मुलांच्या विचीत्र सवयी आणि त्यावरील उपाय

Submitted by मुग्धा केदार on 1 December, 2015 - 07:27

माझा मुलगा दिड वर्षाचा आहे. त्याला एक विचित्र सवय आहे. खालचा ओठ वरच्या दाताखाली घट्ट दाबुन ठेवतो. काही बोलताना किंवा खाताना सोडुन बाकीवेळ तसाच असतो, आपण सांगितल की तेवढ्या पुरता ओठ काढणार पुन्हा तसचं, झोपताना पण आणि झोपेत पण तसचं, आणि झोपेत तो ओठ चोखतो,अगदी आवाज येईपर्यंत. बरेच उपाय केले, कारल्याचा रस/ बारिक किस, कोरफडीचा गर जेवढ्या वेळा मी लावलं त्याने लगेच चाटून टाकलं. आणि पुन्हा तेच. आता एका ओळखीच्या डेन्टीस्टने सांगितलयं की सर्जिकल स्पिरीट लाव त्याच्या ओठाला..ते कडु असतं आणि त्याने ओठ जडावल्यासारखं होईल असं ती म्हणाली. पण असं केमिकल ओठाला लावणं कित्पत योग्य आहे. पेडी.ला विचारल तर ते सांगतात ती सवय आपोआप जाईल.
सगळे घरातले म्हणतात की त्याचा खालचा ओठ बारीक होईल.
मला आता काळजी वाटतेय कृपया मदत करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा, तुमच्या मुलाशी खेळायला आजूबाजूला लहान मुले असतील तर त्याला जास्त वेळ त्यांच्याशी खेळू द्या. घरातल्या माणसांनीही त्याच्याशी जास्त बोलले पाहिजे. शेजारपाजारच्या घरीही थोडा वेळ नेत जा. डे केअर मधे असेल तर तिथे त्याचे मन रमते का हे एकदा बघा. एकटं पडल्यावर काही मुलांना अशा सवयी लागल्याचं साधारण निरीक्षण आहे. मूल जितकं जास्त खेळकर, इतरांत रमणारं होईल तशी ही सवय विसरून जाईल. असंच असेल असं नव्हे, एक शक्यता. शुभेच्छा! Happy

मुग्धा, माझ्या भाच्याला हीच्च सवय होती आणि आम्ही सगळे तुझ्यासारखेच परेशान होतो. डॉक्टरने सांगितलेलं बरोबर आहे. ती सवय आपोआप गेली नंतर. (जेव्हा सगळे सवय घालवायचा प्रयत्न करत होते तेव्हा किंचित फरक पडला नाही, नंतर मात्र ओवरनाइट कोणत्याही कारणाशिवाय सुटली ती सवय). सो डोंटच वरी. काही होणार नाही या सवयीमुळे, खालचा ओठ किंचित जाड होण्याशिवाय. ( तु लिहिलं आहेस बारीक होइल, तर तो उलट जाडसर होतो, सतत दातात दाबुन धरल्यामुळे).

आशुडी म्हणाली तसं आम्ही त्याला खेळण्यात गुंगवायचो, म्हणजे ओठ मोकळा राहिल. पण लेगो खेळताना, चित्र खरडताना, ओठ सतत गच्च पकडलेला. गप्पा मारल्या किंवा हसला तरी किंचित स्मित, म्हणजे ओठ सोडायला नको. Happy गेली ती सवय. तु नको काळजी करुस.

बर्‍याच लहान मुलांना मजेदार सवयी असतात. मला छंदच आहे त्या पहायचा आणि लिस्ट डाउन करायचा.....त्याची कारणं, परिणाम जाणुन घ्यायचा. पण त्या हळुहळु बंद होतात जेव्हा मुलं मोठी होवुन दुसर्‍या गोष्टींमधे रमली कि या सवयी सुटतात आपोआप.

माझ्या भाच्याला झोपताना शेजारच्याचे कोपर पकडायची सवय होती पण ती हळुहळु गेली.
आता माझी लेक ती झोपताना माझा कान पकडते, मी पण तिची ही सवय बंद होण्याची वाट बघत आहे.

अशा सवयी वाढत्या वयाबरोबर आपोआप जातील. सतत त्याबद्दल बोलणे टाळा, कारण मग नको सांगताहेत ना म्हणून मी जास्तच करेन, अशी खोड या वयात असते. बाहेरुन काही लावायचे उपाय मात्र शक्यतो करू नका.

खेळताना, मित्रांशी बोलताना कधी कधी मित्रच त्याची जाणीव करून देतील ( पण यावरून अति चिडवणे होणार नाही, याकडे लक्ष ठेवा )

ओठ / अंगठा चोखणे
एकादी अती आवडती सॉफ्ट टॉय, ब्लँकेट वगैरे कायम हातात लागणे.
डोळे मिचकवणे
इ. सवयी मुलांना लागतात, त्या आपोआपच जातात. त्या सवयीबद्दल वारंवार बोलून दाखवलं, तर ती सवय रीइन्फोर्स होते असं दिसतं.

दुर्लक्ष करा.
मुलाला १-१.५ वर्षाचा असताना वरचे आणि खालचे दात एकमेकांवर घट्ट दाबून action करायची सवय होती. तुमची पोस्ट वाचल्यावर लक्षात आलं की ती सवय आपोआप गेली की. सो डोंट वरी.

वर सर्वांना अनुमोदन. माझ्या मुलाला स-त-त एक निळं ब्लँकेट हातात लागायचं. त्याचं 'पोपो' नाव ठेवण्यात आलं होतं. आता मध्यंतरी घर आवरताना ते ब्लँकेट त्याला दाखवलं तर आठवण सुद्धा नव्हती Happy

माझ्या मुलीला तिचे एक सॉफ्ट टॉय जवळ असल्याशिवाय झोप यायची नाही. किंवा कसलीही खवळली असली तरी त्या सॉफ्ट टॉय संबंधीत संभाषण सुरू केल्यावर शांत होई. सगळे नातेवाईक याविषयी चिंता बोलून दाखवत की मोठेपणीही हीच सवय राहील!

तर आम्हाला दुसरेच टेन्शन. आमचे टेन्शन हे की हे टॉय कुठे हरवले किंवा कालांतराने ते फाटून गेले तर असलेच सेम टू सेम दुसरे कुठे मिळेल! पण नवल हे की तिची हीही सवय आश्चर्यकारकरित्या गेली. आता तर ते टॉय आणि आपण त्या गावचेच नाहीत असे असते.

खालचा ओठ चोखायची सवय माझ्याही लेकाला आहे. घरातल्या बर्‍याच मेंबरांनी माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष्य करून त्याला त्यासवयी वरून सारखं बोलल्यामूळे सवय वाढलीये. घरच्यांना हे अगदी आत्ता आत्ता पटायला लागलंय. हल्ली फक्त रात्री झोपताना किंवा झोपेत ओठ चोखतो.

मला स्वतःला लहानपणी एक शाल सतत जवळ ठेवायची सवय होती. नंतर नंतर घरी सगळे त्या शालीला 'बोळा' म्हणायचे. त्या बोळ्याला जसा वास यायचा तसा दुसर्‍या पांघरूणाला येत नाही म्हणून मी तोच घेऊन बसायचो (म्हणे). एक दिवस आज्जीने माझ्या समोरच उचलून कचर्‍याच्या बादलीत टाकून दिला!! मग मी दुसरी शाल घ्यायला लागलो. Proud पुढे ती सवय पण सुटली.

माझ्या मुलीला अगदी लहान असताना तिचं तोंड पुसायचं रूमाल सदृश फडकं तोंडात घालून झोपायची सवय होती. ती कधी लागली हे ही आम्हांला कळलं नाही. ते फडकं आम्ही कधी कधी.पॅसिफायर सारखंही वापरायचो. पेडी आणि घरातल्या ज्येनांव्यतिरिक्त बाकी सगळ्यांनी भयंकर काळजी व्यक्त केली होती त्या फडक्याबद्दल. (दात पुढे येतील, मागे जातील, फटी पडतील, खालचा ओठ मोठा होईल / लहान होईल वगैरे वगैरे) पुढे आम्ही ते फडकं खराब झालं म्हणून गायब केलं. मग ती सवय सुटली.

एकंदरीत अश्या सवयी आपोआप सुटत असाव्यात.

माझ्या मुलिला पण अगदी १०-११ महिन्याची असताना एक फेवरेट बेबी ब्लॅन्केट आणी त्याच लेबल हातात लागायच वर तोडात अन्गठा असायचाच ... इथे धुळ माती फार नसल्याने खराब व्हायची चिन्ता नसायची , तशातच देशवारी झाली मग काय वॉलमार्ट मधुन ६ ब्लॅकेटचा गठ्ठा घेवुन गेलो होतो.. मी व्हिसा मुळे अडकल्याने आम्ही ४ महिन्यात त्या सगल्यच पोतेर करुन सवय सोडुनच आलो... अन्गठा सोडवायला मात्र वेळ लागला..... तिने आपोआप सोडला.

आपोआपच सुटतात ह्या सवयी.
ह्या वरून आठवले भाच्याला त्याच्या आईच्या ओठांशी खेळायची सवय होती. वैतागली होती बिचारी. ... त्याला झोप आली कि आई चा ओठ .
दुसर्या एका मुलीला आपला हात कोपरापाशी चावायची सवय होती. लिटरली चावणे. सतत जखम असायची . ..

सगळ्यांचे सल्ले बरोबर आहेत. पटले.
पण माझी मात्र एक सवय अजुनही सुटली नै बर्का.... अजुनही किचकट बारकाईचे काम करताना आपसुक जीभेचा शेन्डा ओठाबाहेर येतो.... Proud
(हो, पण ओठाबाहेर येऊन तिथेच थांबतो, बाकी कै करीत नै... हो ना, नैतर लग्गेच दिडमा वगैरे लोक येऊन पुढचे विचारु लागतील म्हणून आधीच डिस्क्लेमर देऊन ठेवतोय Wink )

मी सुध्ध्हा अजुनही काहीक वेळा काही काम करताना ओठ मुडपते. उदा. अगदी नीट अक्षर काढताना, एखादा फॉर्म भरताना, रेखीव काहीतरी करताना इइ.

दुसर्या एका मुलीला आपला हात कोपरापाशी चावायची सवय होती. लिटरली चावणे. सतत जखम असायची >>>
हम्म पहिल्यांदा विचार आला की कोपराजवळ तोंड पोहोचलेच कसे? हे इंपॉसिबल आहे, नंतर लक्षात आलं की कोपराजवळ पण आतल्या बाजुने असेल,
you can't lick your elbow.... (NG वर ह्या टायटलचा एक प्रोग्रॅम आहे)

माझ्या मुलाला झोपताना अंगठा चोखायची सवय होती, सुमारे चार वर्षाचा होईपर्यंत. आम्ही खूप उपाय केले, ढिम्म काही झालं नाही. एक दिवस आपोआपच गेली त्याची ती सवय.

त्यालाच कशाला, मलाही सहा वर्षाची असेपर्यंत एकच एक स्पेसिफिक रुमाल लागायचा झोपताना. पार विरला, फाटला होता तो. तरीही लागायचाच. मग एक रात्री अचानक मीच त्याला सोडचिठ्ठी दिली. तो रुमाल अजूनही आठवतो मला Proud

काहीतरी वेगळा नाद लागला किंवा डोक्यात काही आलं की आपोआप विसरलं जातं आधीचं. असं मोठ्यांचं होत नाही Happy त्यापेक्षा हे बरंय ना? लहान मुलांचं म्हणजे बीत गयी बात गयी. त्यामुळे काळजीचं कारण नाही.

माझा मुलाला टि शर्ट तोन्डात घालायचि सवय होति मि त्याचा टि शर्ट femite लावले दुस र्या दिव्सापसुन बन्द झाले femite हे medical मधेमिळते. अंगठा चोखणे घाल्विन्या साठि

यावरून आठवले, माझ्या मुलाला costco मधून आणलेल्या चोच असलेल्या उशीला घेउन झोपायची सवय होती. चोच तोडात घेउन झोपायचा तो, त्यामूळे ती उशी खूप घाण व्हायची, खुपदा त्याची ही सवय घालवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ… शेवटी बायकोने ती उशी फेकुन दिली. त्या रात्री माझं पिलू 'उची'… 'उची'… (उशी) करत घरभर शोधत होता पण झोप अनावर झाली आणि झोपला. एक दोन दिवस त्याने उशीचा शोध घेतला पण नंतर त्याची सवय सुटली ती कायमची.

हो कोपराजवळ आतल्या बाजूने.
ह्या अगदी वेगळ्या सवयी म्हणून आठवल्या.

अंगठा चोखणे ही खरंच भयानक सवय आहे. काहीजणांची आपोआप सुटते पण काही मोठे झाले तरी गुपचुप अंगठा चोखतातच. माझ्या आत्तेबहीणीला अजूनही (वय वर्षे २९) रात्री झोपताना अंगठा चोखायची सवय आहे.

अंगठा चोखण्यावर एका आईने केलेला अफलातून उपाय - मुलगा साधारण १० वर्षाचा झाला तरी अंगठा चोखणं सोडेना. अंगठ्याला कडू लावणं वैगेरे सगळेच उपाय झाले पण तो इतका हुशार की हात धुवून पुन्हा अंगठा तोंडात. शेवटी तिने मुलाच्या सगळ्या पॅँटमधल्या इलॅस्टीक काढुन टाकले. त्याची जाम पंचाईत झाली.. अंगठा तोंडात घातला की पँट खाली. Proud त्यामुळे सतत पँट पकडून त्याची अंगठा चोखायची सवय सुटली.

माझ्या लेकाला, हातावर झोपण्यची सवय आहे. मी आणी त्याचा बाबा आलटुन पालटुन Traffic Police होतो कारण त्याला आमच्या सरळ हाताची उशी करुन झोपण्यची सवय आहे.

एका बहीणीला चादरीचे सुत नाकात घातल्याशिवाय झोप यायची नाही तर दुसर्या बहीणीला स्वतःचे केस उपट्ल्याशिवाय. काळानुरुप या सवयी जातात.

एका बहीणीला चादरीचे सुत नाकात घातल्याशिवाय झोप यायची नाही तर दुसर्या बहीणीला स्वतःचे केस उपट्ल्याशिवाय Lol

माझ्या मुलीला नख खाण्याची सवय आहे. काही केल्या जात नाहीये.

अंगठा तोंडात घातला की पँट खाली. >>>> कसे काय्?:हहगलो: इलॅस्टीक काढले तरी पॅन्ट च्या नेफ्यात नाडी नव्हती का?:फिदी:

Pages