हार्ड डिस्क मधला डेटा रिगेन करण्याबाबत

Submitted by टीना on 12 October, 2015 - 11:48

WD ची पोर्टेबल हार्डडिस्क मी २ ते ३ वर्षांपूर्वी खरेदी केली.. माझी चिंता सुरु झाली ती येत्या दोन तीन आठवड्यापासुन.. झालं असं कि मी नेहमीप्रमाणे हार्ड डिस्क लावून मुव्ही सुरु केला आणि अर्ध्यात तो एक अचानक अटकला. वेगवेगळ्या प्लेअर मधे सुरु करुनही तीच गत.. कंटाळून दुसरा मुव्ही सुरु केला तरी तेच. शेवटी लॅपटॉप मधे कॉपी करुन मग पहावा अस ठरवलं तर तो कॉपी व्हायला तयार नाही.. त्यानंतर तर आता ती हार्डडिस्क लोकेट होणचं बंद झालयं Sad ..

वेगवेगळ्या लॅपटॉप ला लावून बघीतल पण तरीही ती लोकेट होत नाहीए. बर व्हायरस प्रॉब्लेम असेल तर माझा लॅपटॉप सोडून इतर कुठल्याच लॅपटॉपला मी ती कनेक्ट करत नसे. तसा असेल तर फॉरमॅट डिस्क म्हणून मॅसेज आला असता ना ? आणि स्वतःहून करायला ती लोकेटच होत नाहीए.. ओपन होण तर दुरची गोष्ट..

मदत यासाठी मागतेय कि त्या हार्ड डिस्क मधे मुव्हीज, विडीओ सहीत माझे आजपर्यंतचे सगळे फोटोज आहेत.. नाही कशाच तरी निदान मला फोटोज चं तरी बॅकअप हवय.. मला कस काढता येईल ? जवळजवळ १०० ते १२५ जिबी चे फोटो आहेत त्या १ टिबी डिस्क मधे..

प्लीज प्लीज मदत करा ..

काय करु शकते मी ?

> वेगवेगळ्या लॅपटॉपला कनेक्ट करुन पाहिलीए मी..

> कनेक्टर वायर बदलुन बघीतलाय मी.. पण त्या वायर बद्दल जरा साशंकच आहे.. आता विचार करतेय कि अ‍ॅमेझॉन वरुन परत एखादी केबल बोलवावी का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक्सटर्नल हार्ड डिस्क डिटेक्टच होत नसेल, तर तिचे कव्हर ओपन करुन, कव्हरच्या आत मधिल कनेक्टर चेक करावा. (जसे SATA hard disk asel, तर SATA to USB connector asel आत).
त्यासाठी हार्ड डिस्क ही कुठल्या चांगल्या कॉम्प्युटर रिपेअरच्या दुकानात घेउन जा.
एकदा डिटेक्ट झाली की मग अनेक रिकव्हरी सॉफ्टवअर्स आहेत. नक्की किती डॅमेज आहे त्यावर अवलंबुन काही, बराच अथवा जवळपास पूर्ण डाटा रिकव्हर होऊ शकतो.
डाटा महत्वाचा असेल, तर स्व्तः केबल बदलणे या व्यतिरिक्त काही न करता, जाणकाराकडुन करुन घेतलेले बरे.

USB cable च आहे ना? ती केबल कुठेही मिळेल.

फक्त मुवीज असतील तर सोडून द्या पण फोटोच्या आठवणी असतील तर त्या अमूल्य आहेत आणि कसलेही प्रयोग न करता टेक्निकल लोकांकडे द्या ते भरपूर किंमत लावतात पण डाटा मिळतो.

माझीही डब्ल्यूडीच १ टीबी हार्ड डीस्क उडाली होती आणि पोराच्या पहिल्या वाढदिवसापासूनचे सगळे फोटो त्यात होते. २००० रु खर्च आला पण फोटो मिळाले.

आणि आता दोन ठिकाणी हे फोटो सेव्ह करून ठेवले आहेत. डीजिटल डिस्क कधी उडतील याचा नेम नाही.

आशुचँप, अशा प्रकारे हार्डडिस्कवरचा डेटा/फोटोज पुन्हा मिळवून देणारा मुंबईत कुणी खात्रीलायक दुकानाचा पत्ता/संदर्भ आहे का? किती दिवस लागले होते काम पूर्ण व्हायला?

आभार्स Happy

आशा आहे फोटो परत मिळतील!
म्हणजे बॅकअप डिस्क चा बॅकअप घेणे महत्त्वाचे आहे...

माझा या इलेक्ट्रोनिक स्टोरेजवरचा विश्वास उडून गेला आहे!
माझे ही काही फोटो गेले ते गेलेच.

त्यामुळे मी महत्त्वाचा प्रसंग साजरा झाला की मी ते फोटो प्रिंट करतो. पण डिजिटल फोटोज खुप असतात.
म्हणून जुन्या काळातले २ रोल होते असे समजतो. त्यात सुमारे ७२ फोटो बसत.
मग तेव्हढे तेव्हढे निवडक सुमारे ७२ फोटो प्रिंट करून अल्बम मध्ये ठेवतो.

(पण येवढ्यात केले नाहीये. या दिवाळीत हा कार्यक्रम करून टाकतो.)

टीना, ड्राईवचा पोर्ट ही डॅमेज असू शकेल. वेगळ्या ओएस वर ट्राय केलंय का? म्हणजे विंडोज एक्स्पी, ७, ८, ८.१, १०, मॅक इ. कारण मे बी इंटरनल ड्रायव्हर्स चे वर्जन्स वेगवेगळी असतील, अन कुठेतरी एखादवेळेस डिटेक्ट होईल.

रच्याकने, क्लाऊडवर फोटो सेव करणं (प्रोव्हायडेड, तेव्हडी ब्रॉडबँड अपलोड स्पीड असणं + तेव्हढी डेटा ट्रासन्फर लिमिट असणं) हाही एक पर्याय आहे.

माझी मागच्या वर्षी पीसीमधलीच हार्ड डिस्क उडाली त्याचा डेटा कुणीही परत देऊ शकलं नाही. दोन तीन ठिकाणी चौकशी केली तरीही...

सुदैवानं बराचा बॅकप एक्स्टर्नल हार्ड डिस्कमध्ये होता. (त्याच्याही आता दोन कॉपीज केल्या आहेत) फोटो वगैरे लॅपटॉपमध्येदेखील सेव करून ठेवलेत (जागा जाते, पण काय करणार) कामाची काही कमी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आणि कथाकादंबरींचा बॅकप गूगल ड्राईव्ह्ला सेव्ह करून ठेवले आहेत.

फक्त मुवीज असतील तर सोडून द्या पण फोटोच्या आठवणी असतील तर त्या अमूल्य आहेत आणि कसलेही प्रयोग न करता टेक्निकल लोकांकडे द्या >>> अनुमोदन.

डेटा रीकव्हरीसाठी मुंबईतील पत्ते -

https://www.stellarinfo.co.in/locations/data-recovery-mumbai.php यांची देशात बरेच ठिकाणी केंद्रे आहेत

http://www.datarecoverymumbai.com/ -

पैसे मात्र भरपूर मोजावे लागतात.

डेटा रीकव्हरीसाठी पुण्यात टिळक रोड वर एक जण आहेत . थोड्या वेळात देते फोन
माझी पण एक हार्ड डिस्क अशीच झाली होती .
तुझ्या सारखे फोटो होते त्यात . कुठेच लोकेट होत नव्हती .
शेवटी Apple ला लोकेट झाली. Apple ला converter instal करून data मिळवला .
तुला तुझ्या फोल्डरची नावे माहित आहेत का ?
डेटा रीकव्हरीसाठी ती माहित असणे गरजेचे आहे .
डेटा किती आहे त्यावर charges असतात

चिंचवडमधे आहे एक दुकान.. नाव आत्ता आठवत नाहीये... पण ते कुठल्याही हार्ड ड्राईव्ह मधून डेटा रिकव्हर करुन देतात... त्यांच्याकडे पुण्यातल्या बहुतेक सगळ्या आयटी कंपनीचे कॉम्प्स डेटा रिकव्हरीला असतात..

धन्यवाद सर्वांना..
मृणाल, तुला तर खुप खुप धन्यवाद.. टिळक रोड वर जाते आता पुणे गेल्यावर..तत्पूर्वी एकदा यवतमाळ ला कुणी आहे का याचीसुद्धा चौकशी करते..
मृणाल तुझ्याकडून किती पैसे घेतले ?
माझा जवळजवळ १०० ते १२५ जिबी डेटा आहे..
हार्ड डिस्क मधे ड्राईव्ह नै केले मी तयार.. सरळ सरळच सेव्ह केलेत.. मुव्ही एका फोल्डर मधे, फोटो एका फोल्डर मधे इत्यादी Happy

एक तर डिस्क apple ला लोकेट झाली होती . तू पण apple ला connect करून बघ ( कारण माहित नाही पण काम झाले होते )
दुसरीचे पैसे आठवत नाहीत ग

मृणाल १ ,
ओळखीमधे अ‍ॅपल नै कुणाकडं Sad ..

भ्रमर,
माझ्या लॅपीवर उबुंटू होती पण आता ती मी अनइंस्टॉल केली..
मी सुद्धा हाच विचार करत होती कि एकवेळ लिनक्स ला कनेक्ट करुन बघाव.. डेमो मोड शोधाव लागेल कुठ मिळेल का ते..
जवळची सिडी गेली कारण Sad

सल्ल्यांसाठी धन्यवाद Happy

बुटेबल युएसबी वापरून युबंटु वर लॅपटॉप सुरु करता येईल.
आणि तपासता येईल. किमान ४ जीबी ची युएसबी लागेल.

अन्यथा DOS वापरून पाहता येईल.
पण बुटेबल DOS युएसबीवर आता कसे मिळेल याची कल्पना नाही...
कुणाकडे आयडियाची कल्पना असेल तर द्या!

माझे मतः

विंडोज्/लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही एका Basic Input Output System (BIOS) वर काम करत असते. त्यामुळे hardware detection point of view, त्या दोघांमधे विशेष फरक नसावा. ड्राईव्हर चाच काय तो फरक पडेल. म्हणुन फक्त हार्डवेअर चेक करण्यासाठी हे करा:
१. हार्ड डिस्क कनेक्ट करा.
२. कॉम्प्युटर सुरु होताच सिस्टीम BIOS सेटप मधे जा.
३. त्यात Storage devices किंवा Boot setup मधे तुमची डिस्क दिसते का ते पहा.
४. जर दिसत असेल तर वेगवेगळ्या OS (विंडोज्/लिनक्स) मधे ट्राय करु शकता.
५. जर दिसत नसेल, तर वेगवेगळ्या OS (विंडोज्/लिनक्स) मधे ट्राय करण्याचा उपयोग नाही. कारण ती डिस्क hardware लेव्हल लाच दिसत नहिये.

मात्र case 5 मधे, Apple ला नक्की ट्राय करा. Apple हा वेगळ्या प्रकारचा कॉम्प्युटर असतो.

Apple Mac is not a Personal Computer (PC). It is an example of a Desktop computer as is the Personal Computer.

---
कानडा

निनाद..
स्टिल अ‍ॅट होम..पुण्यात गेल्यावर मृणाल ने सांगितलेल्या जागी जाऊन पाहणार..तोवर नै कै सांगता येणार Sad