दयाळू टिपू आणि त्याची जयंती ??????????

Submitted by रमेश भिडे on 12 November, 2015 - 23:30

१७८५ आणि १७८६ साली टिपुने पेशव्यांचे मांडलिक असलेल्या नरगुंद आणि कित्तूर या दोन संस्थानात दंगा करायला सुरुवात केली , खरे तर टिपूकडे पेशव्यांचे येणे असताना मराठे टीपुकडे तगादा लावू लागले ,पण त्याच वेळी एकीकडे आपला वकील मराठ्यांकडे पाठवून दुसरी कडे नरगुंद वर टिपुने हल्ला चढवला , काळोपंत आणि भावे अगतिक होवून १७८५ ला शत्रूच्या स्वाधीन झाले , सर्व कैदी माणसास ,विशेषतः ब्राह्मणास मुसक्या बांधून रस्त्याने हाल करीत तुरुंगात डांबले ,इतकच नव्हे तर ग्रांड डफ म्हणतात "कालोपंताची कन्या नारो दादाजीची सून सुस्वरूप आहे , ती नबाब घेणार "आणि नरगुंदकरांची कन्या टिपुने आपल्या जनानखान्यात ठेवली.
यापुढे जावून कित्तूरचे संस्थानिक जे देसाई यांची बायकामुले आणि आणि कारभारी गुरुनाथ पंत यासं कैद केले , एक कानडी लेखक म्हणतो "लिंगाइतके चांगले बायका धरिले ,तमाम सुंदर बायका बारा वाट पळून गेले ,बायका धरावयास कारण ,टिपुने पालक मुलगे बाळगले आहेत ,त्यांस स्त्रिया करून देणेस नेतात " देसायाचा वाडा खणून त्याने भांडेकुंडे,दागदागिने वगैरे सर्व संपत्ती हरण केली ,संस्थानातील रयतेस पूर्णपणे नागवले ,सुंदर बायका व दांडगे जवान पुरुष बाटवून टिपुने आपल्या जनानखान्याची व फौजेची भरती केली ,हा प्रकार अत्यंत जाचक झाला ,( खरे २८१३,२८१८,२८२८-३०,२८३४-३६,)
यानंतर मात्र खुद्द आज्ञापत्र निघाले ते इथे देत आहे.
रियासतकार सरदेसाई म्हणतात " टिपू सुलतानाचा जन्म १७५३ देवनहल्ली , बापाने त्याला चांगले शिक्षण देवून सुविद्य केले , लिहिणे वाचणे ,घोड्यावर बसणे ,शत्रास्त्र चालवणे इत्यादी कामे त्यास चांगली अवगत असून शौर्य आणि महत्वकांक्षा त्याचा अंगी उत्कट होते पण त्याच बरोबर फाजील धर्मवेड ,वृथाभीमान ,क्रूर स्वभाव व सर्वज्ञतेचि घमेंड कित्येक गुण त्याच्या ठिकाणी असल्याने तो बापासारखा लोकप्रिय झाला नाही ,मलबार प्रांतात १ लक्ष हिंदू त्याने बळजबरीने मुसलमान केले आणि त्यांची देवालये पाडून त्याठिकाणी मशिदी बांधल्या "
एकंदरीत जयंती,स्मृतीदिन साजरा करताना ,त्या व्यक्तीपासून काही प्रेरणा घेवून येणाऱ्या पिढीने चांगले काम करावे असे अपेक्षित असते , आता राजकारणात हा दोन्ही बाजूंचा विचार करून मगच मुल्याधीष्टीत इतिहास लिहिला पाहिजे ,टिपुच युद्ध करण हे एकवेळेस गृहीत धरता येयील परंतु क्रूरपणा ,विकृत धर्मवेड हे कोणत्याही माणूसकीच्या मूल्यात बसत नाहीत , आणि अशा व्यक्तीच जर आपण उचलून धरलं ,तर नक्कीच समाजाला आपण मागे नेत आहोत.

लेख प्रतिलिप्याधिकार-
शिवराम कार्लेकर ,पुणे
संदर्भ :- मराठी रियासत ,उत्तर विभाग २
ऐतिहसिक लेख संग्रह भाग ६

(पूर्वानुमतीनुसार पुनर्प्रकाशित)*

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिपू सुलतान या इसमाची महती भारतीयांना कधीच नव्हती. म्हणूनच पाकिस्तान नेव्हीत एक जहाज आहे पीएनएस टिपू सुलतान. आता या घटनेनंतर भारत पाकिस्तान सलोख्याची चर्चा सुरळीत पार पडावी आणि शांतता नांदावी असे वातावरण निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न होता असे मानावे का?

हे "बिडोंक" नावाचे सदस्य आज नविनच दिसतायत.ह्या धाग्यावर ह्यांनी गेल्या अकरा वर्षात दुसरा प्रतिसाद दिलाय, म्हणजे सदस्य अ‍ॅप्रव्हुल करण्याचे नियम प्रशासकांनी फारच कडक केल्याचे दिसतेय.

हे गाणे अभंगासारखे गावे का कव्वालीसारखे हे ठरत नाही आहे.

>>

कीर्तन लावा Wink एखाद्या पुराणातून टिपूची कथा काढा ... कर्नाडी पुराणे कावेरी खंडे Proud

माझ्या या प्रश्नाला कुणाकडेच उत्तर नाहीये का?

परत विचारतो. टीपू सुलतानाची जयंती कुणी साजरी केली तर कुणावर कसले आभाळ कोसळणार आहे? कळू शकेल काय?.

बरं, मग आता असे सांगा की नथुरामची पुण्यतिथी कुणी साजरी केली तर कुणावर कसले आभाळ कोसळणार आहे? कळू शकेल काय?.

माझ्या या प्रश्नाला कुणाकडेच उत्तर नाहीये का?

परत विचारतो. टीपू सुलतानाची जयंती कुणी साजरी केली तर कुणावर कसले आभाळ कोसळणार आहे? कळू शकेल काय?.

बरं, मग आता असे सांगा की नथुरामची पुण्यतिथी कुणी साजरी केली तर कुणावर कसले आभाळ कोसळणार आहे? कळू शकेल काय?.>>>>> मै हू ना. फार काही होणार नाही. दोन्ही बाजूचे गट शाब्दिक, वैचारीक हाणामार्‍या करतील. काही रिटार्यड म्हातारे यावर चर्चा समेलने भरवतील आणी ऋन्मेष व पगारेना नवीन विषय मिळतील नवीन बाफ काढायला. ( ज्यावर पगारेनी पैला नम्बर आधीच मारलाय)

बिन्डोका, (उत्तरे) शोधा म्हण्जे सापडेल अस अस्मिता सान्गते रोज झीमराठिवर Proud
नुस्ते प्रश्न् इच्चारताय, हिथ काय आमी परिक्षा देऊन राह्यलो काय बे? Wink

टिपूची जयंती वैयक्तिक पातळीवर साजरी केल्याने कोणालाही काहीही फरक पडत नाही. असेही त्याच्या कबरीवर अनेक जण माथा टेकायला रोज जातातच. पण ही जयंती सरकारी पातळीवर आणि लोकांच्या पैशाने साजरी होत आहे आणि विरोध करणारे लोक याच गोष्टीला विरोध करत आहेत.

नथुराम सारख्या प्रवृत्तींचे उदारीकरण करणे कधीही घातकच आहे. नथुराम कोणी पुण्यात्मा नव्हता की त्याची पुण्यतिथी सार्वजनिकरित्या साजरी करावी. त्याच्या घरातल्या माणसांनी आणि नातेवाईकांनी ती त्यांच्या पुरती खाजगीरित्या साजरी केली तर कोणाला कशाला असेल आक्षेप.

नरेशजी, तुमच्या मतांबद्दल पूर्ण आदर ठेवुन व बराचसा सहमत असुनही एक विचारु पहातो की यातिल "सार्वजनिक" व "खाजगी" रित्या साजरी करणे यात काय फरक आहे? अहो साधा टिनपाट नवरामुलगा असला तरी वधुपक्षाच्या पैशाने खाजगी लग्नाच्या कार्यक्रमात सार्वजनिक रित्या घोडा/घोडीवरुन वाजतगाजत मिरवणूक काढतो... त्याला नै कोणी कै बोलत... Wink

आदरणीय येडियुरप्पा यांच्या भाजपा सरकाराने कर्नाटकात टिपू जयन्तीचा खेळखण्डोबा त्वरित बन्द केला त्याबद्दल हार्दिक अभिनन्दन

भाजपा आणि मोदी शाह शिवाय देशास पर्याय नाही दुसरा !

टिपू जयंती बंद केली,
छान, तसेही कट्टर मुसलमान कुणाचीच जयंती साजरी करत नाहीत, अगदी पैगंम्बराचीही.

अडवाणी जयंती साजरी करण्यास शुभेच्छा, राष्ट्रीय सुट्टी मिळावी

मोहरम सण नाही. तो करबला येथे झालेल्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांच्या स्मरणार्थ काढलेल्या शोकयात्रेचा कार्यक्रम असतो. त्यामुळे तेथे वर्गण्या काढून दारू पिउन कुणी नाचत नाही

मुस्लिम समाजात बोहरी मुस्लिम हे अत्यंत कष्टाळू,समृध्द,शांतता प्रिय आणि शिक्षित समाज आहे .
आणि शिस्तप्रिय सुद्धा आहे .
त्यांचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम अत्यंत शिस्ती मध्ये पार पाडले जातात .
आदर्श समाज आहे

टिपू जयंतीवर धागा काढला, त्यावर इतकी चर्चा केलीत,

त्याबद्दल सर्व हिंदूंचे अभिनंदन व आजच्या बाजीराव जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा.

बकरी ईद बद्दल सविस्तर माहिती द्या.
>> आम्ही तुमचे नोकर नाहीत . आन्तर जालावर ही माहिती सर्वत्र उपलब्ध आहे

पेशव्यांनी सुद्धा अटके पार मराठी साम्राज्याचे झेंडे रोवले आहेत .
कोणीही टीका करण्या एवढे पेशवे चा इतिहास कमजोर नाही .
भल्या भल्या मुस्लिम आक्रमकांना पळती भुई थोडी केली होती त्यांनी .
ते ब्राह्मण असले तरी समस्त हिंदू समाज त्यांच्या कर्तृत्व ला मानाचा मुजरा करतो

नेहरूंचे एक पुस्तक मी वाचले होते .
ब्रिटिश नसते आले तर ह्या देशावर एकतर मराठ्यांचे राज्य असते किंवा टिपू सुलतांनचे

बादवे
ते बकरी ईद नसते
बकरा ईद = बकरीद असते.
-----------

टीपू सुलतान (!) बद्दल एकाच वाक्यात निकाल लावायचा तर इंग्रजांनी महाराजांची भवानी तलवार लंडनच्या म्युझियमसाठी नेली ती संपूर्ण जगासाठी कायमसाठी ठेवली आणि टीपूची so called sword फक्त मैसूर पुरता मर्यादित ठेवली ही आणि एवढीच ह्या जुल्मी सुलतानाची लायकी ... !
माझ्या मते कुठलाही सामुराई योद्धा त्याच्या Samurai sword ने टीपूसाठी कायम भारी पडेल असा होता. थोडक्यात जपानमध्ये टीपूच्या वरचढ़ पराक्रमाचे अगणित योद्धे असायचे त्यामुळे टीपूचा तो पराक्रम, रॉकेट मिसाईल वगैरे नॉट अ बिग डील !

Pages