दुपारच्या जेवणानंतरचे तीन तास

Submitted by हर्ट on 1 October, 2015 - 06:19

पुर्वी दुपारचे जेवण झाले की मी शतपावली घेऊन आल्यावर मला फार फार तर थोडे पेंगायला व्हायचे पण हल्ली जेवण झाल्यानंतर खूपच अस्वस्थपणा येतो. पेंगायला होत नाही पण तो जो अस्वस्थपणा असतो तो काहीतरी वेगळाच असतो. माझी बीपी अगदी नॉरमल आहे. कोलेस्टेरोलसुद्धा नॉरमल आहे. आहार साधाच असतो. हा अस्वस्थपणा तीन ते चार तास चालतो. उन्ह उतरले की मग जरा बरे वाटते. बाहेरचे हवामान उष्ण असले की अजूनच त्रास होतो. दिवस बुडाला की बरे वाटते. हा बदल होण्यामागे काही कारण आहे का? जेवण झाल्यानंतर मी कधी ब्लड प्रेशर मोजले नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल, रक्ताभिसरणाचा वेग कमी जास्त होतो आहे असे जाणवते. चालताना आपले शरिर आपण ओढून चालतो आहे असे वाटते. नक्की शब्दात मांडता येत नाही पण असे काहीसे.

नाही मरगळल्यासारखे नाही आणि सुस्वावल्यासारखेही नाही. एकदम वेगळेच फील येते.

मानव, प्राथमिक चौकशी इथे कराविशी वाटली. ह्याचा एक फायदा असा होतो की डॉक्टरांना नक्की आपल्याला काय होत आहे हे सांगता येत. मला तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना नक्की कसे सांगावे हाच प्रश्न नेहमी पडतो.

जेवणानंतर पचनसंस्थेकडे जास्त रक्त डायव्हर्ट होते. त्ञामुळे इतर अवयवाना रक्त कमी पोचते व सुस्ती येते.

अशा वेळी सरळ टेबल खुर्चीवर किंवा आरामखुर्चीत बसून अर्धा तास झोप काढणे.

सध्या डे व नाइट दोन्ही डुट्या असल्यणे मलाही असे जाणवते . मी खुर्चीत बसून अधा तास झोप घेतो. ( लंच अवर एक तासाचा असल्याने तो त्यात कव्हर होतो. )

थकवा आला म्हणून चहा पिऊ नये. अधुनमधुन पाणी प्या.

'वेगळा फिल' म्हणजे ज्याला कलकलणं(चक्कर आल्यासारखी वाटते, पण शांत नुसते डोळे मिटून झोपावे वाटेल अशी चक्कर नाही, ऑक्सीजन कमी पडल्यावर श्वास घेताना वाटेल किंवा पाण्यात बुडताना तगमग होईल तसं काही तरी) म्हणतात ते का? लो बीपी मध्ये होतं असं वाटतं. मला बारावीत असताना दात काढल्यावर झालं होतं. (मी डॉ नाही, निदान करत नाही,सामान्य अंदाजपंचे प्रतीसाद.)
एकंदर वर्णनावरुन मायग्रेन,लो बीपी किंवा डायबेटीस संबंधीत वाटते आहे.

लबाड कोल्हा - मी भरपुर पाणी पीत राहतो दिवसभर. आणि चहा फक्त पहाटे तोही गवती चहा. इथे गवती चहा विपुल मिळतो.

अनु, खूप छान उत्तर लिहिलेस. माझे डोके कधीच दुखत नाही. त्यामुळे मायग्रेन नसावा. लो बीपी किंवा डायबेटिक्स आहे का माहिती नाही. हे आहे की नाही हे कळायला बीपी आणि रक्त चेक केले तर पुरेसे होईल का?

बीपी आणि रक्त चेक केले तर पुरेसे होईल का?>>> तुम्ही एखाद्या तज्ञ डॉक्टरकडुन पुर्ण बॉडी चेक अप करा.

ढेकरा वगैरे येतात का?
रक्ताभिसरणाचा वेग कमी जास्त होतोय असे वाटते म्हणजे काय़? :o
palpitations जाणवतात का? मुंग्या आल्यासारख / झिणझीण्या आल्यासारखं वाटतं का?

फक्त लक्षणं माहिती. निदान्/टेस्ट्/उपाय तिन्ही नाही, त्यात तज्ञ मार्गदर्शन करतीलच.
एकदा सुट्टीवर ट्रिपमध्ये हॉटेलात असताना दुपारी चाळीस मिनीटे पोहल्यावर वीस मिनीटे स्टिम घेण्याचा मूर्खपणा केला होता (कोणालाही न विचारता) तेव्हा अशी अवस्था झाली होती. स्पा मध्ये डॉ. होती तिच्याकडून मागून २ चमचे साखर खाल्यावर नॉर्मलला आले. (हा डॉक्टरी उपाय नाही, त्यावेळी इट वर्कड फॉर मी.)
गरम+दमट हवेशी संबंधीत.

बीपी आणि रक्त चेक केले तर पुरेसे होईल का?>>>>>

अहो जनरल चेक अप / प्रिव्हेन्टिव्ह मेजर म्हणुन आपले बिपी तपासून घेणे अथवा लिपिड प्रोफाईल / शुगर चेक करुन घेणे हे ठीक आहे. पण तुम्हाला काही त्रास होतोय तर स्वतःच चेक कप करण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने करा.
जर तुम्ही चेक केले आणि नॉर्मल आले तर पुढे काय करणार? आणि नॉर्मल नसेल तर काय करणार? डॉक्टरांना भेटणारच ना?

भरपुर पाणी पीत राहतो दिवसभर असं लिहिलंय्स खरे पण दमट आणि उष्ण हवेमुळे क्षार कमी पडत असतील . नुसते पाणी पिण्याऐवजी ईलेक्ट्रॉल सारखे काहीतरी थोडेसे पाण्यातून घेऊन फरक पडतोय का बघ.

अवांतर - बाहेरच्या देशात रहात असताना डॉक्टरांना आपल्याला काय होतंय हे कसे सांगयचे हा मोठाच प्रश्न असतो. मलाही पोटात डचमळतंय, कणकण वाटत्ये अशी लक्षणं इंग्रजी मधून कशी सांगायची हा मोठाच प्रश्न पडतो.
तुला ते नीट सांगता यावे म्हणून इंग्रजी शब्द हवेत का

.

अस्वस्थपणा येतो : Feeling Uneasy. Do not Feel Normal
पोटात डचमळतंय: Nauseating Feeling. Feels like Vomiting
कणकण वाटत्ये : Feeling Feverish, (may have Body ache)

बी, तूझा फेसबूकवरचा ताजा फोटो बघितला, तब्येत खुप खालावल्यासारखी वाटतेय. भारतात आलास कि एकदा पूर्ण चेक अप करून घे. सध्या बहुतेक आजारांवर इलाज आहेत पण ते योग्य आणि योग्य वेळीच घ्यायला हवेत.

तसेच कधी कधी ट्रीटमेंट चालू केल्यावर, त्याचा योग्य तो परीणाम होतो आहे कि नाही, ते बघायला परत काही टेस्ट्स कराव्या लागतात. तेव्हा सवड काढूनच्ये.

काहीही झालेला नाही आहे हो बी तुम्हाला, जास्ती चा विचार करताय तुम्ही, रोज तर अगदी नॉर्मल दिसता...

No offence to anyone, but during my stay in Singapore I observed that many Indian avoid going to doctor in SG and take some medicines they bought from India. They will go for doctor visit on their trip to India. I think this is very dangerous sometimes.

राहुल, रक्त तपासणीमधे काहीच निघाले नाही. मी अगदी अनाशापोटी गेलो होतो. साखर जी ० ते ६ च्या मधे असावी लागते ती ४.६ आहे. म्हणजे साखर नाही आहे. आणि कोलेस्टेरोल चा तर मला कधीच प्रश्न आलेला नाही. पुर्ण लिपिड अगदी योग्य आहे. ब-१२ सुद्धा रेन्ज मधे आहे. हिमोग्लोबीन सुद्धा १४ आहे. डी जीवनसत्व सुद्धा चांगले आहे. फक्त युरिक अ‍ॅसिड थोडे कमी आहे.

रक्त तपासणी मध्ये काही निघाले नसेल तर एक दिवस Antacid ची गोळी घेवून बघा काही फरक पडतोय का ?
फरक पडला तर डॉ ना पण पुढची दिशा मिळेल.
एक जणाचा अनुभव आहे म्हणून सांगतीये .