Submitted by सत्यजित... on 12 December, 2015 - 14:20
नुसतेच आरश्यांच्या असण्यात अर्थ नाही...
लोकांस दाखवाया हसण्यात अर्थ नाही!
आयुष्य लोटताना इतकेच ठेव ध्यानी...
चालायचेच सारे..'बसण्यात' अर्थ नाही!
पाऊस एकटा का दोषी सदैव ठरतो?
मुर्दाड ढेकळांना कसण्यात अर्थ नाही!
हे शहर माणसांचे माणूस शोधताहे...
मग्रूर श्वापदांनी वसण्यात अर्थ नाही!
दर-रोज पाकळ्यांचा करतो हिशोब आपण...
फुलण्यात अर्थ आहे,'असण्यात' अर्थ नाही!
असणे,असून नसणे..नसणे,नसून असणे...
कोड्यांत जिंदगानी,फसण्यात अर्थ नाही!
—सत्यजित
_______________________________________
बेफिकीरजींनी लिहिलेल्या गझलेच्या जमिनीवरुन सुचलेली रचना!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात है.... अतिशय
क्या बात है....
अतिशय सुरेख....
मस्त
मस्त
हे शहर माणसांचे माणूस
हे शहर माणसांचे माणूस शोधताहे...
मग्रूर श्वापदांनी वसण्यात अर्थ नाही!>>>> सुरेख! तुमच्या रचना नेहेमीच छान असतात.
वाह, सत्यजित, सुंदर रचना !
वाह, सत्यजित, सुंदर रचना !
पाऊस एकटा का दोषी सदैव ठरतो?
मुर्दाड ढेकळांना कसण्यात अर्थ नाही!
हे शहर माणसांचे माणूस शोधताहे...
मग्रूर श्वापदांनी वसण्यात अर्थ नाही!
असणे,असून नसणे..नसणे,नसून असणे...
कोड्यांत जिंदगानी,फसण्यात अर्थ नाही!
हे क्लासच !
नुसतेच आरश्यांच्या असण्यात अर्थ नाही...
लोकांस दाखवाया हसण्यात अर्थ नाही!
दर-रोज पाकळ्यांचा करतो हिशोब आपण...
फुलण्यात अर्थ आहे,'असण्यात' अर्थ नाही!
हे खुपच आवडले.
ही रचना नांवासह व्हॉटस्प्पवर मित्रांशी शेअर करण्याची परवानगी आहे का ?
कसण्यात आवडला
कसण्यात आवडला
एक मिनिट, ही जमीन माझी नाही.
एक मिनिट, ही जमीन माझी नाही. एका व्हॉट्स अॅप ग्रूपवर हा तरहीचा उपक्रम झाला व त्यात 'जाळुन उगी जिवाला जगण्यात अर्थ नाही' ही ओळ तरही म्हणून देण्यात आली होती. माझ्यापुरती मी ती ओळ 'जाळून ह्या जिवाला जगण्यात अर्थ नाही' अशी करून तरही गझल सादर केली होती. वरील गझल कोठेही फॉर्वर्ड करताना 'तरहीची ओळ मूळ बेफिकीर ह्यांची आहे' असा उल्लेख कृपया अजिबात करू नयेत ही विनंती!
सत्यजीत, गझल छान आहे, नंतर एक स्वतंत्र प्रतिसाद देईन वेळ मिळेल तेव्हा.
-'बेफिकीर'!
शशांकजी,moga प्रतिसादाबद्दल
शशांकजी,moga प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
सुरेख! तुमच्या रचना नेहेमीच छान असतात.>>>>अनेक धन्यवाद रश्मी!
बी बी चिंचवडेजी आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खुप धन्यवाद!
आ.सुप्रियाजी,
आपल्या रचना वाचत असताना,नेहमीच आपल्या प्रतिभेचे कौतुक किंबहुना आश्चर्यच वाटते मला.
मी केलेल्या लिखाणाच्या प्रयत्नांवरील,हा आपला पहिलाच प्रतिसाद,माझ्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे!
हार्दिक धन्यवाद!
आ.बेफिकीरजी, आपण एवढा
आ.बेफिकीरजी,
आपण एवढा खुलासेवार प्रतिसाद लिहिलात,हे आपले दिलदार मोठेपण आहे!
आपण लिहिलेली 'कापूर जीवनाचा करण्यात अर्थ नाही',वाचत असतानाच,मला या गझलेचा मतला सुचला,हे ही खरेच!आपल्या गझलेची पकडच अशी होती की,विचार सुचला तसा त्याच वेळी,त्याच जमिनीवर व्यक्त झाला!
आपले प्रतिसाद नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायक आहेत!
हार्दिक धन्यवाद!
वा..वा..सुंदर गझल.. !
वा..वा..सुंदर गझल.. ! आवडली.!
खुप शुभेच्छा..!
धन्यवाद श्रीगणेशा!
धन्यवाद श्रीगणेशा!
खूप छान
खूप छान
धन्यवाद कविताजी!
धन्यवाद कविताजी!
सुरेख गझल… पाऊस एकटा का दोषी
सुरेख गझल…
पाऊस एकटा का दोषी सदैव ठरतो?
मुर्दाड ढेकळांना कसण्यात अर्थ नाही!
सुर्रेख शेर…
शुभेच्छा.
खुप धन्यवाद वैभवजी!
खुप धन्यवाद वैभवजी!