जगताप भाऊंचा डंका...

Submitted by गिरिश सावंत on 24 October, 2015 - 03:40

जगताप भाऊंचा डंका...

photo_2015-10-24_13-09-16.jpg

मायबोलीवर आपल्या थीम्स आणि छायाचित्रणाने सर्वांनाच भुरळ घालणार्‍या योगेश जगताप यांची एक संलल्पना सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. दसर्‍याला दारावर नवे बांधल्यानंतर दुसर्‍या दिवशी नवं कचर्‍यात टाकण्याऐवजी घराबाहेर खिडकीला ते एकत्र बांधावे, जेणेकरून बाहेरच्या चिमण्या ते दाणे खाऊन आपले पोट भरतील हा विचार आणि सोबत अशा भाताच्या लोंब्या खिडकीबाहेर बांधल्या असून त्यातून दाणे वेचणारी गोड चिमणी असे छायाचित्र वॉटसप्वर आणि फेसबुकवर व्हायरल झाले आहे.

photo_2015-10-24_13-08-05.jpg

पहिल्या मॅसेजवेळी ‘चांगला विचार’ म्हणून केवळ वाचला. मात्र फॉर्वड करताना छायाचित्राच्या तळाशी असलेला वॉटरमार्क लक्ष वेधून घेत होता. नेहमीच्या कर्श्यूलिपीत योगेश जगताप असे लिहिलेले नाव डोळ्यात भरले आणि अभिमानाने ऊर भरून आला.
योगेशभाई तुमच्या छायाचित्राला सलाम आणि त्या विचारांनाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

काल या मेसेजने खुप धुमाकुळ घातला... एक अतिशय चांगला मेसेज जो नुसता मेसेज न राहता लोकांनी प्रत्यक्ष आचरणात आणला.

छान!

जिप्सी काल खरंच, तुझ्याशी ओळख असल्याचा अभिमान वाटला. बऱ्याच ठिकाणी नुसते विचार होते तिथे मी तुझे विचार आहेत सांगितलं आणि काही ठिकाणी हा फोटो होताच. ज्या ग्रुपवर फोटो नव्हता तिथे मी हा फोटो दिला आणि सांगितलं हा माझा मायबोलीकर मित्र ज्याने विचार मांडलेत हे, आणि हा फोटो. तो उत्तम फोटोग्राफर आहे.

कौतुकाबद्दल मनापासुन धन्यवाद Happy
मी वेगळं असं काही केलं नाही गेल्या २-३ वर्षापासून एक विचार अमलात आणत होतो तोच फेसबुक/ मायबोलीवर शेअर केला. Happy यावर्षी व्हॉट्सअप /फेसबुकवर व्हायरल झाला. आनंदाची गोष्ट हि की लोकांना हा विचार प्रचंड आवडला आणि त्यांनी लगेच तो अमलात देखील आणला. खिडकीच्या ग्रीलला/गॅलरीत टांगुन ठेवलेल्या भाताच्या लोंब्या आणि पक्षी यांचे फोटो काढुन माझ्यासोबत शेअरसुद्धा केले. मायबोलीकर गोळेकाकांनी तर "हा प्रयोग एवढा प्रभावी ठरेल असे वाटले नव्हते!" अशी कमेंट चिमण्यांच्या फोटोसोबत फेसबुकवर शेअर केली. Happy हे सगळं/वाचुन पाहुन प्रचंड आनंद वाटतोय,

जिप्स्या, आनंद आणि कौतूक तर आहेच.. पण एक आठवण आहे.
मालाडला आमच्या दारावर व्हेंटीलेटर्स होती, तिथे चिमण्यांची कायम लगबग असायची. तसेच आमच्याकडे तोरण असे मुद्दाम काढत नाहीत. त्यामूळे चिमण्या त्यावरच यायच्या. मग तोरणातले दोरे पण उचकटून न्यायच्या.
इतकेच कशाला, आई तांदूळ निवडत असली तर न कांडले गेलेले भात, आणि अळ्याही अगदी जवळ येऊन खायच्या.

बाळाची "सांडलेली शिते गोड उचलून" न्यायला अगदी हक्काने यायच्या. पण त्यांचा बाकी काही त्रास नसायचा.

तसेच आमच्याकडे तोरण असे मुद्दाम काढत नाहीत. त्यामूळे चिमण्या त्यावरच यायच्या. मग तोरणातले दोरे पण उचकटून न्यायच्या.>>>>>>दिनेशदा आमच्या इथेही हे अस्संच व्हायच आणि यावरूनच हि कल्पना सुचली. Happy