प्रधानमंत्री मुद्रा योजना.. बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by मार्तंड on 5 September, 2015 - 07:45

मोदी सरकारने नुकतीच घोषणा केलेल्या "प्रधानमंत्री मुद्रा योजना" बद्दल माहिती हवी आहे?
ते कर्ज कुठल्या स्वरूपात मिळणार? त्यासाठी कुठल्या बाबींची आवश्यकता आहे? त्याचे नियम काय आहेत? त्याचा फायदा कसा घेता येईल?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज तीन सुवर्ण योजनांचे उद्घाट्न झाले (रोखे, ठेव व नाणी).. त्याबद्दलच विचारता आहात का? असल्यास मलाही त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.

मार्तंड
ह्या दुव्यावर फोन नं. आणि ईमेल दिले आहेत. ह्या योजनेआंतर्गत small scale industries ला १० लाखापर्यन लोन मिळु शकते.

http://mudrabank.com/contact-us/

गोल्ड बाँड हे वेगळे आहेत ह्या योजनेत दोन भाग आहेत. एक म्हणजे तुमच्या कडचे सोने किंवा दागिने बॅकेत जमा करायचे. ( दागिने असतिल तर त्याची तुट धरली जाईल) बॅक तुम्हाला २.२५% ते २.५% टक्के व्याज देईल आणि मुदतीनंतर तुम्हाला तुमचे सोने किंवा बाजार भावाने रोख रक्कम देईल

दुसरी योजना RBI Bond आहे. या योजनेत तुम्ही ग्राम मध्ये सोने घेउ शकता. जर १ ग्राम सोने घ्यायचे असेल तर आजच्या दराने पैसे गुंतवायचे. तुम्हाला २.७५% व्याज मिळेल. आणि ८ वर्षानी तुम्हाला तुमचे सोने किंवा बाजार भावा प्रमाणे रोख पैसे मिळतिल.

ह्या योजनेला Bank FD शी compare करु शकत नाही. Bank FD मध्ये मुदतीनंतर तुम्हाला fix रक्कम मिळेल. ह्या योजनेत तुम्हाला सोन्याचा त्यावेळॅचा दरा नुसार रक्कम मिळेल. जर सोन्याचे दर वाढले तर फायदा होईल. जर दर कमी झाले किंवा तेवढेच राहिले तर नुकसान होईल.

सोन्यात गुंतवावे की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण जे कोणी सोने गुंतवणुक म्हणुन घेत असतिल किंवा ज्याचा कडे गुंतवणुक म्हणुन सोने घेतलेले आहे त्याचा साठी ह्या दोनी योजना चांगल्या आहेत. तुम्हाला तुमच्या सोन्यावर व्याज मिळते. ( आणि देशाचे परकिय चलन वाचुन देशाला पण फायदा मिळतो).

>>दुसरी योजना RBI Bond आहे. या योजनेत तुम्ही ग्राम मध्ये सोने घेउ शकता. जर १ ग्राम सोने घ्यायचे असेल तर आजच्या दराने पैसे गुंतवायचे. तुम्हाला २.७५% व्याज मिळेल. आणि ८ वर्षानी तुम्हाला तुमचे सोने किंवा बाजार भावा प्रमाणे रोख पैसे मिळतिल.<<

थँक्स साहिल. या बाँडचा सोन्याची किरकोळ (१० ग्रॅमपेक्षा कमी) खरेदि करणार्‍यांना/गुंतवणुकदारांना फायदा होउ शकतो.

असलीच काहीतरी योजना आणायचं सूतोवाच चिदंबरम यांनी केलं होतं तेव्हां जावयाच्या धंद्यासाठी आमच्या घरातलं सोनं फुकट पाहीजे अशी टीका झाली होती.

तुमच सोन बॅकेला दिल्यावर ते वितळुन बाजारात विकले जाईल त्यामुळे तुम्हाला परत चिप मध्ये किंवा त्यावेळी जो दोअर असेल त्याप्रंआणात रोख असे दोनच पर्याय आहेत. तुमचे दागिने तसेच परत मिळणार नाहित.

आणि पहिल्या योजनेत (दागिने घेऊन गेल्यास) कमित कमी ३० ग्राम असणे बंधनकारक आहे.

Hello,
Mudra bank is scheme of Indian government to support low income group to support there business.
Currently SIDBI is involved in this scheme.
There is low rate of interest but normally it will be given on base rate.(Individual banks are having different base rates)
Some banks financing upto 2,00,000/- in base rate
Currently awareness program is going on.
In pune Bank of Maharashtra going aggressively to disburse the mudra loan(paper article)
Currently Andhra bank focusing upto 50000 loan which called Shishu
http://www.mudra.org.in(official site)
In this scheme trader also involved
No security involved only stock statement required which is submitted to your bank where you availed the loan.
For more information need to share your required loan amount.

माझ्या आठवणीप्रमाणे जेव्हा मनमोहनसिंग अर्थमंत्री होते तेव्हा सुवर्णरोखे योजना आली होती (की येणार होती) असे चालले होते.

गोल्ड बाँड हे वेगळे आहेत ह्या योजनेत दोन भाग आहेत. एक म्हणजे तुमच्या कडचे सोने किंवा दागिने बॅकेत जमा करायचे. ( दागिने असतिल तर त्याची तुट धरली जाईल) बॅक तुम्हाला २.२५% ते २.५% टक्के व्याज देईल आणि मुदतीनंतर तुम्हाला तुमचे सोने किंवा बाजार भावाने रोख रक्कम देईल

अच्छा म्हणजे या योजनेत मी दागिने दिले तर मुदतीनंतर दागिने परत मिळणार नाही तर एकतर सोने चिप्स किंवा रक्कम मिळेल. आणि ठेवायचे सोने ३० ग्रम किंवा जास्त असायला हवे. बरोबर?

सोन्यात गुंतवायचे असेल तर दुसरी योजना जास्त आकर्षक वाटतेय. सोन्याचे भाव भराभरा जरी वाढत नसले तरी दहा पंधरा वर्षांचा कालावधी पाहता त्यात भरपुर वाढ झालेली दिसते. अर्थात त्याच कालावधीत इतरत्र गुंतवलेला पैसा सोन्यापेक्षाही जास्त दराने वाढेल हे सत्य आहे. पण गुंतवणुक करताना सगळीच अंडी एका टोपल्यात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तेव्हा तो सल्ला मानायचा तर थोडी गुंतवणुक सोन्यात करणेही योग्य राहिल.

"प्रधानमंत्री मुद्रा योजना" बद्दल धागा आहे की गोल्ड बाँड बदद्ल ?????
कोणी अप्लाय केल आहे का मुद्रा योजनेसाठी ????

"प्रधानमंत्री मुद्रा योजना" बद्दल धागा आहे की गोल्ड बाँड बदद्ल ?????>> अंकु - ह्याचा दोष माझ्याकडे जातो.. माफ करा. सरकारने नवीन सुवर्ण मुद्रा व योजना प्रकाशित केल्याचे वाचल्यावर मला मुद्रा योजना म्हणजे तेच असे वाटले व मी प्रश्न विचारला. सुवर्णमध्य ह्यांच्या वरील प्रतिसादानंतर कळत आहे कि दोन वेगळ्या योजना आहेत.

वाचकांनो - ह्या धाग्यावर मुद्रा योजनेबद्दलच बोला. मी सुवर्ण योजनेवर वेगळा धागा काढतो.

Rofl

......

कर्ज घेऊन दुकानातील मालाचे स्टेटमेंट द्यायचे म्हणे. क्याश क्रेडिट अकाउंटसारखेच झाले की.

Yes the loan procedure is same as like a normal loan procedure. Only difference is interest rate .
As I said some banks are lending money on base rate up to 200000/-.& no processing fee.

मुद्रा बँक कर्ज योजनेसाठी मी चौकशी केली आहे. नविन उद्योग सुरु करायचा असेल, तर मुद्रा बँक कर्ज योजनेअंतर्गत काहीही सुविधा मिळणार नाही.

उद्योजक असाल आणि तीन वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल, तरच उद्योग वृद्धीसाठी मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज मिळेल.

तेच तर ... क्याश क्रेडिट अकाउंटच आहे हे. तीन वर्षाचे आयटी रिटर्न द्या. दुकानातील मालाचे स्टेटमेंट द्या ..म्हणजे त्याच्या अगेन्स्ट कर्ज / क्रेडिट मिळणार.

सगळ्या ब्यान्केत असतेच की.

I have taken loan Under Mudra in form of CC.

my requirement is less so I choose mudra.(UP TO 2 LAKH)

I got advantage of no processing fee & lending on BASE RATE.

बेस रेट म्हणजे किती ?

प्र्सेसिंग फी किती असते ? १०० रु चा स्ट्याम्प पेपर करावा लागतो . तितकाच खर्च ना ?

तुमच्या घरातले दागिने वितळायला द्यायचे. त्यातले काळे मणी, दोरा आणि करणावळ हीच आपली प्रोसेस फी !