Submitted by सत्यजित... on 4 October, 2015 - 16:00
ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची...
दररोज येत नाही ही रात चांदण्याची!
हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री...
दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची!
कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे...
कवळून जा उराशी तादात चांदण्याची!
येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या...
स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची!
स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती...
घेवून रात ये तू दारात चांदण्याची!
आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!
डोकावतेस जेंव्हा अरश्यात..नाहल्यावर...
क्षणभर छबी तरळते अरश्यात चांदण्याची!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! मस्त.. हिणवून काल
वाह! मस्त..:)
हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री...
दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची!.... मस्त !
स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या
स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती...
घेवून रात ये तू दारात चांदण्याची!<<< सुरेख!
गझलेची जमीन फार आवडली.
काही ठिकाणी खयाल अधिक गहिरे, मोहक करता आले असते असे वाटले.
धन्यवाद माउ! धन्यवाद
धन्यवाद माउ!
धन्यवाद बेफिकीरजी!
आपल्या प्रतिसादांत,गझल हाक मारत असल्याचा...मदतीचा,सोबतीचा हात समोर करत असल्याचा अनुभव येतो!
त्याबद्दल विशेष आभार!
सत्यजित, खरच खूप आवडली
सत्यजित, खरच खूप आवडली जमीन... समोर बसून बोलल्यासारखा आहे लहजा.. आवडली रे
शेवटचा शेर आणि जमीन खूप छान
शेवटचा शेर आणि जमीन खूप छान
धन्यवाद दाद,नएकु!
धन्यवाद दाद,नएकु!
शेवटचे दोन शेर काल सुचल्याने
शेवटचे दोन शेर काल सुचल्याने संपादित!
सुरेख गझल!
सुरेख गझल!
अप्रतिम..
अप्रतिम..
खुप संदर...
खुप संदर...
बात चांदण्याची आवडली
जबरी सत्या.. मस्त गझल.
जबरी सत्या.. मस्त गझल.
आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची! .. >> हा शेर विशेष आवडला.
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
मस्तच....
मस्तच....
धन्यवाद शशांकजी!
धन्यवाद शशांकजी!
आलीस ना छतावर... बेफाट
आलीस ना छतावर... बेफाट देखण्या ओळी .संपूर्ण गझल सुंदरय .
माणिकजी धन्यवाद!
माणिकजी धन्यवाद!