझन आहे असं का म्हणतात ह्याचा प्रत्यय आला. हे तिकडचे काही मी काढलेले फोटो.

हिथ्रो विमानतळाच्या बाहेरच अशा फुलांनी स्वागत केलं आणि प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात दूर झाला.

From mayboli

हिवाळ्यात आक्रसलेलं दिवसाचं फुलपाखरु उन्हाळ्यात चांगलच पंख पसरत आणि रात्री चक्क नऊ साडे नऊ पर्यंत चांगला प्रकाश असतो. स़काळी ही साडेचार पाचलाच फटफटतं

From mayboli

लंडनच बहुतांश वेळा करडं दिसणारं आकाश समर मध्ये असं निळशार दिसतं

From mayboli

ही वाट दूर जाते

From mayboli

हा मणीमोहोर आहे का ?

From mayboli

समर मध्ये सगळीकडे फुल फुललेली असतात. घराच्या पुढच्या अगदी छोट्याशा जागेत ही बाग फुलवलेली असते हौशीने . हे एक अगदी छोट गवत फुल आहे अंगणातल्या हिरवळीवर आलेलं. फोटो वर जाऊ नका ह्याची साईज आपल्या करंगळीच्या नखाएवढी आहे जेमतेम .

From mayboli

हे आणखी एक गवत फुल पण हे साईज ने थोडं मोठ होतं

From mayboli

बकिंगहम पॅलेस, रॉयल पार्क्स आणि इतर सार्वजनिक बागांमध्ये ही हौसेने फुलं लावतात. ही बकिंगहम पॅलेस, च्या अंगणातली फुलं

From mayboli

एका फारशा प्रसिद्ध नसलेल्या बागेतली ही हिरवळ आणि एखाद्या स्त्रीने आपल्या केसांचा मधोमध सरळ भांग पाडावा तसा हा रस्ता

From mayboli

बागेतलं स्मारक आणि त्याभोवती फुलवलेली अशी अष्ट्कोनी बाग

From mayboli

From mayboli

हे पहा भरतकामाचे काही नमुने ( स्मित)

From mayboli

From mayboli

लिलीच्या फुलांचे कर्णे

From mayboli

जनरली प्रत्येक पब किंवा रेस्टॉरंटच्या इमारतीवर फुलं असतातच. पहिल्यांदा तर मला खोटीच वाटली पण ती असतात खरी ( स्मित)

From mayboli

हे जवळुन

From mayboli

From mayboli

अगदीच जागा नसेल तर अशा कुंड्या तरी असतातच पबच्या / रेस्टॉरंटच्या बाहेर

From mayboli

दिव्याच्या खांबांवर लटकवलेल्या ह्या काही कुंड्या. त्यामुळे रस्ता फार सुरेख दिसतो

From mayboli

हे जव़ळुन

From mayboli

रस्त्याच्या डिवायडरवर केलेली फुलांची सजावट

From mayboli

उन्हाळा असला तरी ही एखाद दिवशी रात्री पारा पार खाली जातो आणि मग सकाळी अंगणतल्या हिरवळीवर असे दवबिंदुंचे मोती दिसतात

From mayboli

तिकडे मला निळी फुलं खूप दिसली. ही काही

From mayboli

From mayboli

From mayboli

From mayboli

From mayboli

फुलांच्या सजावटीला रेल्वे स्टेशन ही अपवाद नाही. तिथेही फुलं असतातच आपल्या स्वागताला

From mayboli

अशा सुंदर वातावरणात गाडीची वाट पहाण ही किती आनंददायी असेल ना !
From mayboli

सिटीत जिथे जागेची कमतरता आहे, रस्ते बोळकंडीसारखे आहेत तिथे ही जरा जागा मिळेल तिथे फुलं असतातच.

From mayboli

From mayboli

From mayboli

From mayboli

चला, आता आणखी फोटो टाकण्याचा मोह आवरता घेते. एवढी फुलं होती सगळीकडे पण ती तोडताना मात्र नाही कोणी दिसलं. पहाटेच्या प्रकाशात काठ्या, छत्र्यानी फांद्या वाकवुन वाकवुन फुल तोडुन झाडं बोडकी करण्यातली मज्जा त्यांना अजुन समजलेली दिसत नाहीये. असो.

सगळीकडे जिथे नजर जाईल तिथे अशी फुलच फुल दिसत असल्याने उन्हाळ्यात लंडन एखाद्या हसर्‍या बाळासारखं आनंदी गोजिरवाणं आणि प्रसन्न दिसत ह्यात शंका नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

आहाहा कित्ती छान. ते दिव्यांच्या पोलला कुंड्या लावलेले खुप आवडले.

सगळीच फुले छान.

खुप सुंदर फोटो. तिथल्या लोकांना स्वच्छ प्रकाश आणि उबदार हवा चारपाच महिनेच मिळते आणि तो वेळ ते अगदी मनापासुन साजरा करतात, त्याची मजा उपभोगतात.

मस्त

ममो ...मस्त फोटो.
कॉक अ‍ॅन्ड बुल हॉटेल चा तू अप्लोड केलेला फोटो आणि हा मी काढलेला....काही साम्य वाटतय?
हा २००९ साली हॉप ऑन बशीतून काढलेला,

धन्यवाद सगळ्यांना फोटो आवडले म्हणून.
काश आमची मुंबई अशी असती >>> खरं आहे रे ऋन्मेष, पण मग तिला लंडन नसत का म्हटल? ( स्मित)

शशांक, हो ते Butterfly bush, च आहे. तिथे अशीच त्याची झुडपे होती वईला लावलेली की आपोआप लागलेली कुणास ठाऊक तो नवीन टाकलेला फोटो मणीमोहोरचाच आहे का सांगा ना प्लीज.

साधना , अगदी खरं आहे. आम्ही रहात होतो त्या घराच्या समोरच्या घरातील गृहस्थ ऑफिस मधुन आले की रोज संध्याकाळी त्यांच्या घरापुढच्या मरगळलेल्या लॉनची अगदी भक्तिभावाने मशागत करत असत आणि महिन्याभरात ते लॉन अस काही तरारलं की विचारु नकोस.

डिंपल मी पण त्या बाकावर बसुन घेतलं आणि व्ही.टी.च्या गाडीची वाट बघतेय असं इमॅजिनलं .

मानुषी, बशीतुन काढुन पण मस्त आलाय फोटो. पण ही चेन असेल एखाद वेळेस त्यांची कारण मी काढलेला फोटो एका उपनगरातला आहे जिथे बस वाले नाही येणार.

लंडनचा उन्हाळा हा तिथला सर्वात बेस्ट सीझन >>> लंडनचा आठ दिवसांचा उन्हाळा म्हणा. तिथे समर असा असतोच किती? त्यापेक्षा फॉल आणि स्प्रिंग जास्त आवडले होते मला.

मस्त! लंडन आपले फेवरिट आहे एकदम.

ट्रीप आपल्या उन्हाळ्यात असेल (मे), तर लंडनमधे स्प्रिन्गच असेल तेव्हा.

काश आमची मुंबई अशी असती >>> इंग्रजांनी तरी तशीच तयार केली होती. आपण तशी नंतर ठेवली नाही दुर्दैवाने. लंडन मधे मुंबईची खूप आठवण येते. कारण लाल डबल डेकर्स, स्टेशनच्या त्या साईन्स ई.

Pages