आमच्या घराबाहेरच्या आवारात ५-६ ढोली असलेले आंब्याचे पुरातन झाड आहे. खंड्या, हळद्या, कोकिळा, कावळे, हॉर्नबिल यासारखे अनेक पक्षी सकाळची कोवळी उन्हे अंगावर घ्यायला, तसेच निवांत व्हायला ह्या झाडावर बागडत असतात. तसं पाहील तर ह्या झाडाला साळुंखी पक्षांची वसाहत म्हणू शकतो. कारण झाडावरच्या ढोलीमध्ये साळुंखी पक्षांची कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत असतात. हे पक्षी इतरत्र वावरतानाही जोडीने किंवा घोळक्याने दिसतात. क्वचित एखादा भरकटून किंवा भांडून-रागावून एकटा फिरताना दिसतो.
माझ्या निरीक्षणानुसार वेगवेगळ्या मूडनुसार ह्या पक्षांच्या आवाजात चढ-उतार असतो. सकाळी चांगल्या मूड मध्ये असले की त्यांचा संवादातून गोड आवाजाची कुजबुज ऐकू येते. काही वेळाने बहुतेक त्यांचा ऑफिस टाइम झाल्यावर घाई-गडबडीचा आवाज येतो. ह्यावेळी आवाजाची पट्टी बेताची पण घाई-गडबड चालू असल्यासारखे वाटते. दिवसभराच्या पोटापाण्याची सोय करण्याची लगबग ना ह्यावेळी. कधी कधी कर्कश्यही आवाज काढतात. ह्यांच्याच वसाहतीतली भांडणे अजून काय? ह्यांचा कोणी दुश्मन आला की मात्र एकदम कर्णकर्कश्य आवाज काढतात.
एक दिवस रविवारी घरी होते तेव्हा ह्या पक्षांचा कर्कश्य किलकिलाट ऐकू आला. नक्कीच काहीतरी गडबड आहे काहीतरी वेगळे टिपायला मिळणार असे वाटून कॅमेरा उचलून मी पाहायला गेले तर एका ढोलीच्या भोवती ४-५ साळुंखी जमा होऊन त्यात टोकवून पुन्हा वर मान करून एकमेकांशी भांडत होते. ढोलीत एक गोणपाटाचा तुकडा होता. त्यावरूनच काहीतरी भांडण चालू असावे. मी जवळ जाऊन फोटो काढू लागले. मला वाटलं मला पाहून घाबरतील आणि वर्गात टिचर आल्यावर शाळेतली मुलं जशी एकदम गप्प बसतात तशी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून घाबरून बसतील. पण मला तीळभरही न घाबरता ह्या जिथल्या तिथे भांडत होत्या. मला कितीही वाटले की ह्यांचे भांडण आपण आटोक्यात आणावे तरी त्यांचा संवाद समजायला हवा ना. आपण काहीच यांच्यात लुडबूड करू शकत नाही हे जाणून मी आपले त्यांचे फोटो काढण्याचे काम करू लागले. काही वेळाने तर कहरच झाला भांडण वाढून दोन साळुंख्यांची उडत उडत पंख फडफडवत हवेत कुस्ती चालू झाली. हवेत तोल न राहिल्याने दोघी जमिनीवर पडून लढू लागल्या. मग आपोआप शांत झाल्या. त्यांच्यापैकी कोणी जिंकले-हरले की त्यांनी समझोता केला माहीत नाही. पण बर्याचदा असा चिवचिवाटही असतो ह्यांचा. भांडणात कर्कश्य आवाजही काढतात ह्या मध्येच.
आमच्या आजूबाजूच्या परिसरात हिरवाई, गवत आहे त्यामुळे काही सापांच्या जातीही इथे आपल्या पोटापाण्यासाठी हिंडत असतात. पावसाळी,हिवाळी बेडूक-उंदीरांची मेजवानी संपली की पक्षांच्या अंड्यांसाठी हे साप विशेषकरून धामण सारखे जनावर झाडांवर लक्ष ठेवून असतात. आमच्या आवारात जेव्हा हे साप भक्ष्याच्या शोधात येतात तेव्हा साळुंख्यांच्या नजरेस पडताच त्या कर्णकर्कश्य ओरडू लागतात. ५-६ साळुंख्यांच्यामध्ये एखादा कावळाही काव-काव करत असतो. असा आवाज आला की साप आला हे आम्ही लगेच समजतो. ह्या साळुंख्या इतक्या धीट असतात की साप मोकळा दिसताच त्याला टोचायला जातात. आपल्या चोचीने सरपटत्या जनावरावर हल्ला चढवीत असतात. सापही ह्या साळुंख्यांना घाबरून आड जाऊन लपतात. उन्हाळ्यात असे दृश्य आम्ही वारंवार पाहतो.
पण मागच्या उन्हाळ्यात एक वेगळेच दृश्य पाहिले. एक धामण जातीचा साप साळुंख्यांच्या ढोलीजवळ २-३ दिवस येत होता. साळुंख्या त्याला टोचून टोचून पिटाळून लावायच्या. हे झाड आमच्या घराच्या शेजारीच असल्याने आम्हीही धास्तावलोच होतो. घराच्या खिडक्या-दरवाजे कायम बंदच ठेवत होतो. असे साप अगदी घराच्या जवळ असले की आम्ही लगेच सर्प मित्रांना बोलावतो. पण एक दिवस रात्रीच हा साप ढोलीच्या झाडावर आला. सर्पमित्रांना फोन केला तर सर्प मित्र त्या दिवशी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. साळुंख्यांचा आक्रोश चालू होता. आम्ही घरातील लहान-थोर सगळेच खिडकीजवळ धास्तावून टॉर्च च्या साहाय्याने धामणीवर नजर ठेवून होतो. साळुंख्याच्या चोचींचा वार हुसकावत धामण सरकत सरकत ढोलीत गेली. त्या ढोलीची मालकीण आता मात्र अधिकच उग्र रूप धारण करून डायरेक्ट त्या धामणीच्या तोंडाजवळ वार करायला लागली. हे दृश्य पाहताच आमच्या घरातील काही मंडळी त्या धामणीला त्या ढोलीपासून परावृत्त करण्यासाठी बाहेर आवाज करू लागली. ढोली खालीही नाहीत जरा उंचच आहेत त्यामुळे काठी वगैरे मारणेही शक्य नव्हते. काही केल्या धामण आणि साळुंखी दोन्ही जागचे हालेनात. दोघांच्या झुंजीमध्ये शेवटी धामणीने त्या साळुंखीला तोंडात पकडले. आता तर कोणीतरी त्या धामणीवर दगडही मारण्याचा प्रयत्न केला ती साळुंखी त्याच्या तावडीतून सुटावी म्हणून, पण सगळे प्रयत्न व्यर्थ होते. इतरवेळी माणसाची चाहूल लागताच दूर पळणारे हे साप आज इतका आवाज आणि दगड झेलूनही आपल्या भक्ष्यापासून परावृत्त होत नव्हता. शेवटी त्या धामणीने त्या वीर साळुंखीला शेपटीपासून डोक्यापर्यंत हळूहळू गिळलेच. आम्हा सगळ्यांचा हे दृश्य पाहताना थरकाप उडाला.
त्या रात्री आम्ही शांत झोपू शकलो नाही. मनात सारखे येत होते का ती साळुंखी उगाच त्या धामणीशी भिडायला गेली. पण लक्षात आलं की त्या साळुंखीचा जीव त्या ढोलीत अडकला होता, कदाचित तिची पिले किंवा अंडी त्यात असतील. शेवटी प्राणापेक्षा प्रिय आपली पिले असणारी आई होती ती. काही दिवस ह्या घटनेने मन खूप अस्वस्थ होत. आम्ही खूप दूषणे लावली त्या धामणीला पण नंतर विचार केला, सापासाठी ते भक्ष्य अन्न होते. उन्हाळ्यात जमिनीवरचे बरेचसे भक्ष्य कमी झाल्याने हे साप आपली उपजीविका चालविण्यासाठी हा मार्ग अवलंबतात. निसर्गचक्रातील अन्नसाखळी पुस्तकात वाचलेली त्याचे प्रात्यक्षिक पाहीले.
दिनांक ११ ऑक्टोबर, २०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशीत.
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/samwad/dholi/articleshow/493...
मस्त लिहीलंयस, जागू!
मस्त लिहीलंयस, जागू!
जागू, फारच सुरेख वर्णन केलंय.
जागू, फारच सुरेख वर्णन केलंय. तो शेवटचा प्रसंग वाचताना अक्षरशः डोळ्यापुढे आलं चित्रं. बिचारी साळुंखी.
मस्त लिहिलंय. 'राडा' आठवला
मस्त लिहिलंय. 'राडा' आठवला
छान लिहिलंय. गावाची आठवण
छान लिहिलंय.
गावाची आठवण झाली.
गावी पक्षी खाणारे साप पाहिलेतच, तसेच साप खाणरे पक्षीही पाहिलेत.
समोर संथपणे सरपटणारा साप अचानक पळ काढु लागला की वर पहावे. झपझप उतरणारी घार दिसेल.
कधी साप बिळात / खोबणीत शिरण्यास यशस्वी होती, तर कधी घार त्याला अलगद एका पायात उचलुन वर उडुन जाते. कधीकधी घारीने पकडलेला साप आपली सुटका करण्यात यशस्वी होतो आणि उंचावरुन खाली पडतो, आणि तशाही स्थितीत पळ काढत बिळ शोधतो.
मस्त लिहीलंय जागू पण शेवटचा
मस्त लिहीलंय जागू पण शेवटचा पॅरा ... हम्म्म्म्...
मस्त !
मस्त !
रायगड, मामी, मित, मंजूताई
रायगड, मामी, मित, मंजूताई धन्यवाद.
मानव आमच्याइथे घारी फिरतात पण हे दृश्य नाही पाहीले अजून.
कालच एक चातक पक्श्याच्या चोचीतून एक चतूर आमच्या टेरेसवर पडलेला मी प्रत्यक्ष पाहीला.
मस्त लिहलयसं!
मस्त लिहलयसं!
जीवो जीवस्य जीवनम्
जीवो जीवस्य जीवनम् ....
लेखांकन सुरेख ...
मस्तच
मस्तच
सुरेख लिहीलंयस, जागू! शेवटचा
सुरेख लिहीलंयस, जागू! शेवटचा प्रसंग खरंच चट्का लावणारा..
उत्तम निरीक्षण आणि लेखन. खूप
उत्तम निरीक्षण आणि लेखन. खूप आवडले.
"जीवो जीवस्य जीवनम् ...."----अगदी खरंय.
मस्तचं लिहिलंय जागूताई.
मस्तचं लिहिलंय जागूताई.
जागू, सुंदर लेख! बिचारी
जागू, सुंदर लेख!

बिचारी साळूंखी आणि ढोलीतले जीव!
छान लेख जागूताई. शेवटचा
छान लेख जागूताई.
शेवटचा प्रसंग अगदी चटका लावणारा आहे.. बिचारी साळुंखी.
जबरदस्त लिहीलंय !
जबरदस्त लिहीलंय !
छानच लिहीलय जागू.
छानच लिहीलय जागू.
चनस, शशांकजी, मयुरी, आत्मधनु,
चनस, शशांकजी, मयुरी, आत्मधनु, पद्मावती, नरेश, शोभा, डिंपल, दिनेशदा, भगवती धन्यवाद.
लेख चान्गला आहे, पण शेवट
लेख चान्गला आहे, पण शेवट वाचुन वाईट वाटले ग.:अरेरे:
मस्त लिहिलय!
मस्त लिहिलय!
बिचारी साळूण्की. तिने लढा
बिचारी साळूण्की. तिने लढा देताना जीव गमावला खरा पण तिच्यां नंतर तिच्या पिल्लांची काही खैर नहै. सांपाने त्यांनाही गिळले असणार.तः(
जागुले किती सुंदर लेख..
जागुले किती सुंदर लेख.. बिचारी साळुंखी .. पिल्लांकरता धामणीवर हल्ला करणारी शूर वीर आई.. हॅट्स ऑफ!!
मस्तच लिहिलेलं जागू
मस्तच लिहिलेलं जागू
रश्मी,, स्वाती,
रश्मी,, स्वाती, साधना,वर्षुताऊई, टीना धन्यवाद.
शेवट
शेवट
मस्तय! डिस्कवरी अन नॅशनल
मस्तय! डिस्कवरी अन नॅशनल जिओग्राफिक चॅनेल घरासमोर ..
शेवटाबद्दल वाईट वाटणे साहजिकच आहे .. भले तो निसर्गनियम असला तरी
माय गॉड. बापरे, शहारा आला.
माय गॉड. बापरे, शहारा आला. लेख छान आहे.
निसर्गचक्र अगदी जवळून बघता
निसर्गचक्र अगदी जवळून बघता आलं.नंतर सापाचंही एकदा तेच होतं.याच साळुंक्या चिमण्यांची हीच हालत करताना पाहिलं आहे.खिडकीत एक बुटाचं खोकं भोक पाडून बांधलं होतं चिमण्यांसाठी.अधूनमधून येऊन ते उसकटायला यायच्या साळुंक्या तेव्हा कलकलाट व्हायचा.
आपल्या पिल्लांना वाचविण्याची
आपल्या पिल्लांना वाचविण्याची एका आईचे शर्तीचे प्रयत्न.....हे फक्त आईच करू शकते. अतिशय बोलक्या शब्दात मांडलय तू ताई....
जागू , किती छान लिहीलयस
जागू , किती छान लिहीलयस ग.
Pages