शाहरुख आणि त्याचे विदेशी चाहते

Submitted by Manaskanya on 17 December, 2015 - 21:23

शाहरुख खान वर काढलेला धागा वाचला. खरतर हा लेखाचा प्रतिसाद आहे. पण सगळ्यांना वाचायला मिळावा म्हणुन वेगळा धागा काढलेला. मी शाहरुखची Die hard fan आहे. फौजीतल्या 'अभिमन्यू' पासून ते 'राहुल' पर्यंत. मला त्याला बघायला आवडत अगदी कुठल्याही भुमिकेत.

आता हा धागा काढण्याचे खरे कारण. शाहरुख खान हा देशाबाहेर सगळ्यात लोकप्रिय भारतीय अभिनेता आहे. हा माझा अनुभव मला तुमच्या सगळ्यांबरोबर share करायचा आहे. मी अमेरिकेतल्या एका लहान शहरात रहाते . तिथे सगळे हिंदी सिनेमे येत नाहीत. पण शाहरुखचे मात्र सगळे लागतात रेगुलर थिऎटरला . (खाली पोस्टर आहे आमच्या थिऎटर ला लागलेले )
Happy New Year ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो Chicago ला आला होता. सुमारे साडे अकरा हजार लोक मावतील इतकं autotorium संपूर्ण भरल होत जवळपासच्या ६०० कि मि पर्यंतच्या गावातले लोक त्याचा कार्यक्रम बघायला आलेले. मी स्वत आणि माझ्या शहरातले काही मित्र ६०० कि मि प्रवास करून गेलो होतो. जिथे कुठे त्याचे कार्यक्रम झाले Wasington डक, Texas सगळीकडे अशीच परिस्थिती होती ह्यात त्याचे 'अभारतीय' fans सुद्धा होते. गंमत म्हणजे साडेतीन तासाच्याकार्यक्रमात हा माणूस तीन तास तरी स्टेज वर होता . अगदी 'पैसा वसूल' . कार्यक्रमात शाहरुख dance करायला लागला की सगळे उठुन स्टेजकडे जायचे. Security वाल्यांच्या नाकी नऊ आले होते. तो बोलत असला कि सगळे शांत रहयचे. अगदी कनिका कपूर आणि दीपिकाच्या सोलो performaces ला लोक खुर्चित बसून विश्रांती घ्यायचे. शाहरुख दिसला की पुन्हा बेभान व्हायचे. शेवटी एक Security वाली मला म्हणाली 'This short guy looks like very very famous and likeable. Whenever the beautiful girl (Deepika ) comes people are all quiet but they start jumping and running to stage when they see him'. हा झाला प्रत्यक्ष शाहरुखच्या live show चा अनुभव
नंतर थिएटर ला लागला 'Happy New Year'. मझ्या समोरच्या रांगेत काही विदेशी मुली होत्या. शाहरूखची पडद्यावर entry होताच त्यानी जल्लोष केला. आपल्या मोबाईल मधे फोटो काढले आणि झूम करून फोटो चे पापे घेत बसल्या. मी इंटर्वल मध्ये विचारलं 'Do you understand hindi' तर नाही म्हणल्या. त्या म्हणाल्या ' We like him so much we just read the subtitles and watch him' . मी मनातल्या मनात कोपरापासून नमस्कार केला त्या fans ना.
माझ्या कामाच्या जागीही असेच अनुभव येतात. अभारतीय मुलीना वाटत मी भारतीय आहे म्हणजे शाहरुख खान ला नक्की बघितलं असणार. काहीना तर मुंबईला जायचं आहे त्याला भेटायला. काहीना त्याच्याशी लग्न करायचं आहे. मी अणि माझ्या भारतीय मैत्रिणी त्यांना सांगतो आमच्या करोडोच्या देशात SRK साठी मोठी रांग आहे. तुम्हीही उभ्या रहा एकीने तर मला सरळ विचाराल होत 'तू त्याच्यशी लग्न का केल नाहीस'. मी कपाळावर हात मारला. असे आहेत शाहरुख जागतिक fans

आता 'दिलवाले' बघू नका अस सांगणारे आपले मराठमोळे नेते 'बाजीराव मस्तानी' वर बहिष्कार का घालत नाहीत. 'मल्हारी' गाण्यात नाचणारा बाजीराव बघितल्यावर एकच विचार आला 'भन्सालीने लावली इतिहासाची वाट'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर..
आपली ही पोस्ट शेअर करू का?
फक्त ते खालचे बाजीराव मस्तानीचे काढून शेअर करेन..
प्लीज प्लीज प्लीज..
नाही म्हणालात तरी मोह आवरणार नाही Happy

ओह !
मला वाटलं शाखाच्या फॅन्सना "विदेशी" म्हटलंय की काय !
( पाकिस्तान, बांग्लादेश, सीरीया इ. इ. )

शाहरूखची पडद्यावर entry होताच त्यानी जल्लोष केला. आपल्या मोबाईल मधे फोटो काढले आणि झूम करून फोटो चे पापे घेत बसल्या. >>>>> आमच्या काळात कॅमेरे इतके सहज उपलब्ध नव्हते, नाहीतर मी देखील सिनेमात जाण्याचा विचार केला असता.

अगदी अगदी झालं एकुण एक ओळ वाचून.
आमच्या एका क्लाईंटने पण एका मित्राला सांगितलेलं की मी भारतात येईन तेंव्हा माझी शाहरुखशी भेट घालून दे Proud

तो प्रचंड टॅलेंटेड आहे यात वादच नाही. लोकांचा आक्षेप बहुदा तो त्याच्या टेलेंटचा पुरेपुर वापर करत नाहीये हा असावा

ऑफ्कॉर्स. विदेशी प्रचंड क्रेझ आहे. मुंबई राहतोय म्हणाल्यावर एकच प्रश्न येतो. "शाहरुखच्या बाजुला राहतात का?" मन्नत बंगला बघितला का?" नाही असे प्रामाणिक उत्तर दिल्यावर " मुंबईत राहून सुध्दा तुम्ही बघितला नाही? इतके कसे तुम्ही अरसिक?' अश्या प्रकारे छळ चालू होतो. रशिया,क्रोशिया, रुमानिया, जर्मनी, फिलिपिन्स, बल्गेरिआ, असे कित्येक देश आहे ज्यांची नावे सुध्दा आपणास ठाऊक नाही पण तेथिल लोकांना शाहरुख, आमिर अमिताभ माहीत असतात हिरोईन्स मधे ऐश्वर्या रायचे नाव टॉप वर आहे बाकी इतरांचे नाव ऐकले नाही.
आमीर सुध्दा लोकप्रिय आहे. खासकरून जर्मन फॅन फॉलोइंग छान आहे. अमिताभ साहेब तर एवरग्रीन आहे.

येस्स, अमिताभ आणि शाहरूख!
शाहरूखला आपणच बदनाम करने म्हणजे भारताचेच नाव बदनाम करणे हेच काही लोकांना समजत नाही.

शाहरूखला आपणच बदनाम करने म्हणजे भारताचेच नाव बदनाम करणे हेच काही लोकांना समजत नाही.
>>>>
टाकलीस काडी?
काहीच्या काही उगाच

अगदी. ऋन्मेश
जेव्हा शाहरुख काही वैयक्तिक बोलतो तेव्हा ते देशाची बदनामी आहे असे जे लोक पसरवतात त्यांच्यासाठी वरील तुझे वाक्य अगदी अचूक आहे. Wink

मस्त लिहिलय Happy
पन क्या रे. आमी उसका हर एक मुव्ही पैला दिन देखता है . आज तो ७ बजे देखा . फिरभी हम १ नं कायको नै जी Happy

मलेशिया , ईडोनेशिया , सिंगापुर , मन्य्मार मध्ये शहारुख चे खुप चाहाते आहेत.

सिंगापुर मध्ये एकदा शहारुख येणार म्हणुन एअर पोर्ट वर १००० लोक जमली होती तेव्हा पासुन त्याला सिंगापुर ला त्याची यायची तारिख आधी सांगायला बंदी आहे. तसेच तेव्हापासुन त्याला सिंगापुर च्याpublic place मध्ये फिरायला २००५ पासुन बंदी आहे. तेव्हा पासुन त्यानी येण्याचे बंद केले आहे. पण त्या आधी त्याचा बरोबर फोटो काढायचे आणि हातात हात घेण्यासाठी US$१०० घेत होता. आणि लोक रांगेत उभे राहुन ह्या सेवेचा लाभ घेत असत.

मलेशिया आणि ईडोनेशिया मध्ये मी शाहरुख च्या शहरात राहात होतो हे सांगुन टॅक्सीचे भाडे कमी केले आहे. मलेशिया ला एका गावात एकाने तर मला त्याचा घरी पण बोलवले होते. (मी शहारुखच्य गावात राहतो म्हणुन आमच्या फॅमिलीला त्याला घरी दाखवायचे होते).

"तुम पास आये" हे शहारुख गाणे तर south east देशात खुप आवडते. माझा ५ वर्षाचा मुलगा ते गाण छान म्हणु शकत होता म्हणुन एका खानावळीने मध्ये जेवण फुकट देउ केले होते.

मी देखील विदेशात त्याची क्रेझ बघितली आहे. तो अतिशय रोमांटिक, enteraining मानला जातो. आ-त्ताच्या टिन एजर्स मध्ये देखिल खुप चाहते आहेत त्याचे.

साहिल शहा .. ईंटरेस्टींग .. आणि लय भारी.. आपलीही पोस्ट मी माझ्या दोनतीन व्हॉट्सपग्रूपवर शेअर करत आहे Wink

अजिबात आश्चर्य वाटले नाहि. भारताची हि सॉफ्ट पॉवर खुप मोठी आहे.

ईराणी किंवा अफगाणी सहकार्यांबरोबर बोलताना ह्याची खुप जाणीव होते. आपल्या दुरदर्शन मालिकांचा त्यांच्यावर खुप प्रभाव आहे. ईतकच काय, मधे एका पाकिस्तानी कार्यक्रमामधे एकाला नवीन पिढी उर्दू सोडुन हिंदी शब्द जास्त वापरते, हिंदू संस्क्रुतीचा त्यांच्यावर खुप जास्त प्रभाव आहे म्हणुन गळे काढताना पाहिल्याचे आठवते आहे.

आम्हाला अमेरीकेत एक इथियोपियन ड्रायवर भेटला होता जो मिथुनदांचा जबरदस्त पंखा. २ तासाच्या प्रवासामधे फक्त मिथुनची गाणी व सिनेमांबद्दल बोलत होता. आणि आम्हाला मिथुनबद्दल काहिच माहित नाहि हे समजल्यावर त्याचा अगदिच भ्रमनिरास झाला.

शा.खा., अमिताभ आणि रजनीसरांबद्दल तर क्या केहने... खुप जबरदस्त पंखा परीवार आहे त्यांचा...