ज्योतिष्य शास्त्रावरील पुस्तके

Submitted by ऋन्मेऽऽऽष on 17 October, 2015 - 06:07

ज्योतिष्य शास्त्राबद्दल माहिती मिळवण्यास आणि ते शिकण्यास कुठली पुस्तके आहेत?
कुठे मिळतील?
तसेच जालावरील दुवे आहेत का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणकु, नेटवर असन्ख्य साईट्स आहेत. पुण्यात अप्पा बळवन्त चौकात ( बुधवार पेठ ) चन्द्रकान्त शेवाळे यान्चे ज्योतिष्य कार्यालय आहे, तिथे तुम्हाला हवी ती पुस्तके मिळतील.

http://www.maayboli.com/node/1705?page=43 हे पण वाचा.

धन्यवाद रश्मीजी. मायबोलीच्या त्या लिंक मध्ये चांगली माहिती दिसतेय ती वाचेन.
पुण्यात गेलो की नक्की जाईन चंद्रकांत शेवाळे यांच्या कार्यालयात.

तुम्ही म्हणताय हवी ती पुस्तकं मिळतील. इथेच एक गोची आहे.
कोणती पुस्तकं नवशिक्याला हवी (म्हणजे जी चांगली आहेत) तेच माहिती नाही.
जर पुस्तक / लेखकांची नावे कळाली तर उत्तम. नेट वरुन मागवता येतील.

मी पण खूपच नवखा आहे या शास्त्रात , पण तुम्हाला basic शिकयच असेल तर पुढिल पुस्तके सुचवू इच्छितो

1. कुंड्ली तंत्र आणि मंत्र- भाग १ – श्री व दा भट

2. कुंडली तंत्र आणि मंत्र - भाग २ – श्री व दा भट

3. जातकदीप –कै. द्वारकानाथ राजे

कुंडली तयार करण्यासाठी आपल्याला संगणक व सॉफ़्ट्वेअर लागेल. Jaganaath Hora हे सॉफ़्ट्वेअर डाऊनलोड करुन शकता,हे मोफत आहे ..

हि पुस्तके मला श्री सुहास गोखले सरानी सुचवली होती व ती खूप उत्तम आहे..

त्याचप्रमाणे तुम्हांला https://suhasgokhale.wordpress.com/ या ब्लोग मध्ये पण खूप माहिती मिळेल

माणकुजी,

ज्योतिष निश्चितच पुस्तके वाचुन शिकणे सोप्पे नाही. अभ्यासात प्रगतीही होत नाही. ज्योतिष विषयक वर्गाला जाउन त्याचा अभ्यासक्रम अभ्यासुन लवकर प्रगती होते हा वैयक्तिक अनुभव आहे.

पुण्यातले डॉ. धुंडीराज पाठक यांनी अभ्यासक्रमवार एक पुस्तक लिहले होते. प्रत्येक दिवसाचा एक अभ्यासक्रम या क्रमाने शिकता येईल असे सोपे होते. आत्ता नाव आठवत नाही. त्याचा काही उपयोग झाल्यास पहावा.

छंद म्हणून वर्ग ठीक आहे चार दोन नवीन ओळखी होतात.केपीचं खूळ डोक्यात भरवतात.दोन वर्षं हळूहळू शिकवतात कारण बथ्थडांना गणित येत नाही.
काटवे,राजे,देशिंगकर वाचा.कुंडलीची भाषा भाग १-३ वाचा.विंशोत्तरी दशा स्वत: गणिताने काढा.नंतर ओनलाइन omganesh dot com वर दहा सेकंदात सर्व कुंडली नवमांशासह मिळणारच आहे ती साइट वापरा डाउनलोड सॅाफ्टवेर नाही।
पुस्तके वाचून दोन महिन्यांत समजते.छातीठोक भविष्य सांगून त्यावर जातक निर्णय करतील या स्थिथिस येण्यास मात्र खूप काळ जाऊ शकतो हे महत्त्वाचे.स्वत:च्या कुंडलीत चंद्र/बुध द्वितियात तृतियात दशमात आहेत का यावरही ज्योतिष योग आहे का ते कळते.रवि लग्नी असल्यासही फरक पडतो.

स्

"घरचा ज्योतिषी" की अशाच नावाचे प्राथमिक पुस्तक आहे ते आधी घ्या.
पंचांग, त्यावरुन आकाशातील ग्रह्/नक्षत्रे यांचे स्थान समजुन घेणे, ते कुंडलीत मांडले म्हणजे त्या त्या वेळेचा आकाशाचा तो नकाशा म्हणजे कसा ते समजुन घ्या.
निरनिराळ्या ग्रहांचे व राशींचे वैशिष्ट्य, स्वभावगुण, ते ते माणसावर कसे परिणाम करतात ते समजुन घ्या.
वर लिहिल्याप्रमाणे उच्चस्तरावरील पुस्तके जसे की व दा भटांचे ग्रहयोगाबाबतचे, अन्य लेखकांचे महादशांबाबतचे वगैरे पुस्तके जमा करा, अभ्यासा.
एखादी अशी कुंडली घ्या ज्या व्यक्तिचा पूर्वेतिहास माहित आहे. अन त्या कुंडलीतील ग्रहयोगांवरुन मिळणार्‍या फळांचे बाबत पुर्वेतिहासात तशा घटना आढळतात का याचा अभ्यास करा.
हा अभ्यास कधीच संपत नाही. नित्य नवी सूत्रे, आधीच्याच सुत्रांचे नित्य नवे परिणामस्वरुप आकलत जाते.
जोडीने काही साधना सुरू करा. जसे की गायत्रीजप, वा आराध्य दैवताचा जप/स्तोत्र पठन, गणेशाची आराधना करा, सर्वात महत्वाचे म्हणजे नित्य सत्य बोलणे ठेवा, तर वाचेसही सत्यनिष्ठता लाभेल.
आचरण सदाचारी म्हणजेच कुणाचेच वाईट न चिंतणारे ठेवा.
या सर्व बाबींचा संबंध "दुसर्‍याच्या निव्वळ आयुष्यातच नव्हे तर भविष्यात" डोकावुन बघताना येतोच येतो.

याचबरोबर सावधगिरीची सूचना... आगीत हात घातला तर जसा हात भाजतो, तद्वतच काही अनिष्ट कुंडलीमधे खोलवर अभ्यास करताना त्या त्या कुंडलीचे काही कण तुम्हावरही (अंतरात्मा?) परिणाम करु शकतात (संगतदोष?) त्यापासुन वाचण्यासाठी साधना अत्यावश्यक.
तुम्हांस शुभेच्छा.

<<आगीत हात घातला तर जसा हात भाजतो, तद्वतच काही अनिष्ट कुंडलीमधे खोलवर अभ्यास करताना त्या त्या कुंडलीचे काही कण तुम्हावरही (अंतरात्मा?) परिणाम करु शकतात (संगतदोष?) >>
माझे काका म्हणायचे आपण ज्योतिषी ग्रहांची चाडी करतो त्यामुळन आपणाला सुख नाही लाभत.
आश्चर्य म्हणजे या विषयावर आमचे बोलने झाल्यावर मुंबईतील एका मोठ्या नावाजलेल्या कृष्णमूर्ति तज्ञांने आत्महत्या केल्याचे ऐकण्यात आले.
त्यामुळे ति गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आहे
क्रुपया तुमचे म्हणणे अधिक स्पष्ट कराल का