दयाळू टिपू आणि त्याची जयंती ??????????

Submitted by रमेश भिडे on 12 November, 2015 - 23:30

१७८५ आणि १७८६ साली टिपुने पेशव्यांचे मांडलिक असलेल्या नरगुंद आणि कित्तूर या दोन संस्थानात दंगा करायला सुरुवात केली , खरे तर टिपूकडे पेशव्यांचे येणे असताना मराठे टीपुकडे तगादा लावू लागले ,पण त्याच वेळी एकीकडे आपला वकील मराठ्यांकडे पाठवून दुसरी कडे नरगुंद वर टिपुने हल्ला चढवला , काळोपंत आणि भावे अगतिक होवून १७८५ ला शत्रूच्या स्वाधीन झाले , सर्व कैदी माणसास ,विशेषतः ब्राह्मणास मुसक्या बांधून रस्त्याने हाल करीत तुरुंगात डांबले ,इतकच नव्हे तर ग्रांड डफ म्हणतात "कालोपंताची कन्या नारो दादाजीची सून सुस्वरूप आहे , ती नबाब घेणार "आणि नरगुंदकरांची कन्या टिपुने आपल्या जनानखान्यात ठेवली.
यापुढे जावून कित्तूरचे संस्थानिक जे देसाई यांची बायकामुले आणि आणि कारभारी गुरुनाथ पंत यासं कैद केले , एक कानडी लेखक म्हणतो "लिंगाइतके चांगले बायका धरिले ,तमाम सुंदर बायका बारा वाट पळून गेले ,बायका धरावयास कारण ,टिपुने पालक मुलगे बाळगले आहेत ,त्यांस स्त्रिया करून देणेस नेतात " देसायाचा वाडा खणून त्याने भांडेकुंडे,दागदागिने वगैरे सर्व संपत्ती हरण केली ,संस्थानातील रयतेस पूर्णपणे नागवले ,सुंदर बायका व दांडगे जवान पुरुष बाटवून टिपुने आपल्या जनानखान्याची व फौजेची भरती केली ,हा प्रकार अत्यंत जाचक झाला ,( खरे २८१३,२८१८,२८२८-३०,२८३४-३६,)
यानंतर मात्र खुद्द आज्ञापत्र निघाले ते इथे देत आहे.
रियासतकार सरदेसाई म्हणतात " टिपू सुलतानाचा जन्म १७५३ देवनहल्ली , बापाने त्याला चांगले शिक्षण देवून सुविद्य केले , लिहिणे वाचणे ,घोड्यावर बसणे ,शत्रास्त्र चालवणे इत्यादी कामे त्यास चांगली अवगत असून शौर्य आणि महत्वकांक्षा त्याचा अंगी उत्कट होते पण त्याच बरोबर फाजील धर्मवेड ,वृथाभीमान ,क्रूर स्वभाव व सर्वज्ञतेचि घमेंड कित्येक गुण त्याच्या ठिकाणी असल्याने तो बापासारखा लोकप्रिय झाला नाही ,मलबार प्रांतात १ लक्ष हिंदू त्याने बळजबरीने मुसलमान केले आणि त्यांची देवालये पाडून त्याठिकाणी मशिदी बांधल्या "
एकंदरीत जयंती,स्मृतीदिन साजरा करताना ,त्या व्यक्तीपासून काही प्रेरणा घेवून येणाऱ्या पिढीने चांगले काम करावे असे अपेक्षित असते , आता राजकारणात हा दोन्ही बाजूंचा विचार करून मगच मुल्याधीष्टीत इतिहास लिहिला पाहिजे ,टिपुच युद्ध करण हे एकवेळेस गृहीत धरता येयील परंतु क्रूरपणा ,विकृत धर्मवेड हे कोणत्याही माणूसकीच्या मूल्यात बसत नाहीत , आणि अशा व्यक्तीच जर आपण उचलून धरलं ,तर नक्कीच समाजाला आपण मागे नेत आहोत.

लेख प्रतिलिप्याधिकार-
शिवराम कार्लेकर ,पुणे
संदर्भ :- मराठी रियासत ,उत्तर विभाग २
ऐतिहसिक लेख संग्रह भाग ६

(पूर्वानुमतीनुसार पुनर्प्रकाशित)*

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कानडी लोकांना 'टिपू' बद्दल प्रेम, आदर वाटत असेल तर त्यांनी जरुर त्याची जयंती/पुण्यतिथि साजरी करावी. तसेही श्रीरंगपट्टणमला त्याच्या समाधीवर नमाज पढणार्‍यांची कमी नाही.

आणि कॉंग्रेजने २० नोहेंबरला टिपू सुलतान याची जयंती असताना ती दिवाळीत साजरी करुन ह्या जयंती कार्यक्रमाला राजकीय वळण दिले आणि स्वत:ची लांगुलचालण करण्याची परपंरा अखंड ठेवली. या जयंतीच्या विरोध प्रदर्शानात झालेल्या पोलीसी कारवाईत तीन विहीप कार्यकर्त्यांचा हकनाक बळी गेला.

(पूर्वानुमतीनुसार पुनर्प्रकाशित)
- बरं! कुठेय ती अनुमती?

बाकी परवा मी पण माबोवर लिहिलं होतं. टीपू सुलतानची जयंती अचानक राज्यव्यापी साजरी करण्याचं आमच्या राज्य सरकारला काय प्रयोजन निघालं?

तिकडे साऊथ कर्नाटकात तो 'हिंदुविरोधी' म्हणून मोर्चे निघाले आणि एकाचा मृत्यू झाला.
इकडे नॉर्थ कर्नाटकातल्या आमच्या गावात टिपू 'ब्राह्मणप्रेमी आणि लिंगायतविरोधी' म्हणून मोर्चे निघाले.
खरे काय ते टीपूच जाणे.
पानेच्या पाने भरून टीपूंच्या जाहिराती होत्या.
'शत्रूसमोर झुकण्यापेक्षा मी मरण स्विकारेन' हे त्याचे वाक्य जागोजागी कोट करून लावले होते.
सगळ्या सरकारी जाहिरातींत टीपू 'सर्वधर्मसमभावी, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा (कुठल्याश्या रॉकेट तयार करायला पैसे पुरवले म्हणे), शिस्तप्रिय , दृष्टा अनुशासक(सारा वसूलीची शास्त्रशुद्ध पद्धत शोधून काढली म्हणे) असं काय काय लिहिलेलं होतं.
खरं खोट काय वाचायला पाहिजे .
कारण लहानपणी टिपू सुलतान सिरीयलीत रूवाबदार हैदर अली वारले आणि तो पिचपिच्या संजय खान का कोण बघवत नव्हता म्हणून सोडूनच दिली होती ती सिरीयल! Wink
बाकी इकडच्या बहुसंख्य मुस्लिम जनतेला टीपू सुलतानच्या जयंतीबाबत काहिही घेणे देणे नसल्याचंही लक्षात आलं.

भारताच्या इतिहासात युद्धात सर्वप्रथम क्षेपणास्त्र वापरण्याचा मान टिपूला जातो. अशी थोर वैद्नानिक प्रवृत्ती बाळगल्याबद्दल टिपूचे कौतुक आहे.

खरे २८१३,२८१८,२८२८-३०,२८३४-३६,..

..

हे नेमके काय आहे ?

असे काय घडले गेल्या महिनाभरात कर्नाटकात की कर्नाटक सरकारला त्याची जयंती सर्वाजनिक स्वरुपात साजरी करावी लागतेय.

शृंगेरी शंकराचार्य मठ मराठ्यांनी लुटला होता ना ?

टिपू दुष्ट होता तर त्याच्या प्रांतात शंकराचार्य व मठ कसे शिल्लक राहिले म्हणे ?

टीपू सुलतानाचे धर्मांध अत्याचार पराकोटीचे अपरिमित वाढले तेव्हा सातारच्या छत्रपतींचे अखत्यारीतील मराठ्यांनी इंग्रजांच्या मदतीने टीपूचा नायनाट केला. Happy टीपूला "थोर" ठरविणारे, पर्यायाने सातारच्या छत्रपतींचाही अपमान करीत आहेत हे त्यांना माहित असेलच.

ह्या टिपुभाईचे कौतुक काय तर म्हणे तो ब्रिटिशाविरुद्ध लढला . पण तो का उपकार म्हणून लढला काय? त्याचे राज्य वाचव ण्यासा ठी त्याला तसे करणे भागच होते. याचा अर्थ तो इथल्या बाकी सल्तनतींचा मित्र होतो काय? किंवा इथल्या लोकाना तो यूजर फ्रेंडली होता असा होतो काय?
ईइंग्रजांचे इथले स्थानिक शत्रू सगळे मित्रवर्गात समाविष्ट नव्हते. किंबहुना जे इंग्रजांचे शत्रू होते ते चांगले होते असेही नाही.
अंतुले मुखिल मंत्री असताना त्यानी गावोगावी स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके म्हणून हुतात्मा स्मारके बांधली . त्यात स्थानिक स्वासै ची नावे वगैरे लिहायची होती. त्यानुसार पोलीस ठेसनांमधून /जेलमधून रेकॉर्ड मागविण्यात आले . इंग्रजानी मारलेले , फाशी दिलेले अशी ती नावे होती. पुण्याजवळ एका ठिकाणी स्वासै पिंगळे बंधूंची नावे त्यात होती. ते स्वाभाविकच. पण पोलीसी रेकॉर्डात सापडलेल्या काही दरोडेखोरांची नावेही त्यात होती ! कारण काय तर त्याना ब्रिटीशांनी मृत्युदंड दिला. शेवटी पिंगळेंच्या वारसांनी ह्यांच्याबरो बर आमच्या पूर्वजांशी समक क्षता होणार असेल तर आमच्या पूर्वजांची नावे तिथे लिहू नयेत अशी मागणी केली. त्यामुळे ब्रिटीश गोळीला बळी पडलेले , अथवा कारागृहात गेलेले सगळेच काही देशभक्त नव्हते ह्याचा पाचपोच ठेवलेला बरा.

ह्या पार्श्वभूमिवर टिपूभाईचा सन्मान का केला जातो आहे याबद्दल प्रबोधन करावे व अज्ञानाचा अंधःकार दूरकराब्वा ही णम्र विनन्ती

रांहुंशी सहमत. टिपु,झाशीची राणी, पेशवे हे सारे आपापले संस्थान वाचवण्यासाठी लढले त्यांनी कोणावर काही उपकार केले नाहित.

सहमत.. टीपु राज्यासाठी लढला.

बाकीचे राजे आमच्या खापरपणजोबावर उपकार करायला लढले होते का ?

मुळात सगळ्याच राज्यांच्या दृष्टीने शेजारचे राज्य म्हनजे देखील परकीयच होते. त्यामुळे परकीय आक्रमण ह्या शब्दाला काही अर्थच नाही . पहिले आक्रमण हे खैबर खिंडीतून झालेले नसून ते पश्चिमेतून सिंध प्रांतावर झालेले आहे. त्याला जर आक्रमणच म्हणायचे असेल तर.! बरे हिंदु ह्या प्लॅट्फॉर्मवर तरी ही राज्ये एकत्र होती का तेही नाही. हिंदु राज्येही /संस्थानेही इथे एकमेकांच्या उरावर बसतच होती की. अथवा ' बाहेरून ' ( म्हणजे कुठून? ) आलेल्यांविरुद्ध हे एकत्र लढलेत असेही नाही. उलट सोय पाहून आक्रमकांना काहीनी शेजार्‍याविरुद्ध मदत सुद्धा पुरवल्याचे दाखले आहेतच की. कारण बाहेरून आलेल्या इतकेच शेजार्‍याशीही त्याचे शत्रुत्व तेवढेच कडवे होते . सगळ्याच लूज बॉर्डर्स असल्याने राष्ट्रवाद वगैरे सगळ्या फिजूल गोष्टी. टिप्पू परदेशी मुळाचा म्हणावे तर इथले आर्य खैबर मधून आलेले परकीयच नव्हेत काय. म्हनजे थोडक्यात आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांनी आपसातच लठ्ठालठ्ठी सुरू करावी असा हा मामला ( तेही यजमानाचे शोषन करून त्याच्या खर्चाने !)
यजमानाच्या पोरांनी कोणाची बाजू घ्यावी बरे ? ::फिदी:

हे सारे लढले पण इंग्रज जिंकले हे महत्वाचे त्यांनी देशाची राजेशाहितून सुटका झाली नि देशाला लोकशाहीच्या दिशेने जाण्याचा मार्ग मिळाला. टिपुची जयंति कशाला हरला ते बरे झाले.

हूडा, हूडा, लग्गेच बालिस्टरीचा कोट भिरकावुन का दिलास? Proud इतक का उकडत त्यात? Wink

हिंदुत्ववाद्यांनो,. थोडं थांबा. टिपूवर सर्वात जास्त राग आहे तो मंगलोर कॅथलिक लोकांचा. त्या लोकांना टिपूनं बंदी करून ठेवलं होतं आणी मग ते पळून इकडे मंगळूरात आले वगैरे फार मोठी ड्रामाटिक कहाणी आहे. त्या लोकांनी पण आता टिपूला विरोध चालू केलेला आहे. आता कर्नाटक सरकार काय गमतीजमती करतंय ते पहायला जरा सबुरीनं घ्या.

(रच्याकने गिरीश कर्नाडांची एक मुलाखत वाचली. ते कोडागू भागाला कर्नाटकात येत नाहे म्हण्तात!! मज्जा!! )

अकोला (होय होय माझ्या दोन विद्वान मित्रांचे गाव ! ) मनपाने त्यांच्या सभागृहा ला टिपू सुलतानाचे नाव दिले आहे. तिथे भारिप्बहुजन महासंघाची बॉडी आहे...

>>>>> अकोला (होय होय माझ्या दोन विद्वान मित्रांचे गाव ! ) मनपाने त्यांच्या सभागृहा ला टिपू सुलतानाचे नाव दिले आहे. तिथे भारिप्बहुजन महासंघाची बॉडी आहे... <<<<<<
खरय का हे? थापा नै ना मारत हूडा तू?
"तुला म्हणायचे काय आहे नेमके? कळ्तय बर्का आम्हाला..... अध्यार्हुत अर्थ... ! तुम्ही इन्सल्ट करीत आहात...." Proud
(असा कालवा सुरू झाला नै म्हणजे मिळवली.... )

सचिन पगारे जी
<<<<<हे सारे लढले पण इंग्रज जिंकले हे महत्वाचे त्यांनी देशाची राजेशाहितून सुटका झाली नि देशाला लोकशाहीच्या दिशेने जाण्याचा मार्ग मिळाला. >>>>>

हे असे असताना, ह्याच ब्रिटीशांविरुद्ध महात्मा गांधीनी लढुन परत राजेशाही आणली ते मात्र तुमच्या
"पुज्य लोकांच्या लिस्टीत" कसे काय बुवा ?

मला पुजनिय बिजनिय कोणी नाही. मात्र इंग्रज भारतात आले ते इथल्या दिनदुबळ्या समाजांसाठी चांगलेच ठरले असे माझे मत आहे.

मला पुजनिय बिजनिय कोणी नाही. मात्र इंग्रज भारतात आले ते इथल्या दिनदुबळ्या समाजांसाठी चांगलेच ठरले असे माझे मत आहे.
<<

अरेच्चा!
बिहारच्या एकाच फेरीत ऐवढे मतपरिवर्तन?

इंग्रज व मोघल मलाही पूजनीय आहेत. त्यात काय इतकं विशेष ?

तैंमुरलंगाचे तर आम्ही भक्त आहोत. त्यांच्या थडग्याचे दर्शन तुम्ही आमच्या प्रोफाइलात घेउ शकता.

तुम्हाला पांडव प्रिय आहेत याचा अर्थ भीष्माचार्य तुम्हाला पूज्य असू नयेत , असे असते का ?

चालू द्या>>>>>? ऑ! काय चालू द्या? अस चालू द्या, चालू म्हणताय मग ते चालत सुटतात कसेही, परमिशन मिळायचा अवकाश.:फिदी:

आपल्या बाजीरावाने अत्याच्चार केले की तो वाईटट ठरतो आणि आपल्याच टिपूने कत्तली केल्या की तो प्रातःस्मरणीय फ्रीडम फायटर ठरतो Wink (बर इंग्रजांना हाकलल्यावर तो इस्लामचे पवित्र राज्य भारतात आणणार होता आणि औरंग्याचाचाचे स्वप्न साकारणार होता)

असो. तद्वतच कुत्राचे नाव टिपू ठेवण्याऱ्या कैक लोकांचा मी निषेध करतो Proud

द्विधा मनस्थिती झाली आहे.

टिपू तू दयाळू ... मिसाईलवंत दाता ..

हे गाणे अभंगासारखे गावे का कव्वालीसारखे हे ठरत नाही आहे.

Pages