वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

Submitted by उडन खटोला on 3 December, 2015 - 20:18

http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/9634...

मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...

मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...

गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..

भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा इथे पण नामांतर वाद (!) पण दुसरा कोणी गोयंकार सापडला नव्हता का? संभाजी महाराजांना इम्पोर्ट केले डायरेक्ट?

ते पोर्तुगीज, ख्रिश्चन जाऊ द्या, पण खरच् हे नामकरण चूकीचे आहे. आणी गोवा व केरळ या राज्यातले लोक घरटी १ या प्रमाणात परदेशात जातात/ असतातच. यात नवल नाही. दुसरी गोष्ट, गोवेकरान्वर पोर्तुगीजान्चे राज्य होते त्यामुळे त्यान्ची मानसीकता बदलणार नाही. आपली बदलली का? आपण आपल्या भाषेपेक्षा इन्ग्लिशला किती महत्व देतो?

गोव्यात हिन्दुन्ची सन्ख्या आता कमीच आहे, पण जे असतील ते पण नामकरण स्वीकारतील असे वाटत नाही.

मला आठवते त्त्याप्रमाNe सम्भाजी महाराजानी पोर्तुगीजान्च्या तावडीतून गोवा काही काळ स्वतन्त्र केला होता... त्यामुळे तेथिल सरकारचे हे पाउल योग्यच वाटते मलातरी

गोवा व केरळ या राज्यातले लोक घरटी १ या प्रमाणात परदेशात जातात/ असतातच. >>> हो पण केरळियन लोक भारतिय पासपोर्ट वर जातात परदेशी... गोवेकर पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी जातायत .... यातला फरक समजला नाही का तुम्हाला ?

पोर्तुगिजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले, तिथल्या खुप लोकांचे नातलग आजही पोर्तुगाल, ब्राझिल वगैरे देशांमध्ये राहतात. माझ्या ऑफिसात दोघिजणि होत्या ज्यांच्या घरात कोकणीपेक्षा पोर्तुगिज भाषा बोलली जाई. एकिचे ब्राझिलला रेगुलर जाणेयेणे होते. तिच्याकडुनच मला हे कनेक्षन कळले, नाहीतर आधी मला पोर्तुगिज गेल्यावर गोव्यातले लोक त्यांना विसरले असे वाटायचे.

देश सोडुन जर कोणी जात असेल तर त्याला विरोध करायचे किंवा असे जाणेर वाईट मानायचे काय कारण कळले नाही. कोणी जाहिररित्या मला इथे त्रास होतोय म्हणुन मी जातो म्हणत असेल तर ते प्रकरण वेगळॅ आहे, पण व्यक्तिगत कारणांसाठी कोणी जात असेल तर विरोध का?

कुठल्याही जागेचे नामांतर तिथल्याजनतेची मागणी असली तरच करणे योग्य. नामांतर लादणे अयोग्य आहे.

मुळात गोवा हे सुद्धा भारतातीलच एक राज्य आहे , आणि त्याला स्वातंत्र्य होऊन सुधा ५० वर्षे उलटून गेली आहेत , मग तरीही पोर्तीगीज नावाचा वापर का करावा.
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांची नावे ब्रिटीश सरकारने ठेवली होती ती बदलली आहेत , यावरून जास्त सांगायचे झाल्यास ब्रिटन मध्ये सावरकरांच्या काळात इंडिया हौस चे नाव त्यांनी भारत भुवन असेच घेण्यास सांगितले होते .

आता तर आपण स्वतंत्र भारतात राहतो मग प्रसिद्ध ठिकाणांची नावे हि भारतीयाच हवीत . आणि गोव्यातील नागरिक जरी पोर्तीगीच प्रभावित असले तरीही ते आता भारतीय आहेत (जर नागरिकत्व भारतीय असेल तर ) आणि त्यांना भारतीयांचा मन ठेवणे गरजेचे आहे .

<<<<<<<भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?>>>>>>>>>

भारतीयत्व रुजवायचे(?) असेल तर नाव बदलायचे , ही इतकी सोप्पी गोष्ट कशी कळत मला.

<<<<<गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे>>>> गोव्यात जितके पोर्तुगीज पासपोर्ट वाले आहेत त्यापेक्षा जास्त पुण्यात अमेरीकन आणि युके पासपोर्ट वाले आहेत.

संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती .

पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...

याबद्दल आपले काय म्हणने आअहे तोच्या म्हाराज ?

पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...

असल्या कमेंटी करणा-यांना पोर्तुगिजांचा इतिहास माहित नाही. क्रुरपणा करण्यात रशियाच्या बरोबरीने त्यांचा नंबर येईल. आणि हे बोलताना त्यांचा गेल्या १००० वर्षांचा इतिहस बघावा लागेल, फक्त आजचा नाही. केवळ युरोपात आहे म्हणुन कोणी सिविलाईज्ड होत नाहीत.

आपल्याकडे इतिहास जाणुन न घेताच बाता मारण्यची भारी हौस आहे लोकांना.

<<<<<<याबद्दल आपले काय म्हणने आअहे तोच्या म्हाराज ?>>>>>>>

माझ्या माहीतीत मी कधी कोणाला असे म्हणताना ऐकले नाही. तुम्ही काहीही त्याल, त्या बद्दल मी मत का व्यक्त करावे. आणि कोणी काही ही बोलावे ह्या मताचा मी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे. इथे माबो वर मोदीं पासुन सर्व पंतप्रधानां बद्दल वाट्टेल ते बोलले जाते. प्रत्येकाचे मत आहे. काय हरकत आहे?

औरंगजेबा च्या समाजसेवेबद्दल काय मत आहे? किंवा टीपू च्या कारवार भागातील दानधर्माबद्दल?

ते नामांतर होवो किंवा न होवो, पण पोर्तुगीज हे इंग्रजांपेक्षाही अत्यंत नीच होते यात शंकाच नाही.
माबोवरच गोवा मुक्तीसंग्रामाची गाथा दिलेली आहे. ती वाचा, म्हणजे पोर्तुगीजांचे प्रताप कळतील. Angry

उडन खटोला

वास्को द गामा या शहराला संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी नेमकी कुणी केली ? का केली वगैरे विचारत बसत नाही. कुणी केली तरी त्यामागचा अजेण्डा सहजच कळून येईल.

दुसरी गोष्ट म्हणजे मागणी करणारे भलतेच, त्यावर चर्चा तिस-याच ठिकाणी झालेली असताना आणि मूळ धागा इथला नसताना तिथल्या एखाद्याच्या कमेण्टवर मायबोलीवर दंगल का व्हावी ?

संभाजी महाराजांचं नाव औरंगाबाद आणि वास्को द गामा या दोन्ही शहरांना देण्यापेक्षा ते त्यांचं बालपण जिथे गेलं, ज्या परिसरात त्यांचं वास्तव्य राहीलं, लढाया केल्या आणि मृत्यूही झाला त्या पुणे शहरास देणं जास्त संयुक्तिक नाही का ?

जर मागणी करणारे खरोखरीचे शंभूप्रेमी असतील तर त्यांनी सारासार विचार करून त्यांचे नाव देण्यासाठी शहराची निवड करावी. जेणेकरून लाखो शंभूप्रेमींचा त्यास पाठिंबा मिळेल. नाहीतर यात राजकारण असल्याचा वास येतोच आहे. फेसबुकवरच्या चर्चेसाठी धागा काढण्याची काही एक गरज नाही. कुठेही प्रतिसादात किंवा बितंबातमी वर लिंक देण्याची सोय आहे.

कापोचे भाउ ,तुम्ही का एवढा त्रास करुन घ्यायलाय ? ज्याना करायचिय ते करतिल की चर्चा!

सम्भाजी महाराजान्चे नाव वास्को शहराला देण्यापाठी एक इतिहास आहे... तुम्हाला माहित नसल्यास माबो/मिपा वरची " आमचे गोयं" हे गोवा टीम लिहित लेख वाचा असा फुकटचा सल्ला

तुम्ही तरी का त्रास करून घेता ?
इतिहास नीट माहीत करून घ्या आणि कुठल्या शहराला नाव देणं जास्त संयुक्तिक होईल याचा अर्थ भाषा विभागात विचारा.

महेश

प्लीज एक्स्प्लेन. तुमचे लाडके ट्रोल्स उडाल्याचा राग काढताना तारतम्य ठेवत चला जरा. ते आयडी उडाले म्हणून हा आयडी उडायला हवा या द्वेषामुळे तुम्हाला भरकटवणे कशाला म्हणायचे हे समजेनासे झालेले दिसतेय.

विषय गोव्याचा, आणि नाव बदला म्हणे पुण्याचे, काही संबंध आहे का ?
आणि हो ते बाकीचे ट्रोल्स, उडणे, इ. बद्दल मला काहीच माहिती नसल्याने, काहीही लिहिलेत तरी मला काही फरक पडत नाही. Happy
अजुन एक विषय भरकटवण्याचा मोठा नमुना.

महेश

तुमचा विरोध आहे का पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यायला ? का ते सांगा.
विषय संभाजी महाराजांचं नाव एखाद्या शहराला देण्याचा आहे. तुम्हाला चांगलं माहीत आहे. वेड घेऊन पेडगावला जाऊ नका. महाराजांचा संबंध पुण्याशी जास्त आला की गोव्याशी ? की औरंगाबादेशी ?

मा. अ‍ॅडमिन
महेश यांच्या आयडी उडवण्याच्या प्रयत्नाकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो.

मा. अ‍ॅडमिन

महेश यांनी या चर्चेत आतापर्यंत कुठेही भाग घेतलेला दिसत नाही. एक शब्दही त्यांनी वाचलेला नाही असं दिसतंय. केवळ आकसापोटी, माझा पिच्छा करून ते तक्रारी करत आहेत. या पूर्वी आपण उडवलेल्या अनेक आयडींच्या भरकटवण्याच्या उद्देशात ते स्वतः सामील असत. या आयडीच्या असल्या प्रकारांची आपण नोंद घ्यावी ही विनंती.

कोणीतरी वर असे लिहिले आहे की सम्भाजीने गोवा जिन्कला होता असे असेल तर तो परत पोर्तुगीजान्च्या हाती कसा व कधी गेला. शिवाय सम्भाजीने गोवा जिन्कल्यावर परत तो पोर्तुगीजान्कडे १९६१ पर्यन्त होताच ना? मग त्या स्वतन्त्र करण्याचा काय उपयोग झाला?