मधूमेही लोकांसाठी नाश्ता(सकाळचा, संध्याकाळचा)

Submitted by झंपी on 14 January, 2013 - 18:15

इथे मधूमेही लोकांसाठी झटपट नाश्ता सुचवा.

एकत्र संकलित करु शकतो. आधीच धागा असेल तर हा उडवेन..

तांदूळ, ब्रेड, बटाटा,मैदा,पास्ता ह्या पासूनचे पदार्थ नकोत तसेच गोड साखर, गूळापासूनचे, तेलकट, तूपकट पदार्थ नकोत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुमेह तज्ञ आहेत ते दोन हिरेमठ वेगळे. पुण्यात नाहीत ते. यातले एक वैद्य आहेत, हुबळीला. दुसरे जे आहेत त्यांचं आद्याक्षर एम वरून आहे. शहर लक्षात नाही. एक ज्येष्ठ हिरेमठ शेजारी आहेत, ते या सर्वांना चांगले ओळखतात.

ग्रीन स्मूदी ब्रेफाला चांगली. भारतात मिळणार्‍या पालेभाज्या - पालक / चाकवत / करडई / चुका / चवळई / राजगिरा / माठ / लेट्यूस + दुधी भोपळ्याच्या साल काढून काही फोडी, तुळस - पुदिना - कोथिंबीर - कढीपत्ता पाने, आल्याचा तुकडा हे सर्व मिक्सरमधून स्मूथ पेस्ट करून घेणे. चवीला मिरपूड, सैंधव, दालचिनी पूड व लिंबाचा रस. कपभर किंवा पाऊण कप स्मूदीही पोटात चांगली गप्प बसते. यात किसलेले सफरचंद / पपई / पेरू / पेअर वगैरेही घालता येतील.

मी मोड आलेले मूग, घेवडा, कोबी असेही काहीबाही मिसळून पाहिले. परंतु त्यांची किंचित कडसर चव आली.

अकु,

ह्यावर्षी दिवाळी अंकांमधे मधुमेहावर छानच माहिती आली आहे. त्यात त्यांनी आवर्जुन सांगितले आहे की दुधीचा रस घ्यावा आणि एक स्टीवीआ नावाची वनस्पती असते तिची पाने गोड असतात ती खायला सांगितली. इथे https://en.wikipedia.org/wiki/Stevia वाचा. ह्या वनस्पतीचे मराठी नाव माहिती आहे का?

हिरेमठ ह्यांचे एक भाषण ऐका: https://www.youtube.com/watch?v=NN53VuhxgdE

मी मोड आलेले मूग, घेवडा, कोबी असेही काहीबाही मिसळून पाहिले.>>>>>> मी हे थोडेसे शिजवून घेतले होते. आवडले.पडवळ आणि घेवडा यांची चव मात्र जरा कडवट लागते.

ह्यावर्षी दिवाळी अंकांमधे मधुमेहावर छानच माहिती आली आहे.
>>
अरे कोणत्या दिवाळी अंकात आहे त्याचे नाव नको का सांगायला?

रॉबीनहुड, डायबेटीस मित्र असे नाव आहे. पण हा दिवाळी अंक नाही. त्याच्या स्टॉलवर होता इतर दिवाळी अंकासोबत.
ह्याचे फेबु पान पण आहे: https://www.facebook.com/Diabetes-Mitra-397108363806617/?fref=nf

साईट पण आहे: http://www.heartfriendly.org/

डॉक्टरांचे नाव आहे डॉ. श्रीकांत मुंदडा.

बी, लिंकसाठी धन्यवाद! दुधी खरोखर बहुगुणकारी आहे. कच्चा किंवा शिजवलेला, दोन्ही प्रकारे आहारात दुधी असणे हे काही पथ्यांमध्ये हितावहच आहे.
मी स्मूदीत स्वादासाठी कधी ओव्याचे पानही घालते. पण फार प्रयोग करत नाही. अन्यथा ज्येना स्मूदी घेण्यास खळखळ करतात.
सफरचंद व आवळा किसून त्यांचे एकत्र मिश्रण / सॅलडही छान लागते चवीला. हवे असल्यास वरून किंचित तेलाची फोडणी.
किसलेल्या कोबीत सैंधव, मिरपूड, आवडत असल्यास जिरेपूड घालून वरून तेल, मोहरी, हिंग, किंचित हळद, किंचित तिखट, कढीपत्त्याची फोडणी गार करून घालायची. वरून लिंबाचा रस. या सलादमध्ये आवडीनुसार कोथिंबीर, ओला नारळ, अक्रोड, मोड आलेले हिरवे मूग, डाळिंबाचे दाणे घालू शकता.

ज्वारी / नाचणी / बाजरीच्या लाह्या किंवा पफ्स बाजारात सहज मिळतात. त्यांचा फोडणी घालून चिवडा किंवा त्या जरा किंचित तुपावर भाजून त्यांत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून त्यांची भेळ बनवून खाता येते. नुसत्या भाजलेल्या लाह्याही तूप + मीठ घालून छान लागतात. वरून कोथिंबीर, कांदा, मेतकूट वगैरे आवडीनुसार भुरभुरायचे.

रीन स्मूदी ब्रेफाला चांगली. भारतात मिळणार्‍या पालेभाज्या - पालक / चाकवत / करडई / चुका / चवळई / राजगिरा / माठ / लेट्यूस + दुधी भोपळ्याच्या साल काढून काही फोडी, तुळस - पुदिना - कोथिंबीर - कढीपत्ता पाने, आल्याचा तुकडा हे सर्व मिक्सरमधून स्मूथ पेस्ट करून घेणे. चवीला मिरपूड, सैंधव, दालचिनी पूड व लिंबाचा रस. कपभर किंवा पाऊण कप स्मूदीही पोटात चांगली गप्प बसते. यात किसलेले सफरचंद / पपई / पेरू / पेअर वगैरेही घालता येतील. ----
अजुनही काही रेसिपीज असतील तर द्या, तसेच पालक / चाकवत / करडई / चुका / चवळई / राजगिरा / माठ / लेट्यूस हे सर्व एकत्र करायचे का??

कच्या भाज्या , सॅलड वगैरे खाण्याचा कंटाळा येत असेल तर गाजर, बीट, फ्लॉवर वगैरे तुकडे जरासे वाफवून अजून समजा आवडीच्या भाज्या असतील तर त्या. घ्यायचे, त्यावर वाटल्यास थोडे तूप, मिरपूड व किंचित मीठ घालून खायचे. किंवा मिश्र भाज्यांचे सूप. सूप मधे आवडत असल्यास पालक, व दाटपणा येण्यासाठी मुगाची डाळ घालू शकतो. लसणाची तुपाची फोडणी द्यायची किंचित तूप फक्त चवी पुरते. हा प्रकार मधल्या वेळेत पोटभरीचा.

Pages