"जळ्ळं मेलं 'लक'शण!!" गद्य STY - १

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 16:35

भारत विभूषण आपल्या सिंगल रूममध्ये विमनस्क स्थितीत बसला होता.. आत्ता या घडीला 'सबसे अनलकी कौन' असा गेम शो कुठे असता तर तो नक्कीच जिंकला असता.
तसा तो जन्मापासूनच अनलकी होता. जन्म देतानाच आय मेली अन् बाप आधीच गेला होता घर सोडून. आठवत होतं तेव्हापासून त्याच्या आज्यानंच त्याला वाढवलं होतं.. चार वर्षापूर्वी तोही गेला, अन् हा एकाकी झाला बिचारा.

त्याला बॉलीवूडचा नेक्स्ट 'मगनभाई ड्रेसवाला' बनायचं होतं.. डीझायनर ड्रेस कॅटवॉकपुरते ठीक हो, बाकी, ड्रेस सप्लायरच लागतो लोकांना.. तो बनायचं स्वप्न होतं त्याचं.. त्या स्वप्नापायीच त्याने होती-नव्हती ती पुंजी लावून अंधेरीला खोपटंही टाकलं होतं, दोन टेलर, चार मशिन टाकून काम सुरूही केलं होतं.. त्या निमित्तानं फिल्म लायनीतल्या लोकांच्या बातम्या, गॉसिपही कळत होतं.. पण तिथही नशीब आड आलं! भारतने धंदा सुरु केला तोवर प्रसिद्ध निर्माता 'उदास घाई'चा धंदा पार बसला होता. तो पार कर्जात बुडाला होता.. बहुतेक ड्रेस सप्लायरचा धंदाही मंदा झाला होता कारण दोन चार हातरुमालांमध्ये हिरवणींचे काम भागायला लागले होते. हिरो ही ६-८-१० पॅकच्या नादात असल्याने ड्रेस सप्लायर्सचे धंदे पॅक ह्यायची वेळ आली होती.

त्यातच दुकान टाकताना तिथल्या रामूदादाला पन्नास हजार द्यायचे कबूल केले होते त्यानं.. आता त्याची मदार 'संजीव मिली भोपाली' च्या 'हम देवदास हो चुके सनम' वर होती पण भोपालीनं घातला की सिनेमा डब्यात! सिनेमाच नाही, तर पैसे कुठले??? रामूदादानं वाट पाहिली, पाहिली आणि एक रात्री सोडले चार गुंड दुकानावर! मेल्यांनी पार नासधूस करून टाकली 'भारतभाई ड्रेसवाला'ची! मशिनं मोडली, टेलर गेले पळून वर भारतभाईचे टाकेही ढिले केले.

आता कपाळावर हात मारून बसण्यापलिकडे भारतकडे काहीच करण्याजोगं नव्हतं.. हाती ना पैसा, ना काम, ना कोणी जीवाभावाचा/ची ज्याच्याकडे मन मोकळं करू शकेल.. प्लेन अनलकी फेलो..

स्वत:च्या नशीबाला शिव्या घालता घालता त्याला आठवलं की त्याच्या आज्याने राम म्हणायच्या आधी त्याला एक चपटी लाकडी पेटी दिली होती.. कुठे गेली बरं? रूममध्ये थोडी उचकापाचक केल्यानंतर ट्रंकेच्या तळाला पडलेली ती पेटी त्याच्या हाती लागली. बाहेर काढून, थोडी साफ करून भारत तिच्याकडे निरखून पहायला लागला.. वीतभर लांबी-रुंदीची आतून रिकामी असलेली साधी पेटी होती ती.. पण ती त्याला देताना काय बरं म्हणाला होता म्हातारा.. हां..

'बिभिषणा (आजा त्याला ह्याच नावानं लाडानं हाक मारायचा..) ही पेटी जपून ठिव रंऽऽ सोन्या.. येकदम पावरबाज पेटी हाय, अशीतशी समजू नगंस.. ही पेटी येखाद्याचं नशीब खोलू शकते बग.. म्या फिम्लीस्तानमदी स्पॉटला व्हतो बग, तवा तिथं शूटींग बगायला आलेल्या येका साधूनं दिली व्हती ही.. हां, येकदम पॉवरबाज.. लै बेक्कार दिवस आलं आन् कोनचाच दरवाजा हुघडत न्हाई आसं वाटल ना, की ह्या पेटीवर हात ठिवायचा आन् मंत्र म्हणायचा 'वक्त की फितरत खोलले किस्मत, खुद पे भरोसा है तो आजमाले अपना लक' आन् मग बगंच, अशीऽऽऽ किस्मत खुलेल तुजी.. हां पण ध्यान्यात ठ्येव, पैश्यापायी, लोभापायी पेटीला कामाला लावायचं न्हाई.. फकस्त अडचण आस्ली, तरास आस्ला, काय करावं, कसं करावं कळंना झालं, की मंगच पेटीकडं जायाचं.. हुब्या जिनगानीत तुला अजून काय देऊ नाय शकलो बग.. हीच काय ती माजी इष्टेट.. तुला दीतोय.. पन द्येव करो आणि तुला ती कधी वापरायची येळ न येओ..'

भारतचे डोळे चमकले! वेळ आली होती, पेटी वापरायची वेळ आली होती.. सगळे दरवाजे तर बंद झाले होते.. आता लक आजमावायची वेळ आली होतीच.. काय करावं? भारत अस्वस्थ झाला..

इतक्यात.. 'भारतभाऽऽऽय' अशी हाळी आली खालून.. कोण ते आलं या वक्ताला? म्हणून भारतने खाली पाहिलं तर चक्क एरीयाचा दादा सत्तूभायचा उजवा हात पक्या खाली उभा!

"आयला पक्या! अब्बी कैसे?"
"नीच्चे आ बे.. भाय बुलारा.."
"कौन? सत्तूभाय????" भारतचा विश्वास बसेना..
"और कोन? और कोन भाय है बे इधर????" पक्या चिडला की डेंजर माणूस!
"आलो आलो.."

तिच्यायला! तिकडे अंधेरीत रामूदादा आणि इकडे गिरगावला हा सत्तूदादा. साला तो तिकडे टाका ढिला करतो आता हा इकडे काय उसवतोय?

असावी म्हणून भारतने ती पेटी शर्टच्या आतल्या पैरणीच्या खिश्यात सरकवली आणि जिना उतरायला लागला..

------------------------------------------------------------------------------------

काय झालं पुढे? पेटीने खरंच लक बदललं का? भारतचा 'भारत ड्रेसवाला' झाला का? का पेटीत अजून काही रहस्य होतं?

चला, लिहूया आपणच सर्व- आपली कल्पनाशक्ती पणाला लावून खेळूया सर्व मायबोलीकर हा STY..

तत्पूर्वी, काही अटी:
१) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
२) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
३) चारपेक्षा जास्त नवीन पात्रे एका प्रसंगात नव्याने इन्ट्रोड्यूस करू नये.
४) गाणी घालू शकता (घालाच )
५) स्थळं, काळ, वेळ याला बंधन नाही, लॉजिकचाही हट्ट नाही, पण किमान सूत्र असावं.

चला, करूया सूतकताई या गणेशोत्सवात..

------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण साजीर्‍या शाब्बास रे. व्यवस्थित ठिगळं लावली आहेस. सगळे लुपहोल्स बरोब्बर विणले आहेस. नाहीतर लक्तर झाली होती, संयोजकांची कसोटी लागली असती जुळवताना. Happy वाट शोधा मधे कसे अनेक फाटे फुटुन नंतर बंद होतात तसे व्हायला लागले होते.

अगं आशु माझे आठ वाजून गेले पण केबल नेटचे तास संपले होते माझे ते त्याने सक्काळी रिन्यू केले त्यामुळे आठ वाजता मनातल्या मनात सूत कातलं मी.. Happy

मंडळी, भारताला आपलं 'लक'क्षण आजमावायला अजून फक्त दोन दिवस शिल्लक आहेत हे लक्षात असू द्या. शुक्रवार दि. २८ ऑगस्टला संध्याकाळी हा धागा बंद करण्यात येइल.

वोक्के, वोक्के. आयला काल भसाभसा लिवलं, तेव्हा वाटलं होतं की लईच भयाण झालंय, अन सारा गोपाळकाला झालाय.

लवईष्टोरी आहेच की. त्यासाठी तर भारत अन खुशबूला अंधारकोठडीत टाकलं. पण व्हायोलेन्सशिवाय त्यांना प्रेमाची किंमत कशी कळेल? किंवा प्रेम कसे जुळेल? Proud
पेटी व्हिलनकडे. कोट पण व्हिलनकडे. व्हिलनच्या मागे नवा डॉन. हिरो हिर्वीण कैदेत.
फ्लाईंग मास्टर भोभो बाहेर.

पुढले इमले रचा पटापटा. कोण टाकतंय रुमाल?
एक गाणं पण होऊन जाऊ द्या. लई मारामारी झालीय.

अरे आज शेवटचा दिवस...........कुणी लिहीतय का नाही पुढे ?

ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या रे आजच. नायतर मला जमेल तसा मी उद्या सकाळी शेवट करणारे.. (हे संयोजकांच्या हुकूमावरून बरंका!)
मग बोलायचं नाही- हे राहिलं, ते तसं का वगैरे Proud

अर्रे, हे तर मी साफ विसरूनच गेलो होतो. २ दिवस कुणीच लिहिलं नाही? Uhoh
डांबरसिंगला घाबरले वाटते. Proud

पूनम बनवच एक फर्मास क्लायम्याक्स. Happy

खोडरबर...
तो प्रकाश रुमाल पण टाकायला चळाचळा कापतोय.
खोडरबर...
यावर्षी फार म्हणजे फारच दुष्काळ आहे सुताचा. Sad कुठे गेले ललीतवाले लेखक?

त्या पक्याभायला एन्काऊंटर केल्यामुळे हा प्रकाश चिडून सरसावला वाटतं पुढल्या रीळांसाठी!

गंमत केली रे, प्रकाश, लिही बघू मस्तपैकी. Happy

"सुव्वरके बच्चोsssss! शिमगा कब हय रेsssss!!
डांबरसिंगच्या आवाजाने दचकुन बाहेरच्या गटारीत डुंबणारी डुक्कर मादा आपल्या पिटुकल्या पिल्लांना घेउन चिर्चिर आवाज करत अंधारात पसार झाली!... त्यानंतर वातावरणात फक्त रातकिड्यांचा किरकिर आवाज.
कुठेतरी एका कुत्र्याचा रडण्याचा आवाजाने वातावरणातील शांततेचा भंग केला!
डांबरसिंगाचे सगळे पंटर लटालटा कापत होते.भाईला आता शिमग्याची आठवण झालेली पाहुन..सगळ्याच पंटरांच्या छातीत धडकी भरली. शिमगा म्हणजे होळी,ती होउन ५ महिने झाले होते! पण डांबरसिंगच्या भाषेत होळीचा अर्थ वेग़ळा होता.. ही होळी म्हणजे खुनकी होली ! आता काही खरे नाही.....खुप मोठे गँगवार होणार हे निश्चित होतं !
___
गेल्या होळीदिवशीच डांबर गँग आणि सत्तूगँगमधे बाचाबाची झाली होती. डांबरसिंगाचे नांव डांबरसिंग पडले ते त्या होळीवरूनच. त्याचे मुळचे नांव रुपसिंग! त्या होळीदिवशी मनसोक्त होळी खेळुन गांजा आणि भांग पिऊन गाफील असताना, सत्तूगँग होळी खेळायला आली. पण ही होळी साधीसुधी नव्हती! त्यांनी रुपसिंगच्या सगळ्या पंटरांना आणि त्याला डांबराने रंगवून काढले होते. रूपसिंगच्या तोंडावरचे डांबर निघायला एक आठवडा लागला. तेंव्हापासुन त्याचे नांव पडले डांबरसिंग! त्या अपमानाचा बदला घ्यायला डांबरसिंग चरफडत होता.त्या अपमानित दिवसापासुन डांबरसिंग आपल्या कपाळावर काळी नामाटी ओढत असे. तो सत्तूला संपविल्यानंतरच तो पुसणार होता.आज चांगला मौका मिळाला होता...आणि त्यात ते जॅकेट कसेही करुन त्याला मिळवायचे होते. ही पेटीची काय भानगड आहे तेही पाहायचे होते!
खिडकीतून बाहेर पचकन थुंकत डांबरसिंगाने बारक्या शुटरचं गचुटं पकडलं....आणि त्याला तसाच हवेत वर उचलला!
"बारक्याsssssssआज तेरा नेम चुक्या तो काय खरं नाय!त्या सत्याच्या भेजेंमे गोली मारना है तेरेकु... पिछली बार जैसी हयगय नही चलेगी !.......छोटू...अरे एssss छोटू....चल गाडी निकाल!"
"जी भाय" म्हणत छोटुने आपल्या अगडबंब ढेरीवरून हात फिरवत सुटकेचा नि:श्वास टाकला!
"...और सुन ...सब पंटरलोगको ट्रक लेकर अपने पिछे पिछे चलने के लिए बोल...आज सत्तूगँगका एक भी नही बचना चाहीए!"
_______

भरत आणि खुशबूला घेवून सत्या एका बंद पडलेल्या फॅक्टरीसारख्या गुप्त अड्ड्यावर आला.भारतला आणि हाफ चड्डीतल्या सँटासिंगला एका मोठ्या हुक क्रेनला दोरी बांधुन उलटे लटकवले. खुशबुला एका नाजुक खांबाला बांधले होते!सगळे सत्तू गँगचे लोक मग कोंडाळे करुन रम्मी खेळायला बसले. लगेच एकाने दारु आणि चकना आणला. एकाने बाजुला पडलेलं गाडीचं टायर पेटवुन शेकोटी पेटवली!
सत्या शेकोटीशेजारी एका मोडक्या स्टुलावर बसुन तंदुरी चिकनबरोबर दारुचे पेग रिचवत होता.
२-३ पेगनंतर त्याची नजर त्या जॅकेटकडे गेली. हेच ते जॅकेट ज्याच्यामुळे सम्राटसिंग रोडपतीचा करोडपती बनला होता.या जॅकेटचा वापर कसा करायचा हे मात्र त्याला अजुन कळालेलं नव्हतं !
त्याने जॅकेट उचलुन जवळ घेतलं सगळे खिसे तपासले...एकाही खिशात दमडीपण नव्हती. या मळकटलेल्या जॅकेटमधे असे काय बरे असेल हा विचार त्याला स्वस्थ बसु देईना. कदाचित भारतला हे माहित असेल म्हणुन तो भारतकडे सरसावला. त्याच्या डोक्याचे केस पकडुन त्याला विचारले " क्या है बता...इस जॅकेटमें क्या है ? "
भरत केस ओढल्यामुळे कळवळत म्हणाला " भाई ....माँकसम मुझे कुछभी नहीं पता...इसके बारेमें!...उस सँटासिंग को पुछ लो ना!"
सत्याने मग सँटासिंगकडे मोर्चा वळवला...पण तो फक्त "सिंग इज किंग" एवढेच बोलत होता !
सत्तूला काही कळेना...... तो खूप चिडला.. त्याने सरदाराला खाली उतरवायला लावले. कोलदांडा घालुन त्याला सगळ्यांनी मिळुन बेदम चोप दिला. इतका तुडविला कि त्याची शुध्द हरपली...बेशुध्द अवस्थेतही "सिंग इज किंग" एव्हढेच तो बरळत होता!
सगळेजण हताश झाले.सत्तूभाइने शेवटी ते मळकटलेलं जॅकेट स्वतःच्या अंगात चढविले. त्याची झिप बसविली. परत एक पेग घटाघटा बॉट्मसअप केला ! कोलदांडा घातलेल्या अर्धमेल्या सँटासिंगला एक सणसणीत शिवी हासडली " क्या बे ....कबसे एकच रड लगा रखी है !... "सिंग इज किंग" ....."सिंग इज किंग"...क्या है क्या ये "सिंग इज किंग" ?? ".....आणि एकदम ढग गडगडायला लागले!
बाहेर कडाकड विजा चमकायला लागल्या....!
"सिंग इज किंग" हा त्या जॅकेटचा कोड होता! जॅकेट अंगात घालुन तिनदा "सिंग इज किंग" असे म्हणले कि त्या जॅकेटचा असर सुरू होणार होता. सत्तूला सगळ्या अंगातुन एक चैतन्याची लहर दौडल्याचा भास होत होता. जॅकेट आता काम करायला सुरू करणार होते! तो आता सर्वांत श्रिमंत डॉन होणार होता... पण नियतिला हे मान्य नव्हते!

पाठीमागुन बारक्या शुटरने मारलेली गोळी त्याचा भेजा फ्राय करुन निघुन गेली होती ! डांबरसिंगच्या सार्‍या पंटरांनी सत्तूच्या सगळ्या गँगला एकसाथ पकडले होते !
डांबरसिंगने आपल्या चेहर्‍यावरचा काळा नाम पुसला आणि बारक्या शुटरच्या पाठीत शाब्बासकीचा धपाटा टाकला.
खुशबू,भारत आणि सँटासिंगला सोडवुन एका गाडीत कोंबले. सँटासिंग अजुनही बेशुध्द अवस्थेतच होता..आणि अजुनही त्याचा "सिंग इज किंग "जप सुरूच होता!
डांबरसिंगने मग सत्तूच्या अंगावरचे जॅकेट उतरविले व स्वतः घालण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या ते त्याच्या अंगात घुसेना...जॅकेट मेडीयम साईझचे होते आणि डांबरसिंग डबल एक्सेल !!
शेवटी कंटाळुन डांबरसिंगने ते जॅकेट व पेटी घेतली आणि तिथुन काढता पाय घेतला...
_______
भरधाव वेगाने गाडी धावत होती.गाडीच्या खिडकीतुन आत येणार्‍या थंड वार्‍यानं भारतला जाग आली. त्याच्या खांद्यावर मान ठेवून खुशबू गाढ झोपली होती. तिचे वार्‍याने उडणारे घने बाल भारतच्या मानेवर गुदगुल्या करत होते.एखादा निरागस बालकासारखे भाव तिच्या चेहर्‍यावर होते. तिला झोपेतुन उठवायचा त्याने जराही प्रयत्न केला नाही! खिडकीतून बाहेर पाहात त्याने आसपासच्या भागाचा अंदाज घ्यायला सुरूवात केली. या रस्त्यावरुन आधी कधी आल्यासारखे त्याला आठवत नव्हते! सगळा प्रदेश डोंगराळ जंगली होता. त्या कच्च्या रस्त्यावर आसपास कसल्याही रहदारीचा मागमुसही नव्हता.... गाडी नक्की कुठे चालली आहे ते भारतला कळेना. त्याने पुढे बसुन घोरत असलेल्या डांबरसिंगाला हलवुन उठविले आणि विचारले ..." भाई...भाई..हमलोंग अभी किधर जा रैले है ? "
डांबरसिंगाने त्याच्याकडे रागाने पाहीले आणि कुत्सितपणे हसत डाफरला...
"बस चुपचाप बैठे रहो !"

बर, चुपचाप तर चुपचाप! बडबड करून कोणाला जीव गमवायचाय? भारत गपगार खुशबूचं गोड ओझं पेलत बसला.. ’आयला! काय झमेल्यात पडलो राव! त्या आज्ज्याची पेटी काय हाती लागली, लक बदललं ते बरं झालं की वाईट हेच समजेनासं झालं.. लक फिरून मास्कांची ऑर्डर काय मिळते, शिवाय करण बोअरच्या मेन हीरॉईनचा ड्रेस डीझायनर काय होतो.. खुशबू अशी आपल्या खांद्यावर मान ठेवून निर्धास्त बसलीये, म्हणजे तिचं आणि आपलं सूत जमणाच.. ह्या जमेच्या बाजू काय, आणि त्याच वेळी काय हे गँगवॉर! काय रक्त.. आयला हे गुंड हूं की चू केलं की बंदुकीच काढतात! पक्या, सत्तूभाय मेले- असे डोळ्यादेखत! आपली पेटी, ते सम्राटसीच्या आईचं मायेचं जॅकेट सगळं ह्या डेंजर डांबराच्या हातात! स्वत:च्या ताब्यात घेऊन ठेवलाय सगळं आणि आम्हाला कुठे घेऊन चाललाय काय माहीत!’

एव्हाना गाडी जंगलात शिरली होती, समोरच एक डाक बंगला दिसत होता.. बंगल्याबाहेर आधीच एक आलीशान गाडी उभी होती.. हे काय नवं लचांड! भारतला जीवाची भीती वाटू लागली.. त्याने आर्ततेने आज्ज्याची आठवण काढली.. आज्ज्या रे.. लक बदल रे.. माझी काय चुकी झाली रे? इन्डस्ट्रीचा ड्रेस सप्लायर बनायचं हे स्वप्न असलं डेंजर असतं काय रे? मग मला आधीच वॉर्न का नाही केलंस? ते काय नाय, तुला माझ्या मदतीला आलंच पाहिजे.. डांबरसिंगाच्या हातातल्या पेटीवर लक्ष केन्द्रीत करून भारताने जीव खाऊन मनातल्या मनात पेटीचा मंत्र म्हटला, ’वक्त की फितरत खोलले किस्मत खुदपे भरोसा है तो आजमाले अपना लक’!

त्याला फार आशा होती, की असं केल्याने ढग गडगडतील, विजा चमकतील, पेटी उडत त्याच्या हातात येईल वगैरे, पण ढिम्म! तसंलं काहीच झालं नाही! डांबर, पेटी, जॅकेट कोणावरही काहीही परीणाम झाला नाही! चरफडत भारत हात चोळत बसला.. ती पेटी आणि तो मंत्र म्हणजे आज्ज्याने शेवटच्या क्षणी दिलेला फक्त एक टेकू होता, अशी त्याची खात्री पटली.. आपण मेल्यावर आपला एकुलता एक नातू अगदीच उघड्यावर पडूने म्हणून आज्ज्याचा लास्ट मिनिट स्टंत होता म्हणजे!!

इतक्यात त्या बंगल्याबाहेर गाडी थांबली. खुशबू जागी झाली.. आपण भारतच्या खांद्यावर डोकं टेकवून काय गाढ झोपलो होतो, हे जाणवून ती झक्कपैकी लाजली.. त्या परिस्थितीतही भारतला स्फुरण चढलं! पण ते चढूनही आपण नक्की काय करायचंय हे त्याला कळलं नाही.. तो नुसताच खुशबूकडे बघत राहिला.. गाडी थांबल्यावर संटाही जागा झाला..

’ओये, चला, बाहेर या..’ डांबरसिंगाच्या माणसाने त्यांना बाहेर ओढलं.. कसेबसे तोल सांभाळत ते बाहेर आले आणि आसपास निरखू लागले. डांबर पुढे गेला होता.. त्याच्या मागे यांची वरात निघाली.. त्या बंगल्यात प्रवेश करताच समोर दिसला तो भव्य प्रासाद! अगदी सिनेमातलाच सेट- ओम शांती ओममधला, वरच्या झुंबरासकट! मधोमध जाडजूड सोफे ठेवले होते.. त्यात बसला होता चक्क दुसरातिसरा कोणी नाही, तर खुद्द सम्राटसी!

त्यांना बघताच तो उठून बसला आणि स्वागताला पुढे आला..
"डांबर!!!"
"सॅम!!"
दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली..
"मिशन सक्सेस?"
"येस सर! रामू, सत्तू, पक्या, सब खतम.. अब मुंबईपे राज करेगा ये रूपसिंग!! क्या? रूपसिंग! सत्तूके साथ डांबरकोभी मारा मैने! हाहाहा!"
प्रेमाने त्याच्याकडे बघत सॅमनेही गडगडाटी हास्य केलं. "रूप! You are so manly.. I love you for this!"
प्रेमाच्या या उघड कबूलीमुळे रूपसिंगही लाजला.." You naughty boy"
"हे बघ, आता आपण लवकरात लवकर लग्न करायला हवं.. ही दूरी आता फार झाली.. मुंबईवर राज्य तूच कर, पण तुझा एक प्रॉक्सी नेम आणि व्हाईट कॉलर्ड डार्क आणि हॅन्डसम हो पाहू! आता तर कायदाही आपल्या बाजूने आहे.. Lets get married sooooon baby. लग्न थाटामाटात करू.. आता आपल्याकडे आपला हक्काचा ड्रेस डीझायनरही आहे, क्यू भारत?"

भारत खाडकन भानावर आला! ह्या अनोख्या लव्ह स्टोरीमुळे तो अंमळ भंजाळलाच होता.. आयला! तमाम अंडरवर्ल्ड ज्याला घाबरतं तो रूपसिंग ’असा’? हीहीही.. त्याला हसूच फुटलं! च्यायला, मग आपण फाटके असलो तरी बरे म्हणायचे! खुशबूही लट्टू होते आपल्यावर..
"हां हां सॅमजी.. तुमच्या लग्नाचे ड्रेस मीच करणार.. तुम्ही मला खुशबू दिलीत, सिनेमा दिलात, माझा जीवही गहाण टाकीन मी तुमच्यासाठी!" अधूनमधून असे ड्वायलॉक टाकले, की बरं असतं हे त्याला माहीत होतं.. सॅमही इम्प्रेस झाला..

पण खुशबू चित्कारली! "’खुशबू दिली?’ कोणी दिली तुला खुशबू? अं? खुशबू काय भाजी वाटली काय तुला अं की याने घेतली, त्याला दिली? भूल मत, अब मुंबईपे राज रूपका! और रूप कौन? अपुनका मूंहबोला भाय! शरम कर.. मी नाय करणार तुझ्याशी लग्न-बिग्न! ईईई.. मी हीरॉईन आहे कळ्ळं ना.. मी स्वतंत्र नारी आहे, लग्नाच्या बंधनात, चूलमूलसाठी ह्या खुशबूचा जन्म नाही झालेला.. आणि तू आहेस कोण रे? क्या नाम है तेरा? एकदा डोकं टेकलं खांद्यावर, तर तू उडायलाच लागला!! चल, दूर हो जा.." खुशबू त्याच्यापासून लांब जाऊन उभी राहिली.

चार लोकात असा अपमान झाल्यावर भारताचा चेहरा पार पडला..

आता सॅमचं लक्ष गेलं संटाकडे.. तो अजूनही ’सिंग इज किंग’च्या धुंदीतच होता..
गहिवरून सॅम म्हणाला, "संटे, मेरे भाय, मेरे यार! या जन्मात आपली भेट होईल असं वाटलं नव्हतं मला.. रूप डार्लिंग, ते जॅकेट दे त्याला प्लीज.. माझ्या आईची इच्छा होती, ते त्याच्याकडे असावं.. संटे त्यातली मेख तुला सांगतो- तू हे जॅकेट घाल, झिप लाव आणि 'सिंग इज किंग' तीनदा म्हण, आईचा आशीर्वाद मिळतो बघ.. ढगाआडून आई आपल्याला आशीर्वाद देते.. तसा गडगडाट झाला, की घाबरू नकोस, काय? आईला तुझी फार चिंता होती रे.. मेरी भाई, मुझे माफ कर, मी ’असा’ निघालो, पण तुझं कुटुंब तर मजेत आहे ना?"
"हो हो, कोई बात नही ओये! मी, प्रीतो आणि आमचे पाच बेटे अगदी मजेत आहोत यूएसमध्ये.." संटा डोळे मिचकवत म्हणाला.."फक्त आईची कमी होती, तीही आज पूरी झाली.. आई असती तर मात्र आज म्हणाली असती तुला, "माँदा लाडला बिगड गया.."
सगळेच हसायला लागले.. भारतही..

कभी हाँ कभी ना मधला शाहरूख त्याला आठवत होता.. तो त्याच्या आवडता हीरो.. करणबरोबर काम करायचं म्हणजे त्याची ओळख होणारच.. हां, खुशबूचं फक्त काम करायचं, वाकड्या नजरेने तिच्याकडे बघायचं नाही, सुंदर ड्रेस करायचे ह्या परीसाठी.. जाऊदे, आख्खी फ़िलम इन्डस्ट्री पडलीये, खुशबू नाही, तर नाही सही.. आणि खरं तर, या इन्डस्ट्रीतली बायको नकोच.. लहानपणाची आपली मैत्रिणच बरी.. त्याने मनोमन आज्ज्याचे आभार मानले.. पेटीच्या आधारामुळे का होईना, आज लकने त्याच्याकडे काम होतं, बायको मिळाली असती.. त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं.. लकमुळे वक्त बदलून त्याच्या बाजूने सगळंच (एक खुशबू सोडता) झालं होतं!

समाप्त!

(तटी.. सॉरी, फार उत्कंठावर्धक शेवट नाही करू शकले वेळेअभावी.. ज्यांनी भाग घेतला, त्या सर्वांचे हार्दिक मनापासून आभार. भेटूया, पुढच्या सूतकताईत.)

जबरी, जबरी, पूनम!! लई भारी गोळाबेरीज केलीस!!!
आणि खुशबूला मोकळिच सोडलीस, ते बरं केलंस. तेवढीच 'लकशन पार्ट टु' ची सोय!! खुशबूवर पिंजू आपण भरपूर नेक्स्टैम. Happy
पण त्या राम्याला तर मी मारला होता. तो जित्ता कसा काय झाला?
आणि पक्याभाय, आपलं, परकास, माझ्या डांबर्सिंगला इतक्या सहज उडवलास होय रे?? Proud काहीअसो, तु पण लै भारी लिवलेस रे. Happy

चला मंडळी, नवीन पिंजायला तयार व्हा बघू. Happy

हेहेहे, साजिरा, विसरलेच Happy आता बदललंय बघ.. थोडे लूज एन्ड्ज राहिले होते, तेही विणून टाकलेत.
मज्जा आली ना या एसटीवाय-त? Happy

पांशासु:
पण अजून जास्त लोकांनी लिहिलं असतं, तर आवडलं असतं, एस्प. (खर्‍या) यूएसमधल्या लोकांनी. कदाचित नवीन सूतकताई सुरू झालीये तिथे लिहितील..
पांशासं

विणले का शेवटी सगळे Happy
मला त्या भाई भाषेत काही लिहिता येईना, ट्यू ने इकडे आणायचा प्लॅन केला होता पण तेही झाले नाही त्यामुळे लिहिले नाही. Happy

ह्म्म आता तिकडे हिंदी सिनेमाचा मसाला करायला नको. त्याशिवायचं झालं ते तर मजा येईल..

पूनम , शेवट सह्हीच ...!
तो भोभो राहीलाच कि!........आता जाऊदेत(उडत!)
वेळेची मर्यादा होती... नाहीतर अजुन सही रंगवता आली असती पुढे.असो! सर्वांनी मजा आणली! Happy

Pages