स्थितप्रज्ञाला माकडचाळे शोभत नाही.

Submitted by बाळ पाटील on 11 December, 2015 - 00:57

म्हातार्‍याच्या पायी वाळे, शोभत नाही
स्थितप्रज्ञाला माकडचाळे, शोभत नाही.

लाली एकंच धमन्यामधल्या, या रक्ताची
टपले गोर्‍यावरती काळे, शोभत नाही.

अपुल्या अवखातीला पाहुन, जागा ठरते
म्यानामध्ये केळ - रताळे ,शोभत नाही.

ऐर्‍या - गैर्‍याने केलेले, चालुन जाते
वाघातोंडी शंकरपाळे, शोभत नाही.

बदलाचेही वारे आले, जिकडे - तिकडे
असली मर्दांना डोहाळे, शोभत नाही.

" माझे घर " म्हणती या विश्वाला ज्ञानेश्वर
दारोदारी आतुन टाळे, शोभत नाही.

- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळ पाटील।।। मानाचा मुजरा।।। अंतरात कुठेतरी आग भड़कत आहे तुमच्या ! वा खूप छान लिहली आहे गझल।।।।
>>>.>

गजानन रताळेजी, मानाचा मुजरा नकोय, तो आपल्या स्वभावातही नाही.बाकी आपण मोकळेपणाने बोललात, मनाला उभारी आली, धन्यवाद !
एक शेर सुचला असाच .......
साध्या चेंडूवरती मारुन चौके - छक्के
यॉर्कर येता चवर्‍या ढाळे शोभत नाही
--- बाळ पाटील

बाळ पाटील मला एक सांगायचे आहे! आपण मराठी आहोत गझल ही मराठी आहे ,गझलेचा खरा सरताज (मान सन्मान) ही तिची एक वर्णी भाषा आहे हिला दुसऱ्या भाषेशी जोडले तर तिची किम्मत कमी होणार! तुम्ही खूप छान लिहताय तुमचे विचार शक्ती खूप प्रभावशाली आहे. फक्त गझल मराठी मधे लिहा. मी एक साधा माणूस आहे गझल हा प्रकार मला खूप आवडतो . बाळ पाटील जी माझे बोलणे तुम्हाला आवडले नसेल ही कदाचित माफी मागतो. आणि आशा करतोय की तुमच्या गझल मला वाचायला मिळतील.

म्हातार्^याच्या पायी वाळा शोभत नाही ....असे असायला हवे का?

चाळे, डोहाळे आहे तिथेपण सेम.... अनेकवचन आहे म्हणून विचारले

म्हातार्^याच्या पायी वाळा शोभत नाही ....असे असायला हवे का?

चाळे, डोहाळे आहे तिथेपण सेम.... अनेकवचन आहे म्हणून विचारले .....>>>>..

........................ संतोषजी धन्यवाद हा विषय छेडलात.अगदि लिहितानाही मला हे जाणवले होते.
माझ्या समजुतीनुसार म्हातार्‍याच्या पायी वाळे शोभत नाही म्हणजे म्हातार्‍याच्या पायी वाळे असणे ( अर्थातच दोन पायात ). तसेच स्थितप्रज्ञाला माकडचाळे शोभत नाही म्हणजे स्थितप्रज्ञ असलेल्या व्यक्तीने माकड्चाळे करणे शोभत नाही. असली मर्दांना डोहाळे शोभत नाही. येथे तर मर्दांना हे अनेकवचन आहेच,.म्हणून डोहाळे. संतोषजी तरीही आपणास शंका असेल , तर कळवाल.मी माझी चूक खपवून घेणार नाही, दुरुस्त करेन . धन्यवाद !!

अवांतर;: चाळा एकच केला तर तो माकडाला शोभेल का ?

म्हातार्^यांच्या पायी वाळे शोभत नाहीत......
चाळे शोभत नाहीत.....
डोहाळे शोभत नाहीत .... असे केले तर अनेकवचन पुर्ण होते सर्वार्थाने....असे मला वाटते.... बाकी मिसर्यात काही खटकले नाही कारण तिथे असे वैषम्य नाही. हे माझे मत आहे केवळ. कृपया राग नसावा.

संतोषजी, माझ्या अल्पमतिप्रमाणे काव्यामध्ये गृहितार्थाने आशय समजून घेता येतो. वरील रचनेत यतिभंग नसल्याने शोभत नाहीया शब्द्समूहास स्वतंत्र अस्तित्व आहे. अर्थबोधासाठी म्हातार्‍याच्या पायी वाळे असणे गृहित धरावे लागते.तेच वर मी स्पष्ट केल्याप्रमाणे चाळे /डोहाळे च्या बाबतीत. अन्यथा गद्य आणि पद्य यात फरक तो कोणता?
मला नाही हे क्रियापद स्थित्प्रज्ञाच्या माकडचाळ्याच्या कृतीसाठी, म्हातार्‍याच्या पायी वाळे असण्याच्या कृतीसाठी तसेच मर्दांना डोहाळे लागण्याच्या वृत्तीसाठी अभिप्रेत आहे.
बाकी तज्ज्ञ सांगतील !

हे माझे मत आहे केवळ. कृपया राग नसावा. >>>>>>
संतोषजी, ...... चुक्भुल द्यावी घ्यावी.

अहो क्रोधे यावे कोठे
अवघे आपण निघोटे ...
हात आपला आपणा लागे
त्याचा करू नये खेद ...
जीभ दातंनी चाविली
कोणी बत्तीशी पाडली .... संत मुक्ताई