थ्रील थरार

Submitted by Abhishek Sawant on 26 November, 2015 - 07:14

रोहीत एक महाविद्यालयीन युवक, साधा सरल मनमिलाऊ. रोहीत कर्नाटकमधील विजापूर मध्ये त्याचे महाविध्यालयीन शिक्शन घेत होता. तो शहरात वाढल्याने त्याला ग्रामीण भागाविषयी कुतूहल असे, एका खासगी वस्तीग्रहात रहात असताना त्यची एका मुलाबरोबर मैञी झाली जय असं त्याचे नाव होते. जय हा तिथुनच १५-२० किमी वर असलेल्या गावात रहायचा. पावसाल्याचे दिवस हीते पण पाऊस काय झाला नव्हता, जय च्या गावात खुप चोरी होत होत्या एका विशिष्ट जातीचे लोक हे दरोडे घडवुन आणताहेत अशी अफवा पसरलेली होती. ते लोक खुप क्रुर आहेत आणि त्यांच्याकडे धारधार शस्त्र आहेत अश्या आणि काही भरपुर अफवा पसरवल्या जात होत्या. जय चे घर अगदिच आडरानात असल्याने आणि त्यांच्या वस्तीवर जेमतेम ५-६ पुरुष असल्याने त्याना चोरांची खुप भिती असायची. त्यामुले जय आजकाल मुक्कामाला गावाकडे जात असे. जय आणि रोहीत ची मैत्री तशी फार जुनी नसली तरी खुप चांगली होती. एक दिवस जय ने रोहीतला त्याच्या घराकडे येण्यासाठी आग्रह केला. रोहीत तसा लाजरा कुणा अनोलखी व्यक्ती बरोबर बोलायचे म्हणले तरी त्याला नकोसे व्हायचे पण आपण कोनत्यातरी खेडे गावि जानार या विचाराने तो आनंदी झाला. शिवाय रोहित ३-४ वर्षांपासुन व्यायाम करत असल्या मुले त्याचे शरिर बलवान झालेले अगदी त्याला पाहिलं तरि एखादा माणुस भितीने मागे सरेल असे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users