Submitted by निशिकांत on 16 November, 2015 - 00:37
मी हवा होईन,तू हो गंध जाईचा
दरवळू दे मार्ग अपुल्या वाटचालीचा
जो भ्रमर मधुगंध लुटणे जाणतो त्याला
अर्थ का कळतो समर्पित भाव प्रीतीचा
सोडुनी आकाश रिमझिमतो धरेवरती
ढग भुकेला घ्यावयाला गंध मातीचा
निश्चयाने आसवांना कैद करताना
पाश तुटला वेदनांच्या सावकारीचा
श्वास जेंव्हा थांबतो या देहयष्टीचा
अंत होतो जीवनाच्या साठमारीचा
वाल्मिकी रामायणाचा व्हायचे नाही
का अधी धंदा करू मी वाटमारीचा ?
वेदना घोंगावते अंतिम क्षणाला पण
काळ असतो डॉक्टरांच्या भरभराटीचा
राज्यकर्त्यांची नकोशी सावली वाटे
खानदानी रोग त्यांना लाचखोरीचा
वेगळेपण सोडले "निशिकांत"ने जेंव्हा
जाहला आहे प्रवासी जगरहाटीचा
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>वेदना घोंगावते अंतिम
>>>वेदना घोंगावते अंतिम क्षणाला पण
काळ असतो डॉक्टरांच्या भरभराटीचा<<< खरे आहे.
गझल फार आवडली. सुंदर!
निश्चयाने आसवांना कैद
निश्चयाने आसवांना कैद करताना
पाश तुटला वेदनांच्या सावकारीचा>>>>>>मस्त! आवडली.
सुर्रेखच ....
सुर्रेखच ....
आवडली
आवडली
सर्वांचे मनापासून अभार
सर्वांचे मनापासून अभार प्रेरणादायी प्रतिसादासाठी. बेफिजी शुक्रिया.
मतला जाईच्या गंधाइतकाच
मतला जाईच्या गंधाइतकाच तरल!
>>>सोडुनी आकाश रिमझिमतो धरेवरती
ढग भुकेला घ्यावयाला गंध मातीचा<<<
>>>निश्चयाने आसवांना कैद करताना
पाश तुटला वेदनांच्या सावकारीचा<<<
>>>वाल्मिकी रामायणाचा व्हायचे नाही
का अधी धंदा करू मी वाटमारीचा ?<<<
हे तीन विशेष आवडले!
गझल छानंच...धन्यवाद!