शाम - सुंदरा !!!!

Submitted by सायु on 30 October, 2015 - 07:15

निळ्या-जांभळ्या, संध्याकाळी,
गडद रुपेरी,चांदण-सरी..
नभांगणात अन् मनात माझ्या,
गुंफण घाली एकाच वेळी ।

शाम ही निळा, संध्याही सावळी,
तरी मग लाली, आली गाली,
नाव घेता तुझे..
मग रंगीत अन सुगंधित ही
दिशा - दिशा झाली..।

स्पंदनांना माझ्या,वेद तुझ्या पावलांचे,
पारिजातकाला ही, वेड तुझ्या चाहुलीचे,
सोबतीला माझ्या सवे,, तो ही आज श्रुंगारला..
मुक्तिका परी तो ,अर्पी स्वये तुज पावला...

मुरली- मनोहर, शाम- सुंदरा,
मजसम व्याकुळ ही धरा,
आर्त हाक घाली ही मीरा,
निज अस्तित्व दाखवी जरा..

तोषवी मम ह्रदया,
शांतवी मम चित्ता,
दर्शन दे शाम-सुंदरा !
दर्शन दे शाम-सुंदरा !

(प्र.ची, अंतरजालावरचे एक पेन्टींग, मी रांगोळीत साकारण्याचा केलेला प्रयास..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, छान जमलीय .

शाम ही निळा, संध्याही सावळी, तरी मग लाली, आली गाली, >>> हे आवडलं विशेष

कविता छानच पण चित्रातल्यासारखी रांगोळी पण सहज जमेल कि !

अप्रतिम...

मीराबाई, राधा, जनाबाई अशा महाभागवतांची जी आर्तता आहे त्याचा लक्षांश जरी आपल्याला लाभला तर आपले जीवन धन्य होऊन जाईल ....

दिनेश दा, अभार.. रांगोळीत साकारायचा नक्की प्रयत्न करणार... Happy

शशांक जी, प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद, तुमच्या मताशी मी अगदी सहमत आहे.

मैथिली आणि मंजु ताई मन:पुर्वक आभार..

दिनेश दा, तुमचे खरोखर आभार, तुम्ही सुचवलत म्हणुन मी ते चित्र रांगोळीत साकारण्याचा प्रयत्न केला Happy
अ.आ आणि नीलम खुप खुप आभार!

दिनेश दा, तुमचे खरोखर आभार, तुम्ही सुचवलत म्हणुन मी ते चित्र रांगोळीत साकारण्याचा प्रयत्न केला
>>>>
_____/\_______
तुसी ग्रेट हो!